परवा 'भारत जोडो यात्रा' या एस. ए. जोशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी विचार मांडण्याची संधी मिळाली.
खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, मुलाखतकार राजू परुळेकर, नेहरुवियन प्रतिक पाटील , प्रकाशक तांदळे मॅम यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. सन्मित्र भाऊसाहेब अजबे यांनी सूत्रसंचालन केले तर न्यू एरा चे आशिष शिंदे आणि अजून काही मान्यवरांनी पण मनोगते मांडली.
काही दिवस सामजिक क्षेत्रातून ब्रेक घेतला होता, खासदार कुमार केतकर सरांचा १ महिन्यापूर्वीच फोन आल्यामुळे या कार्यक्रमाला आलो. पण कार्यक्रमाने नवीन ऊर्जा मिळाली.
काही दिवसांपासून वैयक्तिक अडचणीमुळे थोडा मानसिक ताणातून जात होतो पण कार्यक्रमाला आल्यावर जेव्हा विविध तरुण येऊन भेटले आणि सेल्फी काढताना बोलले की तुमचे काम आवडते, आम्हाला त्यात जॉईन करायचे आहे वगैरे तर त्याने ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढला.
सध्या देश, राज्य, गाव, घर यात द्वेष, हिंसा वाढत असताना #प्रेम वाढवण्याची सर्वाधिक गरज आहे.
द्वेष करणे सोप्पे असते पण #प्रेम करणे healthy असते.
प्रेमाचा संदेश पसरवत राहूया ❤️❤️❤️
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment