AddThis code

Saturday, June 24, 2023

'लुका छुप्पी' - मस्त रोमँटिक , कॉमेडी movie


'लुका छुप्पी' - मस्त रोमँटिक , कॉमेडी movie आज पाहिला..
रोहन शंकर यांनी लिहिलेली लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेली ही छान रोमँटिक कॉमेडी फिल्म काल पहिली..चित्रपट शेवटपर्यंत खूप हसवतो आणि शेवटी एक सामाजिक संदेश पण देऊन जातो.
कोका कोला तू, तू लौंग मैं इलाची, दुनिया अशी छान गाणी आहे
कार्तिक आर्यन, क्रिती सॅनन हे मुख्य भूमिकेत असून अपारशक्ती खुराना , पंकज त्रिपाठी , विनय पाठक आणि अलका अमीन यांच्याही भूमिका छान आहेत.
मथुरा आणि ग्वालियार मधील सुंदर परिसर यात छान चित्रित केला आहे. विष्णू त्रिवेदी (विनय पाठक) हा मथुरा शहरातील एक अयशस्वी राजकारणी असून संस्कृती रक्षक पार्टी चा अध्यक्ष आहे. निवडणूक जवळ आली की एखादा जातीय धार्मिक मुद्दा उचलायचा आणि लोकांना धर्मावरून भडकवून द्वेष निर्माण करून मते गोळा करणे हे त्याचे काम.
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली युवांनी एकमेकांवर प्रेम करू नये वगैरे गोष्टी यांचा पक्ष करत असतो. नाजिम खान हे एक सिने अभिनेता म्हणून fictional character घेतले आहे. ज्याचे लिव्ह इन मध्ये राहणे याला मुख्य निवडणुकीचा मुद्दा बनवून त्या विरूद्ध कारवाया करून यांची संस्कृती रक्षक पार्टी स्वतः ची दहशत निर्माण करते.
पण त्याची स्वतः ची मुलगी क्रिती सॅनन सुशिक्षित झाल्याने तिची मते आणि आचरण याहून अगदी विरूद्ध असते. तिचे आणि कार्तिक चे लग्न आणि त्याला सुरवातीला दोन्ही कुटुंबाकडून मिळालेला नकारात्मक , सकारात्मक प्रतिसाद या गोष्टी भरपूर हसवतात.
यात वेगवेगळ्या साधू , ग्रामीण वृध्द महिला यांची लिव्ह इन बद्दल मते घेतली जातात जी shocking आहेत.
शेवट अगदी गोड आहे..
सतत moral पोलिसिंग करणारा संस्कृती रक्षक पार्टीचा अध्यक्ष त्रिवेदी आपली मुलगी, जावई यांनाही या नादात मारायला कमी करणार नसतो पण त्याचा जावई कार्तिक आर्यन आणि मुलगी क्रिती त्याला सांगतात की युवकांचे मुख्य प्रश्न जाती धर्म नसून चांगले शिक्षण, चांगला रोजगार मिळणे , आणि मनासारखे जगता येणे हे आहेत. ज्याला तो सहमत होतो आणि स्वतः च्या पत्नीचा चेहरा झाकणारा घूंघट ( साडीचा पदर,) काढून आणि ज्यांचा त्याने विरोध केला त्याच नजीम खान ला त्याचा प्रचार करण्यासाठी बोलवून स्वतः त सुधारणा करतो...
हे गाणे मस्त गुणगुणत आहे...
बुलावे तुझे यार अज्ज मेरी गलियां
बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया
ना आयें कभी दोनों में ज़रा भी फासले
बस एक तू हो, एक मैं हूँ और कोई ना
खरतर बहुतेक जणांनी पाहिलाच असेल पण पाहिला नसल्यास नक्की पहा...
संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.

छोटीसी बात' - मस्त Romantic आणि Comedy चित्रपट


छोटीसी बात' नावाची फिल्म काल रात्री यूट्यूब वर पहिली. मस्त Romantic आणि Comedy चित्रपट आहे.
अभिनेते अमोल पालेकर यांच्याशी 7-8 वर्षापूर्वी एका फिल्म फेस्टिवल मध्ये एकदा धावती भेट झाली होती पण जास्त माहित नव्हते
सामजिक चळवळीत असताना त्यांचे नावही काही वेळा ऐकले होते. कदाचित मी पाहिलेली ही त्यांची पहिलीच फिल्म असेल.
या फिल्म चे वैशिष्ट्य हे वाटले की कुठेही हिरो ला शुरवीर, angry man वगैरे दाखवले नाही. अमोल पालेकर एक साधा सुधा नोकरदार मनुष्य रोज ज्या बस स्टॉप वर बस साठी थांबतो तेथेच प्रभा म्हणजे विद्या सिन्हा ही थांबत असते. मग तिथे आणि बस मध्ये चढताना एकमेकांशी संपर्क करण्याचा त्याने केलेला प्रयत्न आणि आलेले यश अपयश हे प्रसंग छान रंगवले आहेत. त्यात विद्या चे डोळे आणि smile अप्रतिम आहे. प्रत्यक्ष आयुष्यात अश्या साध्या सरळ आणि प्रामाणिक मनुष्याला एवढी सुंदर मुलगी स्वतः हून बोलेल असे वाटत नाही पण चित्रपटात तसे पाहून थोडे आश्चर्य वाटते.त्यात अभिनेता अशोक कुमार जो निवृत्त कर्नल च्या रोल मध्ये आहे तो स्वतः स्वतः च्या प्रेम मिळवू शकत नाही पण अरुण , प्रभा यांना प्रेम मिळवून द्यायला मदत करतो त्यांचाही रोल छान आहे.
हे त्यातील evergreen गाणे...
जानेमन-जानेमन तेरे दो नयन
चोरी-चोरी ले के गए देखो मेरा मन
जानेमन-जानेमन-जानेमन
मेरे दो नयन चोर नहीं सजन
तुम से ही खोया होगा कहीं तुम्हारा मन
जानेमन-जानेमन-जानेमन
नक्की पहा..
संकेत मुनोत ❤️❤️
Comment, Share ,Follow and Subscribe.

सन्मित्र अमोल सराफ, Great Bhet

अकोला येथील भेटी गाठी
सन्मित्र अमोल सराफ अनेक वर्षापासून बोलवत होते फायनली आज जाणे झाले.त्यांच्या घरी मुक्कामास होतो. त्यांच्याकडे जेवण एवढे आग्रह करून देत होते की माझे 5 किलो वजन नक्की वाढले असणार...
अमोल सरांच्या घरी त्यांच्या मातोश्री , वहिनी आणि 2 मुले संचित आणि मोक्षित यांच्याशी छान गप्पा झाल्या.
सरांचे वडील रिसोड येथे टेलर काम करत असत. 22 वर्षापूर्वी काकूंनी शेजारच्या मुलाला डॉक्टर चे prescription देऊन त्यात eye drop की काहीतरी आणायला पाठवले. मेडिकल वाल्याने चुकून drop च्या जागी D वाचून तो eye drop दिला. 2000 या वर्षी दिवाळी च्या दिवशी काम जास्त होते म्हणून काकूंनी तो ड्रॉप आणल्यावर स्वतःच डोळ्यात टाकला आणि त्यांच्या डोळ्यातील retina खराब झाला आणि त्यांची दृष्टी कायमची गेली. त्यानंतर ते त्या फार्मसिस्ट विरुद्ध लढले. तर मित्रांनो औषध घेताना काळजी घ्या आणि मेडिकल वाल्यांना नीट विचारून घ्या.
यात विशेष गोष्ट ही की माझी आणि अमोल जैन यांची ही पहिलीच भेट. अमोल सरांवर सावरकरांचा पूर्वी प्रचंड प्रभाव होता. त्यांनी त्यांच्या सुरवातीच्या शाळेत शिक्षक असताना सावरकरांचा मोठा फोटो भेट दिला होता जो आजही त्या शाळेत आहे. पण नंतर व्हॉट्सॲप वर कुठल्या तरी ग्रुप वर माझा सावरकर संदर्भातील लेख वाचला आणि फोन केला, सोबत चर्चा केल्यावर आणि Knowing Gandhism Global Friends चळवळीत आल्यावर सर बदलले आणि आता ठामपणे गांधीविचार आणि सत्य मांडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रबोधन त्यांनी स्वतः पुरते मर्यादित ठेवले नाही तर त्यांचे बंधू सचिन आणि अनेकांपर्यंत पोहचवून त्यांच्यात ही बदल घडवला. त्यांचे बंधू सचिन सर ही माझे चांगले मित्र आहेत.
हा वहिनींच्या कड्यावर बसलेला मोक्षीत बघा ...खूपच cute आणि dambish आहे.

Comment, Share ,Follow and Subscribe.

Amit Sarode , यवतमाळ - Great Bhet

आज सन्मित्र Amit Sarode , यवतमाळ यांचा वाढदिवस


जेष्ठ गांधीवादी बाळासाहेब सरोदे यांचा मुलगा आणि adv Asim Sarode यांचे ते लहान भाऊ.
सॉफ्टवेअर इंजिनिअर शिक्षण झाल्यावर भारतात आणि परदेशात नोकरी केली मग पुन्हा गांधी विचारांच्या ओढी मुळे भारतात परत आले. इथे शेती आणि शिक्षणातील विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात.
माझी आणि त्यांची ओळख पण interesting आहे. 8-10 वर्षापूर्वी बालगंधर्व हॉल मध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो तेथून बाहेर पडत होतो तेव्हा पार्किंग मध्ये Sandip Barve की कोणी तरी असीम सरोदे यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा असीम सरांनी अमित सरांचा संपर्क देऊन ते चूनिभाई वैद्य यांचे ' सूर्यसमोर काजवा हे पुस्तक सर्वांना pdf करून पाठवत असल्याचे सांगितले.
थोड्याच दिवसांनी मैत्री अजून घट्ट झाली ती चक्क adv असीम सरोदे यांच्या विरूद्ध एक भूमिका घेतल्यावर. नथुराम गोडसे या गांधीजींची बदनामी करणाऱ्या नाटक/ चित्रपट वर कोणी तरी पाटील म्हणून गृहस्थांनी बंदी आणन्याबद्दल वृत्त आले होते. असीम सरोदे आणि त्यांच्या सोबत काही वकिलांनी या बंदीला विरोध करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणत त्याला आवाहन देणार असल्याचे म्हटले. गांधीजी बद्दल खोटे विष पेरणारे , लोकांची माथी भडकवणारे नाटक बंद च असले पाहिजे असे माझे मत होते ज्याला Knowing Gandhi Global Friends मधील मित्रांनी साथ दिली. विशेष म्हणजे अमित सरोदे आणि सरांचे वडील बाळासाहेब सरोदे यांनी पण मला पाठिंबा दिला. त्यावेळी कोण योग्य कोण अयोग्य तो मुद्दा वेगळा पण ते आमच्यातील फक्त मतभेद होते मनभेद नाही. उलट सरांचे अनेकदा मार्गदर्शन मिळते बऱ्याच गोष्टीत. सोबतचा फोटो असीम सर युनो च्या बैठकीला गेल्यावर त्यांना जो heart attack चा त्रास झाला तेव्हा भेटण्यास गेल्याचा. तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब सरोदे सरांशी पण जवळपास 1 तास गप्पा झाल्या.
असो अमित सरोदे आज software engineer म्हणून नोकरी करतात सोबतच सामजिक काम पण मोठ्या प्रमाणात करतात. खादी घालतात आणि मला विदर्भात (नागपूर)व्याख्यानासाठी जायची पहिली संधी त्यांच्यामुळेच मिळाली म्हणजे यवतमाळ येथेही माझे व्याख्यान झाले पण नागपूर मध्ये राष्ट्रीय युवा संघटन मधून जे मित्र मैत्रीण मिळाले अणि जे शिकायला मिळाले ते अमूल्य आहे.
आपल्या गरजा मर्यादीत करून आपण कसे आनंदी जीवन जगू शकतो याचे अमित सर एक आदर्श उदाहरण आहेत.
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

एक दिवस तरी वारी अनुभवावी- गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर



देहूहून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत वारीत प्रत्यक्ष सहभागी होवून घेतलेली अनुभूती 'अभिव्यक्ती' च्या या विशेष एपिसोड मध्ये आली आहे.
सोबत जेष्ठ पत्रकार Ravindra Pokharkar , Vishal Vimal , राहुल लोंढे , मनोहर पाटील..
खालील लिंकवर क्लिक करून नक्की पहा..
Link -
https://youtu.be/DENxp_33YPk
Comment, Share ,Follow and Subscribe.

राहुल गांधी समज-गैरसमज



राहुल गांधी यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या बद्दलचे काही समज गैरसमज संदर्भा सहित पाहूया..
लहानपणापासून राहुल गांधी यांच्याबद्दल पप्पू वगैरे ऐकत होतो.कधी कधी मीही त्यांची चेष्टा उडवत असे .अजूनही सतत सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणारे साहित्य फिरत असते. विरोधक म्हणतात कि राहुल काही महत्वाचे नाहीत पप्पू आहे वगैरे . तर मग का सतत त्यांच्याबद्दल ते बोलत असतात ?त्यांच्या प्रत्येक भाषणाची मोडतोड करून अर्धवट साहित्य का पसरवले जाते ?असो गैरसमज आणि सत्य पाहूया
*१. राहुल गांधी यांचा "इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा" हे विधान -*
राहुल गांधी कसे चुकीचे वक्तव्य करतात हे दाखवण्यासाठी सतत त्यांचे हे विधान असलेला व्हिडिओ फिरवला जातो. पण तो व्हिडिओ अर्धवट असून पूर्ण व्हिडिओ वेगळा आहे . राहुल गांधी त्यात म्हटले आहेत की , "आलू के किसानों को कहा कि ऐसी मशीन लगाउंगा कि इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा. इस साइड से आलू डालो, उस साइड से सोना निकालो. इतना पैसा बनेगा कि आपको पता नहीं होगा कि क्या करना है पैसे का. *ये मेरे शब्द नहीं है, नरेंद्र मोदी जी के शब्द हैं."* " यातुन " "ये मेरे शब्द नहीं है, *नरेंद्र मोदी जी के शब्द हैं"* हे वाक्य काढून टाकले आहेत आणि अर्धवट व्हिडिओ सगळीकडे फॉरवर्ड केला जात आहे.
*2. राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी नसून फिरोज खान आहेत का ? अणि त्यामुळे राहुल मुस्लिम आहेत का ?-*
राहुल गांधी यांच्या आजोबांचे म्हणजे इंदिराजी गांधी यांच्या पतीचे नाव फिरोज गांधी होते आणि ते पारसी होते. पारसी धर्मातील नियमा प्रमाणे तुम्ही आंतरधर्मीय लग्न केले तरी तुमची पत्नी किंवा मुले त्या धर्माची होत नाहीत त्यांचा मुळ धर्म कायम राहतो त्यामुळे इंदिरा गांधी यांचा पित्याचा धर्म जो हिंदू होता तोच त्यांच्या मुलांना मिळाला. पारसी धर्माची लोकसंख्या सर्वाधिक कमी होण्याचे कारण पण हे एक आहे. भाजपा चे लोक राहुल गांधी बद्दल असे खोटे नाटे पसरवतात पण त्यांचेच चुलत भाऊ वरुण संजय गांधी हे भाजपा मध्ये असून त्यांच्यावर मात्र कधी अशी टीका होत नाही. विरोधाभास पण बघा . मुस्लिम लीगचे नेते जिन्ना हे नेहरूंना हिंदू धार्जिणा आणि काँग्रेसला हिंदूंचा पक्ष म्हणत विरोध करायचे आणि ब्रिटिशांना समर्थन करण्यासाठी जिन्ना यांच्यासोबाबत युती मात्र सावरकर आणि मुखर्जीच्या हिंदू महासभेने केली होती.
*3. राहुल गांधी यांचे अविवाहित असणे म्हणजे ते चरीत्रहीन असणे-*
विवाहित किंवा अविवाहित असणे ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक चॉईस असते पण म्हणून त्यांचे चरित्रहनन करणे योग्य नाही. भाजपा मध्ये ही असे अनेक नेते अविवाहित आहेत किंवा होते. जसे की अटल बिहारी वाजपेयी आणि अनेक जण. अटल बिहारी वाजपेयी यांनीही *'मी अविवाहित आहे पण ब्रम्हचारी नाही'* असे एका मुलाखतीत सांगितले आहे. नरेंद्र मोदी यांनीही स्वतः लग्न केले पण घटस्फोट न देता पत्नीला सोडून दिले शिवाय स्वतः विवाहित असून मुख्यमंत्री असण्याच्या वेळी ते लपवून ठेवले होते. पंतप्रधान होताना ते disclose झाले. राहुल गांधी असे खोटे बोलणारे तर नाहीत.
*4. राहुल गांधी यांचे शिक्षण -*
राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी राहुल गांधी यांना डेहरादून येथील दून स्कूलमध्ये पाठवण्यात आले. 1984 मध्ये झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणामुळे राहुल आणि प्रियांका यांना घरात राहूनच शिकावे लागले. हार्वर्ड विद्यापीठात जाण्यापूर्वी राहुल यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये पदवीपूर्व शिक्षणाची सुरुवात केली. त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षा धोक्यांमुळे राहुल यांची फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये बदली झाली. त्यांनी १९९४ मध्ये पदवी प्राप्त केली आणि पुढच्या वर्षी केंब्रिजमधून एम.फिल. मिळवली . त्यांच्याकडे कुठलीही खोटी पदवी नाही त्यांच्यासोबत शिकलेले वर्गमित्र आजही उपलब्ध आहेत . अमेरिका , इंग्लंड आणि विविध देशातील नामांकित संस्थांनी राहुल गांधी यांची भाषणे तेथे आयोजित केली असून तेथे संबोधित करताना राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या सारख्या teleprompter बघून वाचण्याची गरज पडली नाही.
*5. राहुल गांधी आणि महात्मा गांधी यांचे रक्ताचे नाते ?-*
राहुल गांधी आणि महात्मा गांधी यांचे रक्ताचे नाते नाही हे सत्यच आहे पण विचारांचे नाते मात्र आहे. राहुल गांधी महात्मा गांधींच्या सत्य , अहिंसा , प्रेम या तत्वांच्या वर आजही चालत आहेत. त्याबद्दल काही उदाहरणे पाहू. त्यांचे वडील राजीव गांधी यांचा ज्यांनी खून केला. तिला भेटण्यास प्रियांका गांधी गेल्या होत्या ज्यात ती गर्भवती असल्याचे समजले. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांची शिक्षा माफ व्हावी आणि त्या गुन्हेगार असल्या तरी त्यांच्या बाळाला आई वडील दोघांचे प्रेम मिळावे म्हणून कोर्टात अर्ज केला आणि तिची सुटका केली.आपल्या पित्याचा जो कोणी साधा सुधा मनुष्य नसून एक मोठा नेता आहे त्याचा खून करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बदला न घेता माफ करणे आणि त्याच्या मुलांचा विचार करणे ही गांधीविचारांचीच शिकवण आहे. त्यामुळे रक्ताचे नसले तरी राहुल गांधी हे महात्मा गांधीजींच्या विचारांचे वारसदार नक्कीच आहेत.
*6. राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी यांच्याबद्दल अपशब्द -*
राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या बद्दल भाजपा , मोदी आणि पक्षाच्या विविध नेत्यांच्या कडून सतत अपशब्द वापरले जातात जसे की बारबाला, काँग्रेसची विधवा आणि असे विविध शब्द पातळी सोडून वापरले जातात . आपल्याकडे एखादी सून जेव्हा एखाद्या घराची सून होते तेव्हा ती त्या घरची लक्ष्मी होते आणि ते घर तिचे होते. कमला हॅरिस आणि अनेक भारतीय महिला ज्या दुसऱ्या कुठल्या परदेशी वंशाच्या घरी सून म्ह्णून गेल्या आणि तिथे त्यांना मोठे पद मिळाले तर आपण अभिमानाने त्यांचे कौतुक करतो पण तेच इतर देशाची एखादी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आली आणि आपली झाली तर तिच्याबद्दल असा भेदभाव का ? त्या देशांनी जर आपल्या नागरिकांच्या सोबत असा व्यवहार केला तर आपल्याला कसे वाटेल ? राहुल गांधी यांनी स्वतः मोदींना किंवा त्यांच्या आई किंवा पत्नीला कधीही मोदींसारख्या गलिच्छ भाषेत संबोधले नाही .
आपल्या सासूचा आणि नवऱ्याचा मृत्यू बघितलेल्या सोनियांना राजकारणात यायची बिलकुल इच्छा नव्हती, पण तरीही देशात वाढता हिंसाचार आणि द्वेष पाहता लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांना यावे लागले.पण त्यांना ज्या प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केलं जातं त्यामुळे त्याबद्दल एका पत्रात त्यांनी त्या प्रश्नाचे दिलेले उत्तर
*सरकारे येतात जातात. तुम्हाला वाटतं का, आता या हरण्या-जिंकण्याचा माझ्यावर काही परिणाम होत असेल? तुमच्या शिव्या विदेशी म्हणून मारलेले टोमणे, बारबाला, जर्शी गाय, विधवा, स्मगलर, गुप्तहेर....या सगळ्याचे मला दुःख होतं? एखाद्या टीव्ही चैनल वर दिल्या जाणाऱ्या शिव्यांनी मला दुःख होतं?? ट्विटरवर आणि फेसबुकवर चालवल्या जाणाऱ्या घाणेरड्या ट्रेण्डवर मला दुःख होतं?? नाही हो मला दुःख होत नाही.परंतू या लोकांवर कीव जरूर येते!!*
*लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रेम केलं होतं.त्याचा मृतदेह पाहून दुःख होते पण त्यानंतर दुःख नाही होत. मन दगडाचे होऊन जाते. तूम्हाला माझ्यावर राग असेल माझा तिरस्कार करत असाल तर करा.मी आजच निघून जाईल, फक्त माझा राजीव मला परत द्या आणी जरका तुम्ही माझ्या राजीवला परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे राजीवच्या आजूबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊ द्या.या देशाच्या सुनेला एवढा हक्क तर मिळाला पाहिजे ना!*
*७.राहुल गांधी यांना राजकारणातले कळत नाही का ? किंवा ते चांगले नेते बनू शकत नाही का ? -*
हाही एक चुकीचा आरोप त्यांच्यावर केला जातो . राजकारणाबद्दल कळले नसते तर २००४ मध्ये त्यांनी जेव्हा पहिली निवडणूक अमेठी मधून लढवली तेव्हा सर्वाधिक मतांनी निवडून आले नसते. त्यांनी विचारलेले कुठलेही प्रश्न विरोधकांना घाबरवून सोडतात त्यामुळे ते महत्वाचे नाही- नाही म्हणत ही प्रत्येक विरोधकाला त्यांच्या वक्तव्याची दाखल घ्यावीच लागते. राहुल हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष असताना युवा काँग्रेसचे सदस्य २लाख हून २.५ दशलक्ष इतके वाढले होते . नुकतीच कर्नाटक मध्ये जी निवडणूक काँग्रेस ने जिंकली त्यात ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे मोठे योगदान होते. अश्या अनेक गोष्टी राजकीय कौशल्याबद्दल सांगता येतील .
*८ त्याग* -
आपल्या पणजोबा पासून त्यांच्या घरात जी त्यागाची आणि संघर्षांची परंपरा आहे ती राहुल गांधी यांनी कायम ठेवली आहे . मोतीलाल नेहरू हे देशातील खूप मोठे आणि श्रीमंत वकील होते पण गांधी विचारातून प्रभावित होऊन त्यांनी आपल्या मेहनतीने उभारलेले मोठे 42 खोल्यांचे भव्य असे स्वराज भवन 1920 मध्ये देशाला स्वातंत्र्य लढ्यासाठी दान केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरू यांची एकूण संपत्ती आनंद भवन सोडून 200 कोटी रुपये एवढी होती, त्यातील 98% म्हणजे 196 कोटी रुपये त्यांनी देशासाठी दान केले आणि स्वतः कडे फक्त 4 कोटी ठेवले. इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये भव्य असलेले आनंद भवन, त्यातील मौल्यवान वस्तू, दुर्मिळ फर्निचर हे सगळे एक ट्रस्ट बनवून देशाला दान केले. आत्ताच्या पिढीने ही वारसा सुरु ठेवला आहे. आत्ताच राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द करून त्यांना त्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले पण त्यांनी त्यावर कुठला तमाशा केला नाही .
सरदार पटेल यांनी याबद्दल नेहरू घराण्याचे कौतुक केले होते पटेल म्हणतात - भारत के स्वतंत्रता संग्राम में किसी भी व्यक्ति ने नेहरू से अधिक बलिदान नहीं दिया है और भारतीय स्वतंत्रता के लिए नेहरू के परिवार के रूप में किसी भी परिवार ने सबसे ज्यादा कष्ट नहीं उठाया है.
उन्होंने आगे लिखा था – मोतीलाल नेहरू ने अपनी आजीविका छोड़ दी, अपनी शानदार हवेली को स्वतंत्रता आंदोलन के सिपाहियों को सौंप दिया. और खुद एक छोटे से घर में चले गए.
*९. हिम्मत आणि धैर्य -*
राहुल गांधी १४ वर्षाचे असताना त्यांची लाड करणारी आज्जी इंदिरा गांधी यांचा गोळ्या घालून खून झाला. ते २१ वर्षाचे असताना वडील राजीव गांधी यांना बॉम्ब ने उडवले गेले .आईला सतत बारबाला , विधवा आणि उलटे सुलटे बोलले जाते .सतत वेगवेगळे जाती धर्म इ. लावून शिव्या दिल्या जातात . एखाद्याने हे सगळे पाहून राजकारणातून निवृत्ती घेऊन ऐषोरामात जीवन जगले असते . पण देश एकसंध करण्यासाठी , देशातील प्रेम वाढवण्यासाठी ते आजही लढत आहेत त्या हिम्मत आणि धैर्याला दाद द्यावी तेवढी कमी आहे .
*१०. द्वेष विरुद्ध प्रेम . बदला नाही बदल, हिंसा नाही अहिंसा -*
समोरचा विरोधक सतत द्वेष पसरवत असताना , सुडाची भाषा करत असताना राहुल गांधी कधीही मला भाजपमुक्त भारत करायचा आहे किंवा इतर काही खालच्या पातळीवरची टीका करत नाहीत . महात्मा गांधींच्या विचारांतून आलेला सुसंस्कृतपणा त्यांनी आजही तसाच टिकवून ठेवला आहे.
*११. फिटनेस -*
राहुल हे स्वतः एक खेळाडू असून त्यांनी जपान मार्शल आर्ट अकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवले आहे. राहुल गांधी नेमबाजही आहेत. त्यानी स्पोर्ट्स कोट्यातून सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी कधीही मला ५६ इंची छाती असल्याचा किंवा मी बलवान असल्याचा दावा केला नाही पण मच्छिमार जेव्हा पाण्यात जाळं फेकण्यासाठी जात होते तेव्हा राहुल गांधी यांना राहवलं नाही. त्यांनीही सोबतच उडी मारली समुद्राच्या पाण्यात पोहून बाहेर आल्यावर राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले ज्यात राहुल गांधींचे पॅक अब्स दिसत आहेत .
*१२. निर्भयता -*
त्यांचे विरोधक स्वतः ला शूरवीर , निर्भय असल्याच्या बाता मारतात पण मला कोणतरी मारण्याचा प्रयत्न करेल या भीतीने स्वतःकडे देशातील सर्वोच्च सुरक्षा असूनही मागे पाल काढतात . पत्रकारांच्या प्रश्नाच्या भीतीमुळे आत्तापर्यत एकही पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत नरेंद्र मोदी यांची झाली नाही . तेच राहुल गांधी यांनी सत्तेत असताना आणि नसताना ही अनेक पत्रकार परिषद घेतल्या आणि प्रश्नांना निडरपणे सामोरे गेले . भारत जोडो यात्रेत ही ते निर्भयपणे वावरताना दिसत होते .
*१३. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांचे नागरिकत्व -*
सोनिया गांधी या जेव्हा राजीव गांधी यांची पत्नी आणि इंदिरा गांधी यांची सून बनून भारतात आल्या तेव्हाच त्या भारतीय नागरिक झाल्या . राजीव गांधी यांची दोन्ही मुले राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याकडे हे भारतीय नाहीत हे म्हणणेच मोठा विनोद आहे.
*१४. पंतप्रधान ला पर्याय ?*
जर्मनी राष्ट्राला हिटलरशिवाय दुसरा कुठलाच पर्यायच नाही असे पसरवले जायचे तीच थेरी मोदीभक्तांकडून भारतात पसरवली जाते . अशी थेअरी पसरवत हिटलर सोबत पूर्ण जर्मनी राष्ट्र उध्वस्त झाले. आज त्या जर्मनीत त्याचे नावही घेतले जात नाही . नेहरूंचे निधन झाले तेव्हा भारतालाच नव्हे तर जगाला प्रश्न पडला होता कि भारताचे काय होणार ? पण लाल बहादूर शास्त्री आले त्यांनी सक्षमपणे देश पुढे नेला त्यांचे अचानक निधन झाल्यावर इंदिरा गांधी आल्या तर त्यांना गुंगी गुडिया म्हटले जाऊ लागले पण त्यांनी ही सक्षम पणे देश पुढे नेला . राजीव गांधी ना ही आल्यावर हा पायलट काय देश चालवणार असे म्हटले गेले पण डिजिटल क्रांती आणि अनेक मोठ्या गोष्टी करून देशाचा विकास केला तेच अटलजी आणि मनमोहन सिंग बद्दल ही सांगता येईल हे सगळे अनपेक्षितपणे झालेले पंतप्रधान होते . त्यामुळे xyz ला पर्याय नाही हे वाक्यच मुळी ढोंगीपणाचे आहे.
आपल्याला राहुल गांधी यांचे भक्त व्हायचे नाही पण एक सच्चा, प्रामाणिक आणि संवेदनशील नेता म्हणून आपण त्यांना साथ दिली तर ते नक्कीच चांगला बदल घडवतील असे वाटते.
असो हे सगळे असले तरी मला राहुल गांधी यांच्या काही गोष्टी आवडत नाहीत . विरोधकांच्याकडे कुठला मोठा महामानव नाही ज्याचे पूर्ण देशात आणि जगात मोठे योगदान आहे त्याचे अनुयायी आहेत तरी ते सावरकर, हेडगेवार , गोळवलकर सारख्या संकुचित विचारांच्या त्यांच्या जुन्या नेत्यांना मोठया प्रमाणात जनमानसात पोहोचवतात .
इकडे महात्मा गांधी यांच्यासारखा एवढा मोठा नेता ज्याला जग मानते असे असताना त्या महामानवाचे विचार प्रसार करण्यासाठी वेगवगेळ्या शाळा , कॉलेजेस आणि स्पर्धा , चित्रपट , प्रबोधनपर व्याख्याने , शिबिरे इ. का घेतली जात नाहीत. मी ११वी -१२वी त असताना आमच्या कॉलेजमध्ये आसाराम बापू कि कुणा एक बाबाचे लोक आले होते त्यांनी सनातन संस्कृती वगैरे ची पुस्तके वाटून आमची त्यावर स्पर्धा घेतली .
स्पर्धा घेण्यापूर्वी त्यांनी आम्हाला पूर्ण dictionary पाठ असलेल्या एका माणसाचा विडिओ दाखवला ज्यात तो सांगायचं कि त्याला या बाबांच्या मुळे कि कशामुळे ही शक्ती मिळाली . ते तर खोटे होते पण महात्मा गांधी तर खरेच जगभर प्रभावी आहेत . आजही देशात आणि जगात त्यांना मानणारे लोक आहेत ज्यांनी त्या त्या क्षेत्रात आणि परिसरात मोठा बदल घडवला आहे .हे झाले तर देश एकसंध व्हायला , देशात प्रेम आणि संवाद वाढायला मदत होईल.
*असो आपणही त्यांना साथ देऊया ... मानले कि द्वेष , हिंसा यांचा अंधःकार खूप आहे पण एक छोटीशी पणती अंधःकाराला नाहीसे करायला पुरेशी असते* . अश्या छोट्या छोट्या पणत्या बनून आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया. ❤❤
संदर्भ -
१. - राहुल का आलू पर वायरल बयान, आख़िर कहा क्या?
बीबीसी हिंदी, 15 नवंबर 2017
२. CONVERSION TO ZOROASTRIANISM - pyracantha website
3. photos of Indira and Feroze Gandhi marriege by Hindu Way
4. A forgotten patriot: Feroze Gandhi made a mark in politics at a comparatively young age.. The Hindu, 20 October 2002.
5. Biographical Sketch of Second Lok Sabha". Parliament of India. Archived from the original on 18 May 2006. Retrieved 16 April 2009.
6.Lyon, Peter (2008) Conflict Between India and Pakistan: An Encyclopedia. Santa Barbara: ABC-CLIO. p. 64. ISBN 978-1576077122. "Feroze Gandhi was no relation of Mahatma Gandhi."
7. Gupte, Pranay (2012-02-15). Mother India: A Political Biography of Indira Gandhi. Penguin Books India. pp. 189–205. ISBN 9780143068266.
8. Shashi Bhushan, M.P. (1977). Feroze Gandhy: A political Biography. Progressive People's Sector Publications, New Delhi.pp.166, 179. See these excerpts
9.Varun is the grandson of Indira Gandhi first, then a BJP leader -
The Sunday Guardian Live
10. Maneka, Varun Gandhi join BJP , February 16, 2004 17:20 IST - rediff news
11. अटल जी और राजकुमारी : वो रिश्ता जिसका कोई नाम न था - Bhaskar HindiUpdate: 2017-12-24 11:44 GMT
12. जब वाजपेयी ने कहा था- मैं अविवाहित पर कुंआरा नहीं हूं - आज तक, 17 अगस्त 2018,
अपडेटेड 8:00 AM IST
13. Why did Narendra Modi keep his wife secret for almost 50 years? Washington Post, By Adam Taylor, April 10, 2014 at 11:42 a.m. EDT
14. Modi’s wife – the secret is out
February 1, 2014, 6:14 PM IST Sanjeev Ahluwalia in Opinion India, India, TOI
15.Rahul Gandhi Education: कितना पढ़े-लिखे हैं राहुल गांधी? इन नामी संस्थानों से की है पढ़ाई
Rahul Gandhi: राहुल गांधी ने फ्लोरिडा के Rollins College से ग्रेजुएशन किया है। - जनसत्ता - Written by न्यूज डेस्क, Edited by Vivek Awasthi
नई दिल्ली, June 19, 2023 21:12
16. Images of Hollywood actresses used to target Sonia Gandhi with sexist comments - Alt News - 9TH DECEMBER 2020 / 8:28 PM
17. Italian nationality law did not permit dual nationality until 1992. So, by acquiring Indian citizenship on 30 April 1983, she would automatically have lost Italian citizenship. -
18. Sonia Gandhi Biography: Early Life, Education, Political Career, Net Worth, Recognition & More - jagaran Josh , DEC 15, 2022 11:44 IST
19.BJP wants us to see Indian Sonia Gandhi as Italian but Canadian Akshay Kumar as Indian - The print - JYOTI YADAV
25 April, 2020 02:21 pm IST
20. Supreme Court Affirms Sonia Gandhi Is Citizen
L.A. TIMES ARCHIVES
SEPT. 13, 2001 12 AM PT
21. Rahul Gandhi's political journey - NDTV , February 20, 2014 3:46 pm
22.What was the impact of Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra
TIMES OF INDIA Updated: May 13, 2023, 18:19 IST
23.
Who is afraid of Rahul Gandhi - Dushyant Arora, The Wire, 24 Mar 2023,
24. जवाहरलाल नेहरू ने अपनी 196 करोड़ रुपए की संपत्ति कर दी थी देश के नाम - पत्रिका, November 14, 2019 11:20:47 am
25. Black belt in Aikido Rahul Gandhi shows off his martial art moves - TIMES OF INDIA Updated: Nov 1, 2017, 13:29 IST
26. Mute Modi: Why Is the PM Terrified of Holding Even a Single Press Conference? - Swati Chaturvedi
Jan 04, 2018
27. Modi is first PM who has never held press conference as he ‘cannot answer questions’: - Indian Express Web Desk
Updated: November 19, 2017 16:56 IST
28. सोनिया गांधी , पत्रे, रणजित देसाई
राहुल गांधी यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन ...
संकेत मुनोत
8668975178
लेख आवडल्यास शेअर करावा

Friday, June 23, 2023

Max Women News पोर्टल वर प्रकाशित झालेला माझा दर्शना पवार या mpsc टॉपर मुलीच्या खुनाबद्दलचा लेख..

दर्शना पवार या mpsc टॉपर मुलीच्या खुनाबद्दल सध्या भरपूर चर्चा सुरू आहे. तिला तिच्या मित्राने लग्नासाठी मागणी घातली पण तिने लग्नाला नकार दिला त्यावरून चिडून त्याने तिचा खून केला त्याबद्दल च्या बातमी वर भरपूर विचित्र comments पाहिल्या
त्याला जाळून टाका, चौकात फाशी द्या , तुकडे करा वगैरे लोक कमेंट मध्ये बोलत आहेत. सोबत मुलीला पण काही जण शिव्या देत आहेत की तिने त्याच्याशी मैत्री केलीच का? वगैरे?
समजा अशीच एका मुलीने मुलाची हत्या केली असती तर मुलाबद्दल पण आपण असेच बोललो असतो का की त्याने तिच्या सोबत मैत्री करायला च नको होती किंवा फिरायला जायला नको होते म्हणून?
या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया मला चुकीच्या वाटतात.
दर्शना ने ट्रेकिंग ला जाणे चुकीचे नव्हते, राहुल ने तिला लग्नाबद्दल विचारणे चुकीचे नव्हते आणि तिने लग्नाला नकार देणे हेही चुकीचे नव्हते. चुकीचे काय होते तर त्याला नकार मिळाल्यावर त्याने तिचा खून करणे. जरी ती ट्रेकिंग ला गेली नसती तरी खून करण्याचा दुसरा मार्ग त्याने शोधलाच असता. Acid attack , खून आणि इतर गोष्टी आपण पाहतच असतो.
शिवाय मैत्री करणे, ट्रेकिंग ला जाणे, लग्नासाठी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा विचार करणे किंवा तशी व्यक्ती आसपास शोधणे हेही चुकीचे नाही. चुकीचे आहे त्यात अपयश आल्यावर स्वतः चा किंवा समोरच्या व्यक्तीचा जीव घेणे..
खून करताना त्यालाही कल्पना असेलच की त्याला मोठी शिक्षा होऊ शकते , प्राण जाऊ शकतात पण तरी असे कृत्य त्याने केले कारण मनातील राग. हा राग कसा व्यक्त करायचा? हे शिकायला हवे. टोकाचा राग आल्यावर तो व्यक्त करताना अनेक जण हिंसेवर उतरतात त्यात एकतर समोरच्याचा जीव घेतात किंवा स्वतः चा जीव देतात.
पण त्या रागावर तात्पुरता ताबा कसा मिळवता येईल, दुसरीकडे कसे लक्ष केंद्रित करता येईल? याकडे लक्ष द्यायला हवे. शाळा ,कॉलेज आणि इतर ठिकाणी बालपणापासून याबद्दल प्रशिक्षण द्यायला हवे.
स्वतः ची किंवा समोरच्याची हत्या करणे हा पर्याय नाही हे पटवून देता आले पाहिजे.
आपल्या दैंनदिन जीवनातील साध्या कॉमन शिव्या जरी पाहिल्या तरी "माझ्याशी गद्दारी केली तर जाळून टाकेन, तुकडे-तुकडे करेन, इथेच पुरेन, उभा चिरेन" वगैरे म्हटले जाते जे रागात कधी-कधी आचरणातही आणले जाते. त्यामुळे विचारांची बैठक आणि मानसिकता बदलणे सुरू केले पाहिजे. याबद्दल विवेकी विचार पद्धती आचरणात आणायला हवी.
याबाबत जगाला REBT म्हणजे Rational Emotive Behavior Therapy शिकवणारे अल्बर्ट एलिस या जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाकडून बरेच शिकण्यासारखे आहे. त्यांना लहानपणापासूनच किडनी चा आजार असल्याने ते दवाखान्यात जास्त असत. शिवाय आई वडिलांचे तेवढे प्रेम त्यांना मिळाले नाही आणि तरुण वयात प्रेमभंगाचे पण अनेक प्रसंग आले पण अश्या अतिशय दुःखद प्रसंगातही विवेकी विचारसरणीचा अवलंब करून त्यांनी स्वतःला आणि समुपदेशन करून मानसिक तणावात असणाऱ्या अनेकांना त्यांनी यातून बाहेर काढले आणि जीवनाला नवी दिशा दिली. उदाहरणार्थ . त्यांची साखरपुडा झाला आणि मित्रांनी हॉटेल बुक केले आणि ते एकत्र येणार त्यापूर्वीच त्यांची होणारी पत्नी संध्याकाळी हॉटेल मधून त्यांना सोडून तिच्या पित्याकडे निघून गेली. अल्बर्ट एलिस यांनी भविष्यासाठी रंगवलेली सगळी स्वप्ने तुटली, खूप दुःख झाले पण त्यांनी विवेकी विचारसरणीने त्यावर ताबा मिळवला असे अनेक प्रसंग त्यांच्या 'मी अल्बर्ट एलिस ' या पुस्तकात आहेत तशी विवेकी विचारसरणी आपण विकसित करायला हवी.
याबाबत आपल्याच भूमीत जन्मलेले गांधी, बुध्द आणि महावीर पण वाचायला हवेत. त्यातूनही याबद्दल उत्तरे मिळतील.
गांधींना आफ्रिकेत स्वतः जवळ first-class चे तिकीट असताना आणि ते एवढे मोठे बॅरिस्टर असताना ट्रेन मधून बाहेर फेकले गेले तेवढ्यावरच न थांबता ते आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांना टांगे वाल्याने शिव्या देत चाबकाने खूप मारले, एकदा तर लोकांनी एवढे मारले की ते मृत्यू होता होता वाचले असे अनेक हल्ले त्यांच्यावर तेथे वर्णभेदातून झाले. अश्या वेळी ते तडकाफडकी तेथील लोकांना एकत्र करून ते जाळपोळ करू शकले असते, ज्यांनी त्यांच्या सोबत हे केले त्या व्यक्तींचा खून करू शकले असते किंवा अपमान झाला म्हणून एखादी मोठी चिठ्ठी लिहून स्वतः आत्महत्या करू शकले असते पण असली कुठलीही हिंसक कृती न करता त्यांनी स्वतः च्या रागावर ताबा मिळवून मुळ कारणांचा शोध घेतला आणि अहिंसक लोकचळवळ उभारून वर्णभेदावर मात केली.
बाकी दर्शनाच्या खुन्याला कडक शिक्षा झाली पाहिजे वगैरे मान्यच आहे ती व्हायलाच हवी पण त्यातून लगेच हे चित्र बदलणार नाही. हे बदलण्यासाठी मानसिकता आणि वैचारिक बैठक यावर काम करायला हवे.
असे काही झाले की काही लोक लगेच मुलींवर बंधने घालू लागतात. तिने बाहेर जाऊन शिक्षण घेऊ नये, कुणाशी मैत्री करू नये, स्वतः चा चेहरा झाकून ठेवावा वगैरे गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात . चुकी त्या विकृत मुलाची आणि बंधने तिला का? बदलायचीच असेल तर त्याची हिंसक विचारसरणी बदला आणि त्याची सुरुवात स्वतः च्या घरातील मुलापासून करा. काही महिलांना हिंसक रागीट पुरुषच जास्त भारी वाटतात , सध्या तर काही मुली सुद्धा हिंसक विचारसरणी कडे वळत आहेत आणि आपल्या प्रियकराचा, नवऱ्याचा आणि इतरांचा त्यांनी खून केल्याचे आपण ऐकत असतो ही चुकीची वाटचाल आहे.
तर अहिंसक , विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया ❤️❤️
संकेत मुनोत
8668975178
Comment, Share ,Follow and Subscribe.

Max Women News पोर्टल वर प्रकाशित लेखाची लिंक - https://www.maxwoman.in/maxwoman-blog/currently-there-is-a-lot-of-discussion-about-the-m-u-r-d-e-r-of-mpsc-topper-girl-darshana-pawar-1227775