AddThis code

Sunday, September 24, 2023

गांधी जन्मले तेव्हा शून्य होते आणि गेले तेव्हाही शून्य होते..

आत्ता कोणी तरी गणितात महापुरुषांच्या बद्दल बोलत होते त्यावरून  सहज सुचले...
महात्मा गांधी हे जन्मले तेव्हा #शून्य होते ... ...आणि गेले तेव्हा आणि त्यापूर्वी अनेक दशके शून्यच होते...कुठले मंत्रीपद नाही, कुठली संपत्ती नाही की इतर काही नाही ...

पण ज्याला ते जुळले गेले त्यांचे त्यांनी त्या-त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्यातून  दशक, , शतक, सहस्त्र आणि बरेच काही घडवले...

अगदी तो चांगला विरोधक असला तर त्याचेही त्यांनी शतक केले ..( स्वतःच्या निवडून आलेल्या लोकांना राजीनामे द्यायला लावून त्यांनी विरोधकातील लोकांना ते पद द्यायला लागले)

ते मौलाना आझाद असो, सरदार पटेल असो , विनोबा असो किंवा या देशातील लाखो सत्याग्रही असो ..सर्वच या शून्याशी जुळून त्यांच्यातून शतक, सहस्त्र, लक्ष झाले...  

पण ज्यांना लोकांना एककात ठेवून फक्त स्वतःलाच दशक, शतक करायचे होते, त्या विषमतावादी लोकांचे गांधीजीमुळे धाबे दणाणले..इतर सगळेच दशक , शतक झाले तर आम्ही कोणाला गुलाम करणार ?..मग असे लोक गांधींना पराभूत करण्यासाठी त्यांना  विभागण्याचे प्रयत्न करू लागले पण या शुन्याला भागच जात नाही म्हणून निराश झाले..
मग शेवटी त्यांनी या शून्यालाच संपवले पण ते हे विसरले की तोपर्यंत हा शून्य विचारांतून , कृतीतून हजारो ठिकाणी पोहोचला होता...त्याला जोडण्यासाठी लोकांना आता फक्त त्याच्या देहाची गरज नव्हती ...

त्या शून्याशी कधी आफ्रिकेत मंडेलानी स्वतः ला जोडून घेऊन वर्णभेदाचा लढा दिला. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग ते बराक ओबामा ने घेतला तर पाकिस्तानात मलाला आणि असंख्य जणांनी या शुन्याशी जोडून घेऊन  त्यांचे दशक, लक्ष केले...
त्यामुळेच आईनस्टाईन सारखा शास्त्रज्ञ अश्याच शून्याने जगाचे भले होणार असल्याचे गणित मांडतो 

तर जो या शून्याचा नीट अभ्यास करतो, समजून घेतो, आचरणात आणतो तो त्याला जोडले होऊन त्यातून दशक, शतक, सहस्त्र...वगैरे बनवतो...


..
आजही या शून्याचा स्वार्थी लोकांना त्रास होतो.  मग तो संपवता येत नाही म्हणून ते त्या शून्याला बदनाम करतात जेणेकरून लोकांनी शून्याला जोडलेच जाऊ नये...
भारतपूरते त्यांचे प्रयत्न काही भागात यशस्वीही होतात पण परदेशात गेल्यावर त्यांनाही  स्वतःला शून्याचा अनुयायीच सांगावे लागते...
.आपणच ठरवायचे त्या शून्याला जोडून आपले दशक, शतक, सहस्त्र..वगैरे  करायचे की की चुकीच्या गोष्टी ऐकून त्याला  भागून स्वतःचे नुकसान करायचे...

संकेत मुनोत 
( फोटो - शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या घरातला त्यांच्या घरात दोनच फोटो होते एक गांधीजींचा आणि दुसरा...)

Comment, Share ,Follow and Subscribe.

5 comments:

  1. खूप सुंदर लिहीत आहात सर. मी ही माझ्या पध्दतीने गांधी विचार रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

    ReplyDelete
  2. खूप छान लेखन 👌👌👌गांधी विचार खुप प्रभावी.... गांधींबद्दल जे नकारात्मक बोललं जातं त्याबद्दल पण लिहा सर.... किंवा काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयीची जी नकारात्मकता आहे त्याचेही विवेचन करत जा.... नक्कीच वाचायला आवडेल 👍

    ReplyDelete
  3. हा blog हिंदीमधे करावा.

    ReplyDelete
  4. *गांधी नव्याने व व्यवस्थित कळू लागले...*
    धन्यवाद मोदी राजवट.... धन्यवाद आंधळी झुंड

    ReplyDelete
  5. महात्मा गांधी यांचे बद्दल नकारात्मक बोलून स्वतः किती महान आहोत हे या देशात दाखवायचे मात्र बाहेर गेले वर त्यांच्या विचारांचा उदोउदो करायच कारण बाहेर यांना कोणी विचारत नाहीत हे त्यांना माहीत आहे यासाठी बाहेर गेलेवर गांधी आमचे ,आमच्या देशाचे हे सांगून स्वतः ला मिरवायचे हेच कांहीं स्वार्थांद नेते/ लोक आतापर्यंत करत आलेले आहेत यावरून त्यांचा खुजेपणा समजून येतो व यावरून त्यांची लायकी/ पात्रता काय आहे हे दिसून येते.गांधी व गांधी विचार कधीही संपणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

    ReplyDelete