AddThis code

Monday, February 18, 2019

रयतेचा राजा समजून घेण्याची गरज

महाराजांचे नुसते कोट्यावधी रुपयांचे मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा आणि महाराजांच्या #नावाचे_राजकारण करण्यापेक्षा आज शिवाजी #महाराजांचे_विचार_डोक्यात_घेण्याची_व_रयतेसाठी_कार्य_करण्याची_जास्त_गरज_आहे
आज सर्व ठिकाणी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरे होत आहे. काल रात्री पासून ढोल ताशा , मोटर सायकल वरुण रँली काढून "जय जय जय जय जय शिवजी जय जय जय जय भवानी" असे नारे देत तरुण वर्ग फिरत आहे. आज पहाटे पासून प्रभात फेरी काढत आहेत. #ही_चांगली_बाब आहे. महाराज होतेच तसे . पण प्रश्न पडतो की खरच या तरुणांना शिवाजी महाराज कळले आहेत का? खरे महाराज कळले असते तर आज जी कांही जणतेची अवस्था झाली आहे आणि ती अवस्था आणखी वाईट केली जात आहे ते पाहून याच्या विरुद्ध आवाज उठवला असता.
फक्त अतिरंजित आणि अतिशयोक्ती करणारी व महाराजांची एकच बाजु मांडणारी पुस्तके वाचण्याऐवजी सर्व बाजु मांडणारी वास्तववादी पुस्तके (आचार्य नरहर कुरुंदकर ,कॉ.पानसरे ,यांनी महाराजांचा खरा वास्तववादी इतिहास मांडणारे पुस्तक लिहिलली आहेत ती) सर्वांनी वाचायला हवीत.
महाराज साधे नव्हते केवळ ढोल ताशे ,रँल्या नकोत तर त्यासोबत #सुराज्य_आणि_स्वराज्य निर्माण करणारा #उत्साह_आणि_जिद्द हवी आहे.
कॉ.पानसरेनी लिहलं आहे
शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायांत शिवाजी हे #परमेश्वराचेच_अवतार होते, अशी समजूत आहे. कुणी शिवाचा अवतार म्हणवतात तर कुणी #विष्णूचा. आपल्या देशात आणि #परंपरेत_माणसाचा_देव व्हायला वेळ लागत नाही. ऐतिहासिक थोर पुरूषाचं सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देवमाणूस म्हणण्याची आपली रित आहे.
#अडाणीपणा_आणि_इतिहास यात फरक आहे.
शिवाजी माणूस होते. #चांगले_माणूस होते. #थोर_माणूस होते. #हुशार व दूरदृष्टीचे माणूस होते. नीतिमान आणि व्यवहारी माणूस होते. #शूर_लढवय्ये_आणि_कुशल_संघटक होते. पण माणूस होते. #देव_नव्हते_अवतार नव्हते.
#शिवाजींचा_देव_केला_मग_काय_होतं? #त्यांच्यासारखं_वागण्याची_आपल्यावर_जबाबदारी_राहत_नाही. "शिवाजींसारखं वागा.", "#रयतेला_सतावू_नका.", "बलात्काऱ्यांना पाठीशी घालू नका.", "रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका.", स्वत:च्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण #परधर्माचा_द्वेष_करू_नका." असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं, "ते शिवराय कुठं? आपण कुठं? ते देवाचे अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं."
देव असल्यामुळे वर्षातून एकदा 'शिवाजी महाराज की जय!' म्हणायचं, जयंती करायची, #वर्गणी_गोळा_करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची. जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची. कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं. शिवभक्त म्हणवून घ्यायला आपण रिकामे झालो. #शिवाजींसारखं_वागायची_आपली_जबाबदारी_नाही. शिवाजींनी रयतेला मदत केली. आता त्यांच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्यांचाच उपयोग करताहेत.दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजीचा झेंडा अन् शिवाजीचा फोटो लावायचा अन् काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीच्या प्रतिमेचा गैरवापर आहे. भोंदू कोण अन् भक्त कोण हे ओळखायला शिवाजींना नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे.
( शिवाजी कोण होता? लेखक गोविंद पानसरे, या पुस्तकातून साभार)
महाराजांना विनम्र अभिवादन!
पंडित नेहरुंनीही लिहले आहे
“Shivaji did not belong to Maharashtra alone; he belonged to the whole Indian Nation. Shivaji was not an ambitious ruler anxious to establish a kingdom for himself but a patriot inspired by a vision and political ideas derived from the teachings of the ancient philosophers.”
– Pandit Jawaharlal Nehru
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1091133250937725&id=100001231821936
असो आज एवढ तरी करा
ही 2अप्रतिम वास्तववादी पुस्तके वाचा
1-शिवाजी कोण होता -कॉ गोविंद पानसरे
2- छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य -नरहर कुरुंदकर.
हेही शक्य नसल्यास खालील लिंकवर जाऊन video नक्की पहा
1- m.youtube.com/watch?v=etY9O-_eHak
2- m.youtube.com/playlist?list=PLMTvpNRYTXFvbQfZm_Wr7IcEn65behy-b
पण नीट समजुन घेण्यासाठी पुस्तके वाचावीच लागतील आणि रयतेसाठी जमेल ते काम करावे लागेल
महाराजांना_विनम्र_अभिवादन
#रयतेचा_राजा_शिवाजी
संकेत मुनोत