AddThis code

Friday, May 20, 2022

*देशाचे अतोनात #नुकसान करणारे #पंतप्रधान राजीवजी*

मला ते न आवडण्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली #विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती.

इंदिराजींच्या निधनानंतर अत्यंत विपरीत स्थितीत पंतप्रधान पदाची सूत्रे हाती येताच, #राजीव_गांधी यांनी सरकारचा पैसा जाहिराती करण्यासाठी द्यायचा सोडून तो देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी व त्यांच्या आधुनिकीकरणासाठी  वळवला
पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर होणारा विरोध नाकारुन त्यांनी भारतात *संगणक आणि टेलिकॉम युग* आणले खरतर इंटरनेटचा शोध हा भारताने महाभारताच्या काळातच लावला हे त्त्यांनी त्यावेळी सांगायला हवे होते पण विज्ञानाची दुर्बुद्धी...
या क्रांतीमुळे आज भारतातील लाखो तरुण भारतात आणि भारताबाहेर आय टी क्षेत्रात कार्य करतात ज्यामुळे ते अमीत शाहजी म्हणतात तसे हे तरुण भजी विकण्याचा मोठा व्यवसाय किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात तसे पान टपरी अथवा गोमूत्र विक्रीचा व्यवसाय करण्यापासून मुकले आणि आपण चविष्ट खाद्यपासून मुकलो.

त्यांच्याच काळात 1985-1997 या कालखंडात *देशाचे औद्योगिक उत्पादन 125 टक्के वाढल्यामुळे* सोबतच लोकांना रोजगार ही मिळाल्यामुळे घरी बसणारी तरुणाई कमी होऊन  देशाचे अतोनात नुकसान झाले.

दुसरे मोठे नुकसान म्हणजे *मतदानाचा हक्क वय २१ वर्षे वयावरून १८ वर्षे करणे* ज्यामुळे या युवांना मतदानाचा हक्क मिळाला .

*ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय, गावांसाठी पंचायत राज , C-DOT, Operation Blackboard, Indira Gandhi National Open University (IGNOU), परदेशात भारताचे स्थान अधिक उंचीवर नेणे* अशी अनेक चुकीची कामे त्यांनी केली

असो राजीवजींना थोडी तरी दूर दृष्टी असती तर त्यांनी *जागोजागी आपले फ्लेक्स लावले असते*, वैमानिक होऊन विमान चालवण्याऐवजी पुष्पक विमानाचा शोध भारताने कसा लावलाय याचे समर्थन केले असते,
परदेशात जाऊन सॅम पित्रोदा सारख्या शास्त्रज्ञांना भारतात परत आणून टेलिकॉम क्रांती करण्याऐवजी आसाराम बापू आदींचे सत्संग केले असते

तिकडे जाऊन भारताचे आतंरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याऐवजी सारखे सारखे जाऊन त्यांच्या पंतप्रधनांना जादूकी झप्पी देत देशात मोठं-मोठी भाषणे झाडली असती
लोकांचे मुळ प्रश्न अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण, व्यापार वृध्दी, आरोग्यव्यवस्था हे सोडून गावांची नावे बदलणे, देशात महागाई करत टॅक्स भरमसाठ वाढवून सामान्य माणसांचे जगणे अवघड करणे इ गोष्टी केल्या असत्या

पाकिस्तान सरकारची नाराजी झुगारून बलुचिस्तानात जाऊन सरहद्द गांधी खान अब्दूल गफारखान यांची भेट घेण्याऐवजी शत्रू राष्ट्राला शिव्या देत त्यांच्या राष्ट्रात जाऊन अचानक केक कापून बिर्याणी खाल्ली असती,
जो कोणी त्यांच्यावर टीका करेल प्रश्न विचारेल त्याला देशद्रोही, गद्दार ठरवण्यासाठी ट्रोल ची टीम तयार केली असती

*पण नसते एखाद्याला #दूरदृष्टी*

जाऊ द्या आज त्यांनीच आणलेल्या #तंत्रज्ञान युगात त्याच संगणकाद्वारे त्यांच्याविषयी खोटे-नाटे पसरवून आपण त्यांना चांगलाच धडा शिकवत आहोत

संकेत मुनोत
२२ मे २०१८



#RajivGandhi #RememberingRajivGandhi

Comment, Share ,Follow and Subscribe.

10 comments:

  1. All above mentioned things are exaggeration to support a narrative, but even for a minute we accept it’s to be true, then what next ? Do u expect people to vote for his son based on his dad’s 35 year old performance ??? 🤪

    ReplyDelete
    Replies
    1. Ok please don't vote for his son but vote for the big Feku who has destroyed India's legacy , culture and heritage.

      Delete
  2. Kunal Yashwant PatwardhanMay 23, 2022 at 1:53 AM

    स्मृतिशेष माजी प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांना भावपूर्ण आदरांजली .💐💐💐👏👏👏
    सुंदर व्यंगात्मक पोस्ट !
    खरच दुरदृष्टी नसलेला असाही एखादा प्रधानमंत्री या देशाला लाभला हे या देशाच भाग्यच म्हणावे लागेल . त्यांच्या संगणक क्रांतीला संघी प्रमोद महाजानापासून तर आताचे फेकू यांनी सर्वांनीच विरोध केला होता . आणि आज त्याच संगणकाच्या साह्याने नेहरू पासून ते राहुलपर्यंत सर्वांना टार्गेट करताना दिसतात .
    नाल्याच्या गटारातून गॅस कादून चहा तयार करण्याची दुरदृष्टी राजीव जी जवळ नव्हती हे देशाच केवढ मोठ दुर्भाग्य !ती दुरदृष्टी आमच्या फकीर बाबा कडे आहे . म्हणूनच तर आमचा देश आठ वर्षात सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे . गणेश जी ची त्या काळात पॅस्टीक सर्जरी झाली होती हा शोध आमच्या फकीर बाबाने लावला त्यामुळे वैद्यकिय क्षेत्रात आठ वर्षात अंतौच्यप्रगती झाली आणि करोना काळात एकही मृत्यु झाला नाही . ही फकीर बाबाची पुण्याई आहे . नेहरू राजीव कडे खरच विकासाची दृष्टी नव्हती .स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशात सुई निर्माण होत नव्हती . यांनी उगीचच औदयोगीक क्षेत्रात प्रगती केली . कारखाने काढले ' विमानतळ निर्माण केले .डॅम तयार केले .बँका तयार केल्या . जीवन विमा मंडळ काढले . प्रशासनिक संस्था निर्माण केल्या . देश प्रगतीपथावर आनला हेच मुळात यांनी चुकीच केल-. यांच्याकडे दृष्टीच नव्हती . दिव्य दृष्टीतर आमच्या फकीर बाबा कडे आहे .आठ वर्षात विमानतळ ' रेल्वे ' विमा ' सरकारी संस्था बँका उद्योग क्षेत्र सर्व काही विकून मस्त विदेश दौरें करून लाखो रुपयाचे वेष परिधान करून देश प्रगतीच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवला . रुपया डॉलरच्या किमंतीत कुठे नेऊन ठेवला . याला म्हणतात विकास दृष्टी !तो दिवस दूर नाही की भारता लवकरच श्रीलंका होईल !
    असे झाले तर फकीर बाबाचे आठ हजार करोड रुपयाचे विमान तयार आहेच की फकिर बाबा त्यात बसून रफ्फू चक्कर होईल .
    सुंदर ! विडंबनात्मक पोस्ट !
    मी मुळात कांग्रेसी नाही . तरी पण
    देशाचे अतोनात नुकसान करणारे देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीतो .
    💐💐💐💐👏👏👏👏
    धन्यवाद !
    - सुभाष भीमराव पटवर्धन.

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब किती विष पसरवायचे मी पण अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज तसेच राजीव गांधी यांना मानणारा आहे. किती खोटे बोलायचे. ज्या पंतप्रधानाने टेक्नॉलॉजी क्रांती आणली. तुम्ही जो मोबाईल वापरताना तो त्याने आणलाय

      Delete
  3. आता ईडीची प्रतीक्षा करा!!!!

    ReplyDelete
  4. Real longlife good aporchinity got to Indians,we all filling very much loss by early exit off Rajivji

    ReplyDelete
  5. कशाला फ्लेक्स लावतील देशातल्या प्रत्येक 3 ऱ्या रस्त्याला त्यांची नावं आहेत

    ReplyDelete
  6. पंतप्रधान म्हणुन राजीवजी नी कामे केली ती निश्चित चांगली आहेत. 21 व्या शतकात भारताला जाणेसाठी
    जी प्राथमिक तयारी करायला पाहिजे होती ती त्थांनी निश्चित प्रामाणिक पणे केली. भारतात अधुनिक तंत्रज्ञान आणायचेच ही त्यांची कल्पना, त्यांचे सहयोगी मित्र स्याम पित्रोदा प्रत्यक्षात ऊतरवली. पण नंतर त्यांच्या जवळच्या थिंक टँकने चुकीचा सल्ला दिल्या प्रमाणे शहाबानो केस मधे संख्याबळावर सर्वोच्च न्यालयाचा निर्णय बदलला हे योग्य नव्हते. तसेच नंतर ते बोफोर्स प्रकरणात त्यांची लोकप्रियता खालावली गेली की 1989 मधे नवे सरकार आले. आदरणीय राजवजींचा कालावधी मे 1991 पर्यंत असल्याने पोस्ट मधे लिहलेले 1997 हे वर्ष चुकीचे वाटते. असो.

    ReplyDelete
  7. सुंदर लेख

    ReplyDelete
  8. सुंदर लेख आज राजु गांधी असते तर

    ReplyDelete