AddThis code

Monday, June 13, 2022

दिल्ली गुरुद्वारा मध्ये भेटलेली पायल

 दिल्लीतील महत्वाच्या गाठी भेटी संपल्यावर तेथून निघण्याच्या पहिल्या दिवशी रात्री काही प्रेक्षणीय स्थळे बघू म्हटल आणि इंडिया गेट आणि जवळपास चा परिसर पाहत पाहत रात्री 11-11.30 वाजता गुरुद्वारा मध्ये गेलो तर आतमध्ये पायल नावाची मुलगी वेळ विचारायला आली सोबत दिल्ली स्टेशनला कसे जायचे असेही तिने विचारले. तुम्ही कुठे  जाणार आहात मला जाता-जाता सोडाल का? मी म्हटले मला ते जवळचे मार्केट ही पाहायचे आहे.ती म्हणाली की मला इथे गुरुद्वारात डोक्यावर ओढणी घेतात ती विकत घ्यायची आहे ती भेटेल का मार्केट मध्ये, मी म्हटले भेटू शकेल. (संवाद हिंदीत झाला)
   मी गुरुद्वारा परिसर पाहून पुन्हा जिन्याजवळ यायला 10 मिनिटे लागली तोपर्यंत ती तिथेच थांबलेली होती. मला ओळखू आली नाही तिनेच येऊन सांगितले निकलना है क्या? shoes ठेवायचे अनेक स्टॉल्स असल्याने ते शोधायला बराच वेळ गेला तरी ती तिथे थांबून राहिली.  शेवटी सापडल्यावर तिला दुसऱ्या गेट जवळून पहिल्या गेट कडे बोलवले आणि मार्केट पाहण्यासाठी निघालो. मला रस्त्यावर जाताना थोडी भीती ही वाटत होती की हीचा काही ट्रॅप वगैरे नसेल ना माझ्याकडुन पैसे लुटण्याचा हीचा एखादा साथीदार दुसरीकडून यायचा वगैरे...
या दरम्यान गप्पा  मारताना ती २५ दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे समजले. तिच्याकडे मोबाईल ही नाही.शिक्षण विचारले असता कुठल्या तरी विद्यापीठातून शिकत असल्याचे तिने सांगितले.एवढ्या रात्री फिरताना भीती वाटत नाही का? यावर ती म्हणाली की क्या करेंगे ज्यादा से ज्यादा मार ही डालेंगे ना? फिर क्या डरना.. 
याच दरम्यान  मार्केट लांब आहे तर आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊ या का?कलकत्ता ची  ट्रेन आहे हे तिने सांगितले  मी म्हटले पूर्वी मार्केट पाहू मग जाऊ.मार्केट लांब होते. शेजारी ची दिल्ली पोलिस चे कुठले तरी मुख्य ऑफिस होते बरोबर त्याच्या गेट जवळ जाऊन थांबलो आणि तिला दिल्ली स्टेशन साठी उबर वरून रिक्षा करून देऊ लागलो तर ती रिक्षा काही आली नाही पण थोड्या वेळाने तेथून जाणारी एक रिक्षा आली सुरवातीला 100 म्हणाला मी कमी करायला सांगितले 70 पर्यंत कमी केले आणि तिला बसवून चालत मार्केट पाहण्यासाठी निघालो.

 तिने माझ्यासोबत स्टेशन ला येण्याची किंवा ओढणी घेण्याची इच्छा का व्यक्त केली? तीच तिलाच माहीत मला ती एक नाजूक आणि क्यूट मुलगी वाटली...पण एक मन सावधान इंडिया ही म्हणत होत...😊

हा फोटो तिनेच काढला आहे...तिला सेल्फी काढायचा का विचारणार होतो पण नाही विचारू शकलो...

तुम्हाला आला का असा एखादा अनुभव...


Comment, Share ,Follow and Subscribe.

