AddThis code

Saturday, March 21, 2026

आजच्या युवा पिढीची लग्नाची समस्या - संकेत मुनोत, संवाद मासिक, मार्च 2026

सध्याच्या युवापिढीसमोर अनेक आव्हाने आहेत त्यातील मुख्य ३ म्हणायची तर नोकरी , व्यवसाय आणि लग्न . यात पहिल्या २ म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय हे प्रश्न हळूहळू का होईना सुटूनही जातात पण लग्न जमणे आणि त्यानंतर ते टिकणे हे आजच्या जमान्यात खूप मोठे चॅलेंज झाले आहे . अर्थात अवास्तव अपेक्षा आणि तुलना हे त्यामागचे मोठे कारण आहे असे मला वाटते.
इतिहासाचा अभ्यासक म्हणून विचार केला तर महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा इतर जे काही महामानव झाले त्यांच्यापुढे हे लग्न जमवण्याचे चॅलेंज नव्हते. विशेष म्हणजे जोडीदारामुळे अधिक चांगले काम करू शकलो हे वरचे दोघेही महामानव मान्य करतात आणि सवित्रीबाई आणि कस्तुरबाही त्यांच्यामुळे स्वतःला अधिक चांगले घडवू शकल्याचे सांगतात. 

'आर्थिक नियोजन आणि आर्थिक वृद्धी कशी करावी ?' याबद्दलची कार्यशाळा घेताना मी नेहमी सांगत असतो कि आपण खर्च करत असताना इच्छा आणि गरज यामध्ये गरजेला महत्व द्यावे तेच तत्व मला लग्नाच्या बाबतही सामान वाटते कि "जोडीदार म्हणून मला गरजेचे काय आहे?" ते पहायला हवे . इच्छा तर एखाद्याची करीना कपूरशी लग्न करायची असेल पण मग तो स्वतःही सैफ अली खान आहे का? आवास्तव अपेक्षा ठेवू नयेत हे यानिमित्त समजते.

मुलगा किंवा मुलगी पाहताना बहुतेक लोक काय पाहतात? याबद्दल काही दिवसांपूर्वी मिम बनवले होते त्यात या गोष्टी मांडल्या होत्या..
मुलगा असेल तर बहुतेक जण त्याची जात, धर्म, वार्षिक उत्पन्न, संपत्ती, स्वतःचे घर, जमीन, नोकरीं, व्यवसाय, शिक्षण वगैरे पाहतात तर  
तेच मुलगी असेल तर बहुतेक जण तिची जात, धर्म, रंग, उंची, सौंदर्य वगैरे पाहतात 
यात अश्या अपेक्षातून जोडीदार मिळाला तरी तो संसार पुढे किती चांगला चालेल ? किंवा लोकांना दाखवण्यासाठी नुसतं चाललंय म्हणून चाललंय असेही बऱ्याच ठिकाणी होते पण यात जर खरच काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या तर बराच फरक पडू शकेल आणि मस्त प्रेमळ नाते तयार होऊ शकते असे मला वाटते.

मुलगा पाहताना - 
* *दुप्पट चौपट उत्पन्न * - पूर्वी मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यामुळे उत्पन्नही नव्हते. त्यामुळे उत्पन्नच नसल्याने किंवा अगदी कमी असल्याने दुप्पट, तिप्पट उत्पन्न सहज शक्य होते पण आज जेव्हा शिक्षणाचा समान अधिकार मिळाला आहे तर नोकरीं मिळताना पण सामान उत्पन्न मिळणार ना? नोकरी देताना मुलगा आहे म्हणून जास्त उत्पन्न आणि मुलगी आहे म्हणून कमी उत्पन्न देतात का ? त्यामुळे जमाना बदललाय तसे मुलांच्यासोबत मुलींनीही बदलायला हवे . दुप्पट उत्पन्नाच्या ऐवजी कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थित घेऊ शकेल, घर चालवू शकेल एवढे उत्पन्न मुलाचे आहे ना? हे पहायला हवे असे मला वाटते. संपत्ती पाहताना सुद्धा अमाप संपत्ती ऐवजी आर्थिक स्थैर्य आहे ना एवढे पहायला हवे.

मुलगी पाहताना -
मुलगी पाहताना तिचा रंग , उंची , सौदर्य या गोष्टी अधिक पहिल्या जातात . रंग कुठला असावा , किंवा उंची किती असावी? हे आपल्या हातात नाही त्यामुळे ते न पाहता दोघेही एकमेकांना थोडे फार अनुरूप आहेत का हे पहायला हवे असे मला वाटते. 

यात स्थळ पाहताना जाती धर्माच्या चौकटीमुळे सुद्धा बर्याच अडचणी येतात . नुकतेच एका मुलीबद्दल ऐकले. तिला काही वर्षांपूर्वी सुशिक्षित, शाकाहारी आणि निर्व्यसनी मुलगा हवा पण तिच्या जातीत असा मुलगा मिळणे अवघड जात होते पण जातीबाहेर पाहायचीही तिच्या किंवा तिच्या घरातील लोकांची तयारी नव्हती. पूर्वी जिथे घटस्फोट झाला ते स्वतःच्या जातीधार्मातलेच होते पण तरीही चौकटीबाहेर जायचा विचार नव्हता आता तो विचार झाला पण वय वाढले .जात असो किंवा धर्म असो आपण माणसांनीच निर्माण केलेले आहेत त्यामुळे आयुष्याचा पुढचा प्रवास करताना त्याबाहेरही विचार करायला हवा असे मला वाटते. मुख्य गोष्ट ही पहायला हवी कि एकमेकांच्या वाईब्स जुळतात का ? मग धर्म, जात कुठलीही असो छान नाते चालू शकते .
अर्थात जातीधर्माबाहेरच जोडीदार असावा असेही काही नाही आपण जन्मलेल्या जाती धर्मात किंवा बाहेर कुठेही लग्न करावे पण समजून उमजून करावे असे मला वाटते.

मुलगा म्हणून लग्नाच्या बाजारात जोडीदार शोधताना येणारे अनुभव -
मुलींनाही चांगले वाईट अनुभव येत असतील पण एक मुलगा म्हणून मी जेव्हा या बाजारात जातो तर खूप विचित्र आणि निराशाजनक अनुभव यात आले.यात काही मुलींना मी नाही म्हटलो असेल काही मला नाही म्हटल्या असतील पण अनेक ठिकाणी काही अपेक्षा पाहून चक्रावून गेलो. सध्या व्यवसायातील एक दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी परदेशात बोलवले गेले तेव्हा असे वाटले कि आपण आयुष्यात काहीतरी यश साध्य केले आहे पण तेच लग्नाच्या बाजारात गेलो तर जेव्हा एखादी मुलगी किंवा तीचे पालक वरून खाली कुतसित दृष्टीने पाहतात तेव्हा असे वाटते कि आपण तर कुठेच नाही अगदी कृष्णाचा सुदामा झाल्याचा विचार येतो. २ वर्षापूर्वी एका मुलीच्या वडिलांचा फोन आला कि तुमचे उत्पन्न किती , तेव्हा माझे ₹ 7.5 लाख एवढे वार्षिक उत्पन्न होते तर ते विचारत होते अजून काही- अजून काही उत्पन्न आहे का मी म्हटले नाही एवढ्यात मी खुश आहे आणि हळूहळू वाढेल हेही. मग flat 2 BHK च आहे का मग 3 BHK कधी घेणार ?मी म्हटल पूर्वी पप्पानी घेतलेला 2 BHK च होता आणि त्यात रिडेव्हलोपमेंट मध्ये 1 रूम जास्त घेण्यासाठीच मला बिल्डरला जवळपास ४० लाख द्यावे लागलेत त्यामुळे लगेच 3 BHK घेण्याचा विचार नाही तर तो म्हणाला "मै चिंतन करता हु" मी मनात त्याला " चिंतन नाही चिंता करा" अस म्हटल.
 पण फक्त दिखाव्याला म्हणजे शो ऑफ ला महत्व आहे आणि प्रामाणिक चरित्र , विचारांची प्रगल्भता , निर्व्यसनीपणा आणि संवेदनशीलता वगैरे गोष्टीला या लग्नाच्या बाजारात काहीच महत्व नाही का? असे कधी-कधी वाटते.
पूर्वी नोकरीं होती तेव्हा हे उत्पन्न होते ते दर वर्षाला वाढतही होते पण जेव्हा पूर्ण वेळ व्यवसायात आलो तेव्हा उत्पन्न याहून कितीतरी पटींनी वाढले उलट मी स्वतः काही लोकांना माझ्या फर्म मध्ये नोकरीं दिली आहे पण आता काही जण म्हणतात आम्हाला बिजिनेस नको नोकरींवाला पाहिजे. आता माणसाने करायचे तरी काय? नोकरीतले उत्पन्न चांगले असूनही कमी वाटतं होते तर व्यवसाय सुरु केला आणि ते चांगले वाढले तर आता पुन्हा ते सोडून नोकरीं कशी करणार? 
मध्यंतरी एका मुलीला भेटलो तर ती म्हणाली कि मी क्लबिंग करते, कधी-कधी ड्रिंक करते तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मी म्हटलं नाही मला काही आक्षेप नाही मी घेत नसलो तरी माझे अनेक मित्र घेतात फक्त Occasionally च घे घरी असताना घेऊ नको आणि स्मोकिंग करत असल्यास ती सोड कारण त्याने कॅन्सर होऊ शकतो. एका मुलीचे म्हणणे होते कि बिअर्ड ठेवली पाहिजे तर तीही ठेवायला सुरु केली. ते म्हणतील तसे कपडे आणि इतर गोष्टी स्वतः मध्ये अपडेट करणे सुरु आहे. मुलगा असल्यामुळे जास्त अपेक्षा ठेवून चालत नाही, जशी मार्केट डिमांड आहे तसे स्वतःला बनवावे असे वाटते पण काही-काही गोष्टी नाही पटत.थोडा फार सामाजिक सेवेत सहभाग घेतल्याने दारु वगैरेच्या व्यसनाने अनेक कुटुंब उध्वस्थ झालेली पाहिली आहेत त्यामुळे त्याचे सेवन कधीच करणार नाही तिने केले तर माझी हरकत नाही फक्त कधीतरी आणि प्रमाणात करावे . यात एक-दोन मुली म्हणाल्या की त्यांना रागीट असा जोडीदार हवा आहे, ज्याचा घरात दरारा असेल, जो वर्चस्ववादी थोडा हुकूमशाही वृत्तीचा असेल. एका मुलीने सांगितले की तिच्या भावाचा घरी भलताच दरारा आहे, आई, वहिनी सगळे त्याला घाबरतात, मला कोणी मला घाबरावे किंवा मी त्यांना घाबरावे असे वाटतं नाही. काहींची इच्छा असते कि आईवडील सोबत नसावे, मी जर एकुलता एक आहे आणि त्याच दृष्टीने एवढे अधिक पैसे देऊन घर मोठे करुन घेतले आहे तर वेगळे का व्हावे? 

यात मुलांच्या वाईट परिस्थितीचे उदाहरण मी शेजारच्या अपार्टमेंट मध्ये एका फॅमिलीत प्रत्यक्ष पाहिले. एक जैन मारवाडी आजोबाचे शेजारच्या सोसायटीत 2 फ्लॅट असून एका फ्लॅट मध्ये राम तर दुसऱ्यात श्याम राहतो( नावे बदलली आहेत ). यात रामला 2 मुलगे आणि श्याम ला 2 मुली असं कुटुंब आहे. यात आजोबा 4 नातूना उद्देशून सांगतात कि कि तुम्ही चौघानी भरपूर शिकावे आणि स्वतःच्या पायावर उभे रहावे अशी माझी इच्छा आहे पण यात समजा मुलींना शिकण्याचा कंटाळा आला आणि त्या नाही शिकल्या तर लग्न जमवायला एवढा फरक पडणार नाही पण तुम्ही जर मुलगा म्हणून नाही शिकला किंवा नाही चांगले पैसे कमवले तर लग्नाच्या बाजारात तुम्हाला काहीही किंमत नसेल. 

अजून एक अडचण येते ती विचार मांडण्याची . एकेकाळी मीही एखाद्या धर्मांध नेत्याला मानणारा , प्रोपोगंडा गोष्टींना खरा मानणारा , एखाद्या धर्माचा द्वेष करणारा किंवा काही धर्म, पक्ष, व्यक्ती बद्दल आकस असणारा असा होतो पण जसजसा अभ्यास वाढला तश्या दोन्ही बाजू समजल्या आणि मनातले गैरसमज दूर झाले जे सत्य समजले ते मांडू लागलो आणि त्याबद्दल काही जण व्याख्यान वगैरे द्यायलाही बोलवू लागले , वृत्तपत्रात लेख प्रकाशित होऊ लागले , टी.व्ही. चर्चा मध्येही अभ्यासक म्हणून निमंत्रण मिळाले त्यामुळे तेथेही सत्य मांडू लागलो , हेतू हाच कि सगळीकडे प्रेम आणि अहिंसा पसरावी पण मी ज्या जातिधर्माचा भाग आहे तिथे मात्र आजही बहुसंख्य मी ज्या पूर्वीच्या फेज मध्ये होतो त्यातच आहेत आणि त्यांना हे चुकीचे वाटते . शिवाय मी जेव्हा त्यांच्या प्रचारकी द्वेषपूर्ण विचारांशी सहमत होत नाही आणि एखाद्या नेत्याचे समर्थन करायला नकार देतो किंवा त्यांना तार्किक प्रश्न विंचरतो तेव्हा मात्र ते चिडतात. नवीन काही वाचण्याची तयारी नसते आणि स्वतःच्या मनात असलेला प्रोपोगंडा सोडण्याचीही तयारी नसते. मी बहुतेक वेळेला या लग्नाच्या बाजारात तो विषय काढत नाही इतर आवडी निवडी, संसार , करीअर यावरच बोलतो पण कधीतरी समोरचा स्वतःहून विषय काढतो आणि मग मीही प्रामाणिकपणे माझे मत मांडतो आणि समोरचा व्यक्ती प्रोपोगंडाला बळी पडलेला असला तर अडचण होते . अर्थात भिन्न विचारधारेचे लोक सुद्धा एकत्र छान संसार करू शकतात असे माझे मत आहे. पण सध्या वातावरण एवढं दूषित झालंय की आपल्यापेक्षा विरोधी विचारांचा आहे म्हणजे मूर्ख आहे वगैरे समजले जाते. मला वाटतं आपण सत्यशोधक असले पाहिजे आज जरी मला तुमची विचारधारा किंवा तुम्हाला माझी विचारधारा पटत नसली तरी एकमेकांना समजून घेत पुढे जाऊ पुढे दुसऱ्याची सत्य आहे असे समजले तर त्याचे होऊन जाऊ नाही तर तिला ही सत्य वाटली तर ती आपली होईल किंवा तसेच राहू पण प्रेम एकमेकांना भरभरून देऊ.

असो मीही डिवोर्सच्या म्हणजे नाते तुटण्याच्या प्रक्रियेमधून गेलो आहे त्यात ते नाते तुटू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले पण समोरची व्यक्ती तयारच नव्हती . दोघांच्याही काही चुका असतील किंवा उणीवा असतील पण त्यावर मत करून स्वतः मध्ये सकारात्मक बदल करून पुढे जावे अशी इच्छा होती. पण ते शक्य झाले नाही कुठलेही नाते एकाच बाजूने टिकत नसते. अर्थात आज त्या गोष्टीबद्दल बरेही वाटते कि तुटले ते बरे झाले नाहीतर आजही ज्या व्यक्तीला आपल्याबद्दल किंचितही आदर नाही तिच्यासमोर स्वतःला सिद्ध करत पुढचे जीवन घालवावे लागले असते. तर एका बाजूने चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा वेगळे झालेले बरे या मतावर मी पोहोचलो आहे.
 पण हे होत असताना हे ठरवले होते कि आपल्याला ज्या गोष्टीमुळे एवढा त्रास होतोय त्याच्या मुळाशी जायचे आणि त्यावर शक्य असेल ते काम करायचे आणि त्यातून नाते टिकवूया या चळवळीची सुरुवात झाली . यात समुपदेशक , सामाजिक कार्यकर्ते आणि काही लोकांची टीम बनवली आणि समुपदेशन सुरु झाले ज्यात आम्ही या समस्येतून जाणार्या लोकांचे कॉल घेतो आणि त्यांची नाती सुंदर करण्याचा , ताण तणाव कमी करण्याचाही प्रयत्न करतो .

अर्थात वर मी मुलगा असल्यामुळे ती बाजू अधिक आली.
मुलीची बाजू सांगायची तर 
मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही काळानुरूप स्वतः मध्ये अनेक बदल करायला हवेत. आलेल्या सुनेने सतत पदर घ्यावा, साडीच घालावी, आम्ही म्हणतोय तेच करावे वगैरे अपेक्षा सोडून द्याव्यात. तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र विचार आहेत हे समजून घ्यायला हवे. एखादी महिला वर्किंग असेल तर तिने घरातलीही सर्व कामे करावीत ही अपेक्षा मला चुकीची वाटते. फक्त कुटुंब हे आपली पहिली प्राथमिकता आहे हे मुलगा मुलगी दोघांनीही लक्षात ठेवायला हवे 

 काही वर्षापूर्वी जोडीदार निवडीबाबत लेख लिहला होता तो खालीलप्रमाणे  

जोडीदार निवडीचा कार्यक्रम साधा करण्याची गरज-
काही समाजामध्ये दाखवण्याचा कार्यक्रम खूप मोठा असतो . त्यात मुलीच्या घरातील काही लोक मुलाच्या घरी येतात तर त्यांचा खूप पाहुणचार करावा लागतो, त्यांना आग्रह करण्यासाठी नातेवाईकांना बोलवावे लागते.सुरवातीला ५-१० प्रकारचे ड्राय फ्रुट्स आग्रह करून देणे त्यानंतर नाश्ता / जेवण, ज्यात अनेक पदार्थ , मिठाई ते झाले कि अजून काही असा खूप पाहुणचार करावा लागतो. मुलगा आतमध्ये बसलेला असतो त्याला हे झाल्यानंतर बोलावले जाते आणि मुलाच्या घरच्यांची त्याबद्दलच खूप धावपळ उडते.अर्थात हे करणे सक्तीचे नसते पण नाही केले तर मागे बोलले जाते त्यामुळे बहुतेक जण हे करतातच. 

लग्न कुठल्या प्रकारचे-
लग्न हा क्षण एका नवीन आयुष्याची सुरवात असल्याने तो आंनद आपल्या आप्तजणांना आणि मित्रांना बोलवून द्विगुणित करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे रजिस्टर लग्न बहुतेक जण करत नाहीत, पण जे आप्तजनांना बोलावून करायचे लग्न आहे तेही अगदी सध्या पद्धतीने करता येणे शक्य आहे, त्यातून एक सामजिक संदेशही जातो.माझ्या अनेक मित्रांनी याप्रकारचे लग्न केले आहे.जैन लग्न, गांधीविवाह किंवा सत्यशोधक लग्न ही त्या प्रकारची आदर्श लग्न आहेत.हाच खर्च पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार, शिक्षण देण्यास त्यांना त्यांच्या पायावर उभे करून देण्यास खर्च करायला हवा.शिवाय अश्या साध्या लग्नात नातेवाईकांचा मानपान , रुसवे फुगवे या गोष्टीही टाळल्या जातात ज्यामुळे लग्नाच्या वेळी याला हे केले, त्याला हे केले नाही यामुळे होणारे रुसवे फुगवे व त्यातून होणारा मानसिक त्रास ही टाळला जातो जो 70% लग्नात असतोच असतो. बहुतेक लग्नांमध्ये कोणी न कोणी नातेवाईक रुसून फुगून जातो , गोंधळ घालतो आणि ऐन आनंदाच्या क्षणी आनंदात विरजण पडते .उदाहरण द्मायाचे तर माझा मित्र सचिन आशा सुभाष याने जवळपास हजार लोकांना बोलवून सत्यशोधक पद्धतीचे लग्न केले ज्यात या सर्वांचे जेवण,मंडप, व इतर सर्व मिळून खर्च जवळपास लाख रु.च्या आत आला शिवाय लग्नात भेटवस्तू ऐवजी त्याने पुस्तके स्वीकारली ज्यातून त्या दोघांच्या ही गावात त्यांनी एक चांगले वाचनालय सुरु केले, अशी अनेक उदाहरणे आहेत.

लग्नाबद्दल मानसिक तयारी-
फक्त वय झालय म्हणून टाकूया उरकुन अस म्हणण्यापेक्षा खरच आपण ती जबाबदारी पेलू शकतील अशी त्यांची क्षमता झाली आहे का? ते पहावे.
कुठलेही लग्न म्हटले कि तडजोड ही करावीच लागते पण 'मी कसलीही तडजोड करणार नाही आहे तसाच किंवा तशीच राहणार' म्हटले तर लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टी अवघड होऊन बसतात.कारण दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती म्हटल्या कि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असणारच अश्या वेळी दोघांनाही एकमेकंसाठी काही सकारात्मक तडजोडी कराव्या लागतील त्याची तयारी असायला हवी. हुंड्याला स्पष्ट नकार द्यायला हवा.शिवाय नाते टिकवायचे म्हटले तर अहंकार कमी करायला हवा, मी आहे तसाच किंवा तशीच राहणार कधीच झुकणार नाही असे चालत नाही
नाते सांभाळायचे म्हटले तर ते टिकवण्यासाठी त्यात थोडी झुकण्याची सोबतच त्याग, समर्पण, प्रेम या गोष्टींचीही गरज असते.

जोडीदार निवडतांना-
आपल्या इथे पत्रिका जुळवण्याकडे अधिक लक्ष दिले जाते त्याऐवजी विचार कुंडली जुळते का त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
बाह्य सौंदर्य जसे कि रंग , उंची, बांधा यापेक्षा आंतरिक गुण जसे कि स्वभाव, वैचारिक बैठक यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे.
एकमेकांचे छंद,आवडी-निवडी, सवयी जाणून घ्यायला हव्यात.आणि समोरच्या च्या या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होणार नाही ना हे पाहायला हवे.
अवास्तव अपेक्षा टाळायला हव्यात.
स्वप्ने, भविष्याबद्दलचे विचार यात ही थोडे साम्य असायला हवे.
त्यामुळे ओळख झाल्यापासून ते लग्न यामध्ये किमान 2 महिने ते वर्ष एवढे अंतर तरी असावे जो वेळ एकमेकांना समजून घेण्यासाठी देता येईल शिवाय जर नाहीच जुळले विचार तर तेव्हा तेथेच थांबताही येते, घटस्फोटापेक्षा ते कधीही चांगले.
100% सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असे कोणीच नसते त्यामुळे अपूर्णतेत ही आपल्याला आवश्यक असलेले गुण आहेत का ते पाहता यायला हवे.
आर्थिक जबाबदारी इ. गोष्टी जोडीदार पाहताना स्पष्ट पाहायला हव्यात उगाच वय होत चाललंय म्हणून इच्छा नसतांना एखाद्या आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीशी लग्न करणे आणि लग्नानंतर अधिक आर्थिक क्षमतेच कुणी दिसलं कि आहे त्या नात्याला तोडणे असे प्रकार ही घडतात तेच सौंदर्य, शिक्षण इ. गोष्टी पूर्वीच पाहायला हव्यात उगाच सुरवातीला नाते जोडायचे आणि नाही पटले किंवा दुसरे कुणी अजून सुंदर दिसले कि आहे ते तोडणे चुकीचे आहे. 

व्यसन - आपल्या समाजात ही व्यसनांचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे त्यामुळे त्याबद्दल चौकशी करायला हवी आणि व्यसनी जोडीदाराला स्पष्ट नकार देता यायला हवा.

वैचारिक पातळी आणि सामजिक भान- आपला जोडीदार सामजिक , कला, राजकीय किंवा साहित्यिक क्षेत्रात असेल तर त्याच्या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होत नाही ना, आपण त्या गोष्टीत साथ नाही देऊ शकलो तर किमान प्रोत्साहन तर देऊ शकू ना हे पहायला हवे
शिवाय त्याच्या किंवा तिच्या लेखनाचे, साहित्याचे, कलेचे अर्थ किंवा उद्देश आपल्याला समजत आहेत ना? जर ते समजत नसतील तर त्या गोष्टीतून वेगळे काही अर्थ निघून गैरसमज होण्याची शक्यता असते 
उदा माझी एक मैत्रीण पुरोगामी, वैज्ञानिक आणि आधुनिक विचारांची तर तिच्या नवर्याचे आई-वडील प्रचंड धार्मिक, ज्योतिषशास्त्र वगैरे मानणारे त्यामुळे ही जे काही लेख त्या अंधश्रद्धावर किंवा कशावरही लिहिते तर ते आमच्यवरच आहेत असे त्यांना वाटते आणि त्यातून गैरसमज वाढत जातात रतर ती बऱ्याच वर्षापासून लिहित होती हे त्यांना समजायला हवे होते पण वैचारिक आणि बौद्धिक अंतर असल्यावर अर्थाचा अनर्थ होतो तो असा.

जोडीदाराची संगत -
कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्या संगतीवरून होते.त्याच्यासोबत असणारा मित्र परिवार कुठल्या दर्जाचा आहे त्यावरून ही त्याचा किंवा तिचा स्वभाव लक्षात येतो.कारण जश्या व्यक्ती असतात तसे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

लग्न झाल्यावर-
एकमेकांशी खुला संवाद- मेसेज किंवा फोनवरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष फेस टू फेस बोलणे कधीही चांगले, कारण प्रत्यक्ष बोलण्यात आवाजाला चढ उतार असतो चेहऱ्यावर हावभाव असतात ज्या गोष्टी मेसेज किंवा फोन वर शक्य होत नाहीत आणि गैरसमज वाढण्याची शक्यता असते

एकमेकांची छेड काढणे- लग्नानंतरचे नाते healthy ठेवायचे असेल तर थोडी विनोदबुद्धी असायला हवी आणि एकमेकांची छेड काढणे , चिडवणे यातून प्रेम वाढते.

मतभेद झाल्यास दोघांत सोडवणे- दोन भिन्न व्यक्ती म्हटल्यावर मतभेद हे होणारच पण ते झाले तरी मनभेद होता कामा नये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी , झालेले भांडण तिसऱ्या कुणाला सांगितले जाते तेव्हा दुरावा वाढण्यात च अधिक मदत होते
  सामान्यतः मनुष्य एखाद्याशी झालेल्या वादाबद्दल सांगतांना स्वतःच्या चुका नकळतपणे लपवत असतो किंवा कमी करून सांगत असतो यामुळे ज्याच्यासोबत आपण ही गोष्ट शेयर करतोय ती व्यक्ती तेवढेच ऐकून त्या-त्या दृष्टीने आपले मत बनवते आणि समजा ती गोष्ट त्या व्यक्तीने अजून काहींना सांगितली तर ५ जणांचे ५ सल्ले यातून वाद विकोपाला जातो.

समजूतदार पणा- ही सर्वात महत्वाची बाब आहे , छोट्या-छोट्या गोष्टी पकडून न ठेवता एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला हवे.समोरचा व्यक्ती माणूस आहे आणि तो चुकू शकतो आणि आपणही चुकू शकतो ही गोष्ट मान्य करायला हवी.

कौतुक आणि टीका- 
कौतुक चार चौघात करायला हवे तर चुका या एकट्यात त्याही थोड्या वेगळ्या शब्दात सांगायला हव्यात पण बऱ्याच ठिकाणी नेमके याच्या उलटे घडते.

पालकांचा संसारात अति हस्तक्षेप-
आपला मुलगा वा मुलगी किती वाजता उठतो, काय खातो, कुणाला किती पैसे देतो त्यापासून अनेक ठिकाणी पालकांचे लक्ष असते. आणि अशी प्रत्येक गोष्ट पाल्याकडून फक्त जाणूनच घेतली जात नाही तर त्याच्यावर नाहक सल्लेही दिले जातात कि हे असे-असे असायला हवे शिवाय त्या सगळ्याच बाबतीत संसारात लुडबुडही केली जाते. 
नाते टिकवूया चळवळीत आत्ताच जॉईन झालेल्या व कौटुंबिक समुपदेशक आणि सल्लागार म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या छाया सावरकर यांनी सांगितले कि त्यांनी जेवढ्या केसेस हाताळल्या त्यात घटस्फोटासाठी सार्वधिक आढळलेले कारण हे मुलीच्या आईचा त्यांच्या संसारात अतिहस्तक्षेप हे आहे.आपल्या मुलीला जर मारहाण होत असेल, हुंड्याची मागणी होत असेल, तिच्या जीवाला धोका असेल अश्या वेळी हस्तक्षेप करून जाब विचारायला च हवा पण इतर प्रत्येक गोष्टीत माहेरहुन लक्ष घालणे चुकीचे आहे.
शिवाय मुलाच्या पालकांनीही सुनेकडून अवास्तव अपेक्षा, तिच्याकडून माहेरहुन काही आणण्याची मागणी, मारहाण इ. गोष्टी टाळायला हव्यात.यात सध्या मम्माज बॉय सारखी मुलेही कारण ठरली आहेत. लग्न झाल्यावरही ती आईचा पदर सोडत नाहीत आणि माझी आई असे-असे म्हणते तसेच तुला करावे लागेल यामुळेही काही नाती तुटल्याचे पाहण्यात आले . 

Mould for each other-
जगात made for each other अस कोणीच नसत पण तुम्हाला थोडं mould for each other व्हावेच लागेल

सकारात्मक बदल करण्याची तयारी- मी बिलकुल बदलणार नाही जे बदलायचं ते समोरच्यानेच हा दृष्टिकोन ही घातकच

.तुलना- सतत दुसर्याशी तुलना करु नये
काही मुली आपले भाऊ, मामा, काका इ. कडे बघून आपल्या नवर्याची त्यांच्याशी तुलना करतात तर काही मुले आपली बहीण, आई, आत्या इ बघून बायकोशी तुलना करतात व जोडीदाराने असे त्यांच्यासारखे व्हायला हवे अशी अपेक्षा ठेवतात ज्या चुकीच्या आहेत.सध्या सोशल मिडियामुळे तर या तुलनांचे प्रमाण खूपच वाढले आहे. 

स्वतःचे मत बनवण्याची क्षमता- मुलगा असो वा मुलगी जर तो किंवा ती प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या मतावरून ठरवत असेल तर वैचारीक परिपक्वतेअभावी गैरसमज च होण्याची अधिक शक्यता असते.

14.काही गोष्टी सिक्रेट्स ठेवण्याची गरज - नवरा बायकोतील काही गोष्टी या सीक्रेटस म्हणजे गुप्तच असायला हव्यात पण जर एखादा जोडीदार दुसऱ्या कुणाला या गुप्त गोष्टी सांगत असतील तर ज्या व्यक्तीला ते सांगितले जाते त्यातून वाद वाढण्याची किंवा उलटा अर्थ निघण्याची अधिक शक्यता असते.

15.धरसोड प्रवृत्ती नको- 
धरसोड व्यक्तींना थोड्या दिवस एखादी व्यक्ती आवडते पण बाहेरहून कुणी फूस दिली कि अरे किंवा अग तुला यापेक्षा जास्त चांगला जोडीदार भेटला असता असे म्हटले आणि पालकांचा ही जर याला दुजोरा मिळाला तर अश्या व्यक्ती असणाऱ्या जोडीदारात सतत चुका शोधू लागतात, तू मला बोलायला पॉईंट देतोस/देतेस असे म्हणून समोरच्यात चुका शोधल्या जातात किंवा नसणाऱ्या चुका भासवल्या जातात ज्यामुळे दुसरा जोडीदार त्रस्त होतो, मग एक जण जोडायचा प्रयत्न करतो तर दुसरा तोडण्याचा प्रयत्न करतो , एक जण खोटे नाटे आरोप करत राहतो व दुसरा प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवू लागतो.
जोडणाऱ्याला जोडायचे असल्यामुळे तो किंवा ती कसेही करून नाते कसे चांगले होईल यासाठी प्रयत्न करतात समोरच्याच्या चुका दाखवण्याऐवजी स्वतःत सकारात्मक बदल करायची , सुधारण्याची ते तयारी दाखवतात आणि हवालदिल होतात तर तोडणाऱ्याला याची काही फिकीरच नसते त्यामुळे ते मिळेल तिथे खरे-खोटे आरोप करत आणि बदनामी करत जोडणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करत राहतात, तिसऱ्या व्यक्तींला सर्व बाजू माहित नसतात त्यामुळे तोडणाऱ्याच्या आरोपांकडे च अधिक लक्ष जाते पण यात जोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस खचून जातो त्यामुळे धरसोड प्रवृत्ती टाळायला हवी.

16.एकमेकांना स्पेस देणे-
दोघांच्याही काही आवडी-निवडी असतीलच व त्या गोष्टी करण्यास एकमेकांना थोडी स्पेसही द्यायला हवी, उदा एखादी मुलगी चांगली चित्रकार आहे पण लग्न झाले कि तिला त्याबद्दल काहीच करू न देणे हे तिच्या कलागुणांना थांबवण्यासारखे आहे, तिच्या कलागुणांना वाव दिला तर ती आनंदी राहीलच शिवाय त्याचा फायदा ही होईल.शिवाय अश्या स्पेस चा गैरफायदा ही घेता कामा नये म्हणजे आपली पहिली प्राथमिकता कुटूंब ही असायला हवी.

एकमेकांशी विचारांचे टोकाचे मतभेद असतांना ही ते कायम ठेवून नात्यात मनभेद न ठेवता एकदम सुखी संसार केल्याची अनेक उदाहरणे मला माहित आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर स्वतः अंधश्रद्धा मानत नसले तरी पत्नीच्या इच्छे खातर नऊ वर्ष रोज पत्नीच्या श्रद्धास्थळ असलेल्या मंदिरात ते त्यांना सोडत.महात्मा गांधीनी आश्रमात चहा कॉफी वर्ज्य ठेवली होती ते स्वतः चहा कॉफी घेत नसत त्याला दारू सारखे पेय मानत पण जेव्हा एकदा कस्तुरबांना कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली तर गांधीजींनी स्वतः त्यांना ती आणून दिली आणि अग्रहाने प्यायला ही लावली.
काही दिवसांपूर्वी अभिनेते श्रीराम लागू यांच्याशी जवळपास २ तास मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. ते पूर्णतः नास्तिक आणि बुद्धिवादी चळवळीला समर्पित आहेत,त्यांच्याशी गप्पा झाल्यावर त्यांच्या पत्नी दिपाताई यांच्याशी बोललो कि तुम्ही पण याच विचारांच्या का वगैरे त्या हो म्हटल्या पण माझी थोडी श्रद्धा आहे मी गणपती बसवते तेव्हा तो त्याला विरोध करत नाही 'मला फक्त प्रसाद देत जा' अस श्रीराम जी म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपली प्रेयसी हितार्थी पारख(गुजरात,) हिला कँसर असल्याचे कळूनही प्रवीण पाटील(सांगली) याने तिच्याशी लग्न केले आणि 5 वर्ष तिच्यासोबत पहाडासारखा उभा राहून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, अशीच कहाणी प्रथमेश आणि सोनालीची, दोघे चांगले मित्र होते सोनालीच्या शिक्षणासाठी प्रथमेश ने आपल्या आईचे दागिने विकले होते पण दरम्यान काही वर्षांत प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं तिला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर. प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता. तणावाखाली असलेल्या मित्राला प्रेमाची सावली द्यावी, या भावनेतून सोनालीने प्रथमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली म्हणते, “ 25 जून 2018 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. या दिवसापासून प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मी दृढ निश्चय केला होता. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार दिल्याने मी हा निर्णय घेऊ शकले."
आजही, प्रथमेशवर उपचार सुरू असून एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे आणि त्याची तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एकीकडे स्वार्थापायी काही नाती तुटताना ही उदाहरणे नाती कशी टिकवावी आणि फुलवावी याबद्दल प्रेरणादायी आहेत तर चला नाती अधिक सुंदर बनवूया
त्यावरूनच अश्या काही केसेस हाताळताना सहज सुचलेली कविता

मानलं तर लग्न आहे खूप सुंदर #बात 
जीवन जगायला मिळतो एक हक्काचा #हात 

ज्यांच्यासोबत शेयर करू शकू प्रत्येक #बात 
सुख दुःखात मिळते एकमेकांची #साथ 

 समजून घेऊ एकमेकांना #थोडे 
एकत्र मिळवून सोडू आयुष्याचे प्रत्येक #कोडे 

मान्य नसते कुणी made for each other 
पण व्हा कि थोडे Mould for each other 

बघ मग कसा संसार होईल #छान 
एक बनेल जानू तर दुसरा बनेल #जान 

वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यावर भिन्न स्वभाव #असणारच 
वेगवेगळ्या प्रकृती सारखे कुणी #नसणारच 

वेगळेपणातील अनुभवून #सुख  
चल करूया हास्यमय #मुख..   

संकेत मुनोत 
8668975178
changalevichar1@gmail.com

Monday, March 2, 2026

आर्थिक नियोजनातून आर्थिक वृद्धी , चला प्रामाणिक मार्गाने श्रीमंत होऊया - संकेत मुनोत यांचा दिपालिका मासिकात प्रकाशित लेख

आर्थिक वृद्धी व्हावी ,अधिक पैसे असावे? असे कोणाला नाही वाटतं सर्वांनाच वाटत . पैश्यांनी सर्व काही होत नाही हे खरे असले तरी पैशाशिवाय बऱ्याच गोष्टी शक्य होत नाही हेही तितकेच खरे आहे . आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासोबतच चांगले शिक्षण , चांगले आरोग्य आणि इतर सोयीसुविधा मिळवणायसाठी ही पैसे लागतातच . पण मग जवळपास बघतो ते कोणी लबाड्या करून , कुणाची संपत्ती लाटून ,भ्रष्टाचार करून लोकांना फसवून झटपट श्रीमंत होणारे लोक दिसले कि आपल्यालाही वाट्ते कि सामान्य माणसाला श्रीमंत व्हायला हेच करावे लागत असावे पण हे लोक झटपट श्रीमंत होतात तसे कंगालही होतातच . पण जे शाश्वत मार्गाने श्रीमंत होतात त्यांच्या बाबत मात्र असे होत नाही आणि त्यात लबाडी करण्याची , खोटे बोलण्याची किंवा कुणाला फसण्याची गरज नसते . त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे असावी लागते ती म्हणजे योग्य आर्थिक नियोजन . 
आर्थिक नियोजन ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे तर त्यातील काही महत्वाच्या गोष्टी पाहूया 

बचत करणे - बचत म्हणजे सेविंग करणे , माझे जे काही उत्पन्न असेल त्यातील निदान ३०-६०% रक्कम मी बचत करेलच हे धोरण ठेवले पाहिजे . बचत म्हणजे काय असे विचारले तर बहुतेक जण म्हणतात कि 
उत्पन्न - खर्च = बचत
हे सूत्र वापरल्याने बचत फार कमी राहते किंवा राहतच नाही पण बचतचा खरा फॉर्मुला म्हणजे 
उत्पन्न - बचत = खर्च  
मी दर महिन्यात एवढे-एवढे % बचत करेनच आणि मग राहिलेले पैसे गुंतवणूक करेल आणि राहिलेल्या पैश्यातून माझा खर्च करेल असा फॉर्म्युला ठेवला तरच बचत होते 
आर्थिक गुंतवणुकीतून आर्थिक वृद्धी - पैसे फक्त बचत करून ठेवले तर ते वाचतात पण वाढत नाहीत तर त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ते वाढवणेही महत्वाचे आहे . म्युच्युअल फंड्स , SIP , सेविंग प्लॅन आणि विविध मार्ग त्यासाठी आहेत त्यात योग्य निवड आपण केली पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या सल्लागाराकडून ते करणे आवश्यक आहे . मी सलून मध्ये जाण्याऐवजी घरी केस कापले किंवा डॉक्टरला दाखवण्याऐवजी गुगलवर पाहून आरोग्यावर उपचार घेतले तर केसांची किंवा आरोग्याची जशी अवस्था होते तशीच आपल्या गुंतवणुकीचीही अवस्था होते आपल्या समाधानासाठी ते थोडेफार वाढलेले असतात पण योग्य सल्लागाराच्या मार्गदशर्नाने ते गुंतवल्यास त्यात चांगली वृद्धी होते आणि आपण निश्चिन्त राहतो . 

कुठे किती % - आपले जे काही उत्पन्न असेल त्याचे ३०%+३०%+३०%+१०% असे विभाजन करा . उत्पन्न आले कि त्यातील ३०% इन्व्हेस्ट करा त्यानंतर राहिलेल्या ७० % तीळ ३० % लोन फेडण्यासाठी वापर लोन नसेल तर तेही इन्व्हेस्ट करा , आता राहिलेल्या ४० % तील ३०% घर खर्चासाठी वापरा आणि राहिलेले १० % हे स्वतःच्या मौज मजेसाठी आणि आनंदासाठी वापरा
 
फायनान्शियल पिरॅमिड- आर्थिक नियोजनाचा पिरॅमिड 
- हा आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा जर तुम्ही व्यवस्थित अमलात आणला तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कितीही मोठे आर्थिक संकट आले तरी त्यातून तुम्ही सहज बाहेर पडाल शिवाय आर्थिक वृद्धीही खूप चांगली होईल . तुमचे उत्पन्न १० हजार असू दे नाही तर ५० हजार , १ लाख किंवा १० लाख सर्वांना हा सामान लागू होतो . म्हणजे एखाद्या २० हजार उत्पन्न असलेल्या व्यक्तीने जरी हा फॉलो केला तर तो यातून स्वतःची चांगली वेल्थ निर्माण करू शकतो आणि एखादा ५ लाख उत्पन्न असणारा व्यक्तीही हे फॉलो न केल्यास कर्जबाजारी होऊ शकतो . पैश्याचे मानस शास्त्र या पुस्तकात अश्याच २ व्यक्तींची सत्य घटना संगितली आहे ती नक्की वाचा . 
तर या पिरॅमिड मधील एक-एक मजला समजून घेऊया सर्वात खाली म्हणजे पाया आहे तो बनतो इन्शुरन्सने त्यात २ महत्वाचे इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स त्यानंतर पुढचा मजला येतो तो म्हणजे दीर्घकालीन मुदतीचे प्लॅन आणि म्यूचुअल फंड्सचा त्यानंतर तिसरा मजला येतो तो emrgency कॅश चा , मग येते तुमचे घर , वाहन , सोने , चांदी , रियल इस्टेट इ आणि त्यावर शेवटचा मजला येतो तो शेयर्स वगैरेचा . यात बहुतेक लोक पाया नि त्यावरील मजले मजबूत कारण्याऐवजी डायरेक्ट वरती जातात आणि काही संकट आले तर पाया पक्का नसल्यामुळे सर्व मजले खाली पडतात आणि आपण कर्जबाजारी होतो . तर आता एक एक मजला काय असतो ते पाहू 

टर्म इन्शुरन्स - टर्म इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स मला जर अचानक काही झाले तर त्यावेळी मला किंवा कुटुंबाला मिळणारी रक्कम ज्यात १०-१५ वर्षे किमान माझे कुटुंब भागू शकेल . प्रत्येक जबाबदार व्यक्तीने हा काढायलाच हवा . अनेक जणांचा असा गैरसमज असतो कि हे फक्त मृत्यूनंतरच मिळतात तर तसे नाही त्यात अपघाती अपंगत्व हे रायडर आपण निवडले तर आपल्याला तेव्हाही मिळतात . कारण मृत्यू नाही झाला पण अपघाती अपंगत्व आले तर तेव्हाही अपंगत्व आल्याने काम करू शकत नाही मग पुढे घर खर्च आणि इतर जबाबदाऱ्या कश्या पार पाडणार ? तर त्यामुळे हा रायडर सुद्धा सोबत घ्यावा. यात बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो कि टर्म इन्शुरन्स म्हणजे फक्त गेल्यावरच पैसे मिळणार पण असे काही नाही आता असे सुद्धा टर्म इन्शुरन्स आले आहेत जे तुम्ही जिवंत राहिलात तरी तुम्हाला खूप चांगली रक्कम देतात . 
टर्म इन्शुरन्स चे ३ प्रकार आहेत 
१. नो रिटर्न टर्म इन्शुरन्स - यात तुम्हाला काही झाले तर पैसे मिळतात काही नाही झाले तर पैसे मिळत नाहीत 
२. रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म इन्शुरन्स- यात तुम्हाला काही झाले नाही तर तुम्ही भरलेले पैसे तुम्हाला रिटर्न मिळतात 
३. टर्म विथ वेल्थ क्रीएशन- यात तुम्ही जे काही पैसे टाकता त्यातील जवळपास ७०% मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात तर ३०% पहिले १० वर्षे टर्म साठी बाजूला ठेवतात जे ११ व्य वर्षांपासून दर वर्षी तुमच्या फंडमध्ये ऍड केले जातात ज्यामुळे ११-२० या दरम्यान तुमच्या फंड्स ची value खूप वाढते . आपल्या लहान मुलांचे मोठे झाल्यावर शिक्षण , लग्न , व्यवसाय , स्वतःची रिटायरमेंट आणि विवीध गोष्टीसाठी हा चांगला उपयोगी पडतो . विशेष म्हणजे यात आपला वार्षिक प्रीमियम २.५ लाख च्या कमी असल्यास मिळणारे सगळे पैसे टॅक्स फ्री असतात .आपल्या नॉर्मल म्यूचुयल फंड ला जो लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तो याला लागत नाही . 
टर्म मध्ये तुमच्या उत्पन्नाच्या किमान २० पट तरी कव्हर घेतला पाहिजे जेणेकरून तुम्ही गेले तरी तुमच्यानंतर कुटुंबाला तुम्ही कमवत होता तेवढे उत्पन्न मिळून तुमचे कुटुंब भागवू शकते, ज्यात तुमचा घर खर्च , मुलांचे शिक्षण , आई वडिलांचे आजारपण आणि अनेक गोष्टी येतात . तुम्हाला अपंगत्व आले किंवा मृत्यू झाला तर तुमचे उत्पन्न थांबणार आहे पण दुसरे कोणी तेवढे उत्पन्न तुमच्या कुटुंबाला देणार आहे का ? नाही ना ? त्यामुळे टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे. आता समजा एखाद्याचे वार्षिक उत्पन्न १० लाख आहे आणि त्याने त्याच्या १० पट म्हणजे १ कोटींचा टर्म काढला आणि त्याच्या मृत्यूनंतर १ कोटी मिळाले तर ते बँकेत ठेवले तर ६ % व्याजाने त्याच्या कुटुंबाला ६ लाख मिळतील जे त्याच्या उत्पन्नापेक्षा कमी असतील तेच २ कोटींचा असेल तर १२ लाख मिळतील जेणेकरून ज्या जीवनशैलीची सवय लागलेली असते ती खालावणार नाही . 
 
आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स - 
दवाखाना कोणाला कधी लागेल आणि त्याचा किती लाख खर्च लागेल याचा भरोसा नाही. या खर्चापायी अनेकांना आपले घर विकावे लागते , साठवलेले सगळे पैसे आणि सोनेही मोडावे लागते, कर्ज काढावे लागते . त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने काढायलाच हवा . त्याचा कव्हर उत्पन्नाच्या किमान ५० लाख आणि त्याच्या वर असावा कारण आज एखाद्या अवयवाचे ते फुफ्फुस असो यकृत असो त्यासाठी ५० लाख पेक्षा अधिक खर्च येतो आणि सध्याच्या काळात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही . तेव्हा ५-१० लाख च्या कव्हर मध्ये भगत नाही म्हणून इकडे तिकडे आवाहन करण्यापेक्षा किंवा आपल्याकडील घर जमीन विकून वर कर्ज काढण्यापेक्षा काही हजर भरून तेवढ्या कव्हर चा हेल्थ इन्शुरन्स काढलेला कधीही चांगला . यात एका ३५ वर्षाच्या वयाच्या पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीचे उद्धरण घेतले तर त्याला ५ लाख कव्हर साठी अवर्षिक प्रीमियम ८ हजार येतो तर ५० लाख साठी किमान ७०-८० हजार यायला हवा पण ५० लाख साठी तो येतो फक्त २१ हजार रुपये तर १ कोटी कव्हर साठी २४ हजार रुपये . मग जास्त जर कमी पैश्यात येत असेल तर जास्त घेतलेला काय वाईट ?

हेल्थ इन्शुरन्स घेताना मुख्य गोष्टी पाहाव्यात त्या म्हणजे सल्लागाराचा प्रामाणिकपणा , हॉस्पिटल्सचे नेटवर्क , क्लेम सेटलमेंट रेशो , कंपनी किती जुनी आहे इ . 
यात आरोग्य विमा काढल्यावर हेही लक्षात घ्यावे कि पहिल्याच दिवसापासून सगळे आजार कव्हर होत नसतात त्याला वेटिंग पिरियड असतो तो कशाला किती ते थोडक्यात पाहूया 
१ दिवस - अपघाती कव्हर पुढच्या दिवसापासून लगेच सुरु होतो 
१ महिना - अचानक होणारे आजार १ महिन्यानंतर लगेच कव्हर होतात . मलेरिया , कोविड आणि असंख्य आजार यात येतात 
२ वर्षे - हळूहळू होणारे आजार जसे कि गुडघ्याची वाटी बदलणे , मोतीबिंदू , पाइल्स , मुतखडा , शरीरातील गाठ काढणे असे अनेक आजार २ वर्षानंतर कव्हर होतात 
३ / ४वर्षे - एखाद्या व्यक्तीला पूर्वीपासून असलेले आजार जसे कि रक्तदाब , मधुमेह वगैरे ३ किंवा ४ वर्षानंतर कव्हर होतात पण काही पॉलिसी मध्ये अतिरिक्त पैसे देऊन ते लगेच पण कव्हर करता येतात  
कधीच कव्हर न होणारे आजार - डोळे , दात , त्वचा यांचे आजार आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले उपचार कधीच कव्हर होत नाहीत . 

अजून काय गोष्टी पाहाव्यात - अमर्यादित रिस्टोरेशन , नॉन मेडिकल वस्तूचा कव्हर , बोनस आणि इतर बऱ्याच गोष्टीही पोलिसी घेताना पाहाव्यात . 

म्यूचुयल फंड्स - आपले पैसे वाढवण्याचा सगळ्यात चांगला आणि प्रामाणिक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड्स अर्थात यात थोडी फार रिस्कही असते. आम्ही ही गुंतवणूक करण्यापूर्वी दीर्घ मीटिंग घेतो त्यात गोल समजून घेऊन मग प्लांनिंग करतो . 

इ फ्लॅट - टॅक्स फ्री रेंट मिळवण्यासाठी इ फ्लॅट या नावाने दिल्या जाणाऱ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज हा सुद्धा आयुष्यभर खात्रीशीर रक्कम दरवर्षी मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे . विशेष म्हणजे नॉर्मल फ्लॅट मध्ये लागते तशी एकदम रक्कम इथे द्यावी लागत नाही , इंटेरियर करावे लागत नाही , स्टॅम्प ड्युटी नाही , आणि लोन चा इ.एम.आय. पण नाही .  

चुकीच्या ठिकाणी गुंतवू नये - वर पैसे वाचवा आणि गुंतवून वाढवा असे सांगितले पण त्याचा अर्थ चुकीच्या ठिकाणी गुंतवणे असा होत नाही दुप्पट करून देतो , तिप्पट करून देतो , दर महिन्याला एवढे एवढे देतो असे सांगणाऱ्या अचानक गायब होणाऱ्या फसव्या स्किमलाही खूप लोक बाली पडतात . आर्थिक नियोजन कार्यशाळा घेताना असे खूप लोक भेटले ज्यांनी यातून लाखो रुपये यातून गमावले. 
विदर्भात माझ्यासमोर घडलेला किस्सा सांगतो . माझी आर्थिक नियोजनाची कार्यशाळा झाली तेथील एका काकांनी माझ्याकडून त्यांचे व्यवस्थित आर्थिक नियोजन करून घेतले . हेल्थ इन्शुरन्स , टर्म इन्शुरन्स , म्युच्युअल फंड्स , सेविंग प्लॅन्स यातून त्यांचा आर्थिक नियोजनाचा बेस मी पक्का करून दिला पण त्यांच्याकडे जमिनीतून आलेली एक लम्पसम अमाऊंट होती ती कुठे गुंतवू असे त्यांनी विचारले त्यावर मी काही गोष्टी सुचवल्या पण त्या एवढ्या रिटर्न्स देत नाहीत असे त्यांना वाटले तेवढ्यात एक कुठली तरी ट्रेड करणारी कंपनी पुण्यात आहे आणि ती महिन्याला ४% म्हणजे वर्षाला ४८ % रिटर्न्स देते असे त्यांनी सांगितले . मी म्हटले हे कसे शक्य आहे ? तर विदर्भात त्या जिल्यात अनेक लोकांना हे मिळत आहेत असे त्यांनी सांगितले . मी त्यांना विचारले कि यावर नियंत्रण ठेवणारी कुठली रेग्युलेटरी बॉडी आहे का कि जी तुम्हाला याबाबत खात्री देते तर तसे काही नाही पण लवकरच त्यांना RBI कडून ही लायसन्स मिळणार आहे असे त्यांनी सांगितले सोबत गुंतवणूक केल्यावर ते स्टॅम्प पेपर वर लिहून देतात पार्ट तेवढ्याच रकमेचा चेक वगैरे देतात असेही ते म्हणाले . त्यांची खूप मोठी कंपनी आहे आणि पैसे गुंतवण्याचे चांगले मार्ग त्यांना माहित आहेत आणि आपल्याला पैसे देऊनही त्यांच्याकडे भरपूर पैसे शिल्लक राहतात असे ते म्हणाले. सोबत त्यांच्याच जिल्ह्यातील अनेक चांगल्या लोकांनी त्यात पैसे गुंतवले आहेत ज्यात पोलीस , डॉक्टर ,वकील , शिक्षक , व्यापारी , मेडिकल वाले असे अनेक लोक आहेत असे त्यांनी सांगितले आणि सुरवातीला २० लाख आणि नंतर ३२ लाख असे एकूण ५२ लाख त्यांनी गुंतवले ज्यावर दार महिना २ लाख रुपये ते त्यांना देत होते ४ महिने त्यांनी ते दिलेही पण या दरम्यान त्यांची पत्नी व मुले यांना याबाबत शंका वाटत होती त्यांनी त्यांना समजावून सांगितले आणि संकेतभैया तुम्हीही त्यांना समजावून सांगा असे सांगितले मी त्यांना समजावून सांगितले आणि गुंतवणुकीचे इतर अनेक चांगले मार्ग सांगितले सोबत इथे नाही केले तरी चालेल तुम्ही त्या पैश्याची एक गाडी घ्या सोने घ्या किंवा नुसते असेच घरी ठेवा पण तिथून ते काढा असे मी त्यांना सांगितले . त्यावर अजून २ महिने झाल्यावर घरच्यांनी खूप विरोध केल्यावर त्यांनी ते परत काढणायसाठी नाराजीनेच का होईना कंपनिच्या ऑफिसमध्ये जाऊन इमेल केला कंपनी म्हणाली कि एक महिन्यात मिळतील म्ह्णून पण एक महिन्यात काहीच रिप्लाय नाही अजून काही दिवस काही दिवस करत अनेक दिवस गेले . याच दरम्यान दर महिन्याला मिळणारे पैसे सुद्धा बंद झाले होते त्याचे काय झाले तर मार्च एंडिंग आहे त्यामुळे ऑडिट झाल्यावर पुन्हा सुरु होईल आणि आधिचेही मिळतील वगैरे सांगण्यात आले पण ते काहीच झाले नाही आता अनेक महिने झाले ते पैसे आलेच नाही आणि बरेच गुंतवणूकदार त्या ऑफिस मध्ये चकरा मारू लागले तिकडे कंपनीचे मुख्य लोक मात्र गायब झाले . आता हे लोक मिळून त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार आणि कोर्ट वगैरे मध्ये जाणार आहेत . पण पहा थोड्याश्या लालचे पायी स्वतःचेच पैसे आणि स्वतःलाच त्यासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत . तर असे कोणीही सांगितले तर त्याला बाली पडू नका तो जवळचा नातेवाईक असेल , मित्र असेल किंवा CA असेल कोणीही सांगितले तरी याला बळी पडू नका . 
  
तर या दिपावलीत आपले आर्थिक नियोजन करून आपली आर्थिक वृद्धी करूया . आपले प्रेमानी आर्थिक नियोजन करण्यासाठी संपर्क करा 

संकेत मुनोत 
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार 
संस्थापक ,वेल्थब्रिज फायनान्शियल सर्विसेस 
८६६८९७५१७८

Friday, November 7, 2025

वृद्ध लोकांनी आरोग्य विमा काढू नये का?

एका मित्राने विचारले कि "वृद्ध लोकांना अधिक वयामुळे प्रीमियम जास्त असतो म्हणून हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा पॉलिसी काढू नये का?" मीं म्हटलं "नाही, उलट त्यांनी सक्तीने काढलाच पाहिजे, आज तो नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत, तो असता तर ते थोडे रिलॅक्स जीवन जगू शकले असते असे आज भारतात लाखो वृद्ध आहेत. आणि हप्त्याचे म्हणाल तर उलट त्यांच्यासाठी अश्या खास पॉलिसी आहेत ज्यात त्यांना कमी हप्ता असतो. हे अगदी खरं आहे कि बहुतेक मेडिक्लेम कंपन्या यां वृद्ध व्यक्तीला पॉलिसी देण्यास उत्सुक नसतात कारण सतत क्लेम येतात पण आपण अर्ज केला तर त्यांना द्यावीच लागते. 
आत्ताच माझ्या अकोल्यातील परिचितांनी सांगितले कि त्यांची वृद्ध आई आजारी पडली तर १० लाख खर्च आला. त्यांनी त्यांच्या २ मुलींचे लग्न आणि शिक्षण यासाठी राखून ठेवलेला सगळा पैसा तिकडे खर्च झाला पण पॉलिसी असती तर हे पैसे वाचले असतें.

 आता अगदी कमी खर्चातही सिनियर सिटीझन्सची पॉलिसी काढता येते. 
सिनियर सिटीझन चे प्लॅन अगदी वार्षिक १५-२५ हजार रुपयात सुद्धा येतात ज्यात ३-१० लाख या दरम्यान आपल्याला पाहिजे तेवढा कव्हर घेता येतो तेही स्टॅण्डर्ड कंपन्यांचे प्लॅन येतात..
यात आता चांगली गोष्ट ही कि आता GST नाही नाही तर आत्तापर्यंत १८% GST घ्यायचे ज्यामुळे खूप पैसे जायचे...

अर्थात सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून प्लॅन घ्या उगीच ऑनलाईन जाहिरातीला बळी पडून काहीही काढू नका.. निवड व्यवस्थित करा अधिक माहिती साठी संपर्क करा

संकेत मुनोत, MDRT, USA
आर्थिक नियोजन तज्ञ 
प्रामाणिक सल्लागार उत्तम सेवा 
8668975178

लेख आवडल्यास शेअर करा 

Tuesday, February 11, 2025

राहुल बजाज - निर्भय भूमिका घेणारा उद्योजक

12 फेब्रुवारी 2022
जेष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे ८३ व्या वर्षी निधन झाले, भावपूर्ण श्रद्धांजली

सरकार कुठलेही असो त्याला न घाबरता  निर्भयपणे भूमिका घेणारा माणूस 

  'हमारा बजाज' हे जे स्लोगन ऐकतो ते त्यांचेच ...त्यांच्या कारकीर्दीत  बजाज ऑटोने  कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर पोहोचली होती. बजाज ऑटो ही स्कूटर विकणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली.

बजाज स्कूटर घेण्यासाठी खूप दिवस पूर्वी  बुकिंग करावे लागे...

गांधीविचारांचा वारसा - राहुल #बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांचा जन्म  एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला.चौथीपर्यंतच शिक्षण घेतले. एका श्रीमंत कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले. या नवीन कुटुंबाचा पैशावर खूप विश्वास होता. लोकांशी वागताना पण हे कुटुंब तसेच पैसे बघून वागे. जमनालाल यांना ते पटले नाही आणि ते घर सोडून निघून गेले त्यानंतर घरच्यांनी खूप समजावून त्यांना परत आणले . स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी खूप नाव कमावले. 
त्यांना अश्या व्यक्तीला आपला गुरू बनवायचे होते , ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसेल. 1915 मध्ये भारतात परतल्यावर गांधीजींनी साबरमतीत आश्रम बांधला जमनालाल तिथे पोहोचले आणि गांधीजींच्या कार्याचे निरीक्षण करू लागले कि खरच हा माणूस बोलतो तसा आहे का ? पण सोबत राहिल्यावर  सरदार  पटेल आणि अनेकांप्रमाणे तेही बदलले गांधींना  त्यांचा पाचवा मुलगा म्हणून स्वीकारायला सांगून पुढचे जीवन त्यांनी त्यासाठी वाहून घेतले. इंग्रज स्वातंत्र्यलढ्यात सहभाग न घेणाऱ्या आणि ब्रिटीशांची चापलुसी करणाऱ्या लोकांना व्यापारात खास सवलत देत असे. पण बजाज यांनी त्याला ठाम नकार देऊन  गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात  स्वतःला झोकून दिले ज्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना भरपूर त्रास ही दिला .  
एका मुलाखतीत राहुल बजाज यांनी गांधीविचार आजही कसे अनुकरणीय आहेत हे सांगताना स्वतःच्या  वडील कमलनयन बजाज यांच्यात झालेल्या सुधारणेचेच उदाहरण दिले .कमलनयन बजाज  जेव्हा गांधीजींच्या आश्रमात गेले तेव्हा त्यांनाही नियमाप्रमाणे आश्रमातील सगळे काम करण्यास सांगण्यात आले त्यात ''मै सारे काम करुंगा पर संडास(शौचालय ) साफ करने का गंदा काम नही करुंगा'' असे कमलनयन म्हणाले.  ही तक्रार थेट गांधीजीपर्यंत गेली . गांधींनी त्यांना सक्ती केली नाही  पण तिथून निघताना गांधी कमलनयन यांना  म्हणाले "गंदगी करना गंदी बात है या गंदगी साफ करना ?"  त्यानंतर कमलनयन यांनी स्वतः तर संडास साफ करण्याचे काम केलेच  पण अनेकांना ते करण्याची प्रेरणाही दिली. हेच त्यांच्या पत्नी बद्दल. सावित्री एका श्रीमंत घरातून सून म्हणून  बजाज यांच्या घरी आल्या तर ''खादीमुळे अंगावर ओरखडे येतात'' असे कारण सांगून ती  घालण्यास त्यांनी नकार दिला . गांधीजींकडे गोष्ट गेली तेव्हा ते म्हणाले कि ''खादी घालण्याची सक्ती करणे ही सुधा हिंसाच आहे त्यामुळे जेव्हा पटेल तेव्हा ती स्वीकारेल नाही घातली तरी हरकत नाही.''  पण सावित्रीजी यांनी नंतर खादी स्वीकारली ती कायमचीच.आईच्या अंत्यविधीच्या वेळीही तिच्या अंगावर खादी होती असे बजाज म्हणाले   
पैसा मिळवायचा म्हणजे लबाड्या च करायच्या अश्या गोष्टी जेव्हा आज बोलल्या जातात तेव्हा राहुल बजाज यांनी  प्रसिद्ध मासिक फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आठवतात ,  'मी कोणी संत नाही. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी पैसे मिळवण्यासाठी कोणतीही चुकीची पद्धत वापरली नाही.
त्यांच्या नावाचाही किस्सा भारी आहे .इंदिरा गांधीना त्यांच्या स्वतःच्या मुलाचे नाव राहुल ठेवायचे होते पण पंडित नेहरू यांनी  एका कार्यक्रमात बजाज यांना ते  दिल्यामुळे इदिराजींनी स्वतःच्या  मुलाचे नाव  राजीव ठेवावे लागले पण मग नातवाचे नाव त्यांनी  राहुल असे ठेवले . राहुल बजाज यांनीही स्वतःच्या मुलाचे नाव राजीव ठेवले आहे.
राहुल बजाज यांनीही आजोबांच्या निर्भयतेने भूमिका घेण्याचा  वारसा पुढे चालू ठेवला २०१९ च्या Economic Times Awards च्या कार्यक्रमात सगळे सरकारची चापलुसी करण्यात दंग असतांना त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना थेट जाब विचारला  ''देशात  सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही?गांधीजींचा खून करणाऱ्या दहशतवादी नथुराम गोडसेचे समर्थनच  कसे होऊ शकते ?  त्यावर अमित शहा यांनी ''आम्ही गोडसेचे समर्थन करणाऱ्या प्र्ज्ञासिंग वर कारवाई केल्याचे म्हटले'' सोबत ''तुम्ही बोलले म्हणजे भीती तर नाहीच ना बोलायला ?'' पण त्यांनतर राहुल बजाज यांना जसे ट्रोल केले त्यावरून त्यांच्या बोलण्याची सत्यता समजून येते पण तरीही ते घाबरले नाही आणि त्यांनी माफी ही मागितली नाही. 
गांधीजींचे वैशिष्ट्य हे होते कि क्षेत्र कुठलेही असो ते त्यांना निर्भय भूमिका घ्यायला लावत. तर असा भूमिका घेणारा एक निर्भय उद्योजक आपण गमावला 

भावपूर्ण श्रद्धांजली   

संकेत मुनोत

Sunday, February 9, 2025

खोटे शिक्षण दाखवून पॉलिसी घेणे योग्य आहे का?

