Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
AddThis code
Tuesday, May 31, 2022
जेष्ठ गांधीवादी वसंतरावजी बोंबटकर नहीं रहे उनका अल्प परिचय
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Tuesday, May 24, 2022
सर्वधर्म परिषदेत संकेत मुनोत यांनी केलेली जैन धर्माबद्दल ची मांडणी- जैन जगृती मे २०२२ मध्ये प्रकाशित लेख
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Friday, May 20, 2022
*देशाचे अतोनात #नुकसान करणारे #पंतप्रधान राजीवजी*
मला ते न आवडण्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली #विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती.
इंदिराजींच्या निधनानंतर अत्यंत विपरीत स्थितीत पंतप्रधान पदाची सूत्रे हाती येताच, #राजीव_गांधी यांनी सरकारचा पैसा जाहिराती करण्यासाठी द्यायचा सोडून तो देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी व त्यांच्या आधुनिकीकरणासाठी वळवला
पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर होणारा विरोध नाकारुन त्यांनी भारतात *संगणक आणि टेलिकॉम युग* आणले खरतर इंटरनेटचा शोध हा भारताने महाभारताच्या काळातच लावला हे त्त्यांनी त्यावेळी सांगायला हवे होते पण विज्ञानाची दुर्बुद्धी...
या क्रांतीमुळे आज भारतातील लाखो तरुण भारतात आणि भारताबाहेर आय टी क्षेत्रात कार्य करतात ज्यामुळे ते अमीत शाहजी म्हणतात तसे हे तरुण भजी विकण्याचा मोठा व्यवसाय किंवा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणतात तसे पान टपरी अथवा गोमूत्र विक्रीचा व्यवसाय करण्यापासून मुकले आणि आपण चविष्ट खाद्यपासून मुकलो.
त्यांच्याच काळात 1985-1997 या कालखंडात *देशाचे औद्योगिक उत्पादन 125 टक्के वाढल्यामुळे* सोबतच लोकांना रोजगार ही मिळाल्यामुळे घरी बसणारी तरुणाई कमी होऊन देशाचे अतोनात नुकसान झाले.
दुसरे मोठे नुकसान म्हणजे *मतदानाचा हक्क वय २१ वर्षे वयावरून १८ वर्षे करणे* ज्यामुळे या युवांना मतदानाचा हक्क मिळाला .
*ग्रामीण भागातील मुलांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी नवोदय विद्यालय, गावांसाठी पंचायत राज , C-DOT, Operation Blackboard, Indira Gandhi National Open University (IGNOU), परदेशात भारताचे स्थान अधिक उंचीवर नेणे* अशी अनेक चुकीची कामे त्यांनी केली
असो राजीवजींना थोडी तरी दूर दृष्टी असती तर त्यांनी *जागोजागी आपले फ्लेक्स लावले असते*, वैमानिक होऊन विमान चालवण्याऐवजी पुष्पक विमानाचा शोध भारताने कसा लावलाय याचे समर्थन केले असते,
परदेशात जाऊन सॅम पित्रोदा सारख्या शास्त्रज्ञांना भारतात परत आणून टेलिकॉम क्रांती करण्याऐवजी आसाराम बापू आदींचे सत्संग केले असते
तिकडे जाऊन भारताचे आतंरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याऐवजी सारखे सारखे जाऊन त्यांच्या पंतप्रधनांना जादूकी झप्पी देत देशात मोठं-मोठी भाषणे झाडली असती
लोकांचे मुळ प्रश्न अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शिक्षण, व्यापार वृध्दी, आरोग्यव्यवस्था हे सोडून गावांची नावे बदलणे, देशात महागाई करत टॅक्स भरमसाठ वाढवून सामान्य माणसांचे जगणे अवघड करणे इ गोष्टी केल्या असत्या
पाकिस्तान सरकारची नाराजी झुगारून बलुचिस्तानात जाऊन सरहद्द गांधी खान अब्दूल गफारखान यांची भेट घेण्याऐवजी शत्रू राष्ट्राला शिव्या देत त्यांच्या राष्ट्रात जाऊन अचानक केक कापून बिर्याणी खाल्ली असती,
जो कोणी त्यांच्यावर टीका करेल प्रश्न विचारेल त्याला देशद्रोही, गद्दार ठरवण्यासाठी ट्रोल ची टीम तयार केली असती
*पण नसते एखाद्याला #दूरदृष्टी*
जाऊ द्या आज त्यांनीच आणलेल्या #तंत्रज्ञान युगात त्याच संगणकाद्वारे त्यांच्याविषयी खोटे-नाटे पसरवून आपण त्यांना चांगलाच धडा शिकवत आहोत
संकेत मुनोत
२२ मे २०१८
#RajivGandhi #RememberingRajivGandhi
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Saturday, May 14, 2022
प्रत्यक्ष मॅच पाहणे - छान अनुभव
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist









