पोर्तुगिजांनी एकदा मुस्लिमांचे एक जहाज लुटले. जहाजावरच्या सर्वांना कैद केले. जहाजावर कुराणाच्याही प्रती होत्या त्या जप्त केल्या. किना-याला लागल्यावर पोर्तुगिजांनी कुराणाच्या प्रती कुत्र्यांच्या गळ्यात बांधून त्यांना पिटाळले. नंतर पोर्तुगीजांचे जहाज अकबर च्या सैन्याने पकडले. अकबरापर्यंत ही वार्ता गेली. त्याची आई संतापली. ती अकबराला म्हणाली. "तू बायबलची अशीच विटंबना कर!"
ही सम्राट अकबराबद्दल ची घटना *वीरचंद गांधीं* यांनी विश्व धर्म संसदेत सांगितली होती.
मागच्या वर्षी बॅरिस्टर वीरचंद गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने *इतिहास संशोधक संजय सोनवणी* सरांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी सांगितलेली ही कथा आज पुन्हा आठवली.
(मुलाखतीची लिंक कमेंट मध्ये)
शिकागोला १८९३ साली ज्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद गेले होते त्याच धर्मपरिषदेत जैन धर्माचे तत्वज्ञान सांगायला जे अधिकृत रित्या उपस्थित होते, स्वामी विवेकानंदांच्या भाषणाप्रमाणेच ज्या गाजलेल्या भाषणामुळे अमेरिकेत अनेक व्यक्ती जैन धर्मात प्रविष्ट झाल्या, ज्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, जे जागतीक धर्मांवर अधिकृतपने सातत्याने लिहित व भाषणे देत राहिले ते वीरचंद गांधी.
शिकागो परिषद आपल्याला स्वामी विवेकानंदांमुळेच माहित आहे. त्यांची जेवढी प्रसिद्धी भारतात केली गेली तेवढी वीरचंद गांधीं यांची केली गेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे बहुतेक जैन लोकांना ही ते माहीत नाहीत. वीरचंद गांधी यांच्या भाषणाने अमेरिकन तत्वज्ञांना प्रचंड प्रभावित केले होते हे आपल्याला माहित असले पाहिजे.
त्यांना अजून दोन वर्ष अमेरिकेतच थांबवून ठेवले गेले व त्यांच्या भाषणांवर केवळ लेख नव्हेत तर पुस्तकेही लिहिली गेली. त्यांची स्मारके ही अमेरिकन लोकांनी बांधली आहेत.
अमेरिकेतील त्यांच्या अन्यत्र झालेल्या व्याख्यानांमुळे अनेक अमेरिकन जैन धर्माच्या अभ्यासाकडे वळाले. भगवान महावीरांचा अहिंसावाद आजच्या जगाच्या शांततामय सौहार्दासाठी कसा उपयुक्त आहे हे त्यांनी अमेरिकेत दिलेल्या ५३५ व्याख्यानांतून सांगितले. त्यांचे चाहते हर्बर्ट वॉरेन यांनी जैन धर्म तर स्विकारलाच पण वीरचंद गांधींच्या भाषणांचे संकलन करून त्याचे पुस्तकही प्रकाशित केले.
वीरचंद गांधीं यांनी केवळ जैन धर्माची माहिती सांगितली नाही तर स्वामी विवेकानंद यांच्या भाषणावर आणि वैदिक धर्मावर जी टीका झाली ती खोडून काढली.
वीरचंदजींचे कार्य केवळ धर्म-तत्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण उदार होता. त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ वुमेन इन इंडिया ही संस्थाही स्थापन केली आणि देशभर स्त्री-शिक्षणासाठी प्रयत्न केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही ते उतरले.
वीरचंद जसे स्वामी विवेकानंदचे मित्र होते, तसेच महात्मा गांधी यांनीही वीरचंद गांधींना ‘भावासारखे मित्र’ अशी उपमा दिली होती. अशा या भारतपुत्राचे 07 ऑगस्ट 1901 रोजी वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आज देशात द्वेष प्रचंड वाढत आहे
दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या सामजिक कार्यकर्ता, पत्रकार, न्यायाधीश, विचारवंतांच्या हत्या करून "मेली काही कुत्री तर फरक काय पडतो"* असे अनेक समाजकंटक सामजिक माध्यमावर उघडपणे बोलत आहेत. महिलांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या लोकांना सोडून देऊन मिठाई वाटली जात आहे*
कुठेही कोणी काही प्रश्न उपस्थित केला रे केला कि सरळ त्याला देशद्रोही ठरवत जा पाकिस्तान ला , जा अफगाणिस्तान ला, वगैरे म्हणत अन्न, वस्त्र, रोजगार, शिक्षण या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, बादशाह अकबर सारखे उत्तम प्रशासक याच देशात जन्मले का ? याची आज आठवण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा सामान्य रयत कोणाची अन्यायाबद्दल ची तक्रार घेऊन जात तेव्हा ते असे तर म्हणत नव्हते ना अरे त्या औरंगजेब किंवा इतर लोकांच्या राजांपेक्षा तर इथे बर आहे ना? नाही, ते किंवा वरील इतर राजे अस कधीच बोलत नव्हते ते वेळोवेळी शासन करत होते, रयतेच्या हिताची कामे करत होते.
सध्या जो धार्मिक, जातीय, वर्गीय द्वेष वाढतोय तो असाच वाढत राहिला तर देश राहणार नाही. त्यामुळे वीरचंद गांधी यांचे तत्वज्ञान अभ्यासण्याची आणि ते आचरणात आणण्याची आज खूप गरज आहे.
तर चला त्यांच्या जयंती निमित्त जगाकडे मैत्रीभावाने बघूया, द्वेष कमी करूया, प्रेम वाढवूया
संकेत मुनोत
२५ ऑगस्ट २०२१
Comment, Share ,Follow and Subscribe.