महिला दिनी अश्या युवतींना वाचवण्याचा संकल्प तरी करूया का?आपल्यापैकी अनेकांना हे शक्य आहे
08 मार्च 2021
काही महिन्यांपूर्वी सोबत घडलेली सत्य घटना
विदर्भातील एक मैत्रीण वय वर्षे 22-23, पदवी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि पुढे शिकण्यासाठी तिने पुणे विद्यापीठात PG साठी apply केलं आणि entrance exam नंतर इथे नंबरही लागला.
पण घरच्यांचा विरोध होता की PG करून काय करणार, त्यापेक्षा लग्न कर. सुरवातीला तिने विरोध केला पण सततच्या दबावामुळे तिने ही त्यांना मुले पाहायला येतात तर येऊ द्या म्हणाली.
त्याच वेळी आमचे फोन सुरू होते. मी माझे मित्र विक्रम, मिनाज लाटकर आणि काहींची उदाहरणे देऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायला लावून तिला शिक्षणाचे महत्व आणि पुढचे चांगले भविष्य समजावून सांगितले आणि तीचे आम्ही पुणे विद्यापीठात admission केले.
पण अडचण इथे solve झाली नाही तिकडे तिला पहायला मुलगा आणि त्याच्या घरचे येऊन गेले, जवळच्याच गावातले होते.मुलाच्या घरी चांगली संपत्ती होती आणि मिळकत चांगली होती पण मुलगा तिला अनुरूप नव्हता तिला आवडला ही नव्हता.
पण घरच्यांचा सततचा दबाव होता, वडिलांची तब्येत पूर्वीपासून खराब होती म्हणजे डॉक्टरांनी वडिलांची जगण्याची काही महिन्यांचीच खात्री दिलेली होती. त्यात हीचा फोन हा कि वडील म्हणतात की त्यांची शेवटची इच्छा आहे कि माझे लग्न पाहण्याची तिची आई बहीण सगळेच नातेवाईक तेच सांगत होते कि करून टाक लग्न .
हेच सुरू असतांना मुलाच्या इथून होकार आला
घरचे सगळे खुश झाले, तिने थोडा विरोध केला की मला शिकायचे आहे तर ते म्हणाले , तो म्हटला लग्नानंतर तर शिक पुढे नाहीतर राहूदे
नंतर काही काळानंतर तिनेही होकार दिला कारण घरच्यांकडून सतत चे टोमणे टामने तिला सहन होत नव्हते
तिला फोनवर समजवायचा प्रयत्न केला की लग्न झाल की तू अडकून जाशील , आधी शिक्षण पूर्ण कर मग तू स्वतःच्या पायावर ऊभी राहिलीस आणि स्वतः सक्षम झालीस तर तुला स्वतःला हवा तसा जोडीदार निवडता येईल पण तिचे एकच म्हणणं मग मला घरचे असे म्हणतील तसे म्हणतील वगैरे आणि जाऊद्या मी एकदा निर्णय घेतला आहे लग्न करण्याचा तर घेतला
भावनिक होऊ नको प्रॅक्टिकली विचार कर अजून काही लग्न झालेले नाहीये वगैरे बरेच सांगितले पण ती घरच्याच दबावात होती
परत कधीतरी तिचा मोबाईल जप्त होऊ शकतो वगैरे ही ती म्हणाली
आता आम्ही बाहेरचे म्हणून जास्तीत जास्त काय करू शकत होतो
ती माझ्या नात्यातील वगैरे ही नव्हती पण एकदम हतबल वाटू लागलं तिचा लग्न केल्यानंतर चा काल्पनिक चेहरा समोर आला आणि दुःख वाटले कि स्वतः चे मन मारून ही असे करत आहे
mean while तिच्याच जवळपासच्या गावातील एक मित्राचा मित्र आणि त्याची मैत्रीण ज्यांनी शिक्षणासाठी असेच काही केले होते त्यांच्याशी संपर्क झाला त्यांनीही समजावून सांगितले त्यांनी कुठेही तिचे नाव disclose न करता मदतीची आणि तिच्या घरच्यांना समजवण्याची ही तयारी दाखवली पण तिला ही खात्री होती की पुढच्या शिक्षणाला घरचे नाहीच म्हणतील मग कोणीही येऊ देत. एका मोठ्या लेखिकेचा तिला फोन झाला पण त्यांना तिने आम्हाला सांगितलेल्या मुख्य गोष्टी न सांगता तिचे आई-वडील बरोबर आहेत व ती स्वखुशीने लग्नसाठी तयार वगैरे गोष्टी सांगितल्या.यात त्यांनी मलाच फोनवर सांगितले की तिची इच्छा नाही शिकण्याची तिला लग्न करायचे आहे तर करू द्या की इथे आम्हीच तोंडावर पडलो.
म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे ते तिने आम्हाला पूर्वीच सांगितले होते आणि पूर्वी याबद्दल फोनवर खूप रडली ही होती पण घरच्या दबावामुळे किंवा कश्या मुळे यांना फोनवर वेगळीच बोलली
पण आता तिने स्वतःच नाही म्हटल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही असे वाटले .
तोच तिच्या कॉलेज मधील एका शिक्षकांची आठवण झाली जे तिला मुलगी मानत होते .कसा-बसा त्यांचा संपर्क मिळवला आणि त्यांच्याशी याबद्दल बोललो. त्यांनाही त्या पटल्या त्यांनी तिला आणि तिच्या आईला समजावून सांगतो म्हणाले.
तिला त्यांनी समजावून सांगितले आणि इकडे तिच्या घरच्यांनी ही त्या मुलाच्या घरच्यांना नकार दिला. पण पुण्यात पाठवायला आजही तयार नाहीत
तीचे शिक्षण सुरू झाले आता कोरोना मुळे live सुरू आहे पण पुढे ऑफलाईन जरी असले तरी इथे काही मित्र-मैत्रिणींनी तिच्या राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली आणि आता तिचे चांगले सुरू आहे.
तर यानिमित्ताने एवढेच सांगायचे होते कि भारतात अश्या लाखो मुली असतील ज्यांना अश्यामुळे स्वतःची पुढची स्वप्ने सोडून आई वडील म्हणतील तसे लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागत असेल
ज्यांची स्वतःची लग्नाची तशी इच्छा असेल त्यांच्याबद्दल आक्षेप नाही पण ज्यांना शिकायचे आहे स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे त्यांना प्रोत्साहन द्या, मदत करा , त्यांच्या घरच्यांना समजावून सांगा नसेल समजत तर त्या मुलींनी विद्रोह केला तरी चालेल , मी अश्या अनेक मुलींना ओळखतो ज्या विद्रोह करून घरातून बाहेर पडल्या आणि आज स्वतःच्या पायावर चांगल्या उभ्या आहेत जे घरचे त्यांना दोष देत ते आता कौतुक करत आहेत.काही ठिकाणी अजूनही घरचे सहमत नाही झाले पण या मुली स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात मोठे काम करत आहेत आणि आनंदी आहेत.
आपण सतत म्हणतो की "वर्गात टॉपर किंवा हुशार असणाऱ्या मुली गेल्या कुठे?" तर त्या इथे जातात त्यांच्या इच्छे विरुद्ध अनेकांची लग्न केली जातात आणि फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्या मर्यादित ठेवले जाते.काहींना चार पैसे घरी यावेत किंवा तिने कुठेतरी busy रहावे म्हणून नोकरीची परवानगी दिली जाते पण घरात कुठलाही निर्णयात्मक अधिकार नसतो.तो निर्णयात्मक अधिकार पुरुषालाच असतो.
तर #महिलादिन निमित्त फक्त तसे स्टेटस टाकून किंवा काही मेसेज फॉरवर्ड करून शुभेच्छा देऊ नका त्यासोबत छोट्याश्या कृती सुरू करा
आपल्या जवळपास परिचयात असे काही घडणार नाही याची आज महिला दिनानिमित्त जबाबदारी घ्या
तुम्ही प्रयत्न करूनही आपल्याला ते करणे शक्य होत नसेल तर आम्हाला कळवा आम्ही आमच्या परीने त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू
कारण एक महिला घडली तर ती किमान चार जणांना घडवू शकते
सोबत खालील काही गोष्टीही करूया
-स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने पाऊले उचलूया
-शिव्या देतांना कुठल्याही महिलेचा(समोरच्याची आई बहीण यांचा) उद्धार टाळूया
-आपली आई, बहीण, पत्नी, सहकारी किंवा कोणीही महिला त्यांचा आदर करण्यासोबत त्यांच्यापर्यत हे प्रबोधन पोहोचवायचा प्रयत्न करूया
-हा लेख वाचणार्यांची ही पत्नी , सून किंवा बहीण किंवा इतर कोणीही जवळचे परिचयातील असेल ज्यांना शिकण्याची किंवा इतर काही करण्याची इच्छा असेल तर ते करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या
आपल्या सर्वांना च वाटते की सावित्रीबाई, कस्तुरबा सारख्या प्रेरणादायी महिला तयार व्हाव्या पण त्या कुठे शेजार च्या घरी तर त्या आपल्याच जवळपास तयार होतील यासाठी प्रयत्न करूया
सोबतचा फोटो प्रतिकात्मक
चूक भूल क्षमस्व
#yes_We_can
संकेत मुनोत
8668975178
#Mission_Education
#Women_Empowerment Group
#internationalwomensday
Share
No comments:
Post a Comment