AddThis code

Tuesday, April 26, 2022

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन सुरवात स्वतःपासून,घरापासून आणि कार्यालयातून - पर्यावरणतज्ञ प्रा.ऊदय गायकवाड(कोल्हापूर)



२१ व्या शतकामध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन सर्वात महत्वाचे बनले आहे. त्याची सुरवात स्वतःपासून,घरापासून आणि कार्यालयातून करणे गरजेचे आहे.

एस.एम.जोशी हॉल येथे चांगले विचार युवा व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संपन्न झाले.
विषय होता पर्यावरण आणि बदलती जीवनपद्धती
पर्यावरणतज्ञ प्रा.ऊदय गायकवाड(कोल्हापूर) मुख्य वक्ता होते तर पर्यावरणात जीवन समर्पित करणारे दिलीप कुलकर्णी(दापोली कोकण) सर आणि स्मिताजी सोने (गुजरात ) हे प्रमुख अतिथी होते.
तरुणईचा व पत्रकार मंडळींचा व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.

आपण आपल्या दैनदिन आयुष्यात खुप छोट्या छोट्या गोष्टीतुन आपल्या जवळपासचे जग सुंदर बनवु शकतो व पर्यावरणाची सतत होणारी हाणी, प्रदूषण व ईतर अनेक हानीकारक गोष्टी टाळु शकतो याबद्दल काही महत्वाचे मुद्दे यात मांडले गेले
1-महाराष्ट्रात आत्ता दुष्काळाच्या परिस्थितीत जेवढा पाऊस पडतो किंवा जो पाण्याचा अभाव आहे त्याहीपेक्षा 50%पेक्षा कमी राजस्थानच्या अनेक गावांमध्ये व ईतर ठिकाणी आहे पण त्यांनी ती परिस्थिती adopt केली आपणही व्यवस्थित नियोजन केले तर हे शक्य आहे . महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडला पाणी मिळत नाही पण दुष्काळी गावातही दारुची विक्रि कमी झाली का?
2. आपल्या घरी 30-50%पेक्षा जास्त वस्तु अशा असतात ज्या आपण कधी वापरतच नाही नवीन वस्तु आणण्यापुर्वी या वस्तु एखाद्या गरजुला द्यायल्या हव्यात.अनेक वस्तु तर अशा असतात कि आठवण म्हणून ठेवलेल्या असतात जसे कि घरातील. जुन्या धातुच्या वस्तु , पितळी हंडे वगैरे (आईने दिला याने दिला त्याने दिला वगैरे)
या न लागणार्या वस्तु नुसत्या बाहेर काढल्या तर एवढे धातु मिळतील कि आपल्याला कोणत्याही धातुची बाहेरुन आयात करण्याची गरज पडणार नाही
3)दैनदिन जीवनात वापरत असणारे कपडे हे आपण खादी किंवा कॉटनचे वापरले तरी बराच बदल घडु शकतो.
ऊदा.खादीचे कपडे तयार होताना कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही , जे रंग वापरतात तेही रासायनिक नसुन नैसर्गिक असतात सोबतच आपल्याच देशात हे तयार होत असल्यामुळे आपल्याच माणसांना रोजगारही मिळतो.खादी शक्य नसेल तर कॉटन तरी वापरावे.
4)पाणी
फक्क ब्रश करताना नळ अखंड चालु ठेवण्याऐवजी ग्लास वापरला तरी हजार लोकांमध्ये लाखो लिटर पाणी वाचु शकते.
गळणारे नळ नीट करुन घ्यावेत कारण पुण्याचा लोकसंख्येचा 20%पाणी जरी वापरले तरी कोट्यावधी लिटर पाणी वाया जाते जे वाचवले तर शेकडो गावांचा पाण्याचा प्रश्न मिटु शकतो.सुरवात स्वतःपासुन करा.
5)4Rचा वापर
Reuse
Recycle
and
Reduce
प्लास्टिकचा व ईतर अनैसर्गिक साधनांचा वापर कमीत कमी करा. नैसर्गिक वस्तु वापरा जसे कि लाकुड .ज्याचा आपण पुरेपुर ऊपयोग करु शकतो.
आपण जग बदलु शकत नाही हे माहीतच आहे पण जगातील एक छोटासा कोपरा तर बदलू शकू , एक छोट घर , गाव आणि स्वतः तर बदलु शकतो ना? त्यातुनच हळूहळू जग सुंदर बनण्याकडे वाटचाल होईल

संकेत मुनोत
8668975178
26 April 2016

Comment, Share ,Follow and Subscribe.








No comments:

Post a Comment