तिचा टर्म इन्शुरन्स
आश्चर्य वाटते ना? अनेक घरात आजही त्याचा म्हणजे घरातील पुरुषाचा टर्म इन्शुरन्स काढला जातो पण स्त्रीचा नाही. अर्थात त्याचा काढणारेही खूप कमी असतात कारण आपल्या देशात आजही टर्म इन्शुरन्स चे महत्वच समजत नाही.
होय, हे खरे आहे कि टर्म इन्शुरन्स कमवत्या व्यक्तीचाच निघतो आणि अजूनही अनेक घरी पुरुषांवरच सगळा आर्थिक भार असल्याने त्यांचा टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे कारण तो नसला तर पुढे आपल्यानंतर कुटुंबाचे हाल होतात. म्हणजे ज्याचे कुणाचे आपल्या कुटुंबावर प्रेम आहे त्याने हे केलेच पाहिजे. एकवेळ फिरण्यासाठी नाही गेला, एखादी गाडी, नवीन वस्तू नाही घेतली तरी चालेल पण हे सर्वात आधी केले पाहिजे. यात फक्त मृत्युंनंतरच भेटते असे नाही तर जिवंत असतानाही अपंगत्व आले तरी मोठी रक्कम मिळते.
म्हणजे माझे एक परिचित ते काही वर्षांपूर्वी ट्रेनने घरी चालले होते तेव्हा त्यांना कोणी धक्का दिला कि चक्कर येऊन पडले माहित नाही पण पायावरून ट्रेन गेली आणि बेशुद्ध झाले. नंतर दोन्ही पाय कापावे लागले. पत्नी चांगली मिळाल्याने ती आज अनेक जबाबदाऱ्या घेते . अपंगत्व आल्याने एक गोष्ट ही झाली कि ते आता कुठले काम करू शकत नाहीत आणि घराचे उत्पन्न पूर्ण बंद झाले. यात चांगली गोष्ट ही कि त्यांनी एक पॉलिसी काढली होती त्यातून त्यांना जवळपास 30 लाख रुपये मिळाले आणि पुढे maturity लाही मोठी रक्कम मिळणार आहे. राहिलेले सगळे हप्ते त्यांना अपंगत्व आल्याने ती कंपनी भरणार आहे. बँक, mutual फंडस्, सोने, रियल इस्टेट किंवा इतर कोणी एवढे पैसे दिले असते किंवा पुढची जबाबदारी घेतली असती ? अर्थात त्याही गोष्टी कराव्यातच हळूहळु पण आधी पाया पक्का केल्यावर. पाया पक्का नसेल तर या सगळ्या गोष्टी विकाव्या लागतात आणि कर्ज घेऊन स्वतःची स्वप्ने तोडावी लागतात.
असो आपण तिच्या टर्म इन्शुरन्स बद्दल बोलत होतो तर आता स्त्रियाही कमवत्या झाल्या आहेत आणि गृहिणीलाही कमी जबाबदाऱ्या नसतात. एखाद्या घरी जेव्हा स्त्रीचा मृत्यू होतो किंवा तिला अपंगत्व येते तर पतीचे आणि मुलांचे म्हणजे कुटुंबाचे हालच होतात, कारण त्या सगळ्या जबाबदाऱ्या एका व्यक्तीवर येऊन पडतात. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घरातील स्त्रियांचाही काढायलाच हवा.
यात अनेक जण एक कारण देऊन काढत नाहीत कि "मी गेल्यावरच मिळणार जिवंत असताना काही नाही मग काय फायदा? " तर "भरला तेवढा प्रीमियम रिटर्न मिळतो" अश्या पॉलिसी ही आहेत किंवा ते "भरलेले पैसे इन्व्हेस्ट होऊन नंतर महागाई नुसार मोठी रक्कम मिळते" असेही अनेक पर्याय यात आहेत जे लोकांना माहीतच नाहीत.
तर नवरा बायको दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढाच शिवाय आपल्या मुलांनाही ते जसे वय वर्षे 18 च्या वर जातील तसे त्यांचाही लगेच काढा. कारण वय जेवढे कमी तेवढा प्रीमियम खूप कमी लागतो.
फक्त हे काढतांना निवड काळजीपूर्वक करा. ऑनलाईन जाहिरातीना बळी पडून असाच काहीतरी काढू नका.प्रामाणिक आणि तज्ञ व्यक्तीशी बोलून, व्यवस्थित चर्चा करून काढा कारण मिळणारी रक्कम कोटी मध्ये असते. 100-200 रु वाचवण्यासाठी ऑनलाईन काढला आणि क्लेम मिळाला नाही तर तुमच्या घरचे तिकडे चकरा मारत बसणार नाहीत ते म्हणतील माणूसच गेला तर आता आम्ही काय चकरा मारू इकडे. कारण नवीन कंपन्यामध्ये Rejection चे म्हणजे क्लेम न देण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे.
अधिक माहिती साठी प्रत्यक्ष ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटून बोलूया
आपलाच
संकेत मुनोत
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार
8668975178
No comments:
Post a Comment