*डॉ बाबासाहेब आंबेडकर- समज-गैरसमज*
आज दिवसभर फेसबुक, whatsapp सारख्या सामजिक माध्यमातुन मित्रांशी चर्चेत अनेक समज गैरसमज आढळून आले त्याबद्दल *माझ्या अल्पअभ्यासाने संदर्भासहित काही गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न*
शाळेत असतांना आंबेडकरांबद्दल थोडेसे आकर्षण वाटायचे ते त्यांच्या काही गोष्टी पाठ्यपुस्तकात होत्या त्यामुळे, मी आत्ता जातपात मानत नसलो तरी *cast- open असे असल्यामुळे आरक्षण व ईतर काही अनुभवांमुळे सुरवातीला मला आंबेडकर फक्त दलितांचेच पुढारी वाटत सोबतच त्यांनी आपले नुकसान केले असेही वाटे.*
बी फार्मसी झाल्यावर G-PAT Entrance परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी open caste मधील विद्यार्थ्यांसाठी 145 तर तर SC , NT साठी 100 च मार्क्स पाहिजे होते तेव्हा मला 140 मार्क्स पडले आणि थोडक्यात नंबर हुकला तेव्हा वाईट वाटले होते आणि आरक्षणाबद्दल चीड आली होती (पण काही काळानंतर अभ्यास केल्यानंतर आरक्षण योग्य आहे याचीही जाणीव झाली.काही लोक या आरक्षणाचा गैरफायदा घेतात व आपण त्याचे श्रेय पूर्ण समजाला देऊन बसतो हे चुकीचे आहे.)
परत आंबेडकर जयंतीला रात्री पिऊन फिरणारी मुले, आणि त्यातील ती बिभत्स गाणी ज्यात प्रबोधनाचा अंशही नव्हता उलट काही गाणी तर ईतर महापुरुषांना नावे ठेवणारी होती, त्यातील अनेक भाषणेही इतर महापुरुषांना नावे ठेवणारी होती( जसे की नोटेवर भीम चांगला दिसला असता, किंवा गांधींना शिव्या देऊन त्यावर टाळ्या मिळवणे) इ. हे पाहून आंबेडकरांबद्दलचे गैरसमज अजून वाढत गेले.
पण जस वाचन, सामजिक चळवळीतील सहभाग वाढत गेला तसे सत्य समोर येत गेले कि हे जस दाखवल जातय तस सत्य नाही.
आंबेडकर महामानव होते ते कुणा एका जातीपुरते नव्हतेच. त्यांनी आणि नेहरूंनी जर भारतीय राज्यघटना बनवण्यात मोठे योगदान दिले नसते तर आजचा भारत कदाचित वेगळा असता लोकशाही टिकली नसती.लोकशाही टिकवण्याच सगळ्यात मोठे श्रेय गांधी ,नेहरु, आंबेडकर आणि पटेल सारख्या महापुरुषांना जाते.
*आंबेडकरांचे नुसते कोट्यावधी रुपयांचे मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा आणि दारु पिऊन नाचण्यापेक्षा #आंबेडकरांचे_विचार_डोक्यात_घेण्याची_वत्त्यांच्या_विचारावर_कार्य_करण्याची_जास्त_गरज_आहे.*
*महापुरुषांचा देव केला की त्याच्या अनुकरणाची गरज संपते*
कारण देव बनवल्यावर आपल्याला म्हणता येते की ते तर बाबासाहेब होते म्हणून त्यांना ते शक्य होते आपल्याला कसे शक्य होईल ते?
मागे कुणीतरी लिहले होते की *कागदावरचा बाबासाहेब सर्वानी वाचला पण बाबासाहेबांचा कागद कुणी नाही वाचला.*
*विचारांची कास धरून विवेकाशीलतेने वागून... वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून, सुशिक्षित समाजाचे घटक व्हायला हवे*, *उत्सवासोबत च या दिवशी वही-पेन-पुस्तके ही वाटायला हवीत , रचनात्मक काम करायला हवे असे वाटते.
चळवळीतील काही मित्रांनी असे काही ऊपक्रम चालु केले आहेत त्यांचे अभिनंदन पण हा ऊपक्रम सर्व जण हाती घेतील तेव्हा कुठे डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करु
सोबतच आंबेडकरांविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज(अफवा)आहेत तेही दुर व्हायला हवेत त्या अफवा किंवा गैरसमज खालीलप्रमाणे
*1.आंबेडकरांचे राज्यघटने मध्ये काही योगदान नाही ?*
*2.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रध्वज म्हणून भगवा झेंडा बनविण्याचा आग्रह होता*
*3.आंबेडकर सावरकरांचे कट्टर समर्थक होते,*
*गांधीहत्येनंतर आंबेडकरानी सावरकरांच्या वकिलांना गुपचूप भेटून सावरकरांना गांधीहत्येतून वाचवण्याचा प्रयत्न केला*
*4.आंबेडकर कडवे मुस्लिम धर्मविरोधी होते*
*5.आंबेडकर ब्राम्हण होते व नंतर बौध्द झाले*
*6.आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते*
तर विस्ताराने खालीलप्रमाणे
1)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत काही योगदान दिले नाही, आपली घटना फकत दुसऱ्या देशातील घटनांची कॉपी पेस्ट आवृत्ती आहे ?
उत्तर-
हे साफ खोटे आहे , भारतीय राज्य घटना तयार होण्यासाठी २२ समित्या निर्माण केल्या होत्या, या सर्व समित्यांचे यात खूप मोठे योगदान आहे. ब्रिटिश जाताना आम्हीच भारताचे संविधान तयार करू असे म्हणत होते. महात्मा गांधींनी त्याला ठाम विरोध केला आणि आमचे संविधान आम्ही बनवणार हे ठणकावून सांगितले. जर हे झाले नसते तर ५०० पेक्षा जास्त राजांना त्यांचे राज्य चालवण्याचे अधिकार मिळाले असते आणि भारत कधीही एकसंध झाला नसता.आपण स्वतः आपले संविधान बनवल्यामुळे हे शक्य झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ राजेंद्रप्रसाद आणि यासारखे अनेक विद्वान या निर्मिती प्रक्रियेत होते म्हणून आपले संविधान उत्तम झाले
2)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रध्वज म्हणून भगवा झेंडा बनविण्याचा आग्रह होता-
उत्तर - हे साफ खोटे आहे
१० जुलै १९४७ ची गोष्ट.बाबासाहेब दिल्लीला जायला निघालेले.ते विमानात बसतेवेळी हिंदूमहासभेच्या पुढाऱ्यांनी त्यांना भगवा ध्वज अर्पण केला व आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा असावा यासाठी प्रयत्न करण्याची विंनंती केली .त्या वेळी हिंदू महासभेचे नेते रावबहादूर सी.के.बोले,अनंतराव गद्रे यांना डॉ.बाबासाहेब विनोदाने म्हणाले ,"मला महाराच्या पोराला पुढे करुन तुम्ही मागे राहणार काय??दिल्लीला चला तेथे यासाठी जोरदार निदर्शने झाली पाहिजेत"मी माझ्याकडून शक्य ते सारे करेंनच" आणि आपण पाहताच आहोत बाबासाहेबांनी भगव्या ध्वजाऐवजी अशोक चक्रांकित तिरंगी झेंड्याचा स्वीकार देशासाठी केला म्हणजे अर्थात त्यात ती निवड नेहरूंची होती पण बाबासाहेबांनी त्याला विरोध केला नाही. (संदर्भ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ)
3) आंबेडकर सावरकरांचे कट्टर समर्थक होते,
गांधीहत्येनंतर आंबेडकरानी सावरकरांच्या वकिलांना गुपचूप भेटून सावरकरांना गांधीहत्येतून वाचवण्याचा प्रयत्न केला.
सत्य -
हे साफ खोटे आहे ऊलट सावरकरांनी आंबेडकरांचा ऊल्लेख बाटगा असा केला आहे.
ब्रिटिशांची माफी मागून येणाऱ्या सावरकरांनी जशी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर टीका केली तशीच त्यापेक्षाही जास्त टीका डॉ. आंबेडकरांवर केली आहे, त्यांचे लेखन वाचले तर असे अनेक संदर्भ मिळतील
सावरकरांच्या जात्युच्छेदक निबंध या पुस्तकातील उतारा संदर्भासाठी देत आहे
*"डॉ आंबेडकर हि व्यक्ती भिक्षु आंबेडकर झाली तरी त्याचे कोणाही हिंदूस कोणचेही विशेष सोयर सुतक बाळगण्याचे कारण नाही . ना हर्ष ना विमर्श, जेथे बुद्धाने हात टेकले तेथे आंबेडकर कोणत्या झाडाचा पाला I"(उक्त पृ .२२३)*
तर सावरकरांबद्दल बाबासाहेबांनी म्हटलेले आहे कि सावरकरांनी काय कोणीही अपप्रचार करण्याऐवजी मला बुद्धासंबंधी उघड विचारावे असे आवाहन बाबासाहेबांनी केले होते त्यांनी म्हटले होते कि
*"तेव्हा अश्या नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये.काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर आपल्या पोटातील नरक ओकले(उक्त-2 जून 1956)*
गांधींजींशी वैचारिक मतभेद असले तरी हत्येचे दुःख आंबेडकरांना ही झाले होते आणि डॉ. आंबेडकर जे करायचे किंवा बोलायचे ते उघड उघड बोलत किंवा करत हे आपल्याला त्त्यांच्या लेखनातूनही दिसून येईल त्यामुळे सावरकरांच्या वकिलांना असे गुपचूप भेटण्याचा प्रश्नच येत नाही.
4)आंबेडकर कडवे मुस्लिम धर्मविरोधी होते
सत्य-आंबेडकरांनी अनेक धर्मांची चिकित्सा केली आहे त्यात ईस्लामबद्दलही लिहले आहे-
बाबासाहेबांचे इतर लेखन वापरून हिंदू कट्टरवाद्यांकडून सामान्य मुस्लिमांना झोडपण्याचे काम सुरुये.हाच प्रकार सामान्य हिंदूंच्या बाबतीत "रिडडल्स इन हिंदुइसम"व बाबासाहेबांचे इतर लिखाण वापरून त्यांना झोडपण्याचे काम गैरहिंदू कट्टरवाद्यांकडून होतेय. खरे तर त्यांची विचारसरणी हि बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित विचारसरणी आहे जी कोणत्याच धर्मातील कट्टरवाद्यांना झेपणारी नाही.
5)"आंबेडकर ब्राम्हण होते व नंतर बौध्द झाले"
अनेक मित्रांकडुन मी ही गोष्ट ऐकली आहे
सत्य - हसावे कि रडावे हे ऐकून असा हा गैरसमज आहे पण खूप सामान्य जणांमध्ये हा गैरसमज आहे
जो कुणी हुशार तो आमच्याच जातीचा अस बोलणार्या गटांनी 'हे गैरसमज पसरवले आहेत , त्यांच्या आडनावात 'कर' म्हणुन ते ब्राम्हण असेही अनेक लोक समजतात पण ते खोटे आहे त्यांचा जन्म महार जातीत झाला होता.आणि त्यांना कोणत्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या हे आपणास माहीतच असेल.
6)आंबेडकर आणि गांधी एकमेकांचे कट्टर शत्रू होते
सत्य -
हेही साफ खोटे आहे , गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात मतभेद निश्चितच होते पण मनभेद नव्हते.त्यांचे काही विचार एकमेकांशी भिन्न तर काही विचार एकमेकांना पूरक होते..
*ज्या काळात आंबेडकरांनी दलितांमधील न्युनगंड घालवून त्यांना माणूसपण बहाल केले, त्याच काळात म.गांधींनी स्पृश्य माणसातील अहंगंड कमी करून त्याच्यातील पशुत्व नष्ट केले.या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्याने सामाजिक अन्याय मोठ्या प्रमाणात कमी झाला.*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४. ११.१९३२ रोजीचे बोटीवरून पत्र लिहिले होते त्यात त्यांनी म्हटले आहे
*"माझा बहुतेक वेळ गांधीजींची अस्पृश्यता निवारक पत्रके वाचण्यात जातो. पत्रकांतील विचार वाचून गांधीजींच्या विचारांत केवढी तरी क्रांती घडून आल्याचे दिसून येते. गांधीजींना आता `आपला माणूस' म्हणावे. कारण ते आता आपली भाषा व आपले विचार बोलू लागले आहेत.अस्पृश्यांच्या हालअपेष्टांचे गांधीजींनी एका पत्रकात केलेले यथार्थ वर्णन वाचीत असता मला वाटते की `समता' अगर `बहिष्कृत भारत' या आपल्या पत्रातील काही लेखांचे इंग्लिश भाषांतरच जणू वाचत आहोत."* [संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा
*- शंकरराव खरात*- पृ १७७]
"कुणी एका गालावर मारले तर तर दुसरा गाल पुढे करा" असे गांधीजींनी ब्रिटिशांबद्दल नाही तर अस्पृश्यतानिवारण चळवळीत म्हटलेले वाक्य आहे हे किती जणांना माहित आहे?
*सवर्ण हिंदुंनी दलितांवर एवढे अत्याचार केले आहेत की त्यामुळे चिडून कोण्या दलिताने मला सवर्ण हिंदू समजून माझ्या एका गालावर मारले तर मी त्याचा प्रतिकार करणार नाही उलट दुसरा गाल पुढे करेल,आणि तरीही आम्ही केलेल्या पापाचे परीमार्जन होणार नाही असे महात्मा गांधी म्हणाले होते.*
गांधीजींचा खून ही गोडसेने सावरकरांच्या आदेशावरून अस्पृश्यतानिवारणाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी केला होता.55 कोटी, फाळणी हे सर्व बनाव आहेत कारण गांधीजींवर पहिला हल्ला 25 जून 1934 रोजी पुण्यातील सनातन्यांनी गांधीजींनी केलेल्या मंदिरे सर्व जातींना उघडी करा या आवाहनाला विरोध करण्यासाठी केला होता तेव्हा 55 कोटी किंवा फाळणी कसलाच प्रश्न नव्हता.
गांधीजींच्या उपोषणामुळे जी मंदिरे, विहिरी शेकडो वर्षे अन्य जातीसाठी बंद होती ती गांधीजींच्या उपोषणामुळे काही वर्षात खुली झाली. लोक एकत्र येऊ लागले आणि अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. गांधीजींनी साताऱ्यातील वाई येथे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह केला तेव्हाच पुण्यात सनातनी ब्राम्हण लोकांनी सभा घेऊन गांधींचा निषेध करत त्यांच्यावर सडकून टीका केली होती पण गांधी घाबरले नाहीत. त्यानंतर लगेच 1934 मध्ये सनातनी लोकांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.
सुरेश सावंत सरांनी याबाबत लिहले आहे
गांधीजींशी बाबासाहेबांचे मतभेद काय होते, ते किती तीव्र होते, हे आपण पाहिले. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य काँग्रेसला मिळालेले नसून देशाला मिळाले आहे आणि म्हणून पहिल्या मंत्रिमंडळात देशातील विविध राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधीत्व असायला हवे ही भूमिका घेण्यात गांधीजींचा पुढाकार होता. बाबासाहेबांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींचीच होती, घटना समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते,
लखलखीत गुणवत्तेमुळेच बाबासाहेबांना हा बहुमान मिळाला, हे उघडच आहे. तथापि ते गांधीजीमुळेच शक्य झाले नाहीतर टाळणेही शक्य होते (आत्ता वेगवेगळ्या खात्यावर कोणतीही गुणवत्ता नसणारे कसे लोक भरले आहेत हे आजही आपण पाहु शकता ते FTII, RBI असो वा ईतिहास संशोधन खाते, रघुराम राजन सारखी हुशार व्यक्ती ही हटवली जाते हे आपण पाहतोच),राष्ट्रीय हिताचा विचार करताना मतभेद आड येऊ देता कामा नये, या गांधीजींच्या भूमिकेचा यथोचित आदरही करायला हवा.
ज्या मूल्यांवर आधारित संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब हवे असे गांधीजींना वाटत होते, ती मूल्ये या दोघांची समान होती. संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद झालेली ती हीच दोहोंची सामायिक मूल्ये. जर त्या काळात तीव्र मतभेद असतानाही या सामायिक मूल्यांसाठी ते एकमेकांना सहकार्य करत होते, एकत्र काम करत होते, तर आज ही मूल्ये धोक्यात आलेली असताना त्यांच्या वारसदारांनी परस्परांत तसेच सहकार्य का करु नये?
बाबासाहेबांनी जर त्यावेळी गांधीजी किंवा नेहरु यांच्या सगळ्या भूमिका पटल्या तरच मी घटना लिहीन अशी अट ठेवली नाही किंवा गांधी-नेहरुंनी बाबासाहेबांकडून ठेवली नाही, तर आपण तरी ती आज का ठेवावी? ते जसे परस्परपूरक राहिले, तसेच आपणही राहू शकतो
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखणे आणि आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे हा संकल्प बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताने आपण करायला हवा.
असो डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन
वरील लिखाणात काही चुकले असल्यास क्षमस्व
जय भीम , जय भारत , जय जगत
संकेत मुनोत
8087446346
14-एप्रिल-2017Comment, Share ,Follow and Subscribe.
खूप छान लिहिले आहे अनेक मुद्दे स्पष्ट करत लेख पुढे जात असल्याने विषयाचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी नवीन वाचकास नक्की मदत होत आहे. खूप खूप आभार .
ReplyDeleteVery Nice,truly and correct informative
ReplyDeleteअतिशय मुद्देसुद विवेचन सर
ReplyDeleteआयुष्यमान संकेतराव मुनोत .
ReplyDeleteसप्रेम जयभिम 🙏🏽🙏🏽🙏🏽
डॉ . बाबासाहेब आंबेडकर समज- गैरसमज हा लेख वाचला . सुंदर लेख .
सर्वानी वाचावा असा लेख .
मी ही गांधीजी बद्दल काही गैरसमज बाळगत होतोच . कारण मी दलित समाजात लहण्याचा मोठा झालो . गांधीनी दलीताचे कसे नुकसान केले ? गांधी ना लोक कसे शिव्या घालत होते हे सर्व मी ही अनुभवले आहे .
आमचा मोहल्ला ताराबेननी जी संस्था स्थापन केली कस्तूरबा सर्वोदय मंडळाला लागूनच आहे . त्यातल्या त्यात माझा मोठा भाऊ बाळू दादा पूज्य . बेननी माणसपुत्र म्हणून घेतला . पालनपोषण करून मोठा केला . माझे वडील सुद्धा या संस्थेचे कार्यकर्ते होतो . माझे दहावीपर्यंतचे शिक्षण सुद्धा याच संस्थेच्या शाळेत झाले . नोकरी सुद्धा याच कस्तूरबा विद्यालयात केली .
विद्यार्थी असतांना गांधीजी बद्दल बरेच गैरसमज माझ्याही मनात होते . डॉ .आंबेडकर आणि गांधीजी ऐकमेकाचे विरोधकच आहे . हे वारंवार मी ज्या समाजात वाढलो तेथून नेतेमंडळीकडून सुद्धा गांधी विरोधच ऐकत होतो .
गांधीजी ना शिव्या दिल्या म्हणून विद्यार्थीदशेत बेनच्या कोर्टात हजर ही होत होतो . बेन आम्हाला कधी तिळगुळ तर कधी साखर देऊन निदोर्ष मुफ्त करायच्या . आणि आपसात चर्चा करायच्या की आपण स्पृश्य समाजाने यांना एवढया यातना दिल्या ' दुःख दिले आहे की त्यांनी आपल्याला शिव्याच काय तर थोबाडीत मारली तरी सहन केले पाहीजे असे पूज्य . बेन म्हणत होत्या .
संकेतराव ,
दलीताच्या मनात एवढा गांधी द्वेष निर्माण का झाला हे सांगतांना रावसाहेब कसबे म्हणतात की आमची पिढी धनंजय किर लिखित पुस्तके वाचून मोठी झाली . धनंजय कीर हे सावरकर भक्त होते .सहाजिकच किर गांधीजी विरोधक होते . त्यामुळे कारांनी गांधी आंबेडकर संघर्ष अधिक तिव्रतेने मांडला . आणि त्यावेळचे भाषणेसुद्धा गांधी ना दोन चार शिव्या व ब्राम्हणा ना शिव्या असल्याशिवाया जनता टाळ्या वाजवत नव्हते .टाळया घेण्यासाठी गांधीना शिव्या दिल्याच पाहीजे . असा तेव्हाच्या भाषणकर्त्याचा नियमच होत .
मी संस्थेत शिक्षक लागल्यावर खऱ्या अर्थाने माझ्यात बदल होण्यास सुरवात झाली . गांधी जयंतीला भाषण दयायचे
तर काही तरी वाचावे लागेल . वाचन सुरू केले .आंबेडकर वाचताना गांधी वाचावाच लागतो . हे दोन्ही महामानव एकमेकांना पूरक च आहे .
महात्म्याची अखेर हे जगन फडणीस यांचे पुस्तक वाचण्यात आहे . रावसाहेब कसबे यांची युट्यूबवर गांधी आंबेडकरावरची भाषणे एैकली . सुरेश द्वादशिवारची भाषणे ऐकली . तुषार गांधीचे भाषण ऐकले . बाळासाहेब पटवर्धनानी संस्थेत गांधी मरत का नाही ?हे चंद्रकांत वानखडे चे भाषण आयोजीत केले ते ऐकले .
गांधीजी बद्दलचा गैरसमज कमी होत गेला .डॉ आंबेडकर आणि म . गांधीमध्ये काही बाबतीत वैचारीक संघर्ष होता पण द्वेष नव्हता मतभेद होते पण मनभेद नव्हते . एकमेकांबद्दल नितांत आदर होता .१९३२नंतर संघर्षाची धार कमी कमी होत गेली . आणि नंतर एक मेकांना सहकार्य करू लागले . भारताच्या उज्वल भविष्या साठी हे दोन्ही महात्मे रात्रदिवस झटू लागले .
मग आता हे गैरसमज कोणी निर्माण केले हा मोठा यक्षप्रश्न आहे .
सावरकर यांच्या पोटात गरड जमा झालीच होती . त्यानी त्यांच्या भक्तानी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांनी समाजात हे विष कालवण्याच काम केले . कारण त्यांना गांधी विचार नको होता . तो त्यांच्या धर्माच्या विरोधात जात होता .डॉ आंबेडकर तर त्याना त्यावेळी नको होते आणि आजही नकोच आहे . फक्त ते वेळप्रसंगी पुतणामावशीचे प्रेम प्रगट करतात .
आज भारत विनाशाकडे जात आहे . धार्मिक अराजकता वाढत आहे .दंगे धोपे करण्याचे जूनेच तंत्र आज सुद्धा वापरले जात आहे . देशात हुकूमशाहीची वाटचाल सुरू आहे . देश विध्वंसाकडे जात आहे .
आज देश वाचवयाचा असेल तर म . गांधीजीचे विचार , डॉ . बाबासाहेबांचे विचार ' आणि भगतसिंहाचे विचार यांची सांगळ घालून काम करणे ही काळाजी गरज आहे .
परमपूज्य डॉ . बाबासाहेबाना जयंतीदिनी हार्दिक शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन .💐💐💐👏👏👏
फारच सुंदर ओघोवती भाषाशैली!
DeleteVery nice Sanket. Thanks for sharing the truth about history.
ReplyDeleteVery Nice!
ReplyDeleteफार छान लेख आहे. आजच्या दिवशी जयंती निमित्त होणाऱ्या प्रत्येक सभेच्या भाषणात हा लेख वाचून आणि समजून सांगणे गरजेचे आहे. आजची दलित पिढी ज्या वैचारिक मुद्दे,गांधी आणि बाबासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे त्यांना याच रुळावर परत आणण्यासाठी अशाच पद्धतीने सौम्य व मनाला भावणारे लिखाण होणे आवश्यक आहे.
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌
ReplyDeleteअभ्यासपूर्ण वाचनीय लेख 👍🙏🏻
खुप सुंदर लेख आहे... बऱ्याच गोष्टी ज्यांच्याबाबत भ्रम होता त्या clear झाल्या... प्रश्न उत्तर रूपात अनेक संभ्रम संपुष्टात आले आहेत... 👌🏻👌🏻👍😊
ReplyDeleteअत्यंत वास्तव दाखविणारा लेख आहे. संकेत जी इतक्या तरुण वयातील आपले काम पाहून अस वाटतंय की प्रत्येक आईने आपल्या मुलाला अस घडवलं पाहिजे जो समाजातील योग्य अयोग्य ओळखेल आपल्यात बदल करेल आणि समाजातही. संकेत जी तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.
ReplyDeleteफार छान लेख आहे. आजच्या दिवशी जयंती निमित्त होणाऱ्या प्रत्येक सभेच्या भाषणात हा लेख वाचून आणि समजून सांगणे गरजेचे आहे. आजची दलित पिढी ज्या वैचारिक मुद्दे,गांधी आणि बाबासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे त्यांना याच रुळावर परत आणण्यासाठी अशाच पद्धतीने सौम्य व मनाला भावणारे लिखाण होणे आवश्यक आहे.
ReplyDeleteअनिल विनायक कोरगावकर
देवगड
संकेत मुनोत The Bast ...जयभीम
ReplyDeleteखुप छान 🙏🙏सत्यमेव जयते 🙏🙏
ReplyDeleteफार छान आणि योग्य विवेचन आहे. मुनेतजींचे लेखन नेहमीच अभ्यासपूर्ण असते. आम्ही भाग्यवान आहोत कारण असे लेखन वाचायला मिळते.
ReplyDeleteछान लेख. विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.
ReplyDeleteएक अभ्यासू व्यक्ती स्वतः बरोबर अनेकांचे लक्ख प्रबोधन करू शकतो,
ReplyDeleteअसा संदेश हा लेख देतो.
हे चांगले संकेत आहेत आजच्या घडीला
अभिनंदन संकेत
गैरसमज दूर करणारा अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDeleteमहामानवास विनम्र अभिवादन
उत्तम मांडणी. बरे झाले की इतक्या सविस्तर लिहिलेत.
ReplyDeleteKharach asa kititari jan manasancha gairsamaz aahe to he wachoon nishchitach 99% door hoil aashi aasha aahe thanks
ReplyDeleteबाबासाहेब म्हणतात मी प्रथमत: भारतिय आणी अंतिमत: हि ह्या ऐकाच शब्दातुन खरतर आपल्याला बाबासाहेब समजता आले पाहिजे होते पण वाचन कमी लोकांनकजुन मिळालेल अर्थवट ज्ञान ,स्वताहुन कधिही न समजुन घेतलेले बाबासाहेब ह्या सर्व गोष्टीमुळे बाबांना ऐका चौकटित बसवलात बाबासाहेबांनी हजारो जातींना जिवन दिल पण तिच लोक आज त्यांना विसरलेत असो ,ऐवढच कोणतेच महापुरुषाना ऐका चोकटित बसवु नका अडाणी लकांनपेक्षा शिकलेले लोक अशिक्षित अडाणी वाटु लागलेत
ReplyDeleteसत्यावर आधारीत अतिशय अभ्यासपुर्ण असा लेख...!! संकेत भाऊ खुप खुप आभार...!!
ReplyDeleteमुनोत जी घटना समितीमध्ये एकूण सात सदस्य होते व त्यातील सहा जणांबद्दलचे रिक्त जागांबाबतच्या कारणमिमांसा वाचली.बाबासाहेबांवर एकट्यानेच संविधान लेखन मसुदा पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा प्रक्रुतस्वास्थ्य ढासळत असतानाही संविधान लिखान पूर्ण करून संसदे समोर सादर केले हा त्याच्या राष्ट्रभक्तीचा नमुना समर्थनीय वाटतो.गांधीजीनी व कट्टर हिंदुत्ववाद्यांनी जेव्हा बाबासाहेबांच्या धर्मांतराची घोषणा केली त्यावेळी त्यांचेविषयी जी भाषा व टीकेचे स्वरूप संबंधितांनी विषद केले त्याबाबत देखील लेखात उल्लेख आवश्यक हवा होता असे वाटते.बाकी लेखन प्रपंच चांगला असुन हल्लीच्या युवायुवतींच्या डोळ्यात अंजन घालण्यास पूरक ठरेल अशी आशा बाळगायला हरकत नसावी.आपण पूरविलेली माहिती प्रबोधनात्मक आहे.
ReplyDeleteफारच छान अभ्यास पुर्न लेरव असेच समज गैरसमज दुर करने आवश्यक आहे
ReplyDeleteछान च तुमचा प्रत्येक लेख उत्तम च असतो !मी बऱ्याच ग्रुप वर ते फॉरवर्ड करत असतो !
ReplyDeleteखुप छान विचार तू माडंले ते आमहाला पण माहीत नवहते
ReplyDeleteसर्वोत्तम नेत्यावरल़ं सर्वोत्तम लिखाण !
ReplyDeletebalanced and comprehencive. khoop khoop shubheccha sanketjee.
ReplyDeleteआज डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डाँ.बाबासाहेब आणि भारतीय राज्यघटना यावर कसबा वाळवे येथे व्याख्यान दिले. या व्याख्यानामध्ये वरील बरचसे मुद्दे समान होते. आपण मांडलेली अपेक्षा अगदी योग्य आहे. मार्क्स, गांधी, बाबासाहेब आणि नेहरु ही मंडळी काळाच्या पुढे होतीत. त्यांच्या विचारातील समन्वयाचा आपण पुरस्कार करायलाच पाहीजे.
ReplyDeleteअतिशय अभ्यासपूर्ण लिखाण ,छान!
ReplyDeleteखुप छान लेख लिहला आहे बरेच गैरसमज दूर ज़ालेत
ReplyDeleteअतिशय उत्कृष्ट विवेचन 👍👍👍👍
ReplyDeleteहोय , पटले ...आवडले ....आणि निखळ सत्य सर्वांनी समजून घ्यावे इतके ते स्वच्छ आहे ! आपणास मनापासून धन्यवाद !
ReplyDeleteसंकेत,खुप खुप धन्यवाद या लेखाबद्दल...
ReplyDeleteअसेच लेख लिहून समाजात सत्यता व जाज्वल्य राष्ट्रप्रेम निर्माण करावे हीच अपेक्षा...
ReplyDeleteबहोत बढिया संकेतजी भाईजान ! लोगो मे फैली गलतफहमी दुर करने का बहोत बढिया प्रयास है | आप के इस जजबे को सलाम !
ReplyDeleteऔर हमारे कलाम को तर्जी देने के लिये भी आप का शुक्रिया |
हळूहळू का होईना तूमाच्यासारख्या अभ्यासू लोकांकडून बाबासाहेबांचा ख-या अर्थाने स्वीकार होतो आहे हे महत्त्वाचे वाटते
ReplyDeleteसंकेत मित्रा खुप छान लिहीलय !
ReplyDeleteबाबासाहेब बौध्दांची खाजगी मालमत्ता नाही ! ते वैश्वीक आहेत...जगातला प्रतेक इसम ज्याला बाबासाहेबांविषयी कुतूहल आणि जिज्ञासा आहे तो अभ्यास करून आपली मते मांडू शकतो !
ज्यांनी बाबासाहेबांना पुतळ्यात कैद केलय त्यांच्याकडे लक्ष देवू नकोस ! तू तूझ माणसे जोडण्याच काम सुरू ठेव...तूझ्या कार्याला सविनय जय भीम...__/\__
खरंच सविस्तर लिहीलं स हे लिहिणं गरजेचे आहे,नवीन युवा साठी उपयोग चे आहे
ReplyDeleteनवीन पिढीने आवर्जून वाचावा असा अप्रतिम सुंदर लेख.
ReplyDelete