©संकेत मुनोत
मी पूर्वी फक्त विमा सल्लागार होतो पण आता त्यात लीडर ही झालो ज्यामुळे अनेक सल्लगार घडवण्याचे कामही माझ्याकडे आले.
काही विमा पॉलिसी पटकन मिळतात तर काहींना अधिक वेळ लागतो असे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो. यात विमा सल्लगाराची काही चूक नसते वेळ लागतो तो कंपनीची Underwriting Team जी विविध documents मागवते त्याला. यात पडताळणी करताना त्यांना कुठे शंका आली तर कंपनी पुन्हा काही माहिती मागवते त्यानंतर पॉलिसी देते.
तर यातील महत्वाचे मुद्दे पाहूया
थोड्या वेळात मिळणाऱ्या पॉलिसी -
1. नवीन आरोग्य विमा -
कुठलाही आजार नसलेल्या एखाद्या निरोगी व्यक्तीचा आरोग्य विमा म्हणजे health Insurance हा त्यांनी त्यांची माहिती, कागदपत्रे आणि प्रीमियम चे पैसे भरल्यावर त्वरित म्हणजे काही मिनिटात किंवा काही तासात मिळतो.
2. साधे सेविंग प्लॅन्स -
20 लाख पर्यंत कव्हर असणारे साधे सेविंग प्लॅन्स जसे कि LIC पॉलिसी वगैरे त्याही तुम्ही निरोगी असल्यास सहज मिळतात तर त्यापेक्षा जास्त कव्हर पाहिजे असल्यास थोडा वेळ घेऊन मग मिळतात.
मध्यम वेळ लावणाऱ्या पॉलिसी
3. Health Insurance Port -
आपण जेव्हा आरोग्य विमा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करतो तेव्हा तो करायला नवीन कंपनी थोडा वेळ घेते.पूर्वीच्या कंपनीत असताना कुठले क्लेम घेतलेत का? घेतले तर कशासाठी घेतले वगैरे पाहते, त्याचे clarification भेटल्यावर मग पॉलिसी देते. त्यामुळे पॉलिसी पोर्ट करत असाल तररिन्यूअल च्या 15-45 दिवस आधी पोर्ट करा. अर्थात शेवटच्या 3 दिवसात पण होते पण त्यात documents गोळा करण्याची आणि इतर गोष्टींची पण घाई होते.
सर्वाधिक वेळ लावणाऱ्या पॉलिसी
4. - #टर्म इन्शुरन्स
#Term Insurance काढतांना सर्वाधिक वेळ लागतो. कंपनी विविध कागदपत्रे पडताळणी करते, आरोग्य तपासणी करते आणि मग टर्म इन्शुरन्स देते. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 25 पट एवढ्या कव्हर चा टर्म इन्शुरन्स काढण्याची तुम्हाला परवानगी असतें. त्यावर तुम्ही काढू शकत नाही. अर्थात हे वयानुरूप बदलते. वय जेवढे कमी तेवढ्या अधिक पटीचे कव्हर आपल्याला घेता येते.
समजा एखाद्याचे उत्पन्न 10 लाख आहे आणि त्याच्या वयाला 25 पट पर्यंत घेण्याची परवानगी असेल तर तो जास्तीत 2.5 कोटींचा कव्हर घेऊ शकतो, त्याची इच्छा असली तरी त्याला 4-5 कोटींचा कव्हर तेवढ्या रकमेचे पैसे भरण्याची तयारी त्याने दाखवली तरी मिळणार नाही. यात जोडीदाराचे उत्पन्न सुद्धा पकडता येते.
यात बहुतेक सर्वांना हप्ता ( premium ) हा विमा सल्लागार सांगतात तेवढाच येत असतो
पण तंबाखू किंवा सिगरेट पिणाऱ्या व्यक्तींना थोडा अधिक प्रीमियम भरावा लागतो.
तुमचे उंची वजन प्रमाणात नसेल किंवा आरोग्याच्या मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य काही समस्या असतील तर तुम्हाला त्याचा थोडा अधिक हप्ता लागू शकतो. आणि पॉलिसी सुरु व्हायला अजून जास्त वेळ लागू शकतो. हा किती द्यायचा, कुठले कागदपत्रे अधिक लागतील ते विमा सल्लागार ठरवत नाही तर underwriting team ठरवते.
अनेकदा काही लोक या underwriting प्रोसेस ला कंटाळतात किंवा म्हणतात कि *** कंपनी मला लगेच देते काही जास्त पडताळणी न करता तर असे जर कोणी देत असेल तर नंतर क्लेम ला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमचे कोट्यावधी रुपये बुडू शकतात हे लक्षात घ्या.
त्यामुळेच ऑनलाईन पॉलिसीज मध्ये claim रिजेक्शन चे प्रमाण 60% पेक्षा अधिक आहे. अर्थात अपवादाने काही सल्लागार ही पॉलिसी लवकर होण्यासाठी अश्या गोष्टी करतात जे चुकीचे आहे.
माझ्या ऑफिस शेजारीच वकील मित्रांचे ऑफिस असल्याने त्यांच्याकडे इन्शुरन्स क्लेम बाबत rejection झालेले clients माझ्याकडे येत असतात. घरातील व्यक्ती गेलेली असतें आणि क्लेम साठी कोर्टात चकरा सुरु असतात, यात कधी त्यांनी पॉलिसी ऑनलाईन घेतलेली असते किंवा एजन्टनी पटकन द्यावी म्हणून काही गोष्टी लपवून किंवा खोट्या सांगून पॉलिसी दिलेली असतें. नुकतेच अश्या एका विमा सल्लागाराला निलंबित करण्यात आले कारण त्याने शिक्षण वाढवून टाकले होते. जेवढे त्यांचे शिक्षण आणि उत्पन्न होते त्यासाठी कमी विमा संरक्षण होते पण त्याने ते जास्त लिहून कव्हर पण वाढवला आणि कंपनीने जास्त पडताळणी न करता पॉलिसी दिली आणि पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर तो नाकारला गेला.अर्थात यात त्या विमा कंपनीचीही चूक असल्याने त्यांना तो आम्ही मिळवून दिला. पण त्याने निवडतानाच चांगली कंपनी निवडली असती तर हा इशू आला नसता.
तर लेखाचा उद्देश हाच कि आपले याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत आणि याबद्दलचा patience वाढावा.
LIC, Tata आणि तत्सम काही चांगल्या कंपन्या जेव्हा खूप सारी पडताळणी करतात आणि वेळ घेऊन मग पॉलिसी देतात कारण त्यांना क्लेम देताना वेळ घ्यायचा नसतो.
उदाहरणार्थ जिथे कुठे मोठ्या नैसर्गिक आपत्तीत लोक मोठ्या प्रमाणात मरण पावतात तेथे LIC स्वतः जाऊन स्टॉल लावते तर मृत्यू बद्दल समजताच TATA AIA मध्ये पॉलिसी असल्यास तेही 3 लाख लगेच आणि राहिलेले काही दिवसात नॉमिनी च्या account मध्ये देतात, अर्थात अजुनही काही चांगल्या कंपन्या आणि काही वाईटही आहेत पण सर्वांची नावे इथे लिहीत नाही.
मला किंवा कुठल्याही प्रामाणिक सल्लगाराला असेच वाटते कि ग्राहकाची माहिती भरली, पैसे भरले कि पॉलिसी त्याला पटकन इशू व्हावी म्हणून जेणेकरून आम्हालाही दुसऱ्या कामाकडे वळता येईल पण underwriting टीम नियमाप्रमाणे पडताळणी करायला जो वेळ घेणार तो घेतेच आणि ते तुमच्या भविष्यासाठी आवश्यक असते.
टीव्ही, फ्रीज, कार, घर, सोने mutual funds, शेयरस या गोष्टी तुम्ही पैसे दिले कि लगेच भेटतात तिथे तुमच्या आरोग्याची, उत्पन्नाची, शिक्षणाची पडताळणी करण्याची गरज नसते पण विमा घेताना ती असते म्हणून तुम्ही तुमचे आरोग्य चांगले असतानाच या गोष्टी कारण एकदा मोठा आजार झाल्यावर तुम्ही 10 पट रक्कम दिली तरी तुम्हाला विमा पॉलिसी मिळत नाही.
आपल्या भारतात आर्थिक साक्षरतेची खूप गरज आहे. विकसित देशाची संख्या फक्त 20 कोटी असूनही त्याट हजारो लाईफ इन्शुरन्स कंपन्या आहेत तेच आपली लोकसंख्या 140 कोटी असुनहीं लाईफ इन्शुरन्स कंपन्या फक्त 21-26 आहेत.
meme प्रतिकात्मक आहे.
असो आम्ही ठिकठिकाणी आर्थिक नियोजन सल्लागार वाढवत आहोत. आपल्यालाही या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असल्यास आम्हाला संपर्क करावा.
लेख आवडल्यास शेयर करा
आपलाच
संकेत मुनोत
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार
8668975178

No comments:
Post a Comment