परवा एका मित्राच्या रेफेरेंस ने एका व्यवसायिकाने त्याचे आर्थिक नियोजन करण्यासाठी बोलवले होते. त्यांना बँकेत  कोणी तरी Term पॉलिसी दिली होती जी मेडिकल मध्ये रिजेक्ट झाली. शुगर जास्त भरली होती 6 महिन्यांनी परत करायला सांगितले होते. मला त्या म्हटल्या की तिथे नाही होत तुम्ही बघा तुमच्या ओळखीने सेटिंगने कुठे काही झाले तर. 
त्यांना म्हटलं तुमचे उत्पन्न आणि जबाबदाऱ्या पाहून मी तुम्हाला सूट होईल असे चांगल्यात चांगले planning सुचवेल जेणेकरून तुमचे पैसे वाढतीलही आणि वाचतीलही पण असे खोटे काही जमणार नाही. अर्थात जे कोणी तुम्हाला जमवून द्यायचे सांगतील ते आत्ता तात्पुरते काहीतरी देऊन नंतर क्लेम आल्यावर हात वर करतील. जर 1-2 कोटी चा क्लेम मिळाला नाही तर टर्म इन्शुरन्स काय कामाचा?
अशीच अजून एक केस त्यांचे शिक्षण 10 वी झालेले मी म्हटले तुम्हाला तुमच्या या उत्पन्नाला टर्म मिळू शकत नाही private कंपनीचा. LIC चा मिळत होता पण त्यांना महाग वाटला. पण काही महिन्यांनी त्यांना कोणी तरी टर्म दिला मला त्यांनी पॉलिसी कागदपत्रे दाखवली. मला आश्चर्य वाटले मी तपासले तर देणाऱ्यांनी त्यांचे शिक्षण graduate दाखवले होते. मी त्यांना सांगितले की क्लेम आला तर खोटे शिक्षण दाखवले म्हणून रिजेक्ट होईल असे करू नका मग त्यांनी त्या बँकेतील व्यक्तीला संपर्क केला पण त्याची दुसरीकडे बदली झाली होती जो नवीन बँकर त्याच्या जागी आला होता तो म्हटला मला काही माहित नाही तुम्ही इन्शुरन्स च्या ऑफिस मध्ये जा. तर बँकेतुन पॉलिसी घेण्याचा हा तोटा होतो ते आत्ताचं उपलब्ध नाही तर पुढे क्लेम आल्यावर काय करणार? स्वतः IRDA ने आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की बँकेने इन्शुरन्स पॉलिसी बाबत misseling केले आहे म्हणजे चुकीच्या पॉलिसी विकल्या आहेत. हेच ऑनलाईन बाबतही होते की नंतर जबाबदारी घेण्यासाठी ते नसतात.
मी स्वतः कुठलीही पॉलिसी देताना माझ्या घरातील एखाद्या व्यक्तीला देतोय अश्या प्रकारे देतो आणि मिळत नसेल तर नाही म्हणतो पण चुकीचे काही देत नाही कारण चुकीच्या गोष्टी सांगून दिले तर नंतर त्या कुटुंबाला 1-2 कोटी रुपये मिळणार नाहीत आणि तो तळतळाट आपल्याला लागेल ही भीती असते. ऑनलाईन पॉलिसी देणाऱ्यांना किंवा काहीही चुकीचे करणाऱ्यांना ही भीती नसते का? त्यांना नसली तरी जो काढतोय त्यांना ती असायला हवी.

असो तुम्ही तरी अश्या गोष्टी करू नका. आपण पैसा कष्टाने कमवतो तो योग्य प्रकारे नियोजित करा. 

संकेत मुनोत 
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार 
8668975178
( photo प्रतिकात्मक आहे..)
#financialliteracy #financialplanning

Saturday, January 11, 2025

माझे नावडते पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग- मार्मिक मध्ये प्रकाशित लेख

माझे नावडते पंतप्रधान डॉ.#मनमोहनसिंग

ते न पटण्याचे कारण त्यांचे #पंतप्रधान म्हणून शांत राहून काम करणे

पंतप्रधान कसा असावा तर मस्त भरपूर #भाषणे करणारा ,जे केले नाही ते पण मी केले असे सांगणारा, स्वतःच्या चुकांचे खापर पूर्वीच्या सरकारवर टाकणारा, मस्त बॉलीवूड च्या लोकांसोबत, पशु पक्ष्यांसोबत रोज वेगवेगळ्या पोसे मध्ये फोटो शूट करणारा आणि असा सगळा टाइमपास करूनही पहा ;''मी कसा १८-१८ तास काम करतो'' अश्या थापा मारणारा ...

पण डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान असूनही यातले काहीच जमत नव्हते, मोठं-मोठ्या थापा मारत आक्रस्ताळी भाषणे न करता शांतपणे काम करत स्वतःच्या निर्णयातून ते इतिहास घडवत राहिले? खरं तर करायला काय हवं होत त्यांनी तर प्रत्येक दिवसाचा इव्हेंट करायला हवा होता,आज हे कसे भारी केले असं सांगत प्रत्येक दिवस #ऐतिहासिक कसा आहे हे सांगायला हवे होते पण डॉ मनमोहनसिंगांना हे जमत नव्हते .#दुर्बुद्धी च म्हणा त्यांची

त्यांनी #चुकीचे अनेक मोठे मोठे #निर्णय घेतले पण त्यातले ५ निर्णय खूप भयानक होते

1.त्यातील पहिला म्हणजे #Economic_Reforms_1995- देशाची अर्थव्यवथा बुडते का काय? असं लोकांना वाटतं असतांना डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थविषयक काही धोरणे आखून भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली लायसन्स राज संपवले ,ते पंतप्रधान असताना एक काळ असा होता कि पूर्ण #जग मंदीच्या गर्तेत होते, रोज शेयर मार्केट ढासळत होते, खरतर यावेळी करायला काय हवे होते तर नोटबंदी किंवा इतर कुठला निर्णय किंवा थाळी वाजवा , टाळ्या वाजवा सारखा निर्णय ज्यामुळे पूर्ण जग नैराश्यात आहे पण आपण एकत्र कसे आहोत हे लोकांना सांगता आले असते पण केले काय तर, मनमोहन सिंग यांनी अशी काही धोरणे आखली कि भारताला याचा धोकाच पोहोचला नाही ,त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या स्थानावर नेऊन ठेवली होती.

2. त्यांचा चुकीचा दुसरा निर्णय म्हणजे #माहिती_अधिकार_कायदा ज्याच्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर थांबला, अरे #भ्रष्टाचार काय थांबवायची गोष्ट असते काय ?

उलट ''ना खाता हू , न खाने दूंगा'' असं म्हणत भरमसाठ भ्रष्टाचार करायचा असतो, ED, CBI, RBI आणि अश्या सगळ्या स्वायत्त संस्थांना आपले बाहुले बनवायचे असते.आणि तरीही विरोधी कोणी जिंकले तर त्यांच्यातील लोक शेकडो कोटी देऊन विकत घ्यायचे असते, वृत्तपत्रात पहिल्या पानावर आणि टीव्ही च्या सगळ्या वाहिन्यांवर स्वतःच्या हजारो कोटींच्या जाहिराती द्यायच्या असतात एवढे करायला पैसे कुठून आले त्याचा हिशोब विचारायचा नसतो, तो भ्रष्टाचार थोडीच असतो?.

3. तिसरा चुकीचा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार देणारी #मनरेगा योजना, तुम्हाला आठवत असेल तर आपले आपले पंतप्रधान मोदीजी यांनी या योजनेवर प्रचंड टीका केली आणि स्वतः १ कोटी रोजगार दर वर्षाला देऊ म्हटले पण आज आपण पाहतो कि नवीन रोजगार सोडा, आहे ते रोजगार गेले आहेत, शेवटी आजही याच मनरेगा योजनेअंतर्गत अनेकांना रोजगार मिळतो पण खरं करायला काय हवे होते लोकांना सरळ ''भजी तळा'' वगैरे सारखे सल्ले द्यायला हवे होते आणि जो काही राष्ट्रीय रोजगार सर्वे चा चार्ट आहे तोच बंद करायला हवा होता पण त्यांना ते जमले नाही.

4. चौथा महत्वाचा चुकीचा निर्णय म्हणजे #Civil_Nuclear_Deal - या निर्णयवेळी त्यांच्यासोबत जे सत्तेत होते त्यांनी या्ला विरोध करत पाठिंबा काढून घेऊअसे म्हटले, पण डॉ मनमोहन सिंग यांनी ते बिल पारित करून त्यांचा पाठींबा जाऊनही पुन्हा मजबूत सरकार स्थापन केले. इथे एक मुद्दा चमचा म्हणण्याचा पण येतो ते जर दुसऱ्या कुणाचा चमचा असते तर असा निर्णय घेणे शक्य झाले असते का ? नाही ना ? पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला पण आपण मात्र त्यांना असं असूनही बाहुला म्हणूया...

5. पाचवा चुकीचा निर्णय फूड security बिल चा याबद्दल तुम्ही स्वतः जाऊन वाचा , याचे फायदे आपण आजही भोगत आहोत

पण वरील सर्व करतांना त्यांचे चुकले काय तर त्यांनी सामान्य लोक, मध्यमवर्गीय लोक ,छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी,कामगार सर्वांचा विचार केला पण विचार कोणाचा करायला हवा होता तर अदानी अंबानी यांचा, त्यांच्यामुळे तर आपला देश चालतोय ना बाकी आपण कुठे काय करतोय पण इथे चुकलेच त्यांचे..

अजून एक मुद्दा सहानुभूतीचा पण आहे, त्यांनी भाषणात रडून स्वतःचे बालपणातील किस्से सांगून किंवा आपल्या आज्जीसोबतचेे फोटो टाकून किंवा जगभरातून मिळालेले पुरस्कार दाखवून कधी सहानुभूती गोळा नाही केली.फाळणीच्यावेळी बालपणीच त्यांना सर्वस्व गमावून भारतात यावे लागेल, त्याच दरम्यान आईचा मृत्यू झाल्याने आज्जीने त्यांना सांभाळले, त्या वेळी घरातील प्रचंड गरिबीमुळे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात रात्री जागून अभ्यास केल्यामुळे त्यांचे डोळे खराब झाले, त्यांच्या जाड भिंगाचा चष्मा याची साक्ष देतो ,शिक्षणातील प्रत्येक वर्षात पहिला नंबर मिळवत त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठापर्यत मजल मारली पण यातील कुठल्याही गोष्टीचा त्यांनी सहानुभूती गोळा करण्यासाठी उपयोग केला नाही, खरतर स्वतःच्या कार्यकाळात स्वतःच्या प्रेरणादायी आयुष्यावर एक मस्त चित्रपट काढता आला असता आणि त्याला भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला असता, त्यांच्या तर सगळ्या पदव्या सुद्धा खऱ्या होत्या

मान्य करू कि नसेल मगर पकडली बालपणी त्यांनी मोदीजींसारखी किंवा एकाच वेळी आपला एक एक अवतार हिमालयात, एक भिक्षा मागायला, एक चहा विकायला आणि एक शिक्षण करायला असे नसतील गेले त्यांचे

पण त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जगातील नावाजलेलया केम्ब्रिज विद्यापीठाने ''सिंग शिष्यवृत्ती'' त्यांचा सन्मान म्हणून सुरु केली आहे मग करायचा ना एखादा मस्त चित्रपट तयार पण दुर्बुद्धी मुले नाही जमले त्यांना हे ..

एक मुद्दा #मौनी बाबाचा ही - पंतप्रधानाला भाषणात #थापा मारता यायला हव्यात, हे आज आपण पाहतो पण मनमोहन सिंग यांच्यात हा चांगला गुणच नव्हता, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल १९९८ एवढी भाषणे केली पण ती मनकी बात सारखी एककल्ली नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभा सारख्या सदनांमध्ये केली आहेत, त्यांच्या मुलाखती पहिल्या तर मुलाखत घेणारे पत्रकार ही मूर्ख असावेतअसे दिसते, वेगवेगळ्या धोरणविषयी अवघड प्रश्न हे पत्रकार विचारत, पण अरे मुलाखतीत काय विचारावे हे समजायला नको का तुम्हाला ?तुम्ही आंबे कसे खाता?, तुम्ही खिशात पाकीट ठेवता कि नाही? तुम्ही कसे महान आहात वगैरे प्रश्न विचारायला हवेत ना? पण त्यावेळी पत्रकार पण चांगले नसावेत

आज पहा कसे मस्त मस्त पत्रकार आहेत लोकांचे मुख्य प्रश्न सोडून पूर्ण वेळ रिया कंगना ड्रुग्स इ वर बोलत असतात. अरे रोजगार जात आहेत , आरोग्यव्यस्था , शिक्षण , GDP यावर बोलायाच असत का कुठे?

डॉ.मनमोहनसिंग ्यांच्यावर काही लोक जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते तेव्हा ते म्हणाले होते कि ''माझ्या कामाची दखल इतिहास घेईल''

आज आपली अर्थव्यवस्था रसातळाला गेल्यावर, बेरोजगारी प्रचंड वाढल्यावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतच आहोत. पण मला वाटतं त्यांनी तस बोलण्यापेक्षा सरळ जो कोणी त्यांचा विरोध सोडा, छोटासा प्रश्न सुद्धा विचारतोय त्याला #पाकिस्तानी , #देशद्रोही , #चमचा म्हणत ट्रोल करायला हवे होते, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून तुरुंगात टाकायला हवे होते पण असतात काही-काही लोक ज्यांना या महत्वाच्या गोष्टी समजत नाहीत ते असले प्रकार करायचे सोडून फक्त स्वतःचे काम करत राहतात

चूकभूल क्षमस्व

संकेत मुनोत
26 Sep 2020
#ManmohanSingh

Thursday, October 17, 2024

दै. लोकमत लेख -...अन पुण्याने देशाला महात्मा दिला

सकाळपासून अनेकांनी टेक्स्ट स्वरूपात मागितला म्हणून तोही सोबत paste करत आहे.
आज जगात 150 पेक्षा जास्त देशात महात्मा गांधींचे पुतळे आणि रस्ते असून अनेक देशात त्यांची विद्यापीठे सुद्धा आहेत. पण याच गांधींना घडवण्यात पुणे शहराचाही महत्वाचा सहभाग आहे 

ना. गोपाळकृष्ण गोखले(मवाळ गट) आणि लोकमान्य टिळक (जहाल गट) दोघेही त्यांना पुण्यात भेटले. त्यांच्यातील विरोध संपवून दोघांना एकत्र करण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न पुण्यातच केले . 
त्यांचे राजकीय गुरु ना. गोखले यांनी याच पुण्यात गांधींना देश समजून घेण्यासाठी भारत फिरण्यास सांगितले. पण गांधीजी भारत पाहून परत येण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.पण गोखलेंची इच्छा होती कि त्यांनी स्थापन केलेल्या 'सर्वटस ऑफ इंडिया' संस्थेचे गांधीनी सदस्य व्हावे पण त्या संस्थेच्या इतर सदस्यांनी त्याला विरोध केल्याने ते शक्य झाले नाही .
गांधीजींचे पहिले आत्मचरित्र १९१८ मध्ये अवंतिका गोखले यांनी लिहले त्याची प्रस्तावना खुद्द लोकमान्य टिळकांनी पुण्यातच लिहली ज्यात त्यांनी गांधीजींच्या शील आणि चरित्राचे भरभरून कौतुक केले शिवाय देशातील भविष्याचा नेता म्हणून ही वर्णन केले. ही प्रस्तावना वाचली तर टिळकांचा गांधीजीबद्दल असणारा आत्मविश्वास , प्रेम आणि आदर स्पष्ट दिसून येतो, दोघांत मतभेद नक्कीच होते पण मनभेद नव्हते. 
  टिळकांच्या अंत्ययात्रेत खांदा द्यायला गांधी गेले तर "ब्राम्हण नसल्यामुळे तुम्ही खांदा देऊ शकत नाही" असे सांगून तेथील सानतन्यांनी त्यांना बाजूला ढकलले. गांधी अस्वस्थ झाले पण पुन्हा आक्रमकपणे पुढे गेले "समाजसेवकाला जात असत नाही" असे सुनावत गांधींनी स्वतः तर खांदा दिलाच पण पुढे जाऊन धर्माने मुस्लिम असलेल्या व्यक्तीला पण खांदा द्यायला लावला.
टिळक-गोखलेंच्या काळापर्यंत कॉंग्रेस म्हणजे ठराविक उच्चभ्रू लोक असे सामान्य माणसाला वाटे. त्यामुळे सामान्य माणसे आणि बहुजन त्यात आणि स्वातंत्र्यलढ्यात जास्त प्रमाणात सहभागी नव्हते. गांधीनी या खांदा देण्याच्या प्रसंगापासूनच स्वातंत्र्यलढा उच्चभ्रू लोकांपासून बहुजनांचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचाही बनवला यामुळे कोट्यावधी लोक यात आले. 
“आधी स्वातंत्र्य मग सुधारणा” आणि “आधी सुधारणा मग स्वातंत्र्य “ असे म्हणणारे २ गट भारतात होते. या दोन्ही गटांना एकत्र करण्याचे काम गांधीनी या पुण्यातच केले. स्वातंत्र्य आणि सुधारणा दोन्ही सोबत करता येतात हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. 
पुणे करार - गांधी येरवडा तुरुंगात होते त्यादरम्यान ब्रिटिशांनी दलितांना विभक्त मतदार संघ द्यायचे ठरवले . त्यावेळेस देशात त्यामुळे अजून एक फुट पडू नये म्हणून गांधीनी आत्मक्लेश उपवास सुरु केला . आपण दलितांच्या सोबत हजारो वर्ष अन्याय केला आहे आणि त्याचे प्रायश्चित आपण घ्यायला हवे असे गांधीजी त्यावेळी सवर्णांना उद्देशून म्हणाले. या उपवासाचा परिणाम देशभर झाला. ज्या घरात प्रवेश नव्हता त्यापैकी अनेक घरात तो मिळाला . ज्या विहिरी मंदिरे जातीत विभागली होती त्यातील अनेक खुली झाली . डॉ. आंबेडकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला गांधीजीनीही ठरल्यापेक्षा जास्त जागा देऊ केल्या आणि दोन्ही महामानवांचे इथे मिलन झाले . 
याच येरवडा तुरुंगात त्यांनी संत तुकारामांचे अभंग समजून घेतले आणि त्याचा इंग्रजीत अनुवाद केला.
गांधीहत्या– गांधीहत्येचे मुख्य हल्ले पुण्यातूनच झाले . अस्पृश्यतानिवारण आचरणात आणताना गांधीनी वाई येथे स्वतःच्या मुलाचा आंतर्जातीय विवाह लावला, त्याला प्रतिसाद देत त्यांच्या अनुयायांनी देशभर असे विवाह लावले. यानंतर पुण्यात काही ब्राम्हणांनी सभा घेतली आणि “या गांधीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे” असे म्हटले . 
पण गांधीजींची अस्पृश्यता निवारण मोहीम सुरूच राहिली यामुळे पुणे येथे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला पण त्यात जात असताना २५ जून १९३४ रोजी पुण्यातील काही सनातन्यांनी त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला. सुदैवाने गांधीजी मागच्या गाडीत असल्याने बचावले पण त्या गाडीतील लोक गंभीर जखमी झाले. 
गांधींनी पुण्यातच अंतरराष्ट्रीय असा निसर्गोपचार आश्रम स्थापन केला ज्यात आजही देश विदेशातून लोक स्वतःचे आरोग्य चांगले करण्यासाठी येतात.
 पुण्यात एका कार्यकर्त्यावर निसर्गोपचार करण्यासाठी गांधी आले होते तेव्हा सुद्धा नथुराम त्यांना भेटून संपवण्याचा कट रचला पण भेट न झाल्याने भेट म्हणून तुटक्या चप्पल बूट यांची पिशवी त्याने दिली. पिशवी उघडताच कार्यकर्ते संतापले पण गांधींनी त्या चपला भंगारात विकून त्यापासून काही उपयोगी आणण्यास सांगितले. १९३४-१९४४ या दरम्यान झालेल्या ७ हल्ल्यांच्या वेळी कुठेही फाळणी , ५५ कोटी हे मुद्दे नव्हते तर कारण एकच होते गांधीजीनी चालवलेले अस्पृश्यता निवारण धोरण ज्यामुळे राजकारण समाजकारण आणि धर्मकारण यात ठराविक एका उच्चभ्रू वर्गाचे असलेले वर्चस्व कमी होऊन सामान्य माणसाला यात नेतृत्व आणि मोठे स्थान मिळत होते.
महावीर, बुद्ध , तुकाराम, ज्ञानेश्वर, महात्मा फुले यांना ज्या विषमतावादी विचारधारेच्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांनी गांधींची हत्या केली. दुर्दैवाने हे खुनी लोकही पुण्यातलेच होते.

गांधीजी काही काळ आगाखान तुरुंगात होते . palace म्हणत असले तरी ते तुरुंगच होते . तिथल्या रोगट वातावरणामुळे गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांचा मृत्यू तिथे झाला. महात्मा गांधीही तिथे मृत्युच्या दारापर्यंत जाऊन परत आले . 

देशाला कत्तलीपासून वाचवणारा पुणेकर काकासाहेब गाडगीळ - 
1948 मध्ये गांधीहत्या करण्यासाठी गोडसे आणि सहकाऱ्यांनी पुण्यातूनच प्रस्थान केले, खून केल्यावर गोडसे पळून जात होता पण त्याला रघुराम यादव या बिर्लाभवन मधील माळ्याने पकडले. तिथे तो स्वतःची ओळख सांगण्यास तयार नव्हता. हा खुनी कुणी मुस्लिम असावा अशी अफवा पसरून देशातील काही भागात मुस्लिमांवर हल्ले सुरु झाले. यात या दंगली वाढवून हिंदू मुस्लिम दंगलीत नेहरू पटेल यांचे लोकशाही सरकार पाडणे आणि संस्थानीकांचे सरकार परत आणणे हा डाव त्यामागे होता. पण संध्याकाळी काकासाहेब गाडगीळ तेथे गेले आणि त्यांनी नथुरामला ओळखल्याने हा मुस्लिम नसून हा हिंदू ब्राम्हण आहे हे समोर आले. पण याचा त्रास त्याच्या चूक नसलेल्या काही जातीबांधवांनाही झाला.गांधीजींची हत्या झाल्यावर पूर्ण देश शोकात बुडालेला होता पण या विषमतावादी लोकांनी मिठाई वाटून तेव्हा विकृत आनंद साजरा केला होता ज्याला उत्तर म्हणून काही सामान्य लोकांनी त्यांच्या घरावर हल्ले केले पण अश्यावेळीही गांधीवाद्यांनीच मध्ये पडून त्यांची घरे वाचवली.

ज्या पुण्यात गांधींचा खुनी दहशतवादी गोडसे निघाला त्याच पुण्यात त्यांना अनेक चांगले अनुयायी सुद्धा भेटले. साने गुरुजी , सेनापती बापट आणि अनेक लोकांनी गांधीजींचा लढा पुढे नेला .

संकेत मुनोत 
8668975178
knowing.gandhi@gmail.कॉम