पुण्यातील बंद पडलेल्या बँकातील नागरिकांचे अडकलेले पैसे मिळावेत म्हणून पुणेकर नागरी समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करणारे जेष्ठ कार्यकर्ते मिहिर थत्ते यांची काही महिन्यांपूर्वी भेट झाली आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या ..
त्यांचे वडील यदुनाथ जी थत्ते यांचे विचारधन हे पुस्तक ही त्यांनी भेट दिले तर मी त्यांना माझे एक धैर्यशील योद्धा गांधी हे पुस्तक भेट दिले.
आज रुपी बँक किंवा अन्य बँकातून लोकांना जे त्यांचे बुडालेले कोट्यवधी रुपये परत मिळत आहेत त्यातील मोठे श्रेय या माणसाला जाते.
गांधीजींच्या विचारातून असे ठिकठिकाणी निस्वार्थपणे कार्य करणारे, निर्भयपणे लढणारे लोक आहेत ज्यांच्यामुळे सामान्य माणसावर होणारा अन्याय दूर होउन त्याचे आयुष्य अजून चांगले होत आहे.
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment