AddThis code

Thursday, April 30, 2026

गुगल, chat gpt किंवा इतर कुणाच्या सल्ल्यातून बनलेले आर्थिक डॉक्टर्स

डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांकडून त्यांना जसे गुगल किंवा चॅट जी. पी.टी. वरून आजार आणि त्याची औषधे, उपचार स्वतःच सांगणाऱ्या व्यक्तींचा त्रास होतो त्याचप्रमाणे तो सध्या आमच्या क्षेत्रातही होऊ लागला आहे. 
एखादी SIP सुरु असतें तर यांचा मित्र म्हणतो, किंवा एखाद्या व्हिडिओत पाहतात किंवा कोणी दुसरा सल्लागार सांगतो 
 "हा नाही तू स्मॉल कॅप फंड घे त्यात बघ माझे कसे जास्त वाढलेत वगैरे " ( अरे पण त्यात रिस्क किती आहे? जर मार्केट खाली गेले तर सगळेच खाली जाईल ना? आपण एक ध्येय ठरवून प्लॅनिंग केले होते असं केले तर तो goal साध्य होईल का ?)
 "तू हा हेल्थ इन्शुरन्स कशाला घेतला? हा घे यात हेल्थ चेक अप एवढ्या हजारांचे आहे" 
( अरे पण आपण हेल्थ चेक अप साठी हेल्थ इन्शुरन्स साठी नाही घेतला ते त्यात कॉम्प्लिमेंटरी आहे आपला मुख्य हेतू हा मोठे आजारपण आहे.)
 एक जेष्ठ नागरिक त्यांना पेन्शन प्लॅन आणि एक swp अश्या 2 गोष्टी दिल्या होत्या तर त्यांना कोणी म्हणे "तुम्ही हा नव्हे टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा होता, हे प्लॅन काही कामाचे नाही ",( अरे त्यांचे वय काय सल्ला देतो काय? त्यांना टर्म मिळेल का आता ? आणि या वयात टर्म घेऊन ते करणार काय? त्यापेक्षा पेन्शन आणि SWP घेऊन चांगले आयुष्य जगू दे ना त्यांना )
एकाचे शिक्षण तिसरीच झाले त्यांना टर्म देता येत नाही म्हणून "एक SIP आणि एक वेगळा सेविंग इन्शुरन्स प्लॅन दिला तर त्यांना कोणीतरी म्हणे "टर्मच घ्या हे सेविंग इन्शुरन्स प्लॅन कशाला घेतले?" ( टर्म साठी शिक्षण किमान पदवी नाहीतर ते नसेल तर 10 वी शिक्षण असेल तर गेल्या 2-3 वर्षाचे उत्पन्न 10 लाख च्या वर लागते ते आहे का? आत्ता हाच प्लॅन योग्य आहे ना?)
 एखाद्याला वजनामुळे, स्मोकिंग मुळे किंवा अन्य कुठल्या कारणामुळे एक्सट्रा लोडींग आले तर म्हणे "मला अबक सल्लागार किंवा बँकेतील xyz व्यक्ती हे वजन, स्मोकिंग वगैरे सगळं मॅनेज करुन देत होता " मी म्हटलं "जेव्हा 1-2 कोटींचा क्लेम येईल आणि या कुठल्या कारणामुळे रिजेक्ट होईल तेव्हा कुटुंबाला 1-2 कोटी ₹ तो मॅनेज करुन देईल का? त्यापेक्षा जे काही जास्त वजन किंवा रिस्क आलीये त्याला काही हजार जास्त भरून कव्हर करा" पण असे प्रामाणिक मार्गाने गेले तर क्लेम ची चिंता नाही. जे तुम्हाला 1 कोटी देणारे आहेत ते असेच देणार नाहीत, पडताळणी करतीलच ना?
एक जण म्हणे तो अबक सल्लागार हेल्थ इन्शुरन्स काढल्यावर डॉक्टरला मॅनेज करुन दरवर्षी 1 लाख रुपये चे ऍडमिशन करुन देतो त्यात डॉक्टरला 50 हजार, पेशन्टला 25 हजार आणि सल्लागाराला 25 हजार असे ते दरवर्षी कमवतात, तुम्ही असे काही करू शकाल का? म्हटलं हा फ्रॉड आहे आणि तो सल्लागार, डॉक्टर आणि पेशन्ट तिघेही कधी ना कधी पकडले जाणार आहेत आणि खरी अडचण आल्यावर त्यांना 1 रुपयाही मिळणार नाही. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? प्रति व्यक्ती ₹ 10 हजार असे हजार लोकांकडून गोळा केले तर जमा झाले ₹ 1 कोटी. तर या हजार व्यक्तीतील 100 व्यक्ती आजारी पडल्या आणि त्यांना समजा 10 लाख प्रति व्यक्ती खर्च आला तर त्या सर्वांचे मिळून झाले 1 कोटी ते त्यातून दिले जातात पण समजा हा खर्च 2 कोटी आला तर? तर कंपनी जास्त स्ट्रिक्टली पडताळणी करते आणि यात रिजेक्टही होतात पण हे प्रमाण बिघडते कधी? जेव्हा वर सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात फेक क्लेम्स येतात तेव्हा.

डॉक्टर जसे रुग्णाची आरोग्याची स्थिती, वय आणि इतर गोष्टी पाहून तुम्हाला औषध आणि ट्रीटमेंट सुचवतात. तसेच तुमचे वय, शिक्षण, आरोग्य, उत्पन्न या सर्व गोष्टी पाहून तुम्हाला तश्या योजना आम्हाला सुचवाव्या लागतात. आणि तुम्ही पैसे दिले की तुम्हाला तो इन्शुरन्स भेटेल असे नाहीये त्यात तुमची पात्रताही जसे की उत्पन्न, शिक्षण, वय हे सर्व कंपनी पाहते आणि त्यांना जर त्यातली कुठली गोष्ट अयोग्य वाटली तर नाही म्हणून रिजेक्ट करुन तुम्हाला भरलेले पैसे जसेच्या तसे रिटर्न देते.

जी चर्चा करायची ती सल्लागाराशी करा तुमच्या सगळ्या शंका बिनधास्त विचारा, समज-गैरसमज दूर करा आणि मग पुढे जा पण संवाद करा.

एका क्लायंटच्या मित्राला महिना 4% म्हणजे वर्षाचे 48% रिटर्न मिळत होते तर ते म्हणे आम्हालाही असा प्लॅन दे, "आमच्या इकडे अनेक मोठ-मोठ्या लोकांनी वकील, पोलीस, CA, डॉक्टर, शिक्षक आणि अनेकांनी त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे, गेले 6 महिने त्यांना त्यातून लाखो रुपये मिळाले आहेत तर आताही देतीलच " मी म्हटलं "माझ्याकडे असला कुठलाही प्लॅन नाही, एवढे रिटर्न्स कोणी देऊ शकत नाही आणि देत असेल तर त्यावर रेगुलेटरी बॉडी कुठली आहे? ते पहा, ते काही महिने देतील आणि सगळी मुद्दल घेऊन गायब होतील" आणि झालेही तसेच सगळे पैसे घेऊन पळाले मग आता चालु झाल्या गुंतवलेली मुद्दल परत मिळवण्यासाठीचा संघर्ष, पण तोपर्यंत हजारो कोटी घेऊन ती व्यक्ती फरार झालेली असतें.

कोणाचेही प्लँनिंग करताना माझा किमान अर्धा तास तरी financial pyramid, त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लॅन्स असतात कोणाला काय मिळु शकते? त्यासाठी शिक्षण, वय, आरोग्य, आर्थिक उत्पन्न याची मर्यादा काय हे सांगण्यासाठी घेतो, वेटिंग पिरियड वगैरे समजावून सांगतो त्यानंतर quotation काढतो. जेणेकरून नंतर मनात शंका राहू नयेत. 
तर गुगल, chat gpt, याने सांगितले किंवा कुणा मित्राने, सहकार्याने सांगितले म्हणजे ते बरोबरच असेल असे नाही. आम्ही ज्या दर आठवड्यात 6-6 तास बसून नवनवीन ट्रेनिंग्स घेतो, आर्थिक क्षेत्रातील विविध परीक्षा देतो त्यात काहीतरी आम्हालाही समजत असेल ना? अर्थात यात काही जण सल्लागाराकडे एकदम वेगळ्याच नजरेने पाहतात कि याला काहीतरी भेटणार म्हणून हा मला देणार आहे, तर तू साध्या हॉटेल मध्ये जरी गेला आणि काही खरेदी केली तर त्या हॉटेलमालकाला काही मिळतच असते, तू स्वतःही काही काम करतो, सेवा देतो त्याचे तुला पैसे मिळतात ना? मुख्य म्हणजे तुझा फायदा तो प्लॅन देणाऱ्यापेक्षा जास्त आहे हे का तू लक्षात घेत नाही, आर्थिक वृद्धी तुझी होणार आहे, संकट आले तर तुला लाखो किंवा कोट्यावधी रुपये तुला मिळणार आहेत त्याला नाही. ज्यावेळेस नातेवाईक, मित्र कोणीच उपयोगी पडणार नाही त्यावेळेस हे उपयोगी पडणार आहे. अर्थात असल्या दृष्टीचे कोणी असेल तर मीच स्वतः नाही म्हणतो. 4 पैसे कमी मिळाले तर चालतील पण किटकिट नको.

अर्थात आम्ही 100% बरोबरच असू असे माझे बिलकुल मत नाही. प्रत्येक क्षेत्रात असतात तसे आमच्याही क्षेत्रात काही फक्त स्वतःचा फायदा पाहणारे लोक असतील पण मग ते जास्त दिवस टिकत नाहीत. तुमच्या ज्या काही शंका असतील त्याबद्दल प्रत्यक्ष आमच्याशी संवाद साधा, भरपूर प्रश्न विचारा मग निर्णय घ्या पण याचे-त्याचे ऐकून निर्णय घेऊ नका.

आपलाच 
संकेत मुनोत, MDRT, USA
आर्थिक नियोजन सल्लागार 
Wealthbridge Financial Services 
8668975178
#financialliteracy #WealthBuilding