AddThis code

Sunday, July 31, 2022

महावीरांचे विचार #तत्वज्ञ आणि #विचारवंत म्हणून इतर समाजासमोर मांडण्याची गरज माझा यंदाच्या जैन जागृती मध्ये आलेला लेख

महावीरांचे विचार #तत्वज्ञ आणि #विचारवंत म्हणून इतर समाजासमोर मांडण्याची गरज
माझा यंदाच्या जैन जागृती मध्ये आलेला लेख

काही जैन मित्रांशी चर्चा करत होतो की त्यांना महावीरांबद्दल नेमकी काय - काय माहित आहे?"तर 14 स्वप्ने, कानात खिळे ठोकणे वगैरे कथा सोडल्या तर त्यांची बहुतेक मित्रांना माहित नव्हती.
सामजिक चळवळीतील मित्रांना, मान्यवरांना विचारले तर ते म्हणे गौतम #बुद्ध यांच्यासारखेच काही तरी तत्वज्ञान दिले महावीरांनी त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही.
#अनेकांतवाद आणि सध्याच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महावीरांच्या महत्वाच्या विचारांबद्दल लोकांना माहीत नाही हे पाहून आश्चर्य वाटले त्यामुळे हा लेख ...
गौतम बुद्धांच्या पूर्वी काही वर्षे महावीरांचा जन्म झाला .#महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते ना महावीरांनी कधी कुठल्या चमत्कार वा अंधश्रद्धांचे समर्थन केले पण त्यांनी सामाजात चालत असलेल्या चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध, विषमते विरुद्ध ठामपणे भूमिका घेतली आणि समतेची शिकवण दिली..
सविस्तर सोबतच्या लेखात ..
कसा वाटला नक्की सांगा..❤️❤️






 
Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment