एखादा आजार झाल्यावर, त्यावर हजारो किंवा लाखो रु खर्च समजल्यावर अनेकांना आरोग्य विमा काढण्याचे आठवते मग ते आरोग्य विमा पॉलिसी काढताना तो आजार मुद्दामून लपवून ठेवतात किंवा आहे किरकोळ तर कश्याला सांगायचे म्हणून सांगत नाहीत.किंवा काही agent किंवा advisor ही फॉर्म भरतांना त्यातील सगळे प्रश्न विचारत नाहीत .
पण कुठलाही आजार अस्तित्वात असल्यास तो सांगायलाच हवे आणि agent ने ही ते विचारायलाच हवे कारण यात नंतर त्या policy holder चे नुकसान असते, कारण आजार नाही सांगितला तरी तो insurance कंपनीला कुठून ना कुठून समजतोच किंवा डॉक्टरांच्या मेडिकल हिस्टरी रिपोर्ट मध्ये तो दिसतो त्यामुळे तुम्ही आजारी पडल्यावर जर त्यासाठी claim केले तर तो claim तर रिजेक्ट होऊ शकतोच पण सोबत तुमची पॉलिसी सुद्धा रद्द होऊ शकते.
त्यामुळे तुम्हाला जे काही आजार अस्तित्वात असतील तर ते मेंशन करा . कुठला प्लॅन घेतोय त्यानुसार त्याचा waiting period 3-4 वर्षे असतो. तेवढे वर्ष त्या आजारासंबंधीत काही झाले तर कव्हर होणार नाही त्यानंतर त्या आजाराचा खर्च ही त्यात कव्हर होतो
शिवाय काही असे health insurance प्लॅन्स पण आहेत त्यात पहिल्या वर्षी थोडे अधिक premium देऊन तुम्ही तो waiting period कमी करण्यासाठी अर्ज करू शकता ज्यामुळे तुमचा त्या आजराचा खर्च ही पुढच्या वर्षीपासून किंवा महिन्यापासून कव्हर होईल.
त्यामुळे health insurance काढताना नुसता काढायचा म्हणून काढू नका तर ही काळजी पण घ्या
हे लिहावे लागले कारण आत्तापर्यत 2-3 फोन यासंदर्भात आले ते की त्यांचा claim रिजेक्ट झाला , मी म्हटलं आपण ज्यांच्याकडून काढला आहे ते काय म्हणत आहेत तर म्हणे कि ज्या बँकेत खाते होते त्यात एका कर्मचाऱ्याने जास्त आग्रह करून घ्यायला लावला आणि आता जेव्हा याबद्दल विचारायला गेलो तर म्हणतो insurance department वेगळे आहे त्यांना विचारा. Insurance department सांगते कि आम्हाला काही माहीत नाही तुम्ही आजार लपवला म्हणून आम्ही रिजेक्ट केले .
माझे मत- आजार लपवणे ही पहिली चुकी आणि दुसरी चुकी ही कि जास्त माहिती न घेता त्या बँक कर्मचाऱ्याकडून तो घेणे.बँक खात्यात सेविंग करणे, लोन काढणे किंवा अजून इतर काही बँकेची कामे करणे या गोष्टी कराव्यात पण हेल्थ इन्शुरन्स मात्र स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्स वर कार्य करणाऱ्या कंपनीकडूनच घ्यायला हवा.लोक ऑनलाईन जाहिरातींना ही याबाबत खूपदा बळी पडतात पण मग जेव्हा सर्व्हिस ची वेळ येते त्यावेळेस त्रास होतो. मोबाईल किंवा एखादी अन्य वस्तू तुम्ही ऑनलाईन खरेदी केली ते चालू शकते पण जिथे सेवेची आणि योग्य सल्ल्याची गरज आहे अश्या ठिकाणी त्यातील तज्ञ व्यक्तीकडूनच तो घ्यायला हवा जसे की डॉक्टर, वकील, आणि आरोग्य विमा सल्लागार. अजून त्याची निवड करतांना काय-काय करावे हे यापूर्वीच्या लेखात सविस्तर लिहले आहेच तर आरोग्य विमा काढताना ही काळजी घ्या नाहीतर त्या एका आजार लपवल्यामुळे तुमचे इतर शेकडो आजार कव्हर होणार नाहीत ज्यांचा खर्च ही लाखोंच्या घरात असतो.
©संकेत मुनोत
Financial Planner & insurance Advisor
Sanket.insurance@gmail.com
8668975178
Share
No comments:
Post a Comment