Monday, June 6, 2022

हरिद्वार मध्ये असलेले अध्यात्मिक आणि नैसर्गीक सौंदर्य

आत्ता #हरिद्वार हून #देहरादून आणि तेथून #मसुरी ला चाललो..
हरिद्वार मध्य एका आश्रमात राहण्यास होतो. इथल्या काही % साधू आणि इतर साधुंमध्ये फरक हा वाटला की हे धर्मांध नाहीत आणि पर्यावरणाबद्दल ही जागरूक आहेत.
त्यांच्याशी संवाद केल्यावर अनेक गोष्टी समजल्या त्या अश्या...
येथील पर्यावरणाचा जो सर्वनाश चालवला

आहे त्याविरुद्ध येथील काही साधू ठाम भूमिका घेतात आणि उपोषण करून जनतेला एकत्र करून त्याला विरोध ही करतात आणि त्यामुळे काही अंशी फरक ही पडला आहे. पण येथे अडचणी ही खूप आहेत. जो मनुष्य इथे अवैध कार्य करत होता आणि नगरसेवक म्हणून ही निवडून आला नसता तो त्याच्या केंद्र सरकार मधील connection मुळे आज येथे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे जे अवैध काम करत आहेत त्यांना आता रान मोकळे झाले आहे. 
हरिद्वार मध्ये तुम्ही पाहिले तर सगळीकडे नुसते आश्रम च आश्रम दिसतील...त्यात एका मोठ्या आर्थिक उलाढाल असणाऱ्या आश्रमात त्याचे मुख्य साधू आयुष्याच्या शेवटच्या स्टेज ला होते तेव्हा  संघाचे लोक तेथे आले आणि अनेक महिने त्यांना भेटून त्यांची प्रशंसा करणे , सतत सेवेचा आव आणणे अश्या गोष्टी करू लागले. त्या साधूच्या निधनानंतर त्यांच्यासोबतचे फोटो दाखवून त्यांनी हा आश्रम आम्हाला चालवायला सांगितले असे सांगून त्या आश्रमात त्यांनी स्वतःचा एक दुसरा राज्यातील व्यक्ती महाराजाच्या वेशात इथे आणला आणि आता तोच आश्रम चालवतो आणि त्यांची सगळी कामे सोप्पी करतो. त्याला अध्यात्म, शस्त्र याबद्दल काहीही अभ्यास नसताना तो आश्रमाचा प्रमुख झाला आहे.
विश्व धर्म संसद मध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टींवर विचारल्यावर ते म्हणाले की मुस्लिमांना शिव्या देणे, गांधींबद्दल अपशब्द बोलणे हे साधू लोकांमध्ये जे संघाचे लोक घुसले आहेत त्यांच्याकडून केले जाते.जेणेकरून लोकांनी महागाई, रोजगार, अर्थव्यवस्था, पर्यावरण याबद्दल सरकार ला प्रश्न च विचारू नयेत आणि कुठल्या तरी चुकीच्या मुद्द्याला चिकटून रहावे.
नवरा बायको ची भांडणे झाली आणि त्यात जोडीदाराचा राग जसा मुलांवर काढून काही लोक मोकळे होतात तसाच बेरोजगारी, वाढती महागाई, घटती अर्थव्यवस्था या गोष्टींचा राग सरकार ऐवजी मुस्लिम आणि अन्य गोष्टींवर काढला जातो..
असो इथे वातावरण खूप छान आहे. काल इथल्या माताजी, गुरुदेव आणि अन्य अनेकांशी खूप छान गप्पा झाल्या. काही परदेशी नागरिक ही आश्रमात आले होते त्यांच्याशी भेट झाली.त्या माताजीनी तर म्हणाल्या की after observing you I feel that you are very near to spirituality, stay for more days here.when many people from your generation are busy in drinking , smoking and other materialistic things you doing this is showing that you have some special purpose in life.. नोकरी आहे असे सांगून मी उद्या लगेच निघणार असल्याचे त्यांना सांगितले.
असो गंगेत आंघोळ करणे, बेल चा ज्यूस पिणे आणि इतर सर्वच खूप सुंदर अनुभव होते नक्की भेट द्या...
माझे अश्या ठिकाणी जाण्याचे २ हेतू असतात एक तर संवाद साधून त्यांच्या गोष्टी समजावून घेऊन सामजिक चळवळ, प्रेम, संवाद वाढवावा आणि दुसरे तिथल्या निसर्गाचा आनंद घेणे...

चूकभूल क्षमस्व
संकेत मुनोत
(फोटो - सकाळी मोर दिसले तेव्हाचा)
Comment, Share ,Follow and Subscribe.