AddThis code

Sunday, July 31, 2022

महावीरांचे विचार #तत्वज्ञ आणि #विचारवंत म्हणून इतर समाजासमोर मांडण्याची गरज माझा यंदाच्या जैन जागृती मध्ये आलेला लेख

महावीरांचे विचार #तत्वज्ञ आणि #विचारवंत म्हणून इतर समाजासमोर मांडण्याची गरज
माझा यंदाच्या जैन जागृती मध्ये आलेला लेख

काही जैन मित्रांशी चर्चा करत होतो की त्यांना महावीरांबद्दल नेमकी काय - काय माहित आहे?"तर 14 स्वप्ने, कानात खिळे ठोकणे वगैरे कथा सोडल्या तर त्यांची बहुतेक मित्रांना माहित नव्हती.
सामजिक चळवळीतील मित्रांना, मान्यवरांना विचारले तर ते म्हणे गौतम #बुद्ध यांच्यासारखेच काही तरी तत्वज्ञान दिले महावीरांनी त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही.
#अनेकांतवाद आणि सध्याच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महावीरांच्या महत्वाच्या विचारांबद्दल लोकांना माहीत नाही हे पाहून आश्चर्य वाटले त्यामुळे हा लेख ...
गौतम बुद्धांच्या पूर्वी काही वर्षे महावीरांचा जन्म झाला .#महावीर कुठल्याही देवी-देवतेचा अवतार नव्हते ना महावीरांनी कधी कुठल्या चमत्कार वा अंधश्रद्धांचे समर्थन केले पण त्यांनी सामाजात चालत असलेल्या चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध, विषमते विरुद्ध ठामपणे भूमिका घेतली आणि समतेची शिकवण दिली..
सविस्तर सोबतच्या लेखात ..
कसा वाटला नक्की सांगा..❤️❤️






 
Comment, Share ,Follow and Subscribe.

Wednesday, July 27, 2022

मोरवाडी जेष्ठ नागरिक संघ येथे गांधीविचारांतून प्रेम प्रसार विषयावर व्याख्यान

नेहमी तरुणांसमोर बोलत असतो यावेळी जेष्ठ नागरिकांसमोर बोलण्याची संधी मिळाली खूप छान वाटले. ❤️❤️🌸
एवढ्या आज्जी आजोबांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले.
मला तसे आज्जी आजोबांचे प्रेम 8 वी पर्यंत च मिळाले. पप्पांकडचे आज्जी आजोबा मी पहिली दुसरीत असतानाच वारले असावेत त्यांच्याबद्दल एवढे आठवत नाही. पण आईचे आईवडील म्हणजे नाना-नानी यांच्याबद्दल बरेच आठवते. मी चौथीत असताना नाना वारले तर आठवीत असताना नानी. त्यातही नानांचा मी सर्वधिक लाडका त्यांना ७ मुली होत्या. आम्ही १७ नातवंडे त्यात मी सुट्टीला गेल्यावर नाना मलाच एकट्याला पेढा आणून गुपचूप खायला देत. कोणी पाहुणे आले की प्रश्न उत्तरे द्यायला माझे नाव घेत. सकाळीच उठून त्यांच्यासोबत मारुतीच्या आणि देवीच्या मंदिरात जाणे आणि तिथे साखर खाणे हा खूपच मस्त क्षण होता. मी पहिलीत असतानाच माझे मारुती स्तोत्र तोंडपाठ होते तर गावातील मारुती मंदिरात जेव्हा हरिपाठ चले तेव्हा म्हणे तर शंकरलालजींचा नातू म्हणत माझी ओळख होई आणि नाना मायेने डोक्यावरून हात फिरवत. लेकराला जप असा ठळक उल्लेख त्यांच्या आईला लीहलेल्या पत्रात असे. आज त्यांना माझे हे काम पाहून खूप आनंद झाला असता.
मा. माडगूळकर गुरुजी यांचे विशेष आभार की त्यांनी मला येथे व्याख्यानासाठी बोलवले. साने गुरुजी कथामाला आणि मोरवाडी जेष्ठ नागरीक संघ यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.
गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद कसा वाढवता येईल यावर गप्पा झाल्याच पण सोबत या आज्जी आजोबांच्या ही व्यथा समजून घेता आल्या.
त्यानिमित्त एवढे सांगू इच्छितो की त्यांनी तुमच्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात टाकू नका, प्रेमाने 2 शब्द बोलले तुम्ही तरी त्यांच्यासाठी ते खूप असते.❤️🌸
जेणेकरून आपण खरच योग्य बोलतोय का योग्य मार्गावर चाललोय का ते समजावे म्हणून व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या प्रतिक्रिया...यावेळी लाईव्ह घेतल्या - https://youtu.be/93zRHZ109ZM
तर #प्रेम पसरवत राहूया














संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.


'जयहिंद पत्रिका' या त्रैमासिकाचे पहिले प्रकाशन

*जगात ठिक-ठिकाणी स्वार्थ वाढत असताना आजही समाजाची थोडी का होईना प्रगती होत राहिली आहे त्याला कारण आहे चांगल्या लोकांची चिकाटी , निस्वार्थ भाव आणि लोक चळवळ.* ❤️🌹🌎
तर सदृढ समाज निर्मिती साठी कार्य करणाऱ्या अश्याच एका लोक चळवळचे पाहिले त्रैमासिक आपल्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
*या चळवळीने 15 गावे दत्तक घेतली असून रचनात्मक कार्य आणि वैचारिक काम दोन्ही स्तरांवर तिचे काम सुरू आहे.*
जयहिंद पत्रिका हे त्रैमासिक यंदा आपण सुरू केले आहे त्या कार्यक्रमाचे काही अंश...
संकेत मुनोत
प्रमुख समन्वयक
जयहिंद लोक चळवळ












Comment, Share ,Follow and Subscribe.
Knowing Gandhi Global Friends Pune😊 चे Get Together 23 july 2022 रोजी संध्याकाळी 5-7 वा. हॉटेल सेंट्रल पार्क, JM Road येथे संपन्न झाले...❤️❤️
यात निमंत्रण देण्यासाठी ग्रुप मधील एकाही व्यक्तीला वैयक्तिक फोन किंवा मेसेज केले नाही. Knowing Gandhi Pune WhatsApp ग्रुपमध्ये 2-3 दिवसांपूर्वी गोपाळदादा तिवारी यांच्या पुढाकाराने ही भेट ठरली होती.
ग्रुपमध्ये बघता-बघता या सर्व लोकांनी नावे दिली आणि सर्व स्वतः हून आले.
सध्या वाढत असलेला द्वेष, हिंसा , भेदभाव कमी करून गांधीविचारांच्या प्रचार, प्रसार, अंगीकार यांच्याद्वारे समाजात प्रेम कसे वाढवता येईल याबाबत थोडी आखणी झाली.

(मला माहित आहे की फोन का केला नाही किंवा बोलवले का नाही असेही काही स्नेही जणांना वाटले असेल पण ही अचानक ठरलेली सहज भेट होती.मी स्वतः लोणावळा येथून 5 दिवसाची कार्यशाळा पूर्ण करून काल रात्री घरी परतलो आणि आज संध्याकाळी इथे जॉईन झालो. समूहातील सक्रिय सदस्य जे २-३ दिवसातून एकदा तरी समूहातील मेसेजेस बघतात ते सर्व स्वतःहून जॉईन झाले होते कोणालाही वैयक्तिक फोन किंवा मेसेज केले नाहीत)

असे असले तरी सर्वांना वैयक्तिक फोन मेसेज करून एक मोठे स्नेहसंमेलन लवकरच ठरवू...😊❤️ही सहज भेट होती समूहातील मेसेज खरच वाचणाऱ्या आणि महत्वाचे वाटणाऱ्या सदस्यांची..

गोपळदादा बोलताना म्हणाले की ते इतर अनेक ग्रुप मधील मेसेज वाचत नाहीत पण knowing Gandhi ग्रुप मधील सर्व मेसेज २-३ दिवसातून एकदा का होईना वाचतातच आणि दादांसारख्या अनेक व्यक्ती आहेत हेच ग्रुपचे वैशिष्ट आहे.
यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील सदस्यांना विनंती आहे की आपण आपापल्या जिल्ह्यात अश्या भेटी घेऊन एकमेकांचा परिचय करत गांधीविचारतून रचनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्य सुरू करावे...

❤️गांधिविचारांना आजही मरण नाही..जात पात धर्म सगळी बंधने भेद सोडून तो लोकांना एकत्र आणतो आणि सेवा कार्या सोबतच निर्भयपणे ठाम भूमिका ही घ्यायला लावतो..❤️

तर चला खिशातला गांधी डोक्यात आणुया...

#राष्ट्रपिता #महात्मा #गांधी की जय

संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, July 14, 2022

मिहिरजी थत्ते ज्यांच्यामुळे लोकांचे बँकेतील कोट्यवधी रुपये परत मिळाले

पुण्यातील बंद पडलेल्या बँकातील  नागरिकांचे अडकलेले पैसे मिळावेत म्हणून पुणेकर नागरी समितीच्या  माध्यमातून सातत्याने प्रयत्न करणारे जेष्ठ कार्यकर्ते  मिहिर थत्ते यांची काही महिन्यांपूर्वी भेट झाली आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या ..
त्यांचे वडील यदुनाथ जी थत्ते यांचे विचारधन हे पुस्तक ही त्यांनी भेट दिले तर मी त्यांना माझे एक धैर्यशील योद्धा गांधी हे पुस्तक भेट दिले. 
आज रुपी बँक किंवा अन्य बँकातून लोकांना जे त्यांचे बुडालेले कोट्यवधी रुपये परत मिळत आहेत त्यातील मोठे श्रेय या माणसाला जाते.
गांधीजींच्या विचारातून असे ठिकठिकाणी निस्वार्थपणे कार्य करणारे, निर्भयपणे लढणारे लोक आहेत ज्यांच्यामुळे सामान्य माणसावर होणारा अन्याय दूर होउन त्याचे आयुष्य  अजून चांगले होत आहे.

संकेत मुनोत



Comment, Share ,Follow and Subscribe.