AddThis code

Saturday, May 9, 2020

माझ्या आयुष्यातील बुद्ध


बुद्धा एवढे ज्ञान कधी प्राप्त करू शकेल कि नाही माहित नाही
पण 
 चेहऱ्यायवरचे हे निरागस स्मित हास्य  आणि करुणा मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन❤

बुद्धा ची एक गोष्ट  ऐकली होती,
तोडकीमोडकी आठवतीये ती अशी-
 बुद्ध एका गावातून दुसऱ्या गावात विहार करत असताना पुढच्या गावातील लोकांनी गावात प्रवेश करताच बुद्धांना खूप शिव्या दिल्या,  खोटेनाटे आरोप केले,  पण बुद्धावर त्याचा काही एक फरक पडला नाही ते तसेच स्मितहास्य करत तेथील कार्य संपल्यावर पुढच्या गावी गेले.
 अस्वस्थ झालेल्या त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले की की 
शिष्य- तुम्हाला ते एवढे वाईट साईट बोलले, नको नको ते खोटे नाटे आरोप केले तुम्हाला काहीच कसे वाटले नाही
बुद्ध -आपण मागच्या गावात होतो तेव्हा त्यांनी आपल्याला काय दिले होते? 
शिष्य -त्यांनी आपल्याला सोने-नाणे आणि अजून काही वस्तू देऊ केल्या होत्या , पण तुम्ही त्या स्वीकारल्याच नाहीत, जश्या आहेत त्यांच्याकडे परत दिल्या.
बुद्ध- होय ना,  इथेही मी तेच केले,  त्यांनी मला शिव्या दिल्या, खोटेनाटे आरोप केले पण मी ते घेतलेच नाही.

मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात बुद्धांच्या वरील गोष्टीचा पुष्कळ फायदा झाला त्यामुळे बाहेरच्या कुणी कितीही ट्रोल केले, शिव्या दिल्या तर म्हणावा तेवढा फरक पडत नाही
 पण जेव्हा जवळचे कोणी असे काही करते तेव्हा त्रास होतो म्हणजे अनेकदा मी उलटे बोलत नाही ते वरील शिक्षेमुळेच
पण नंतर बराच मानसिक त्रास होतो, कि समोरचे आपल्याशी असे कसे एवढे वाईट वागू शकतात वगैरे विचार करून 
म्हणजे अजूनही तेवढा संयम माझ्यात आला नाही पण प्रयत्न सुरू आहेत
बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन
संकेत मुनोत