हिंगणघाटहुन जाम या गावी हे सर्व भेटण्यास आले होते , अशोका हॉटेल, जाम येथे गप्पा एवढ्या रंगल्या की ते सर्वोदय आश्रम वर्धा पर्यत सोडण्यास आले आणि पुन्हा आश्रमात बसूनही बराच वेळ खूप छान विचारमंथन झाले
अभिजित डाखोरे सरांशी पूर्वी बऱ्याचदा फोनवर बोलणे व्हायचे पण प्रत्यक्ष भेट पहिलीच होती
डावीकडून राजकुमार झोटिंग( सामजिक कार्यकर्ते),श्रीकृष्ण बोढे( प्राध्यापक, अर्थशास्त्र), अभिजित डाखोरे( प्राध्यापक), संकेत मुनोत, डॉ. शिवचरण ठाकूर( सर्वोदयी, नयी तालीम), रमेश झाडे( अध्यक्ष, वर्धा जिल्हा सर्वोदय)
त्यातील काहींचा अल्प परिचय पाहूया
राजकुमार झोटिंग यांच्या मुलाचा अवघ्या 18व्या वर्षी मृत्यू झाला तेव्हा त्यांनी स्वतः अश्या बिकट मानसिक अवस्थेत असतानाही त्याचे अवयवदान केले, त्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ ambulance ही दिली आणि मोठे सामजिक कार्य त्यांच्याकडून सुरू आहे.
अभिजित डाखोरे यांनी 10 वीत असताना लोकमत मध्ये 'बापू हमे माफ करना' लेख लिहला, जो खूप गाजला. सुरेश द्वादशीवार पासून अनेक जणांना वाटले कि कोणी तरी जेष्ठ विचारवंत असावा पण 10 वी तला विद्यार्थी पाहून ते थक्क झाले होते, त्यांनी खूप छान कविता ऐकवल्या
रमेश झाडे हे शेतकरी पण वाचनामुळे गांधींविचारांकडे वळाले त्यांनतर पांढरे गुरुजींच्या एका व्याख्यानात ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी तेव्हापासून इतर वस्त्रांचा त्याग करून फक्त खादीच घालण्याचा संकल्प केला जो आजवर सुरू आहे त्यांनी गांधी विनोबांच्या अनेक भावपूर्ण गोष्टी सांगितल्या.जसे की तुरुंगात गांधी पटेल नेहरू आणि इतर सर्वांना च खूप त्रास दिला जायचा पण त्यांनी त्याचे रसभरीत वर्णन केले नाही उलट तुरुंगाला मंदिर म्हटले...ज्यामुळे कैदी एवढे झाले कि इंग्रजांना तुरुंग कमी पडू लागले.
सृष्टीकडे सगळ्यांची गरज भागवण्याएव्हढे आहे पण एकाचा हव्यास भागवण्याएव्हढे नाही हे गांधीजींचे वाक्य सांगून गांधीविचार आजही कसे अनुकरणीय आहेत हे झाडे काकांनी पटवून दिले..
डॉ शिवचरण ठाकूर, श्रेकृष्ण बोढे यांच्याबद्दल पुन्हा कधी तरी लिहतो
तर पहा गांधी हयात नसतानाही विचारांनी कसे अनेक ठिकाणी जिवंत आहेत आणि तो विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडवत आहेत
देशातील वाढता द्वेष कमी करण्यासाठी या सर्व लोकांना जोडत या विचारांचा प्रसार अधिक वाढवण्याची गरज आहे
संकेत मुनोत
16-12-2021Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment