₹ 13 लाख मिळाले
इन्शुरन्स बद्दल भारतात नेहमी नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते त्यामुळे परवा 24 मार्च 2026 ला आलेला क्लेम सेटलमेंट चा अनुभव शेयर करत आहे.
अपघात झाल्यामुळे आपल्या टीम मधील एका सल्लागार मित्राचे क्लायंट 13 आठवडे घरी बेडवर होते. त्यामुळे तेवढे दिवस त्यांचे उत्पन्न ही बंद होते तर त्यांना त्याबदल्यात ₹ 13 लाख मिळाले विशेष म्हणजे यासाठी त्यांनी फक्त 1400 प्रति महिन्याचे भरले होते ( 5 वर्षाचे 85,000 भरले होते )
तर सविस्तर सांगतो राजेश (नाव बदललेले ) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला त्यात त्यांची चूक नव्हती. दारु पिऊन बाईक चालवणाऱ्या एका बाईकवाल्याने नशेत त्यांना उडवले आणि तो आणि त्याचा मागे बसलेला मित्र सॉरी म्हणून निघून गेला. हे उडून दुसरीकडे पडले यात त्यांच्या पायाचे हाड मोडले ज्यामुळे चालणे अशक्य झाले तर त्यांना डॉक्टरांनी 1 महिना घरीच बेडरेस्ट सांगितली. हॉस्पिटलचा खर्च जास्त आला नाही पण घरी थांबल्यामुळे इनकम बंद झाले आणि पत्नी, मुले, म्हातारे आईवडील आणि स्वतः सर्वांचा खर्च मॅनेज करणे अवघड जात होते पण या दरम्यान काढलेली ही पॉलिसी उपयोगी पडली.
डॉक्टरांनी 1 महिन्यात पाय बरा होईल असे म्हटले पण 13 आठवडे झाल्यावर तो बरा झाला अर्थात आता थोडे-थोडे चालता येते. तर या 13 आठवड्याचे प्रति आठवडा 1 लाख असे तब्बल 13 लाख रू त्यांना मिळाले.
त्यांना काही आजार असल्यामुळे टर्म पॉलिसी मिळत नव्हती पण या पॉलिसी ला ती अडचण नसल्याने ती त्यांना घेतली .
यात 1 कोटीसाठी प्रति महिना फक्त 1400₹ असे 5 वर्षाचे मिळून फक्त 84,000 त्यांनी भरले होते.
तर या पॉलिसीची वैशिष्ट्य सांगतो 18-64 वयाच्या कुठल्याही व्यक्तीची ज्याला काहीतरी उत्पन्न सुरू आहे त्यांना ही पॉलिसी काढता येते. कुठलाही आजार असो, शिक्षण काहीही असो, उत्पन्न कितीही असो हा प्लॅन निघतो.
आता 1 कोटी कव्हर चे उदाहरण पाहु
अपघाती मृत्यू झाला तर 100 महिने प्रति महिना 1% असे एकूण 1 कोटी कुटुंबाला मिळतात.
अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तर एकाच वेळी 200% म्हणजे 2 कोटी मिळतात.
तर अपघातामुळे घरी बेडरीडन झालो तर प्रति आठवडा 1% म्हणजे प्रति आठवडा 1 लाख मिळतात जसे यांना 13 लाख मिळाले.
अपघातमुळे होणारा हॉस्पिटल खर्च आणि इतर अनेक गोष्टीही यात मिळतात.
1400 ₹ महिन्यात अजुन काय येईल? अर्थात तुमचे बजेट नसेल तर 50 लाख किंवा 30 लाख ची पण पॉलिसी घेऊ शकता. ज्याला प्रति महिना 500/- किंवा फक्त प्रति महिना फक्त ₹ 1000/- जातात. ज्यांचे इनकम जास्त आहे त्यांनी 2 कोटी किंवा 3 कोटीची पॉलिसी घ्यावी.....( आपल्याला 5 वर्षाचे पैसे एक साथ भरावे लागतात अर्थात ते एका वर्षात EMI सारखे पण भरू शकतो )
आपण सध्या युद्धामुळे होणारे मृत्यू पाहत आहोत पण आपल्या भारतात दर महिन्याला अपघातामुळे 400 पेक्षा जास्त लोक मरतात तर हजारो या अपघातात अपंग होतात.बातमीत फोटो फक्त मृत्यू झाला त्यांचा येतो पण अपंगत्व येते तेव्हा अजुन हाल होतात. यात बहुतेक ठिकाणी त्यांची चूक नसते.कुठे पूल पडतो, कुठे गटाराला कठडा नसतो त्यामुळे आपण त्यात पडतो, कुठे एखादा कार वाला उडवून जातो, तर कधी घरात स्टोव्ह चा स्फ़ोट होतो, आग लागते किंवा अन्य काहीही होते...मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर इनकम बंद होते पण आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या संपत नाहीत.. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च लागणारच आहे, घर खर्च लागणारच आहे, इतरही अनेक बाबी आहेत. त्यासाठी अशी पॉलिसी अत्यावश्यक आहे.
500 ₹ तर असेच चित्रपट पहायला पण जातात पण त्यात असे काही केले तर पुढे कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.
कारण असे काही झाले तर नातेवाईक, मित्र परिवार भेटायला येतात दुःख ही व्यक्त करतात पण कोणी 1 लाख रू महिना किंवा एक साथ 2 कोटी ₹ देत नाही ना? जेव्हा आम्ही असे काही देतो तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेले असतें. अर्थात आम्ही देऊ शकतो ते तुम्ही केलेल्या योग्य आर्थिक नियोजनमुळेच...
तर आपले प्रामाणिक आर्थिक नियोजन करण्यासाठी आजच मला संपर्क करा...
© संकेत मुनोत, MDRT, USA
8668975178
Whatsapp Link https://wa.me/918668975178
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार
संस्थापक, वेल्थब्रिज असोशिएट्स
आर्थिक साक्षरता पसरवणारी सामाजिक चळवळ...
लेख आवडल्यास आर्थिक साक्षरते साठी नावासह शेयर करा...
No comments:
Post a Comment