नेहमी तरुणांसमोर बोलत असतो यावेळी जेष्ठ नागरिकांसमोर बोलण्याची संधी मिळाली खूप छान वाटले. 





एवढ्या आज्जी आजोबांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले.
मला तसे आज्जी आजोबांचे प्रेम 8 वी पर्यंत च मिळाले. पप्पांकडचे आज्जी आजोबा मी पहिली दुसरीत असतानाच वारले असावेत त्यांच्याबद्दल एवढे आठवत नाही. पण आईचे आईवडील म्हणजे नाना-नानी यांच्याबद्दल बरेच आठवते. मी चौथीत असताना नाना वारले तर आठवीत असताना नानी. त्यातही नानांचा मी सर्वधिक लाडका त्यांना ७ मुली होत्या. आम्ही १७ नातवंडे त्यात मी सुट्टीला गेल्यावर नाना मलाच एकट्याला पेढा आणून गुपचूप खायला देत. कोणी पाहुणे आले की प्रश्न उत्तरे द्यायला माझे नाव घेत. सकाळीच उठून त्यांच्यासोबत मारुतीच्या आणि देवीच्या मंदिरात जाणे आणि तिथे साखर खाणे हा खूपच मस्त क्षण होता. मी पहिलीत असतानाच माझे मारुती स्तोत्र तोंडपाठ होते तर गावातील मारुती मंदिरात जेव्हा हरिपाठ चले तेव्हा म्हणे तर शंकरलालजींचा नातू म्हणत माझी ओळख होई आणि नाना मायेने डोक्यावरून हात फिरवत. लेकराला जप असा ठळक उल्लेख त्यांच्या आईला लीहलेल्या पत्रात असे. आज त्यांना माझे हे काम पाहून खूप आनंद झाला असता.
मा. माडगूळकर गुरुजी यांचे विशेष आभार की त्यांनी मला येथे व्याख्यानासाठी बोलवले. साने गुरुजी कथामाला आणि मोरवाडी जेष्ठ नागरीक संघ यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.
गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद कसा वाढवता येईल यावर गप्पा झाल्याच पण सोबत या आज्जी आजोबांच्या ही व्यथा समजून घेता आल्या.
त्यानिमित्त एवढे सांगू इच्छितो की त्यांनी तुमच्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात टाकू नका, प्रेमाने 2 शब्द बोलले तुम्ही तरी त्यांच्यासाठी ते खूप असते.



जेणेकरून आपण खरच योग्य बोलतोय का योग्य मार्गावर चाललोय का ते समजावे म्हणून व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या प्रतिक्रिया...यावेळी लाईव्ह घेतल्या - https://youtu.be/93zRHZ109ZM
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment