एका गावातून दुसरी कडे जाताना एक आजी भेटली हात करून म्हणाली "टिंब-टिंब या गावापर्यंत सोडतोस का? टोचून घ्यायचंय, अंगाची लय लाही लाही होतीया..."
मग अधिक चौकशी केली असता म्हणाली कि "घरात म्हातारा, पोरगं, सून आणि नातवंड आहेत पण म्हातारा सोडून कोणीच बोलत नाय माझ्याशी, लय दिस झाले अंघोळ करून ..
सकाळी बैलांला ठेवलेलं पाणी बैलानी पिल्यावर राहिलेलं घेतलं,' इसनून(गरम करून) घेऊ म्हटलं' तर पोरानी पाणी ओढून घेतलं , आंघोळीला पाणी नाही दिले
दर काही दिवसांनी ....गावी जाते आणि डाक्टरकडे टोचून घेते..."
नातवंडाच कौतुक करत होती कि हा आता इकडं नोकरीला लागणार त्यो इथं लागणार पण ते बोलतात का तुमच्याशी म्हटल्यावर अस्वस्थ झाली.
गाडीवरून उतरली तेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवला, म्हटलं आज्जी चिवडा खाशील का?थोडासा चिवडा आणि थोडे पैसे देऊ केले तिने नकार दिला पण खूप आग्रह केला , तुझा नातू समज मला म्हटल्यावर घेतले, तुला हाय ना व खर्चायला हे ही बोलली, तिला व्हीसीटिंग कार्ड दिले आणि म्हटलं "कधी काही लागलं तर कुणाला तरी याच्यावर फोन करायला सांग" आणि निरोप घेऊन निघालो
निघतांना तिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिल्यावर माझ्या ही डोळ्यात पाणी आले
पण पुढच्या प्रवासात प्रश्न पडला
ज्या पोराला वाढवलं मोठं केलं तो का बर तिच्याशी अस वागत असेल, शिवाय तिची सून तीही ? हे पण कधी तरी म्हातारे होणारच ना? कि आयुष्यभर तरुण राहणार?
मागे वृद्धाश्रमाला भेट दिल्यावर ही असाच अनुभव
आला होता , कुणाचा मुलगा परदेशात, कुणाचा इथे मोठया पदावर पण सगळे असे कसे कृतघ्न होतात?
तरी हे वाचणारे जे मित्र-मैत्रीण आहेत त्यांना सांगू इच्छितो कि यांनी तुमच्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात टाकू नका, आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते, बाकी काय?
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये किंवा त्यांच्याशी बोलणे बंद करू नये..
असे प्रकार घडू नयेत यासाठी नाते टिकवूया चळवळीतर्फे काहीतरी प्रबोधनात्मक उपक्रम घेण्याच्या प्रयत्न करत आहोत त्यामुळे अश्या अनेक मुलांमध्ये याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने जाणीव करून देता येईल.
अश्या पालक पाल्य, पती पत्नी, सासू सून, जावई अश्या गवेगळ्या काही केसेस शी संवाद साधताना सहज सुचलेली कविता
एकाचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम होते त्यामुळे त्याला तिच्याबाबत सतत प्रेमळ कविता सुचायच्या.कविता या हृदयातून येत असतात त्यात संवेदना असतात. त्याच्या कवितांना इतरांकडून दाद मिळायची मात्र पत्नी मात्र त्याला तुच्छ लेखायची कधी कुठल्या कवितेला दाद ही देत नसे
कोणीतरी विचारले मला|
खरच दाद मिळते का रे तुला||
ज्यांच्यावर तू रचतोस कविता आणि करतोस जीवापाड प्रेम|
खरच त्यांचेही असते का तुझ्यावर तेवढे ते सेम..||
म्हटलं प्रेमात ठेवायची नसते अपेक्षा आणि कवितेला नको असते दाद|
शब्दाचे वेगळे अर्थ काढून उगाच कशाला वाद...||
ज्याला लहानाचे मोठे केले आणि दिले हृदयाचे भाग|
अश्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारे ही असतातच ना काही महाभाग...||
तरीही काय आई त्यांच्यावर प्रेम करणे सोडून देते?|
एवढे होऊनही त्याच्याच चुका स्वतःवर ओढून घेते...||
रात्र दिवस कष्ट करून
ताठ मानेन जगत मोठं करणारे आई-बाप|
सुनेशी काही भांडण झालं तर लगेच झुकुन म्हणतात, चूकले असेल काही तर , कर आम्हाला माफ||
उगीच आमच्या दोघांमुळे कशाला तुमच्या संसाराला ताप|
तुम्ही फक्त आनंदी रहा , आम्ही होतो इथून वाफ!||
पण कस करतात मुले एवढं मोठं पाप|
ज्याने लहानाचे मोठे केले त्यालाच करतात घरातून साफ||
सासू सासऱ्यांचे प्रत्येक गोष्टीत काढणारी माप|
त्यांच्या हृदयाच्या भागासोबत संसार करताना देते त्या हृदयालाच काप||
का विसरून जाते ती कि तीही होणारच कोणाची तरी आई|
इथे केलेले पाप इथेच फेडावे लागेल ना ग बाई||
मानून पहा त्यांनाही तुझे आईबाप|
सुखाने संसार कर मन ठेव साफ||
शब्दांचे कीस करुन काढू नको त्यांचे वेगळे अर्थ|
गैरसमज करून घेऊन नको करू जीवन व्यर्थ...||
कशाला तू ठेवतेस सतत त्यांच्यावर नेम ?|
करून बघ कधी त्यांच्यावरही प्रेम ||
आहे आता ते तुझेच ग घर ||
सगळ्या गोष्टी बाहेर सांगून छाटू नको त्याचे पर||
( काही घरात सासरचे लोक सुनेचा छळ करतात, पैश्याची मागणी, अतिरिक्त कामाची मागणी, पतीकडून मारहाण अश्या गोष्टी ही होतात त्यांना उद्देशून खालील ओळी)
पण हो अन्याय वा अत्याचार झाला तर ठेवू नको शांती|
त्याविरुद्ध आवाज उचलून कर तू क्रांती||
पण शक्यतो तुमच्या समस्या तुमच्यातच सोडव|
एकमेकांवर विश्वास ठेवून प्रश्न उत्तरे सोडव||
सासूला ही विंनंती कि समज तु तिला तुझी लेक|
नको मागू हुंडा, मन ठेव नेक( नेक- चांगले)||
दृष्ट सासू सारखी करू नको, तू तिचा छळ|
दे तू सुनेच्या ध्येयवादी पंखानाही आशेचे बळ||
उचलू नकोस तू तिच्यावर हात|
दे तिला तिच्या कामात साथ||
(काही जण सगळं आपल्या मुलांच्या नावावर करून टाकतात)
बापाला विनंती कि स्वतःची संपत्ती स्वतःजवळ राख|
पोराबाळांच्या नावी करून नको करू त्याची राख||
असेल सुपुत्र वा सुपुत्री तर स्वकष्टाने कमवेल|
असेल कपुत्र कुपुत्री तर आळसाने गमवेल||
कुटुंबप्रमुख म्हणून तुही लाव थोडा धाक|
जेणेकरून व्यवस्थित चालेल संसाराचे चाक||
घरात न राहणाऱ्या पण फोनवर सर्व माहिती घेऊन घरात ढवळाढवळ करणाऱ्या लोकांमुळे अनेक घरे तुटतात त्याबद्दल सुचलेले शब्द
मुलीच्या आई वडीलांनो नका घालू संसारात अति लक्ष|
तुमच्या लुडबुडीमुळे होईल संसार त्यांचा भक्ष||
दोघांनाही करू द्या थोडी सकारात्मक तडजोड|
न बदलता आहे तसेच राहणार म्हटले तर होईल नातेसंबंधांची तोडफोड||
कुटुंबातील व्यक्तींनो ,
त्याग आणि समर्पणासोबत एकमेकांना द्या एवढे प्रेम|
प्रत्येक कुटुंबाला वाटेल व्हावे तुमच्यासारखे सेम||
समजा बनला एक तलवार|
तर बनू तुम्ही बनू नका तुम्ही ढाल वा तलवार||
कारण दोन्हीतही होणार कश्यावर तरी वार|||
त्यापेक्षा बनून जा म्यान |
समोरच्याला तुमच्यात सामावून घ्या छान||
कधीही देऊ नका एकमेकांना त्रास|
बना एकमेकांचं हृदय आणि एकमेकांचा श्वास||
समजून घ्या व्यवस्थित शब्द आणि काढू नका त्याचे वेगळे अर्थ|
तरच मिळेल जीवनाला आशा आणि उमजेल जगण्याचा अर्थ...||
संकेत मुनोत
8668975178