जगातील गुंतवणूक क्षेत्रातील गुरू मानले जाणारे चार्ली मंगर यांचे आज वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले
काय-काय संकटे एका माणसावर यावीत?घटस्फोट झाला ज्यात सगळे गमावले. 3 मुलांची जबाबदारी आली त्यातील एका मुलाला कॅन्सर झाला,त्यात health insurance नसल्याने त्याच्या कॅन्सर चा खर्च करता-करता सगळे पैसे तर संपलेच पण त्यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी झाले .त्या मुलाचा मृत्यू झाला. वडील गेले , त्यात आयुष्यात अजून काही संकटे आली स्वतःचा एक डोळा गेला, पण ते खचले नाहीत लढत राहिले.
आपल्या देशातील सध्याच्या काही अतिश्रीमंत लोकांच्या कडे पाहून आपल्याला वाटते कि लबाडी केली कि यश पटकन मिळते पण ते जागतिक सत्य नाही
एवढ्या सगळ्या संकटात चार्ली यांना मदत करणारा एकच मित्र होता तो म्हणजे वाचन.
"We both (Charlie Munger and Warren Buffett) insist on a lot of time being available almost every day to just sit and think. That is very uncommon in American business. We read and think."
Spend each day trying to be a little wiser than you were when you woke up. Day by day, and at the end of the day-if you live long enough-like most people, you will get out of life what you deserve.- - Charlie Munger
वॉरन बफे यांना मदत करण्यासाठी चार्ली मंगर यांनी वकिली सोडली. Warren Buffett यांच्या Berkshire या जगविख्यात कंपनी च्या उभारण्यात चार्ली यांचा सिंहाचा वाटा होता.बर्कशायरमध्ये त्यांची गुंतवणूक सुमारे २.२ अब्ज डॉलर इतकी होती. वॉरन बफे यांच्या प्रमाणेच चार्ली मंगर हा गुंतवणूक क्षेत्रातील अखेरचा शब्द होता. बर्कशायरच्या २००२ सालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बफे यांनी मंगर यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. 'तुम्ही चुकत आहात हे तोंडावर सांगणारा सहकारी मिळणं खूप कठीण असतं. अनेक सीईओ चापलूस लोकांच्या गराड्यात वावरत असतात. त्यांच्या मताला आव्हान देणारा व्यक्ती त्यांना नको असतो. आम्ही त्या बाबतीत नशीबवान आहोत, असं बफे म्हणाले होते. त्यावरून मंगर यांच्या स्पष्टवक्तेपणाची कल्पना येते.
एका annual meeting मध्ये त्यांनी Warren Buffett यांना महात्मा गांधी यांचे fatter version असे म्हटले होते. त्यातच ते हेही सांगतात कि " a lot of other people are trying to be brilliant , and we are just trying to stay rattional.
"Money management requires people to pretend they can do something that they can't, and like it when they really don't. I think that's a terrible way to spend your life, but it's very well paid."
शो ऑफ ला त्यांचा विरोध होता. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून वावरायचे. बिटकॉइन हे एक प्रकारचं विष आहे, असं त्यांचं मत होतं.
अनेक तज्ज्ञ यात गुंतवा त्यात गुंतवा म्हणतात तिथे चार्ली स्वतःला घडवण्यासाठी गुंतवायला सांगतात.
*आपले आर्थिक नियोजन व्यवस्थित करणे हीच चार्ली यांना खरी श्रद्धांजली ठरेल
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment