AddThis code

Saturday, August 5, 2023

ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत साथी शेखर सोनाळकर यांना विनम्र आदरांजली!





 ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत प्रा. शेखर सोनाळकर यांचे परवा रात्री 1.15 मिनिटांनी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ व्यांधींशी लढताना निधन झाले.

खूपच दुःख होतंय पण काहीच करता येत नाहीये. सरांसोबत अनेकदा भेट घ्यायचे ठरवले पण राहून गेले . 20 ऑक्टोबर 2022 ला जळगाव येथे गेलो होतो तर तिथे सरांना घरी जाऊन भेटणार होतो पण गडबडीत नाही भेटू शकलो लवकर दुसऱ्या गावी जावे लागले. त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी सर पुण्यात होते तेव्हा सुद्धा आमचे भेटणे चालले होते पण माझ्या नोकरीच्या व्यापात भेटू नाही शकलो. सर पुण्यात होते तेव्हा एका सोलापूर च्या निर्माण मधील Friend चा स्पेशल फोन आला होता की तू सरांना भेट आणि त्यांची सगळी माहिती व्हिडिओ रेकॉर्ड करून घे खूप चांगले document होईल पण तेही करता आले नाही. सरांच्या सोबत अधे मध्ये फोनवर बोलणे व्हायचे. जेव्हा-जेव्हा बोलणे होई खूप जिव्हाळ्याने बोलत शेखर सर.

मी वर्षभरापूर्वी दिल्लीत एका राष्ट्रीय मीटिंग साठी गेलो होतो जिथे देशातील वेगवेगळ्या राज्यातून चांगले काम करणारे मान्यवर लोक आले होते त्यात मी जाऊ शकलो ते सरांच्यामुळेच . महाराष्ट्रातून निवडक 3 नावे सरांनी त्या मीटिंग साठी सुचवली होती त्यात माझे एक नाव दिले होते सर स्वतः पण येणार होते पण त्यांचा आजार वाढल्याने  आणि डॉक्टर ने प्रवास करण्यास नाही सांगितल्याने त्यांना अचानक येणे कॅन्सल करावे लागले होते...
देशभरातील लोकांना जोडणारे , विधायक काम करणारे होते सर. निदान 100 पर्यंत तरी जगायला हवे होते अजून खूप काम झाले असते सरांकडून. 
द्वेष पासरवणारी, दंगली घडवणारी, लोकांची डोकी भडकवणारी लोक 90 च्या पुढे जगत आहेत आणि सरांच्या सारखा प्रेमळ , सत्यवादी आणि संवेदनशील मनुष्य 72 मध्येच जग सोडून जातो हे चांगले नाही. यानिमित्त माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आपल्या आरोग्याची पण तेवढीच काळजी घ्या. 
महात्मा गांधींनी सरदार पटेल आणि विनोबा भावेंना याबद्दल विशेष सुनावले होते. महात्मा गांधी स्वतः म्हणाले होते की मी 125 वर्षे जगणार अणि कदाचित त्यांच्या इतर वाक्यांचा प्रमाणे हे वाक्य ही सत्य झाले असते पण मध्येच दहशतवादी गोडसेने त्यांची हत्या केली.

शेखर सर CA होते, CID मध्ये होते. त्यांनी CBI ला आणि अनेक संस्थांना आपल्या अभ्यासाद्वारे अनेक गुन्हे तपासण्यात मदत आणि मार्गदर्शन केले होते, ते अजून बरेच काही करत होते...त्यांचे संदर्भ पूर्ण लेख वाचणे आणि भाषण ऐकणे ही खूप मोठी वैचारिक मेजवानी असे...
माझे चुकले हे की मी निदान त्यांची ZOOM वर तरी मुलाखत घ्यायला हवी होती किंवा फोनवर त्यांना विविध प्रश्न विचारून ते रेकॉर्ड करून ठेवायला हवे होते पण मला कल्पनाच नव्हती की एवढ्या लवकर असे काही होईल. पण यापुढे काळजी घेईल. 

शेवटी एवढेच सांगेन की लोकांना हिंसेचे कौतुक करणारे खूप प्रक्षोभक बोलणारे भडक लोक आवडतात पण गांधिविचाराच्या माध्यमातून शांतपणे आपले काम करणारे लोक अधिक परिणामकारक असतात. कारण भडका उडतो आणि लगेच शांत ही होतो पण पणती अनेक दिवे प्रकाशित करत राहते. आपले काम एवढेच की या पणत्या बनुया आणि अश्या पणत्या लोकांना आदर्श म्हणून समोर आणुया.
आपलेही शेखर सरांच्या समवेत चे अनुभव कमेंट मध्ये मांडा 

Shekhar Sonalkar  सरांना भावपूर्ण आदरांजली...

संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment