


यात निमंत्रण देण्यासाठी ग्रुप मधील एकाही व्यक्तीला वैयक्तिक फोन किंवा मेसेज केले नाही. Knowing Gandhi Pune WhatsApp ग्रुपमध्ये 2-3 दिवसांपूर्वी गोपाळदादा तिवारी यांच्या पुढाकाराने ही भेट ठरली होती.
ग्रुपमध्ये बघता-बघता या सर्व लोकांनी नावे दिली आणि सर्व स्वतः हून आले.
सध्या वाढत असलेला द्वेष, हिंसा , भेदभाव कमी करून गांधीविचारांच्या प्रचार, प्रसार, अंगीकार यांच्याद्वारे समाजात प्रेम कसे वाढवता येईल याबाबत थोडी आखणी झाली.
(मला माहित आहे की फोन का केला नाही किंवा बोलवले का नाही असेही काही स्नेही जणांना वाटले असेल पण ही अचानक ठरलेली सहज भेट होती.मी स्वतः लोणावळा येथून 5 दिवसाची कार्यशाळा पूर्ण करून काल रात्री घरी परतलो आणि आज संध्याकाळी इथे जॉईन झालो. समूहातील सक्रिय सदस्य जे २-३ दिवसातून एकदा तरी समूहातील मेसेजेस बघतात ते सर्व स्वतःहून जॉईन झाले होते कोणालाही वैयक्तिक फोन किंवा मेसेज केले नाहीत)
असे असले तरी सर्वांना वैयक्तिक फोन मेसेज करून एक मोठे स्नेहसंमेलन लवकरच ठरवू...


गोपळदादा बोलताना म्हणाले की ते इतर अनेक ग्रुप मधील मेसेज वाचत नाहीत पण knowing Gandhi ग्रुप मधील सर्व मेसेज २-३ दिवसातून एकदा का होईना वाचतातच आणि दादांसारख्या अनेक व्यक्ती आहेत हेच ग्रुपचे वैशिष्ट आहे.
यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील सदस्यांना विनंती आहे की आपण आपापल्या जिल्ह्यात अश्या भेटी घेऊन एकमेकांचा परिचय करत गांधीविचारतून रचनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्य सुरू करावे...


तर चला खिशातला गांधी डोक्यात आणुया...
#राष्ट्रपिता #महात्मा #गांधी की जय
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment