AddThis code

Monday, October 23, 2017

पेट्रोल पंपवर एक असाही अनुभव-भविष्यात कधीही पेट्रोल न मारण्याचे केले कबूल

पेट्रोल भरतांना आकड्यांकडे व्यवस्थित लक्ष देत जा,या बुधवारी पेट्रोल भरायला गेलो तर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याने पेट्रोल भरताना मीटर शून्य केलेच नाही. रु.50 चे सेट होते त्यावरूनच सुरु केले पण माझे तिकडे लक्ष्य होते लगेच त्याची चोरी पकडली.

“अहो काय हे तुम्ही reading शून्य केलेच नाही?” मी पाहिलेले बघून लगेच त्याने सांगितले साहेब चुकून झाले त्याने ते 50रु कमी घेतले. मी तरीही अजून बोलत होतो तर त्याच्या समोर असणार्या कर्मचार्याने मला गाडी पुढे घेण्यास सांगितले मी पुढे जाऊन गाडी लावून लगेच त्याचे फोटो काढले आणि VOICE रेकॉर्डिंग चालू केले. नंतर निघालो तर दुसरा कर्मचारी माझी गाडी थांबवुन मला समजवायला लागला.

”साहेब जाऊ द्या चुकून झाल त्याच्याकडून, कपाळावरील गंध आणि टीळा दाखवत म्हणाला साहेब हा टीळा बघा मी धार्मिक आहे मी रोज पूजा करतो धर्मग्रंथ वाचन करतो”ही गोष्ट 3-4वेळा सांगितली.मी- “अहो ते ठीक आहे पण जे घडल ते चुकीचे आहे ना?” त्याचे उत्तर “साहेब तुम्ही यापुढे कधी आलात तर रांगेत थांबू नका तुम्हाला सर्वात आधी पेट्रोल भरतो” आणि अजून बरेच काही बोलबच्चन देत राहिला शेवटी त्याला हो हो म्हणत तेथून सुटलो.
पण जाता जाता सहज मनात प्रश्न आला कि आपल्या सोबत जे घडले ते आपण बघितले म्हणून समजले पण हे एखाद्या गरीबासोबत झाले तर? आणि कुणीच जर या विरुद्ध बोलले नाही तर हे अजून वाढतच जाणार.
एका पत्रकार मित्राला फोन केला तो म्हणाला “मी लगच माझी टीम घेऊन येतो राज्यव्यापी किंवा देशव्यापी बातमी होईल live दाखव त्याला ही अद्दल घडेल तूही पोहोचशील सगळीकडे” पण परत एक प्रश्न मनात आला 'उगाच कशाला एखाद्याला त्रास त्या कर्मचार्याची नोकरी जाईल परत त्याच्या घराच्यांचे काय होईल.' व्यक्ती वाईट नसते प्रवृत्ती वाईट असते आणि आपल्याला प्रवृत्ती बदलायची असेल तर हा मार्ग योग्य नाही
म्हणून तसाच निघालो जाता जाता पोलीस चौकी लागली तेथे गेलो आणि त्यांना घडलेली घटना सांगितली त्यांनी पेट्रोल पंप वर याबाबत जे रजिस्टर असते त्यात हे नमूद करायला सांगितले आणि माझ्यासोबत पेट्रोल पंपवर दोन पोलीस कर्मचारी पाठवले (पोलीस चौकीतून निघतानाच पोलिसांनाही सांगितले कि मला त्त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही फक्त समजावून सांगायचे आहे माझ्यामुळे भ्रष्टाचार वाढला नाही पाहिजे). तिकडे येऊन त्यांनी त्या माणसाला आणि पंप अधिकार्याला बोलावले आणि चौकीत यायला सांगितले. पंप अधिकारी मला सांगू लागला कि साहेब तुम्ही माझ्याकडे यायचे ना पोलिसांकडे कशाला जायचे? पोलिसांना मी विनंती केली कि “मला हे प्रकरण पुढे न्यायचे नाही त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली तरी  माझ्यासाठी खूप आहे” पोलीस गेल्यावर तो कर्मचारी ज्याने चूक केली होती माझ्याजवळ आला आणि त्याने धन्यवाद मानून असे करणार नसल्याचे सांगितले मी त्याल माझे पुस्तक भेट दिले आणि संकल्प करण्यासोबतच त्यावरच लिहून मागितले कि “मी यापुढे प्रामाणिकपणे काम करेन असला प्रकार पुन्हा कधीही करणार नाही” आणि  चक्क त्याने याचा संकल्प केला आणि ते लिहूनही दिले त्यावरच त्याचा फोटो घेतला.उद्या तो पुस्तक वाचून प्रतिक्रिया ही देणार आहे.

मला त्याची प्रामाणिकता आवडली.
स्वतःची चूक कबूल करणे ही खूप मोठी गोष्ट आहे
एखाद्याने स्वतःची ही चूकच कबूल केली नसती लिहून देणे आणि फोटो काढून देणे तर खूप दुरचा प्रश्न.
आणि त्यामुळेच त्याचा पूर्ण फोटो ही टाकला नाही वा लिहलेल्याच्या खाली त्याचे किंवा त्या पेट्रोल पंप चे नावही इथे दिले नाही

#हृदयपरिवर्तनाचा पुन्हा अनुभव आला
बोले तो #गांधीगिरी_जिंदाबाद

पोलीस आणि पेट्रोल पपंचे सर्व कर्मचारी यांचे धन्यवाद

संकेत मुनोत
8087446346