दीपावली स्नेहभेट सोहळ्यासाठी काल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण मिळाले. दिवाळी फराळ, नाश्ता आणि त्यानंतर 2 प्रमुख अतिथी चे मार्गदर्शन असा कार्यक्रम होता.
निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांना बऱ्याच दिवसापासून भेटायची इच्छा होती पण असे सोबत व्यासपीठ शेयर करता येईल असे वाटले नव्हते.
आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असे PCMC ( Pimpri chinchwad Municipal corporation ) बद्दल ऐकून आहे. इकडचे रस्ते आणि इतर अनेक गोष्टी अनुकरण करण्यासारख्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहराशी माझे जवळचे नाते आहे. तसे माझं बालपण वगैरे सगळे पुण्यात गेले असले तरी माझे बी फार्मसी इथे निगडीत झाले त्यानंतर तळवडे IT park आणि pune IT park मध्ये जी नोकरी केली तेही याच हद्दीत येतात आणि माझ्या LIC चे हेड ऑफिस पण PCMC मध्येच येते. सध्या PF वरील name correction निमित्त ज्या PF office मध्ये हेलपाटे मारावे लागले तेही आकुर्डी म्हणजे PCMC मध्येच होते. यापूर्वी बी आर माडगूळकर काकांनी मोरवाडी जेष्ठ नागरिक संघातर्फे 2021 आणि 2022 मध्ये 2 व्याख्याने घेतली आणि हे तिसरे.
कामगार नेते आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष कैलास कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मा. नरेंद्र बनसोडे यांच्यामुळे हे शक्य झाले. पुण्यातील Knowing Gandhi Global Friends च्या बहुतेक सर्व उपक्रमांना ते वेळोवेळी उपस्थित राहून चांगले योगदान देत असतात.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांशी छान संवाद झाला.
यात एक गोष्ट मोठी ही झाली की प्रेक्षकांच्या मध्ये सन्मित्र चैतन्य सावळे पण बसले होते. ते पूर्वी कट्टर भक्त , गांधीविरोधक आणि हिंसेचे समर्थक होते. पण माझा लोकमत मधील लेख वाचून ते बदलले आणि आज ते खूप चांगल्या प्रकारे facts मांडत असतात मी तर म्हणेल ते माझ्या पेक्षाही ते अधिक सक्रिय असतात.
गांधी, बोस आणि भगतसिंग यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होते स्वातंत्र्य आणि तेही सर्व समावेशक स्वातंत्र्य. तिघांनी हिंदुराष्ट्र, इस्लामिक राष्ट्र किंवा अश्या प्रकारच्या धर्मावर आधारित कल्पनेला तीव्र विरोध केला. आज देश जात, धर्म, वर्ग यात वाटला जात असताना गांधी विचारच आहे जो सर्वांना भेद विसरून एकत्र आणू शकतो.
माझ्या व्याख्यानाच्या शेवटी नेहमीप्रमाणे इथेही सर्वांकडून पंचसूत्रीचा संकल्प घेतला.
1. कुठले व्यसन करणार नाही
2. कुणाला नात्यात फसवणार नाही
3.जात, धर्म, वर्ग,रंग , लिंग, उंची यावरून भेदभाव करणार नाही.
4.हिंसक दंगलीत सहभागी होणार नाही
5.सत्यता पडताळल्या शिवाय कुठलाही मेसेज पुढे सांगणार नाही फॉरवर्ड करणार नाही अशी शपथ शेवटी सर्वांना दिली.
यात शेवटी हे पण सांगितले की फक्त छान छान म्हणून चालत नाही तर आपण एकमेकांना नोकरी, व्यवसाय ई. मध्ये मदत ही केली पाहिजे. कारण चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पण कुटुंब असते आणि आपण त्याला व्यवसाय नोकरी याबाबत मदत केली तर तो किंवा ती ते काम अधिक जोमाने करू शकेल. याबाबत संघाकडून गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. माझा मित्र निलेश शिंगे याचा एक मित्र सॉफ्टवेअर इंजिनीयर होता त्याने मध्यंतरी ब्रेक घेऊन 3 वर्षे संघ प्रचारक झाला तर त्याच्या अर्थार्जनाची पूर्ण जबाबदारी संघाने घेतलीच शिवाय जेव्हा त्याला 3 वर्षानंतर पुन्हा स्वतःचे फील्ड जॉईन करायचे होते तर ओळखीतून IT कंपनीत चांगल्या पदावर नोकरी ही लावून दिली. अजून एक उदाहरण व्यवसायाचे. आमच्या एका समविचारी संघटने च्या मीटिंग ला 2 तरुण मित्र यायचे जे घरातील वस्तू repair करण्याचे काम करायचे. त्यांना तिथे व्यवसाय मिळू शकला नाही पण काही महिन्यांनी तिकडे जॉईन झाले आणि त्यांना तिथे महिन्याला किमान 15-20 घरातील कार्य मिळाले. गांधींनी पण मुख्य गोष्ट हीच केली होती खादी आणि वेगवेगळे ग्रामोद्योग यातून त्यांनी देशातील लाखो लोकांच्या रोजगाराची सोय केली होती. तर आपण पूर्ण वेळ जरी यात येऊ शकला नाहीत तरी चालेल पण जे यात पुढे होऊन कार्य करत आहेत त्यांना या प्रकारे सेवेची संधी द्या. लोक पूर्वी ब्रिटिशांच्या कडून कापड घ्यायचे ते बंद करून ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून खादी घेऊ लागले त्यामुळे ते अधिक जोमाने काम करू शकले. आज खादी नसली तरी इतर सेवा आहेत त्यात त्यांना प्राथमिकता द्या. उदाहरणार्थ आपल्या पैकी कुणाला स्टेशनरी ची गरज तर *** या कार्यकर्त्याला प्राथमिकता द्या. आपले किंवा आपल्या मित्र परिवारातील कोणाचेही आर्थिक नियोजन करण्यासाठी , पॉलिसी काढण्यासाठी मला सेवेची संधी द्या आपली सेवा देशभर आहे. Child education plan, जीवनसाथी प्लॅन, कन्यादान, पेन्शन किंवा retirement plan, health insurance, life insurance, term insurance याबाबत कुठलेही कार्य असल्यास मला आपल्या सेवेची संधी द्या. आपले नाव माझ्या client च्या यादीत add होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असेल. प्रामाणिक सल्ला आणि उत्तम सेवा हे आपले मुख्य वैशिष्ट्य आहे.
यावेळी डॉ. Mukhtar Mulla सर खास भेटण्यास आले होते .सन्मित्र दाहर मुजावर आणि मुख्तार सरांशी बराच वेळ छान गप्पा झाल्या.
याप्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, जेष्ठ महिला नेत्या श्यामला सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, छायावती देसले, अर्चना राऊत, अबुबकर लांडगे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर मनीषा गरुड, कौशल्य विकास विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, सुप्रिया पोहरे, ग्राहक विभागाचे अध्यक्ष जेवियर अँथनी, इस्माईल संगम, भास्कर नारखेडे, उमेश बनसोडे, योगेश बहिरट, सुधीर गायकवाड, रवी कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मित्रांनो द्वेष करणे सोप्पे असले तरी प्रेम करणे healthy आहे त्यामुळे प्रेम पसरवत राहूया.
माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है?
संकेत मुनोत
8668975178
Comment, Share ,Follow and Subscribe.