AddThis code

Monday, November 28, 2022

मला समजलेले महात्मा फुले - 28 Nov 2016

मला माहित आहे फेसबुक whatsapp सारख्या ठिकाणी मोठा लेख कुणी वाचणार नाही तरी कमीत कमी शब्दात मांडायचा प्रयत्न करत आहे

आज जिथे *मोठं-मोठी भाषणे झाडणे , स्वतःच्या चुका लपवण्यासाठी भाषणातून रडणे, लाखोंचे कोट घालणे, स्वतःची पदवी खोटी सांगून लाखोंचा पेन वापरणे, जाहिराती करणे,अभिनय करणे  वगैरे फॅशन होत चालली आहे* तेव्हा महात्मा फुलेंची आठवण प्रकर्षाने होते 
त्यांना काय कमी त्रास झाला असेल ?
जेव्हा ते रस्त्यावरून जात असत  तेव्हा लोक त्यांच्यावर कचरा फेकत, थुंकत , शिव्या देत , अंगावर शेण फेकत आणि वेगवेगळ्या प्रकारे उपद्रव देत , ज्या समाजाच्या उत्थानासाठी ते झटत होते सनातन्यांनी त्याच समाजातील माणसाला सुपारी देऊन त्यांचा खून करायला पाठवले होते या सर्वांच्या काय कमी वेदना झाल्या असतील त्यांना (तो मारेकरी स्वतःची चूक लक्षात आल्यावर बदलला आणि त्याची पुढची पिढी महात्मा फुलेंची अनुयायी बनली त्यामुळे सनातन्यांनी पुढच्या वेळी गांधीजींच्या हत्येच्या वेळी स्वजातीतील गोडसेला खून करायला पाठवले) पण एवढा त्रास होऊनही ते ना कधी रडले ना इतरांना दोष देत बसले , अविरतपणे शेवटपर्यंत परखडपणे आपले विचार मांडत सोबत कार्य करत राहिले

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1311756648875383&id=100001231821936

आपल्याकडे समाजसुधारणा, जातिव्यवस्था  यावर बोलणारे अनेक बोलघेवडे समाजसुधारक होऊन गेले पण कर्ते  फार कमी ,
*बाहेर मोठं मोठे तत्वज्ञान सांगायचे पण स्वतःवर आल्यावर मात्र तत्वाला तिलांजली द्यायची* असे ते प्रकार
पण महात्मा फुले तसे नव्हते
 महात्मा फुले हे कर्त्या सुधारकांतील सर्वश्रेष्ठ उदाहरण होते
म्हणजे *बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले* असे ते व्यक्तिमत्व 

*राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही ज्याला महात्मा म्हटले असे ते महात्मा*

खालील प्रसंग पहा

त्यांचे लग्न होऊन बरीच वर्षे लोटली तरी मुल-बाळ नव्हते हे पाहून  काही नातेवाईकांनी  म. फुलेकडे सावित्री बाईना मुल होत नसल्याचे सांगून ज्योतीबांनी दुसरे लग्न करावे असा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला तेव्हा नातेवाईकांना ज्योतिबांनी खालील उत्तर दिले होते 

*माझे दुसरे लग्न करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचेच एका दुसर्या पुरुषाशी दुसरे लग्न करून मलाच सवता आणूया आणि त्याच्यापासून जे मुल होईल त्याला मी स्वतःचे नाव देवून त्याचा सांभाळ करीन. पण मी मात्र सावित्रीला सोडणार नाही किवा तिला सवतहि आणणार नाही.बघा पटते का ?"*

आणि सांगा जगातील कोणताही पुरुष असा प्रस्ताव मांडेल?

 विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य *नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांनी कामगारांचा संप घडवून आणला होता.*आजकाल पगारवाढीसाठी(सातवे वेतन) संप केला जातो. पण अशा *सामाजिक प्रश्‍नासाठी संपाचे शस्त्र* ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल

*प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक* झाले पाहिजे अशी मागणी १३० वर्षापूर्वी देशात सर्वप्रथम करणारे द्रष्टे महात्मा होते.

*विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥*
      *निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।*
      *वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥*

*एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.*
      
आजकाल काही जाणती विचारवंत मंडळीही दारूबंदीला विरोध करतात त्त्यांनी महात्मा गांधी,डॉ .आंबेडकर , महात्मा फुले दारुबाबत या महापुरुषांनी दारूबंदी चे समर्थन का केले होते याबाबत वाचायला हवे 
महात्मा फुले याबाबत म्हणतात-
      *‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।*
      *तोच पैसा भरा। ग्रंथासाठी॥’*
१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला तीव्र विरोध केला होता.

सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशाच्या खेड्यापाड्यात *शिक्षण, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मुलन, जाती निर्मुलन, स्त्रीपुरुष समता, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, लोकजागृती आणि प्रबोधन* यासाठी ते झटले.

  साहित्य किंवा लेखन
 सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

असो
, *१८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा  काढणारे धोर समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ,धर्मचिकित्सक,पहिले शिवशाहिर,नाटककार, साहित्यिक,इतिहास संशोधक ,अंधश्रद्धा विरोधक, समतानायक तथा शेतकर्यांचे कैवारी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले* यांच्या स्मृतीदिनानिमित्त  त्यांच्या विचार व कार्यकर्तृत्त्वास विनम्र अभिवादन!!!
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
लिहिण्यात काही चुकले असल्यास क्षमस्व

28 Nov 2016
संकेत मुनोत
8668975178

संदर्भ-
1- महात्मा फुले चरित्र
2-दत्तात्रय जाधव यांचा लेख
3- केशवराज वाघमारे यांचा लेख
4-महात्मा फुलेंवरील पुस्तके
http://www.mahatmaphule.com/marathiBooksonMahatmaPhule.htm
5- 
https://m.wikisource.org/wiki/Author:जोतीराव_गोविंदराव_फुले
6-http://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-jyotiba-phule
7-
https://hi.m.wikipedia.org/wiki/ज्योतिराव_गोविंदराव_फुले
5-http://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-jyotiba-phule


Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment