यथार्थ स्वातंत्र्य
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे स्वातंत्र्य आपण अबाधित कसे ठेवायचे आणि भविष्यात देशाची वाटचाल अजून चांगली कशी होईल हे आपण पाहायला हवे. त्याला मुख्य कारण म्हणजे आज आपला देश पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आहे
. ७५ वर्षांपूर्वी फक्त भारत देश स्वातंत्र्य नाही झाला तर त्यादरम्यान अनेक देश स्वतंत्र झाले पण भारत वगळता बहुतेक देश जास्त काळ टिकले नाहीत. अनके ठिकाणी लष्करशाही , हुकूमशाही आली तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच्या राष्ट्रप्रमुखालाच फाशी वगैरे दिली. यातील अनेक देश उध्वस्तही झाले. आपला देश ७५ वर्षानंतर आजही मजबूत आहे त्याला कारण आहे गांधीजींनी अनेक दशके लोकचळवळ घडवून लोकांची घडवलेली मने. समोरच्यावर हातही उचलणार नाही आणि अंगावर लाठी पडत असताना पळूनही जाणार नाही असे वागायला खूप धैर्य लागते ते होते म्हणून इतर देशांच्यासारख्या हिंसक दंगली झाल्या नाहीत .
फक्त भारतावरच नव्हे तर जगभर सूर्य मावळत नाही तिथपर्यत साम्राज्य असणारे विल्स्टन चर्चिल म्हणले होते कि यांना स्वातंत्र्य देऊ नका यांच्यात एवढे मतभेद आहेत कि काही वर्षात शेकडो तुकडे होतील.आणि त्यांचे अनेक अंशी खरे ही होते. अवघे दिड लाख ब्रिटिश आपल्या देशातील ४० कोटी लोकांवर राज्य करू शकले त्याला कारण होते इथली विषमता, भेदभाव आणि आपापसातील द्वेष. महात्मा गांधीजींच्या भारतीय राजकारणात उदय होईपर्यत स्वातंत्र्यलढा हा फक्त देशातील काही उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित होता . सामान्य माणसाला त्याचे काही देणे घेणे नव्हते. राज्य करणारे ब्रिटिश असो , पेशवे असो किंवा मुगल किंवा अन्य कोणी असो त्यांना तर गुलामीतच जगावे लागत होते . उलट काहींना ब्रिटिश त्यातल्या त्यात बरे वाटत होते कारण ते पेशव्यांसारखा जातीवरून अन्याय तर ब्रिटिश करत नव्हते आणि सतीप्रथा बंदी आणि अनेक सुधारणावादी कायदे त्यांनी पारित केले जे इथल्या सनातनी लोकांनी स्वतःच्या सत्तेत कधी होऊ दिले नसते.
महात्मा गांधींनी नेतृत्व हाती घेतल्यावर सर्वप्रथम हा जात, धर्म, वर्ग पंथ वगैरे मधला भेद मिटवला आणि लोकांना देशप्रेम आणि खादीच्या धाग्याने एकत्र आणले. पूर्वी देशात २ गट होते एक गट म्हणायचा 'आधी स्वातंत्र्य मग सुधारणा' तर दुसरा गट म्हणायचा 'आधी सुधारणा मग स्वातंत्र्य' . गांधी म्हणाले कि स्वातंत्र्य आणि सुधारणा या गोष्टी सोबत होऊ शकतात आणि ते त्यांनी करून दाखवले .
.त्यांनी कोट्यवधी लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा जागवलीच पण सोबत सुधारणावादी धोरणही जागविले. सवर्णामध्ये पश्चातापाची भावना जागी करून त्यांना आपण एक पायरी खाली उतरायला हवे हे सांगीतले तेच ज्यांना त्याकाळी अस्पृश्य म्हटले जाई त्यांच्यामध्ये त्यांनी आत्मविश्वासाची भावना निर्माण केली. याचे साधे उदाहरण घ्यायचे तर खादी टोपी घ्या पूर्वी जातीनिहाय पगड्या होत्या ज्याची जेवढी जात मोठी तेवढे पगडीत पीळ जास्त आणि त्यावरून त्याला सलाम ठोकला जाई . गांधींनी सर्वांना सारखी खादी टोपी घालून हा फरक संपवला. गांधीजींच्या उपवासामुळे शेकडो वर्षांपासून अस्पृश्यांना बंद असलेली मंदिरे खुली झाली , विहिरी एकत्र झाल्या . जिथे अस्पृश्यांना घरात प्रवेश नव्हता तिथे लोक एकत्र जेवू लागले .फक्त उच्चभ्रू वर्गापुरता मर्यदित असणारा पक्ष सर्वांचा झाला आणि गांधीजींच्या या सुधारणावादी धोरणामुळे दहशतवादी गोडसेला गांधींचा खून करावा लागला . त्याने ५५ कोटी , फाळणी वगैरे खोटी कारणे सांगितली असली तरी खरे कारण हे गांधीजींचे सुधारणावादी धोरण हेच होते .. कारण गांधीजवर १९३४,१९४२,१९४४ या काळात जवळपास ७ हल्ले झाले ज्यातून गांधी वाचले तेव्हा ना फाळणीचा विषय होता ना ५५ कोटींचा . कारण एकच होते गांधींनी बहुजनांना मुख्य प्रवाहात घेणे सोबत या कामात आचार्य विनोबा भावे , साने गुरुजी आणि अनेक विद्वान ब्राम्हण ही साथ देत होते ज्याची गोडसेच्या मनात जास्त चीड होती.
तर चर्चिल ने सांगितले ते आज खरे होऊ लागले आहे आज धर्म, जात , वर्ग , पंथ इ वरून मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवला जाऊन देश हळूहळू तुटत आहे . आपल्याला जर देश पुढे न्यायचा असेल तर हा द्वेष थांबवून आपापसात प्रेम आणि संवाद वाढवायला हवा . पंडित नेहरू जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशात सुई ही तयार होत नव्हती.पण नेहरू कधी हे नाही म्हटले कि ब्रिटिशांनी १५० वर्षे घाण करून ठेवली आता मी काय करू मला अजून वेळ द्या वगैरे ? उलट त्यांनी कारखाने , प्रयोगशाळा , धरणे , वैज्ञानिक संस्था आणि अनेक गोष्टी उभारून आधुनिक भारताची निर्मिती केली. नेहरू इथे जेव्हा या गोष्टी करत होते त्याच वेळी पाकिस्तान आणि अन्य काही देशात धर्माच्या नावाखाली मोठं-मोठी धार्मिक स्थळे आणि तत्सम गोष्टींवर जोर दिला गेला. आज ते कुठे आणि आपण कुठे त्यातील प्रमुख अंतर हे धोरणातील आहे . आपल्या देशात रोजगार, शिक्षण , औद्योगिकता , आरोग्य , अर्थव्यवस्था , आरोग्य व्यवस्था इ गोष्टी मजबूत करण्याकडे भर दिला गेल्यामुळे देशातील लोक आणि देश पुढे जाऊ शकला.आज या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून लोकांना धर्मांधतेकडे वळवले जात आहे ते थांबायला हवे नाहीतर आपल्या देशाचेही जर्मनी , श्रीलंका इ सारखे हाल होतील धार्मिक असणे आणि धर्माध असणे यात खूप मोठा फरक आहे . गांधी , मौलाना आझाद , खान अब्दुल गफार खान ही धार्मिक माणसे ज्यांचा धर्म त्या धर्मातील सामन्यातील सामान्य माणसाचे कल्याण कास होईल ते पाहत होता तर तेच गोडसे , लादेन इ सारख्या धर्मांध लोकांचा धर्मांधपणा इतर धर्माचा द्वेष करून स्वतःच्याच धर्माचे मोठे नुकसान करतो . .
तर चला बदल घडवूया बदलाची सुरवात स्वतःपासून करूया
संकेत मुनोत
8668975178
changalevichar1@gmail.com
Comment, Share ,Follow and Subscribe.
👌Keep it up!💐
ReplyDeleteमी आताच तुमचा... यथार्थ स्वातंत्र्य..
ReplyDeleteहा लेख वाचला... शब्द नाहीत माझ्याकडे ....
खुपच सविस्तर संदर्भासह स्पष्टीकरण देऊन भारताच्या भवितव्यासाठी गांधीजींचे विचार गरजेचे आहे.
खुपच अप्रतिम वास्तविक परिस्थितीशी समरुप आणि भविष्यातील सुचक धोका तुम्ही या लेखातून दाखवून दिला आहे..
मनापासुन सलाम तुमच्या लेखणीला.. 👏🏻
यथार्थ लिखाण....... अप्रतिम
ReplyDeleteसुंदर मांडणी!
ReplyDeleteखरंच देशाला शांततेची गरज आहे.
हा देश बुद्धांचा, महाविरांचा आहे ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे.
*वैर जिंकावे प्रेमाने, युद्धाने वाढते युद्ध*
*शाक्य कोलीया संघर्षी ते वदले गौतम बुद्ध!*
हे वचन अजरामर आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी...
*हाती न घेता तलवार!*
*बुद्ध राज्य चालवी जगावर!!*
असे वचन आपल्या ग्रामगीतेत नमूद केले आहे.
आपल्या विदेशी दौऱ्यात
किंवा भारतात आलेल्या परराष्ट्रीय प्रमुखांना प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी शांतता उपासक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देशाच्या वतीने भेट देत असतात.
भगवान महावीर यांनी दिलेला शांतता आणि अहिंसेचा संदेश देखील जगात अजरामर आहे.
गांधीजींनी या थोर धर्म संस्थापकांकडूनच अहिंसेची शिकवण घेतली असावी!
लेख आवडला, खुप चांगले विचार मांडले आहेत. तुझे काम, तुझे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏👍
ReplyDeleteसंकेत,
ReplyDeleteआपल्यामुळे पुन्हा एकदा गांधी विचारांची महती सर्वसामान्यांना होत आहे. अहिंसा आणि सत्य या तत्वांची खरी ताकत महात्मा गांधीनी संपूर्ण जगाला अवगत करुन दिली. आजच्या परिस्थितीत आपण या विचारांना जनमानसांत खोलवर रुजवत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार ...