AddThis code

Saturday, February 25, 2017

डिजिटल होताना किंवा online व्यवहार करताना सावध रहा, पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा होऊ शकतात

डिजिटल होताना किंवा online व्यवहार करताना काळजी घ्या या संदर्भात काही दिवसांपूर्वी आलेला एक अनुभव.

एक महिन्यांपूर्वी OLX वरून घरातील एक जुने कपाट विकले होते परवा ज्याने घेतले त्याचा पुन्हा फोन आला मी एका  कार्यक्रमात असल्यामुळे फोन उचलला नाही मला वाटले आता परत घेऊन जा वगैरे म्हणतो काय?
पण घडले दुसरेच
त्याचा मेसेज आला होता की त्याने चुकून 1080 रु माझ्या अकाउंट वर transfer केले म्हणून खूप काळजीत होता पैसे परत मिळतील का नाही या विवंचनेत कारण आम्ही दोघेही एकमेकांना नीट ओळखत नव्हतो परत  मी म्हटले ''नाही आले माझ्या खात्यात तुझे पैसे" तर काय करणार असे अनेक प्रश्न त्याच्या मनांत होते असे त्याने पैसे मिळाल्यांनतर सांगितले
त्याचे ते पैसे परत पाठवले माझी आणि त्याची ओळख फक्त कपाट देण्यापूरती होती त्यामुळे त्याने माझे नाव payee मधून काढून टाकायला हवे होते पण तसे न केल्यामुळे आणि पुढच्या transfer च्या वेळी चुकून इतर कुणाच्या नावाऐवजी payee मध्ये माझे नाव त्याने निवडल्यामुळे मलाच ते पैसे  transfer झाले.असो मी त्याला ते पैसे परत केले पण असा प्रत्येक जण पैसे परत करेलच असे नाही त्यामुळे online व्यवहार करताना खालील काळजी घ्या. त्यसंबंधी काही मुद्दे
 मी काही त्यातील तज्ञ नाही पण व्यवहार करताना जे थोडेसे वाचले आणि अनुभवले त्यातील काही मुद्दे , कदाचित तुम्हाला हे किंवा यापेक्षा जास्त ही मुद्दे यासंदर्भात माहिती असु शकतील पण जर नसतील तर त्यांच्यासाठी
1.Password- दर काही दिवसांनी बदला, पासवर्ड तयार करताना आपली वैयक्तिक माहिती वापरू नका जसे की काही जण स्वतःचे नाव , जन्मतारीख मोबाईल नंबर पासवर्ड म्हणून वापरतात जे hack करणे सोपे असते
2-OTP - online transaction करतांना जेथे शक्य असेल तेथे OTP compulsory करा म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी आपल्या mobile वर code येतो व मगच पैसे ट्रान्सफर होतात
3-अनोळखी links
आपण online असतांना काही साईट्स वर काही जाहिराती येतात आपण त्याला क्लिक करतो आणि काही तरी activate होऊन आपले पैसे जातात किंवा आपल्या मोबाईलवर एखादी अनोळखी लिंक किंवा एमएमएस येतो जो ओपन केला की त्या लिंकमधून मालवेअर आपला pc, लॅपटॉप, मोबाईल हॅक होतो.
4- बँक खात्याबद्दल माहिती विचारणारे फोन आणि ई-मेल?
उत्तर ःकोणतीही बँक आपल्या खात्याबाबत, कार्ड च्या पिन बाबत किंवा ऑनलाइन बॅंकिंगविषयक आपली वैयक्तिक माहिती विचारत नाही. सोबतच काही ई-मेल येतात ज्यात तुम्हाला एवढे एवढे कोटी रुपये बक्षीस लकी विजेता म्हणून मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही एवढे एवढे पैसे भरा किंवा ही ही माहिती पाठवा असे सांगण्यात येते त्याला ही बळी पडू नका
5-Free Apps-
आपण अनेक फ्री मधील unauthorized applications मोबाईल मध्ये download करत असतो , ज्यात अनेकांना read contacts, messages इ. गोष्टींची  permission ही या applications ला दिली जाते ही permission देऊ नका ही माहिती वापरून तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो  ज्यामुळे मोबाईल तुमच्या हातात आणि त्याचा वापर दुसराच कुणीतरी करत असेल.
6-सोशल मीडिया-
facebook, whatsapp, twitter आदी माध्यमांवर वैयक्तिक माहिती share करू नका आणि काही अपरिहार्य कारणासाठी share करायचीच असेल तर त्याची privacy public ऐवजी private करा
7- Payee-
    तुम्ही जर कोणाला online पैसे ट्रान्सफर केले आणि पुन्हा त्याला पैसे पाठवणार नसाल तर  payee चे नाव काढून टाका किंवा payee निवडताना काळजीपूर्वक निवडा
8-Antivirus
Antivirus software सतत update करत राहा कारण रोज नवीन malwares सोडले जातात आणि शक्यतो cyber कॅफे किंवा इतर ठिकाणावरून असले व्यवहार करू नका आणि केलेच तर लॉग आऊट अवश्य करा
धन्यवाद
आपल्याही सूचना यात add  करा 
संकेत मुनोत
8087446346
changalevichar1@gmail.com

No comments:

Post a Comment