AddThis code

Monday, July 1, 2024

टर्म इन्शुरन्स प्लॅन मिळण्यापूर्वी होणारे क्लिष्ट चेक अप आणि कागदपत्र पडताळणी ( Documentation )

अनेक Advisors किंवा एजन्ट टर्म इन्शुरन्स सुचवत नाहीत त्याऐवजी साधे सेविंग प्लॅनस सुचवतात. त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे टर्म इन्शुरन्स पॉलिसी सुरु होण्यापूर्वी होणारे strict check up आणि कागदपत्र पडताळणी आणि त्याबद्दलची प्रोसेस.या पडताळणी प्रोसेसमध्ये मध्येच काही जण माघार घेतात. कारण त्यांना वाटते इतर policy मिळतात तशी ही पण पटकन मिळावी, एवढी प्रोसेस कशाला करावी. मग एवढी मेहनत घ्या आणि त्यातही मध्ये काही झाले तर client पुढे जाणार नाही मग आपली मेहनत वाया जाणार, म्हणून अनेक जण टर्म इन्शुरन्सच सुचवत नाहीत.
यातही कंपनी जेवढी चांगली तेवढी त्याची किंमत जास्त असते आणि प्रक्रिया पण मोठी असते पण त्या कंपन्याची क्लेम सेटलमेंट प्रक्रिया पण चांगली असते आणि rejection चे प्रमाण कमी असते. तेच नवख्या आणि जास्त प्रोसेस न करणाऱ्या कंपन्यातून क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. ऑनलाईन मध्ये तर याच्या 80% पेक्षा जास्त fraud केसेस समोर आल्या आहेत.

आपण जे काही करतो ते कुटुंबासाठी करतो मग त्यांच्यासाठी आपला टर्म इन्शुरन्स काढणे  अन्न, वस्त्र, निवारा एवढेच आत्यावश्यक आहे हे आपण समजून घ्यायला हवे. अनेक विकसित देशांमध्ये Health Insurance आणि इतर अनेक प्रकारचे इन्शुरन्स compulsary आहेत. आपल्या इथे याबद्दल फारसे प्रबोधन नाही.
असो Term Insurance आणि Health Insurance हे 2  आर्थिक नियोजनाचे  मुख्य खांब आहेत. हे जर नसतील तर तुम्ही कितीही FD , SIP, saving, सोने किंवा इतर काहीही घ्या त्या सर्वांची इमारत एका दिवसात कोसळून तुम्ही उध्वस्त होऊ शकता.  त्यामुळे सर्वात आधी ते करा.
त्यासाठी जो वेळ लागेल प्रक्रिया लागेल ती होऊ द्या कारण ते तुम्हाला 50 लाख ते कोट्यावधी रुपये तुमच्या छोट्याश्या premium च्या बदल्यात देणार आहेत तर तेवढी पडताळणी ते करणारच. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला 2 लाख जरी दिले तरी तो  त्या बदल्यात तुमच्या कुटुंबाला  50 लाख किंवा 1-2 कोटी देणार आहे का? नाही ना? त्यामुळे ही प्रक्रिया होते पण ती आवश्यक असते. 
कुठलाही प्रामाणिक आर्थिक सल्लागार तुम्हाला सर्वात आधी Term Insurance आणि Health Insurance सुचवेल मग इतर गोष्टी सुचवेल. जर ते सुचवत नसेल तर एकतर तो अप्रामाणिक आहे किंवा त्याला आर्थिक नियोजना बद्दल फारसे माहिती नाही. 
काही लोकांचे म्हणणे असतें कि आज 1 कोटीची किंमत आहे पण अजून 20 वर्षांनी 1 कोटीची किंमत तेवढी राहणार नाही तर आज असेही प्लॅन्स आहेत ज्यांचे कव्हर काळानुरूप वाढत जाते आज कव्हर 1 कोटी असेल तर 20 वर्षानी कव्हर 20-30 कोटी असेल. फक्त यात निवड करताना काळजीपूर्वक करायला हवी. नाहीतर तुम्ही घेऊन किंमत देऊन त्याचा क्लेम तुम्हाला नाही मिळाला तर त्याचा काय फायदा? इथे खूप गोड-गोड बोलून नंतर गळा कापणारेही लोक आहेत, जे नंतर तुमचा फोनही उचलणार नाहीत. त्यामुळे जो स्वतःचे शब्द जपून वापरतो, प्रामाणिकपणे काम करतो, स्वतःच्या फायद्यापेक्षा तुमचा जास्त विचार करतो अश्या तज्ञ व्यक्तीकडुन हे घेणे म्हणजे निर्धास्त होणे आहे. 

आपल्यापैकी अनेकांना अमेरिकेचे, विकसित देशांचे, त्यातील लोकांचे आकर्षण असते पण आपल्या लोकांना हे माहित आहे का कि तेथील लोक टर्म, हेल्थ आणि इतर इन्शुरन्स सर्वात आधी काढतात कारण ते आपल्या जबाबदारांच्या प्रति प्रॅक्टिकल असतात भावनिक नसतात. त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असुनही हजारो लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत तर आपली लोकसंख्या जगात 1 नंबर असूनही फक्त 21 लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत.
असो अधिक माहिती प्रत्यक्ष ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटून बोलू 

आपलाच 
संकेत मुनोत 
आर्थिक तज्ञ आणि विमा सल्लागार 
प्रामाणिक सल्ला उत्तम सेवा 
8668975178

No comments:

Post a Comment