लेखक, दिग्दर्शक , अभिनेते असलेले मित्र शार्दुल सराफ यांच्याशी परवा भेट झाली.खर तर ते स्पेशल भेटण्यास आले त्याबद्दल त्यांचे आभार. आमची ही पहिलीच भेट होती ज्यात जवळपास 4-5 तास मस्त चर्चा झाली.
खर भेटण्यापुर्वी ते एवढे काही करतात हे माहीत नव्हते. समविचारी मित्र आहेत एवढेच माहीत होते. एकमेकांचे लेख वाचणे वगैरे गोष्टी होत्याच पण यात अजून विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी ते माझ्यासाठी लग्नाचे स्थळ सुद्धा शोधत होते...😊
असो त्यानिमित्त त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया
प्रायोगिक पातळीवर रात्रंदिन आम्हां, जनक ह्या पारितोषिक विजेत्या नाटकांचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत
वळू, गाभरीचा पाऊस, सलाम, होम स्वीट होम ह्या चित्रपटांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं आहे
कमला, दुर्वा, पसंत आहे मुलगी, लव्ह लग्न लोच्या, अंजली, जीव माझा गुंतला, शाब्बास सूनबाई अशा मालिकांचे लेखक आहेत
तर आमिर खान ह्यांच्या पाणी फाऊंडेशन च्या ' तुफान आलंया ' ह्या कार्यक्रमाचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत.
आमची ओळख गांधी विचारांच्या मुळे... शार्दुल पण पूर्वी गांधीजींची चेष्टा उडवायचे पण गांधीजींची आत्मकथा वाचली आणि त्यातून नवीन दृष्टी त्याला मिळाली असे ते म्हणाले...
गांधीविचार अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या पर्यंत कसे पोहोचवता येतील याबाबत थोडे नियोजन ही या भेटीत केले.
शार्दुल ने आरे तुरे बोलायला सांगितले ते पण अजून बोलू शकलो नाही पण प्रयत्न सुरू आहेत.
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment