#valentines Week निमित्त 🌹 "समाजात गांधी विचारांच्या माध्यमातून #प्रेम कसे वाढवावे" ❤️ या विषयावर विचार मांडण्याची संधी मिळाली. झील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी भोंगवली गावात NSS कॅम्प साठी आले होते. सन्मित्र अविनाश पवार आणि विशाल ताठे यांच्यामुळे मला या इंजिनिअरिंग च्या आणि शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
मीही बी फार्मसी ला असताना #NSS मध्ये होतो ते दिवस आठवले.
इथे मुलांनी स्वतः बनवलेले जेवण बढिया होते..हे विद्यार्थी शाळेची जुनी इमारत paint करून देत होते.
व्याख्यानाला जाताना मुद्दामून 20 कॅडबरी अविनाश ला घेण्यास सांगितले होते. त्यातील 5 कॅडबरी व्याख्यान सुरु असताना माझ्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या साठी तर 15 कॅडबरी मला प्रश्न विचारणाऱ्या साठी. त्यामुळे सेशन मध्ये मजा आली, भरपूर प्रश्न आले.
आपल्या इथे अनेक ठिकाणी "प्रश्न विचारू नका, गप्प बसा" वगैरे संस्कृती आहे. त्यामुळे अनेक जण अंधपणे काही गोष्टी अनुकरण करत राहतात. तर्क आणि चिकित्सा न केल्यामुळे बौद्धिक विकास आणि नवीन संशोधन ही होत नाही. त्यामुळे माझा याला प्रोत्साहन देण्याचा थोडा प्रयत्न असतो. यात कुठलाही प्रश्न टाळत नाही उलट याच्यामुळे आपल्याला आपला अभ्यास किती झाला आहे आणि अजून किती करायचा आहे हे शोधण्याचीही संधी मिळते. अधिकाधिक तयारी करता येते.
सध्या समाजात प्रेम आणि #संवाद वाढवण्याची खूप गरज आहे. लोक एकमेकांच्या पासून अधिकाधिक दुरावत चालले आहेत. आपण जेव्हा एखाद्या जातीचा , धर्माचा #द्वेष करतो तेव्हा हळु हळू तो द्वेष आपल्या मनात ही उतरतो आणि त्यानंतर तोच द्वेष गावात , घरात ही पसरतो. त्याला उत्तर दुसऱ्याने प्रती द्वेष करणे हे नाही तर प्रेम पसरवणे हेच आहे. ❤️
पण जवळपास सतत भीषण काही तरी घडत असताना आणि इतिहासापासून हिंसा, युद्ध याची उदाहरणे असताना प्रेम फक्त बोलून चालत नाही? त्यासाठी त्यावर चालणाऱ्याची अनुकरण करता येईल अशी जवळपास ची उदाहरणेही लागतात . #गांधी हे त्यातील सगळ्यात जवळचे आणि प्रेमाचे सर्वात मोठे उदाहरण. त्यामुळे त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना सोबत आईन्स्टाईन, स्टीव जॉब्स, जॉन लिनन आणि वेगवेगळ्या लोकांनी गांधी विचारातून प्रेरणा घेऊन जगात आणि स्वतः त काय बदल घडवले त्याबद्दल गप्पा मारत मांडणी केली. त्यांच्याबद्दलचे गैरसमज आणि सत्य याबद्दल सांगितले.
हे झाल्यावर शेवटी सर्वाकडून #पंचसूत्री ची शपथ घेतली. मला आत्ता तरी समाजात 5 प्रमुख समस्या दिसतात त्यामुळे जिथे जाईल तिथे त्यावर शपथ देत असतो. म्हणजे सगळेच पाळतील असा माझा बिलकुल दावा नाही पण 1% लोकांनी जरी पंचसूत्री अमलात आणली तर माझ्यासाठी पुरेसे आहे. आणि परिणाम होतच नाही असा नाही. मला लहानपणी कोणी तरी अशीच दारू, सिगरेट, गुटखा वगैरे न ग्रहण करण्याची शपथ दिली होती जी आजपर्यंत मोडू शकलो नाही. पण मी संकल्प थोडे वेगळे देत असतो ते खालील प्रमाणे..
पहिली समस्या भेदभावाची . जात, धर्म, पंथ, वर्ग, रंग, लिंग वगैरे अनेक गोष्टीवरून लोक काहींना कमी लेखतात तर काहींना जास्त आदर देतात. सर्वांशी समानतेने वागत नाहीत. ( 1.मी कधीही कुणाला त्याची जात धर्म पंथ वर्ग लिंग रंग या गोष्टीवरून कमी लेखणार नाही, सर्वांशी समानतेने वागेन)
दुसरी समस्या आहे फसवणुकीची.आज स्वार्थीपणा, धरसोड प्रवृत्ती खूप वाढली आहे ज्यामुळे लोक फसवणूक करतात त्यातही बाहेर आपण सावध असतो पण नात्यात जिथे विश्वास ठेवतो तिथेच काही लोक थोड्या स्वार्थासाठी घात करतात . घटस्फोट वाढले, भावंडात कलह वाढले , आई वडिलांना किंवा मुलांना उघड्यावर सोडून देण्याचे प्रमाण वाढले ते याच स्वार्थी वृत्तीमुळे त्यामुळे याबद्दल एक शपथ ( 2. मी कधीही कुणाला नात्यात फसवणार नाही. महिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करेन)
तिसरी समस्या व्यसनाची- अनेक संसार दारू आणि अमली पदार्थाच्या व्यसनाने बरबाद झाले. जेवढे अपघात होतात, गुन्हे घडतात ( खून, महिलांवरील अत्याचार आणि अन्य गुन्हे) त्यातील बहुतेक ठिकाणी व्यसन मोठे कारण असते ज्यामुळे नाहक व्यसनी व्यक्ती सोबत इतरांनाही त्रास होतो, त्यांचा बळी जातो.( 3. मी कधी कुठले व्यसन करणार नाही. करत असेल तर ते हळूहळू सोडेल)
चौथी समस्या असत्य प्रसाराची- लोक ऐकलेली खोटी गोष्ट दुसऱ्याला सांगतात त्यामुळे गैरसमज तर वाढतातच पण दंगली सुध्दा होतात. पालघर मध्ये साधू मारले गेले ते याच चुकीच्या व्हॉट्सॲप मेसेज मुळे की "ते साधू मुल पळवायला आले आहेत" ज्यामुळे लोकांनी चिडून त्यांची हत्या केली.(4. मी कधीही कुठलीही बातमी, कुठलाही मेसेज सत्य पडताळणी केल्याशिवाय दुसऱ्याला सांगणार नाही, forward करणार नाही)
पाचवी मोठी समस्या आहे हिंसक दंगलीची. धर्मांध लोक स्वतः सुरक्षित राहतात पण सामान्य लोकांना धर्माच्या नावावर भडकवून एकमेकांच्या विरूद्ध दंगली घडवतात. त्यामुळे गाव, राज्य आणि देश उध्वस्त होऊ शकतो त्यामुळे हिंसक दंगलीत सहभाग न घेण्याचा शेवटचा संकल्प (5. मी कधीही कुठल्या हिंसक दंगलीत सहभागी होणार नाही.)
प्रश्न भरपूर आले जसे की एका मुलीने सांगितले. की गोडसेला दहशतवादी का म्हणता? तो तर गांधीजींचा भक्त होता ना ? पूर्वी अनेक वर्षे गांधीजींच्या सोबत राहिला पण त्याला त्यांचे विचार आणि आचरण नाही आवडले म्हणून हत्या केली त्याने? तिला ही खोटी गोष्ट कोणी सांगितली? माहित नाही पण अश्या बऱ्याच बनावट कथा युवा पिढी पर्यंत पोहोचवल्या जात आहेत..उत्तर देताना मी सांगितले की गोडसेने कधीही गांधीजींसोबत संवाद साधला नाही . तो एक आठवडा जरी गांधीजी सोबत राहिला असता तरी आतून बाहेरून बदलला असता पण त्याने कधीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. मनातील गैरसमजामुळे गांधीजींचा खून करण्याची इच्छा बाळगणारे अनेक जण होते पण जेव्हा हे लोक गांधींना भेटले तेव्हा आतून बाहेरून बदलले.
