23मार्च 2019
08फेब्रुवारी 2019 रोजी जालना येथील जे ई एस महाविद्यालयात युवांशी छान संवाद साधता आला, 3-4 दिवसीय शिबिरानिमित्त महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून युवा वर्ग येथे आला होता.
मला आमच्या NSS कॅम्प ची आठवण झाली
आजचे युवाच उद्याचा देश घडवणार आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यत हे प्रेमाचे, समतेचे, बंधुतेचे विचार पोहोचणे अधिक आवश्यक आहे असे मला वाटते.
यानिमित्त पुणे-जालना प्रवासात भुजंग बोबडे सरांची पहिली ग्रेट भेट झाली, ट्रक क्लीनर ते इतिहास संशोधक हा थरारक प्रवास जाणून घेता आला, एरवी फोन होत असतात पण हा मनुष्य एवढा मोठा असेल याची कल्पना नव्हती. जगातील गांधीजीबद्दल सगळ्यात मोठे असलेले गांधी रिसर्च फौंडेशन, जळगाव या संग्रहालयाचे ते मुख्य आहेत आणि वेगवेगळ्या सरकारी व इतर संघटनांमध्ये पदाधिकारी आहेत, त्यांची जगातील 8 भाषांमध्ये आत्तपर्यत अनेक पुस्तके आलेली आहेत, विशेष म्हणजे आत्ता आलेल्या एका शिल्पकलेवरील पुस्तकाची किंमत 30 हजार रुपये आणि त्याची पहिली आवृत्ती ही लगेच संपली.पण अगदी साधा गांधी प्रत्यक्षात जगणारा मनुष्य आहे हा, खादी कपडे तर घालतातच पण स्वतःचे केस ही स्वतःच कापतात..
नंतर भेट झाली ती डॉ यशवंत सोनूने सरांची,ते अनेक वर्षापासून चिकाटी व जिद्दीने जालना इथे गांधी अध्यासन केंद्र चालवत आहेत. २००४ ते २०१९ या पंधरा वर्षाच्या कालखंडात 15 राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिराचे आयोजन त्यांनी केले आणि अजून बरेच मोठे कार्य करत आहेत.माझी न त्यांची ओळख व्हाट्सअप्प आणि फेसबुक वरचीच पण तिथे गेल्यावर सरांशी आपुलकीचे नाते तयार झाले.प्रा. डॉ महावीर सदावर्ते यांचे पण चांगले सहकार्य लाभले.
कॉलेज चे प्राचार्य काबरा सर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या त्यांनी महाविद्यालय कसे स्थपन झाले ते सांगितले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी 1957 साली जालना शहरात आले असताना जालनेकरांनी त्यांच्या सन्मानार्थ रुपये 21,211 एवढा निधी उभा केला व त्यांना भेट दिला, पंडितजींनी हा गौरव निधी जालनेकरांना परत केला आणि या निधीतून शहरात एक उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय सुरू केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून जालना एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. आज कनिष्ठ महाविद्यालय एमसीवीसी बायोफोकल, वरिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान आणि पदवीत्तर महाविद्यालयांमध्ये भौतिक शास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र ,एम .कॉम .,एम . ए. अर्थशास्त्र तसेच अनेक विषयात संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे दरवर्षी जवळपास चार ते साडेचार हजार विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेत असतात.
त्यांनतर तेथे असणारे पुरोगामी चळवळीतील मित्र आणि शिक्षक संजय लकडे या रुबाबदार व्यक्तिमत्वाशी सरांशी थोडी चर्चा करता आली.
निघतांना अमरावतीत धर्मेंद्रभाई शी अर्धा तासाची धावती भेट झाली, आसाम मधील ज्या ठिकाणी अशांतता आहे दंगलीं घडतात अश्या अनेक ठिकाणी धर्मेंद्र भाई शांतता नांदवण्यासाठी कार्य करत आहेत, म्हणजे काही प्रांत तर असाही असतो कि जिथे पोलीस व इतर लोक ही जायला घाबरतात, अश्या ठिकाणी ही धर्मेंद्र भाई जीवाची पर्वा न करता गांधीजी प्रमाणे निर्भीडपणे प्रवेश करतात आणि तेथे गांधींविचारानी शांतता प्रस्थस्पित करतात.लघुउद्योगच्या माध्यमातून त्यांनी तेथे हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.
दुपारी chemistry च्या प्रा. बाफना सरांसोबत गणेश भुवन मध्ये जाऊन प.पु. खद्दरधारी गणेशलालजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेता आले व तेथील शांत व प्रसन्न जागेचा अनुभव घेता आला, तेथील पदाधिकाऱ्यांना ही भेटता आले ज्यांनी तेथे छान स्वागत केले, दर महिन्याला हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात.
आपल्याला एक गोष्ट माहित नसेल कि गणेशलालजी महाराज ही खादीबद्दल खूप आग्रही होते स्वतः तर खादी घालतच पण ते जिथे जात तिथे त्यांच्या प्रवेशपूर्वी खादीचे दालन कि गाडी येत असे आणि बहुतेक दर्शनार्थी ही खादीतच असत. (असे सुगन बरंठ काकांनी सांगितल्याचे आठवते.)
राष्ट्रीय युवा संघटनचे मा. संयोजक मनोजभाऊ ठाकरे आणि रजर्नीताई पाटील यांच्याकडून ही प्रेरणादायी गीते ऐकता आली व वेगवेगळ्या गोष्टींवर संवाद साधता आला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच शालेय विद्यार्थी आणि समाजातील नागरिक यांच्यामध्ये महात्मा गांधींचे सत्य आहे चे विचार पोहोचावे या उद्देशाने हे महात्मा गांधी अध्ययन केंद्र कार्य करत आहे.
मला इथे बोलण्याची संधी मिळणे माझे मोठे भाग्यच म्हणावे लागेल
आजपर्यंत येथे कुमार प्रशांतजी, डॉ. यशवंत सुमंत ,मेधाताई पाटकर, अमरनाथ भाई, दिल्ली येथील डॉ. सच्चिदानंद ,adv असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ,लवनमजी विश्वजीत रॉय ,सोपान जोशी, डॉ. श्रीराम जाधव, शोभा शिरोडकर , रमेश ओझा, गंगाप्रसाद अग्रवाल, विजयअण्णा बोराडे, अल्लाउद्दीन शेख, वसुधा सरदार, विजय दिवाण, अरुण ठाकूर, संजय मंगला गोपाळ, समीर शिपूरकर, नरेंद्र लांजेवार सुभाष शर्मा, प्रांजल दीक्षित ,किशोर बेडकीहाळ अर्जुन डांगळे हरिभाऊ ,प्रशांत नागोसे, मनोज ठाकरे, यामिनी गजपुरे , बाळासाहेब सरोदे , लक्ष्मण विवेकानंद विजय जावंधिया, , भूजंग बोबडे एड. राज कुलकर्णी संजय मंगला गोपाळ, प्रेरणा देसाई आदी अनेक मान्यवरांनी या शिबिरात मार्गदर्शन केले आहे.शिबिराचे वैशिष्ट्य हे सांगता येईल की दररोज सकाळी पाच ते रात्री दहा या मध्ये सर्वधर्म प्रार्थना, प्रकृती प्रार्थना सुबह का सच, गीत ,वर्ग बौद्धिक स्वतः गटचर्चा ,खेळ ,चावडी असे अनेक उपक्रम होत असतात.
मागच्या तीन वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजना बंद झाले असल्याकारणाने हे केंद्र संस्थेच्या मदतीवर सुरू आहे .यावर्षी शासन स्तरावर गांधी 150 निमित्ताने अनेक उपक्रम घेतले जात असताना या केंद्राच्या अनुदान बंद होणे हे दुःखद आहे. सरकारला याप्रति जाब विचारायला हवा कि बाहेर प्रत्येक देशात जाऊन सोयीसाठी गांधींचे नाव घेता आणि स्वतःच्या देशात गांधींविचारांच्या प्रसाराला थांबवता असे दुटप्पी धोरण का घेता?
जालना मधील हा अनुभव ऊर्जदायी आणि अविस्मरणीय होता
या सगळ्यांकडे पाहून सहज एक गीत आठवले
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
लिहताना काही चुकले असल्यास कुणाचे नाव राहिले असल्यास क्षमस्व
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment