दिल्लीतील महत्वाच्या गाठी भेटी संपल्यावर तेथून निघण्याच्या पहिल्या दिवशी रात्री काही प्रेक्षणीय स्थळे बघू म्हटल आणि इंडिया गेट आणि जवळपास चा परिसर पाहत पाहत रात्री 11-11.30 वाजता गुरुद्वारा मध्ये गेलो तर आतमध्ये पायल नावाची मुलगी वेळ विचारायला आली सोबत दिल्ली स्टेशनला कसे जायचे असेही तिने विचारले. तुम्ही कुठे जाणार आहात मला जाता-जाता सोडाल का? मी म्हटले मला ते जवळचे मार्केट ही पाहायचे आहे.ती म्हणाली की मला इथे गुरुद्वारात डोक्यावर ओढणी घेतात ती विकत घ्यायची आहे ती भेटेल का मार्केट मध्ये, मी म्हटले भेटू शकेल. (संवाद हिंदीत झाला)
मी गुरुद्वारा परिसर पाहून पुन्हा जिन्याजवळ यायला 10 मिनिटे लागली तोपर्यंत ती तिथेच थांबलेली होती. मला ओळखू आली नाही तिनेच येऊन सांगितले निकलना है क्या? shoes ठेवायचे अनेक स्टॉल्स असल्याने ते शोधायला बराच वेळ गेला तरी ती तिथे थांबून राहिली. शेवटी सापडल्यावर तिला दुसऱ्या गेट जवळून पहिल्या गेट कडे बोलवले आणि मार्केट पाहण्यासाठी निघालो. मला रस्त्यावर जाताना थोडी भीती ही वाटत होती की हीचा काही ट्रॅप वगैरे नसेल ना माझ्याकडुन पैसे लुटण्याचा हीचा एखादा साथीदार दुसरीकडून यायचा वगैरे...
या दरम्यान गप्पा मारताना ती २५ दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचे समजले. तिच्याकडे मोबाईल ही नाही.शिक्षण विचारले असता कुठल्या तरी विद्यापीठातून शिकत असल्याचे तिने सांगितले.एवढ्या रात्री फिरताना भीती वाटत नाही का? यावर ती म्हणाली की क्या करेंगे ज्यादा से ज्यादा मार ही डालेंगे ना? फिर क्या डरना..
याच दरम्यान मार्केट लांब आहे तर आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊ या का?कलकत्ता ची ट्रेन आहे हे तिने सांगितले मी म्हटले पूर्वी मार्केट पाहू मग जाऊ.मार्केट लांब होते. शेजारी ची दिल्ली पोलिस चे कुठले तरी मुख्य ऑफिस होते बरोबर त्याच्या गेट जवळ जाऊन थांबलो आणि तिला दिल्ली स्टेशन साठी उबर वरून रिक्षा करून देऊ लागलो तर ती रिक्षा काही आली नाही पण थोड्या वेळाने तेथून जाणारी एक रिक्षा आली सुरवातीला 100 म्हणाला मी कमी करायला सांगितले 70 पर्यंत कमी केले आणि तिला बसवून चालत मार्केट पाहण्यासाठी निघालो.
तिने माझ्यासोबत स्टेशन ला येण्याची किंवा ओढणी घेण्याची इच्छा का व्यक्त केली? तीच तिलाच माहीत मला ती एक नाजूक आणि क्यूट मुलगी वाटली...पण एक मन सावधान इंडिया ही म्हणत होत...😊
हा फोटो तिनेच काढला आहे...तिला सेल्फी काढायचा का विचारणार होतो पण नाही विचारू शकलो...
No comments:
Post a Comment