एकाने मिलिटरी बद्दल प्रश्न विचारला मिलिटरी म्हणजे हिंसेची आवश्यकता आहे म्हणजे गांधीजी अहिंसा उपयोगाची नाही ना? त्याला तात्विक अहिंसा आणि गांधीजींची अहिंसा यातील फरक सांगितला. गांधींनी कधीही देशाला मिलिटरी नको म्हणून उपोषण केले नाही उलट कश्मीर मध्ये पाकिस्तान ने घुसखोरी केली तर सैन्य पाठवून त्याला चोख उत्तर द्या असे सांगणारे गांधी होते. पण जगात अनेक देश आहेत ज्यांच्या boundry वर मिलिटरी नाही तिथे गांधी विचार यशस्वी झाले आहेत. आपण आणि आपल्या शेजारच्या देशाने ठरवले तर आपला बराच मिलिटरी चा खर्च वाचू शकतो. पण दोन्ही बाजूंच्या राजकीय व्यक्तींना हा संघर्ष हवा असतो.
मला यानिमित्त मागच्या वर्षी शाळेतील एका चिमुकल्या मुलाने विचारलेला प्रश्न आठवला. गांधींकडून जगभर एवढ्या लोकांनी प्रेरणा घेतली पण गांधींना कोणी बरं प्रेरणा दिली? ❤️❤️
यात मी हिंसा आणि अहिंसा यातील फरक समजावून सांगताना विद्यार्थ्यांना काही प्रयोगही सुचवत असतो. तुमच्यातील ज्यांना आपल्या वडीलांच्या दारू पिण्याचा त्रास होतोय तुम्ही ठरवले तरी त्यांच्या विरूद्ध हिंसा करू शकता का? नाही ना? पण गांधी मार्गाने उपवास किंवा अन्य गोष्टी करून बघा. डॉ. विवेक सावंत सरांनी काही ठिकाणी या प्रयोगातून बदल घडवले आहेत. अनेक पालक आपल्या पाल्याच्या प्रेमामुळे व्यसन सोडू शकतात पण त्यांना ती जाणीव देण्यासाठी पाल्याकडून तेवढीच मेहनत लागेल.
यात सध्याच्या वाढत चाललेल्या हिंसेबद्दल ही काही ठिकाणी प्रश्न आले. नुकतेच आपण ऐकले असेल की "प्रियकराने प्रेयसीचा किंवा प्रेयसी ने प्रियकराचा , पत्नीने पतीचा किंवा पतीने पत्नीचा खून केला. प्रेत फ्रीज मध्ये बेड मध्ये किंवा अन्य ठिकाणी ठेवले. काही ठिकाणी पित्याने मुलीचा खून करून प्रेताची राख केली, तुकडे करून जंगलात फेकून दिले" अश्या गोष्टी का वाढत आहेत?. तर आपल्या मनातील हिंसा, द्वेष , क्रूरता आणि स्वार्थ वाढल्यामुळे.
जोडीदार निवड करताना मुख्य गोष्टी काय पहायला हव्यात? तर त्या व्यक्तीची प्रामाणिकता, विचार , आचरण , अनुरूपता, शिक्षण वगैरे पण आपण काय पाहतो?
मुली असल्या तर पैसा पाहतात आणि मुले असली तर सौंदर्य पाहतात.
पण माझे मत आहे की खूप पैसा, संपत्ती पाहण्यापेक्षा आर्थिक स्थैर्य पहावे आणि मुलांनी सौंदर्या ऐवजी अनुरूपता पहावी. या 2 गोष्टी केल्या तर मनाजोगा चांगला जोडीदार पण मिळेल आणि नात्यात नंतर समस्याही कमीत कमी येतील. ❣️❣️
(महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग या तिघांचे स्वातंत्र्य लढ्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी तिघांचे आणि त्यांच्या सोबतच्या सर्वांचे 'सर्वांचा भारत' हेच ध्येय होते. तेच RSS, हिंदू महासभा, मुस्लिम लीग यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नसला तरी देश स्वतंत्र होताना मात्र त्यांना तो मूठभर वर्चस्ववादी लोकांच्या हाती हवा होता. याबद्दल काही RSS शी जुळलेल्या विद्यार्थ्यांनी भरपूर प्रश्न विचारले. ज्या सर्वांची उत्तरे देताना तो संवाद रंगला होता.)
शेवटी फीड बॅक ही घेतले त्याचे व्हिडिओ पण लवकरच पाठवतो..
असो प्रेमाचा प्रसार करत राहूया ❤️❤️
द्वेष करणे सोप्पे असते पण #प्रेम करणे #Healthy असते ❤️❤️🌹
संकेत मुनोत
8668975178
17 Feb 2023