संभाजी भिडे यांचे कुंकू -टिकली बद्दलचे विधान हे त्यांच्या स्त्रियांना कमी लेखण्याचे एक छोटेसे उदाहरण आहे. हिंदूराष्ट्र निर्माण झाले तर असे अनेक नग तयार होतील, जे स्त्रियांनी काय करावे याबद्दल ज्ञान देतील आणि "मग तू असे असे केले तरच मी हे-हे करेन" म्हणत त्यांच्याशी व्यवहार करतील.
हे इतिहासात पण घडले आहे. राजा राम मोहन रॉय आणि सुधारकांनी जेव्हा सती प्रथेस (पतीच्या निधना नंतर त्याच्या पत्नीलाही त्याच्या चितेवर जाळण्यास) विरोध केला तर हे आमचे संस्कृती बुडवायला आणि धर्माचा अपमान करायला निघाले आहेत असे म्हटले गेले. सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींना शिकवणे सुरू केले तेव्हा त्यांच्यावर याच विचारसरणीच्या लोकांनी शेण फेकले आणि प्रचंड त्रास दिला. महात्मा गांधी जेव्हा म्हणाले की महिलांनी चूल आणि मूल पुरते मर्यादित न राहता लोक चळवळ केली पाहिजे तेव्हाही त्यांना प्रचंड विरोध झाला. गांधीजींनी स्त्रीयांनी पडद्याआड राहणे , घुंघट वगैरे ला विरोध करणारे विधान केले तेव्हा सनातनी त्यांच्यावर प्रचंड चिडले होते पण त्यावेळी देशभर स्त्रियांनी या प्रथेविरुद्ध आंदोलने केली आणि त्या गोष्टी सोडल्या.
स्त्रियांनी याबद्दल वेळीच सतर्क राहिले पाहिजे. नाहीतर हे वारे वाढत राहिले तर पुढे हा काळ त्यांच्यासाठी अवघड असेल. इतिहासात याची असंख्य उदाहरणे आहेत.
महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन शल्य विशारद सती जाण्यास यांनी आपली लाडकी कन्या बाहुली हिला शिकवण्यास सुरुवात केली. त्यांना सनातन्यांनी जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली.पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला. ती ६-७ वर्षाची चिमुकली तो लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडली. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ घोले यांनी शुक्रवार पेठ येथे बाहुली हौद बांधला.
त्यांना आवडले तर #टिकली लावतील नाही आवडले तर नाही लावणार. तेच #बुरखा #हिजाब किंवा इतर गोष्टी बद्दलही. #itsherchoice
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment