AddThis code

Saturday, May 14, 2022

प्रत्यक्ष मॅच पाहणे - छान अनुभव

तुम्हाला आश्चर्य वाटेल मला क्रिकेट मॅच पाहायला आवडत नाही. लहानपणी अपार्टमेंट च्या जवळ खूप क्रिकेट खेळायचो...गल्ली क्रिकेट मध्ये त्यावेळी कधी कधी कमेंट्री पण केली...सध्या अनेक वर्षापासून क्रिकेट खेळले नाही आणि आता रस ही नाही..

बॅडमिंटन, खोखो, फुटबॉल, कबड्डी किंवा इतर गेम क्रिकेट पेक्षा जास्त आवडतात..
मला अजूनही क्रिकेटच्या बहुतेक players ची नावे ही माहीत नाही.

सचिन, विराट, द्रविड, जडेजा, वसीम अक्रम, हरबजन सिंग, इरफान पठाण, झहीर खान आणि अजून असे १०-२० काही निवडक माहित आहेत..यातही भारत पाकिस्तान आणि वर्ल्ड कप सामनेच  मी मुख्यतः पाहिले...
बाकी आयपीएल वगैरे कधी जास्त पाहिले नाही घरात कधी कधी मावस भावंडे किंवा कोणी आले तर ते स्कोर विचारतात मला तो माहीतच नसतो..त्यांच्या घरी गेल्यावर ही ते क्रिकेट पाहत बसतात तेव्हा मी पेपर वाचतो किंवा मोबाईल मध्ये काही तरी करत बसतो...

आधी मी एकटाच असा आहे का असे वाटायचे पण सामजिक क्षेत्रात पडल्यामुळे असे अनेक लोक माहित पडले यात मोठ मोठे मान्यवर उद्योगपती, पत्रकार, लेखक, कवी, सामजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, विद्यार्थी आहेत ज्यांना हे पाहण तेवढं आवडत नाही..
असो कोणी पाहत असेल तर त्यालाही माझा आक्षेप नाही ...

 आत्ता मुंबईत गेलो होतो आणि वेळ होता तर प्रत्यक्ष मॅच पाहू म्हटल आणि गेलो मॅच पहायला..
प्रत्यक्ष मॅच पाहणे हा सुंदर अनुभव असतो...
यात जेव्हा सिक्स किंवा फोर जाते किंवा एखादा player out होतो तेव्हा ची excitement भारी असते...

आवडो अथवा नावडो एखाद्या गोष्टीत गेलो की त्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घ्यायचा असा माझा स्वभाव असल्यामुळे मॅच फूल एन्जॉय केली...






Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment