पुण्यातील प्रतिष्ठित वर्तमानपत्र सकाळ यांनी आयोजित केलेली माझी "आर्थिक नियोजन कसे करावे" ही 3 तासाची कार्यशाळा कशी होणार? याचे प्रचंड दडपण मनात होते.
कारण येणारे लोक म्हणजे काही साधे नव्हते तर सुज्ञ पुणेकर होते तेही या सेशन साठी 600 रु भरून आले होते. तुम्ही भारतात कुठेही कार्यक्रमाला 50-500 श्रोते सहज जमवू शकता. पण पुण्यात 5 लोक पण तुम्हाला ऐकायला येणे आणि आले तरी अर्ध्या तासाच्या वर थांबणे म्हणजे महाकठीण काम आहे.
आपल्याला ऐकण्यासाठी प्रत्येक जण fees देत आहे तर खरच आपण त्याला त्याचा तेवढा मोबदला देऊ शकू ना? कोणी नाराज तर होणार नाही ना? वगैरे प्रश्न मनात होते. पण नंतर उपस्थित सदस्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यामुळे कार्यशाळा सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.
मागच्या रविवारी सकाळी 11 ते 2 अशी सुमारे 3 तास ही कार्यशाळा मी घेतली. 1 तास पूर्ण झाला तसा दर काही मिनिटांनी मी लोकांना विचारतही होतो bore तर होत नाही ना? विषय बदलायचा का? वगैरे.. पण सहभागी लोकांनी इंटरेस्टिंग आहे सुरु ठेवा असे सांगितले. सर्व लोक शेवटपर्यंत थांबले भरपूर प्रश्न विचारले आणि सेशन संपल्यावरही अनेकांनी वैयक्तिक भेटून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
माझा पिंड सामाजिक असल्याने कोणाकडून पैसे घ्यायला नको किंवा घेतले तरी कमी घ्यावेत म्हणून मी आयोजकांना विचारले कि खरच मध्यमावर्गीयांना 600 रु. परवडेल ना? लोक येतील ना? त्यांनी सांगितले कि महिलांना आर्थिक नियोजन बद्दल प्रोत्साहन देण्यासाठी 50% डिस्काउंट असेल . आणि पाहिले तर training रूम फुल झाली होती.मला वाटले महिला मोठ्या प्रमाणात असतील पण महिला 6-7 च होत्या तर बाकी सगळे पुरुष होते पण तेवढ्या तरी महिला आल्या ते चांगले वाटले.
नंतर जाणीव झाली कि जेव्हा पैसे देऊन एखादी गोष्ट समजून घ्यायला येतात तेव्हा त्याची किंमतही राहते आणि ही fees तशी तर खुप नाही. एका मित्राने सांगितले कि तुझा त्यातला अभ्यास, अनुभव, समजावून सांगण्याचे कौशल्य आणि वेळ हेही खूप महत्वाचे आहेत त्यासाठी तेवढे घ्यायलाच हवेत आणि मला ते पटले. आपण एवढ्या तळमळीने सांगतो आणि फ्री मध्ये ते ज्ञान दिले तर लोकांना त्याची किंमत राहत नाही ते असा विचार करतात कि याचाच काहीतरी स्वार्थ असणार किंवा याला काही काम नसणार... जिथे शक्य नाही तिथे फ्री मध्येही द्यावे पण शक्य तिथे थोडे तरी charges ठेवावेत जेणेकरून लोकांना त्या गोष्टीची किंमत राहते. सन्मित्र श्याम येंगे याने माझे नाव इथे सुचवले त्याबद्दल त्याचे विशेष आभार
तर मित्रांनो आपणही आपले आर्थिक नियोजन व्यवस्थित करा.
पैश्याने सगळ्या गोष्टी होत नसल्या हे जरी खरे असले तरी जगातली प्रत्येक गोष्ट करायला पैसाच लागतो. पैश्याने अनेक गोष्टी सोप्प्या होतात.
आपले उत्पन्न किती असावे ते आपल्या हातात नसते पण त्याचे नियोजन कसे करावे ते मात्र आपल्या हातात असते. एखादा 30 हजार उत्पन्न वाला ही स्वतःचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करून आनंदी आयुष्य जगू शकतो आणि एखादा एक लाख रु उत्पन्न वाला ही ते आर्थिक नियोजन व्यवस्थित नसल्याने उध्वस्त होऊ शकतो. गरजेचे आहे ते proper planning आणि तेही स्वतःचे स्वतः नव्हे तर तज्ज्ञला भेटून. आपले शारीरिक आरोग्य चांगले करायला जशी तज्ञ डॉक्टर ची गरज असते जो आपल्याला आपल्या आरोग्यानुसार आहार औषधे आणि पथ्य सुचवतो तसेच आर्थिक आरोग्य व्यवस्थित कारायला financial planner ची गरज असते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट CA ( Chartered Accountant ) वेगळा आणि financial planner वेगळा. Chartered Accountant कडुन आपण त्या अपेक्षा करणे चुकीचे आहे.
यनिमित्त 5 महत्वाच्या गोष्टी सांगतो.
1. गरजा आणि इच्छा मधला फरक ओळखा आणि गरजेचे आहे तेच खरेदी करा. श्रीमंत दिसणे नव्हे तर असणे महत्वाचे आहे.
2. Health insurance, Term Insurance हे आर्थिक नियोजनातील पाया आहेत. ते त्वरित घ्या कारण नंतर तुमची इच्छा असली तरी ते मिळणार नाहीत. आणि निवड करताना काळजीपूर्वक करा, ऑनलाईन ला बळी पडू नका कारण मिळणारा claim लाख किंवा कोटी मध्ये असतो.
3. C-bil Score जपा, सगळी देणी वेळेवर चुकवा.
4. छोटीशी का होईना SIP सुरु करा.
5. आपल्या जोडीदाराला किंवा जवळच्या व्यक्तीला आपल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स ची, policy ची, प्रॉपर्टी ची माहिती देऊन ठेवा.आम्ही यासाठी एक वेगळी diary च तयार केली आहे. जी प्रत्येक client ला भेट देतो. जेणेकरून पूर्ण कुटुंब सुरक्षित राहते.
तर आपणही सेवेची संधी द्यावी. आपली सेवा आज जगभर आहे. भेटूया लवकरच...
आपलाच
संकेत मुनोत
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार






प्रामाणिक सल्ला, उत्तम सेवा
8668975178
#financialliteracy #FinancialPlanning #financialfreedom #आर्थिक
No comments:
Post a Comment