Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
AddThis code
Saturday, January 20, 2024
Financial Planner संकेत मुनोत यांचे बालेवाडी, पुणे येथील IT कंपनी मध्ये Financial Planning संदर्भात मार्गदर्शन

Thursday, January 11, 2024
'आपल्याला माहित नसलेले विवेकानंद' - विवेकानंद केंद्र कन्याकुमारी , शाखा अंबरनाथ येथे संकेत मुनोत यांनी केलेले व्याख्यान
आज स्वामी विवेकानंद जयंती , राष्ट्रीय युवा दिवस
मागच्या वर्षी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी , शाखा अंबरनाथ येथे विचार मांडण्यासाठी मला बोलवले होते तेव्हा मांडलेले काही विचार
मला समजलेले विवेकानंद
प्रथमतः आपण माझा परिचय करून देताना जे "विवेकानंदांच्या स्वप्नातला तरुण" असे वर्णन केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पण मी स्वतः ला त्यायोग्य मानत नाही.
आज #स्वामी_विवेकानंद जयंती पण बहुतेक ठिकाणी स्वामी विवेकानंदाचे हे दुर्मिळ विचार सांगितलेच जात नाहीत . स्वामी विवेकानंदांचे हे विचार जर प्रत्येकाने वाचले आणि अमलात आणले तर भारतच काय जग सुंदर व्हायला अधिक मदत होईल..
विवेकानंदांचा देव करण्यापेक्षा माणूस म्हणून त्यांनी स्वतःचे ध्येय कसे साध्य केले ते पाहायला हवे "माणसाचा देव अथवा अवतार ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे." समाजात अद्वितीय काम करणार्या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्या-पटणार्या-मानवणार्या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.
स्वामी विवेकानंद बहुसंख्यांना माहीत आहेत, ते त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत केलेल्या भाषणामुळे. त्यांनी त्या सभेत समस्तांना बंधुभगिनी असं संबोधलं, हे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यांच्या मठांना आपण भेटी देतो. गेलं वर्षभर तर त्यांच्या कार्याची महती सांगणारे अनेक लेख छापून आले, अनेक भाषणंही दिली गेली. मात्र या सार्या लेखाभाषणांमध्ये भर होता तो त्यांच्या शिकागोतल्या भाषणावर आणि त्यांनी केलेल्या 'हिंदू धर्माच्या उभारणी'वर.
#एवढेच_विवेकानंद माहित होते
पण स्वामी विवेकानंदाचे विज्ञानवादी,समाजवादी,चिकित्सक असे परखड विचार कुणी सांगितलेच नव्हते
आज विवेकानंदानां केवळ #एका_जातीचे_धर्माचे_पंथाचे_प्रतीक म्हणून पाहीले जात आहे.त्या पार्श्वभूमीवर विवेकानंदांचे विचार आणि त्यांच्या #स्वप्नातला_भारत कसा होता हे समजुन घेणे आवश्यक आहे. धर्माची व्याख्या करताना विवेकानंद म्हणतात, "#माणसाला_माणुस_बनवतो_तो_धर्म. त्यांनी #धर्मांधतेवर_कठोर_प्रहार_केले आहेत.'आपण एक धर्म स्वीकारला तर सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि आपण एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील.इतर धर्मीयांचा आदर करण्याची शिकवण देणाऱ्या विवेकानंदाचा वापर धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी आज केला जात आहे. ते म्हणतात,"जो धर्म अथवा ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही त्यावर माझा विश्वास नाही."#नव्या_देशाचे_स्वप्न पाहताना विवेकानंद म्हणतात की,"आपल्याला #नवा_देव_नवा_वेद_आणि_नवा_धर्म हवा आहे, कारण आपल्याला #नवा_भारत घडवायचा आहे. पुढं ते म्हणतात," #ज्या_ठिकाणी_वेद_नाही_कुराण_नाही_बायबल_नाही_अशा_ठिकाणी_आपल्याला_मानवजातीला_घेऊन_जायचे_आहे माञ, हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबलचा आधार घेऊनच करावे लागेल"
विवेकानंदानी १८९० ते ९३ या काळात भारत उभा-आडवा पिंजुन काढला.लोकांचे प्रश्न जाणुन घेतले.लोकांची हलाखीची परीस्थिती पाहिल्यावर ते अस्वस्थपणे मिञांना पञ लिहून म्हणतात, "भारताचा उद्धार करायला हवा.शिक्षणाचा प्रचार करावयास हवा.सामाजिक अत्याचार नको.जिथं विषमता नसेल, जातीव्यवस्था नसेल.सर्वधमीय एकोप्याने राहतील, असा समाज निर्माण करण्यासाठी विवेकानंद तरुण-तरुणीनां आवाहन करतात.ते म्हणतात," आपण मरणार हे निश्चित आहे पण आपण चांगल्या उद्दिष्टांसाठी मरुया.आपली सर्व कामे आपण आत्मसमर्पणाच्या भावनेने करूया...आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी.माणसे तयार करणे हे कोणत्याही कार्याचे उद्दीष्ट हवे".
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनीही 'शोध स्वामी विवेकानंदांचा' या अप्रतिम पुस्तकात विवेकानंदांच्या विचारधनाचा वेध घेतला आहे. खरे विवेकानंद कसे होते? विवेकानंद हे #समाजपरिवर्तनाच्या_चळवळीतले_अग्रदूत होते. त्यांनी आजन्म विचारधन वाटलं आणि समाजाचं रूप बदलण्यासाठी कृतीही केली. ते वैचारिक लढाया लढले. मतं बदलली, ती मान्य केली. नव्या मतांचा प्रसार केला. स्वामी विवेकानंदांची भाषणं, पत्रं, लेख, मुलाखती यांचा अभ्यास केला, तर असं लक्षात येतं, की त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय होतं भारताला उर्जितावस्था प्राप्त करून देणं हे. त्यांना भारतीय समाज सुखासमाधानानं नांदायला हवा होता. #इथली_गरिबी_अज्ञान_जातिव्यवस्थेमुळे_होणारे_तंट_दुबळ्यांवर_होणारा_अन्याय_कायमचे_दूर_व्हावेत, अशी त्यांची पराकोटीची इच्छा होती. हे काम सहजसाध्य नाही, याची त्यांना जाणीव होती. भारतीय समाजावर #धर्माचा_जातिव्यवस्थेचा_प्रचंड_पगडा_होता. हा पगडा दूर करून जनतेला त्यांचं भलं कशात आहे, याची जाणीव करून देणं हे महत्त्वाचं होतं, आणि अवघं एकूणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंदांनी हे कार्य आयुष्यभर केलं. त्यांनी #संपूर्ण_भारत_पालथा_घातला त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या काळी निषिद्ध असलेलं समुद्रपर्यटन करून ते परदेशातही गेले. अवलोकनातून, मननचिंतनातून तयार झालेले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत राहिले. त्यांच वकृत्व आणि अभ्यासामुळे ते जगभर वेगवेगळ्या देशात हिंडुनही मोदीसारखी मनकी बात सांगु शकले असते व देशप्रेमाच्या गप्पा मारु शकले असते पण त्यांनी तसे केले नाही
'#आजचा_हिंदू_धर्म_हा_धर्म_नव्हे_हा_आहे_सैतानाचा_बाजार!' असं ते उद्वेगानं म्हणाले असले, तरी जगभरातल्या बहुसंख्यांना जगण्यासाठी धर्म लागणार, हे त्यांना मान्य होतं. पण त्यांचा कल कायम धर्माचं खरं स्वरूप समजून घेण्यात आणि समजावून देण्याकडे राहिला. धर्मातल्या अनैतिक, अशास्त्रीय बाबींचं उच्चाटन करण्यासाठी विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे, हे त्यांना ठाऊक होतं आणि म्हणून ते कायम #विज्ञानवादाचे_पुरस्कर्ते राहिले. जपानहून अमेरिकेला जाताना बोटीवर भेटलेल्या जमशेदजी टाटांना त्यांनी विज्ञानाचा अभ्यास करणारी देशी संस्था उभारण्याचा सल्ला दिला, आणि त्यातून बंगळुरूची आज जगप्रसिद्ध असलेली '#आयआयएससी' ही संस्था उभी राहिली.
विवेकानंदांना '#माणूस_घडवणारा_धर्म' अभिप्रेत होता. '#आपण_सर्व_पुस्तके_जाळूया_आणि_स्वतः_विचारकरूया. मी जे बोलतो त्यावर #तुमच्यापैकी कोणी निव्वळ विश्वास ठेवला तर मला वाईट वाटेल. #स्वतः_विचार_करण्याची_शक्ती_तुमच्यात मी जागृत करू शकलो, तर मला आनंद होईल. मला स्त्रीपुरुषांशी बोलण्याची इच्छा आहे, मेंढरांशी नव्हे', असं सांगणार्या विवेकानंदांचे विचार अभ्यासले तर ते काळाच्या किती पुढे होते, हे लक्षात येतं. समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीही त्यांच्या विचारधनाचा भाग आहेत. '#मी_समाजवादी_आहे', असं त्या काळात ते म्हणाले. आंबेडकरांच्या कितीतरी आधी त्यांनी वर्गलढ्यावर भाष्य केलं. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. देशात विज्ञानाचं शिक्षण देणारी विद्यापीठं उभी राहावीत म्हणून धडपडले. '#संन्याशानं_धर्माभ्यासापेक्षा_खेडोपाडी_जाऊन_आजारी_व्यक्तींची_सेवा_करावी', असं सांगत आपल्या शिष्यांना कॉलराग्रस्तांची शुषृशा करायला लावली. लोकांना हाताशी घेऊन गटारं साफ केली. सार्वजनिक आयुष्य जगताना व्यवहारात नीतिमत्ता जपली जावी, म्हणून प्रत्येक हिशेब चोख राहील, याची स्वतः काळजी घेतलीच, पण वेळोवेळी आपल्या शिष्यांना पत्रं लिहून ते याबाबत बजावत राहिले.
अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडुन हा गैरसमज पसरवला जातो कि धर्मांतर हे तलवारीच्या जोरावर केले गेले विवेकानंदांनी त्याच काळात याला ऊत्तर दिलेले आहे
त्यांच्याच शब्दात ते असे
ईसाई और मुसलमान क्यों बनते हैं ? – स्वामी विवेकानन्द
अगर हमारे देश में कोई नीच जाति में जन्म लेता है , तो वह हमेशा के लिए गया – बीता समझा जाता है , उसके लिए कोई आशा – भरोसा नहीं । ( पत्रावली भाग २ , पृ. ३१६ ) आइए , देखिए तो सही , त्रिवांकुर में जहाँ पुरोहितों के अत्याचार भारतवर्ष में सब से अधिक हैं , जहाँ एक एक अंगुल जमीन के मालिक ब्राह्मण हैं,वहाँ लगभग चौथाई जनसंख्या ईसाई हो गयी है ! ( पत्रावली भाग १ , पृ. ३८५ ) यह देखो न – हिंदुओं की सहानुभूति न पाकर मद्रास प्रांत में हजारों पेरिया ईसाई बने जा रहे हैं , पर ऐसा न समझना कि वे केवल पेट के लिए ईसाई बनते हैं । असल में हमारी सहानुभूति न पाने के कारण वे ईसाई बनते हैं । ( पत्रावली भाग ६ , पृ. २१५ तथा नया भारत गढ़ो पृ. १८)
भारत के गरीबों में इतने मुसलमान क्यों हैं ? यह सब मिथ्या बकवाद है कि तलवार की धार पर उन्होंने धर्म बदला । जमींदारों और पुरोहितों से अपना पिंड छुड़ाने के लिए ही उन्होंने ऐसा किया , और फलत: आप देखेंगे कि बंगाल में जहाँ जमींदार अधिक हैं , वहाँ हिंदुओं से अधिक मुसलमान किसान हैं । ( पत्रावली भाग ३ , पृ. ३३०, नया भारत गढ़ो, पृ . १८ )
प्रत्येकाने आपापल्या मनात, आजच्या काळाच्या चौकटीत या महामानवांचे कोणते विचार, कोणती कृती बरोबर वाटते हे ठरवायचे असते. त्यांनी आज आपले विचार कसे मांडले असते, कोणती कृती सांगितली असती, कोणते मार्ग सुचवले असते, हे ठरवायला मदत हवी म्हणून, काळाच्या कोणत्या चौकटीत त्यांनी आपले विचार मांडले, त्यांचा पिंड कोणता होता, कोणत्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आघातप्रत्याघातांत ते घडत होते, हे सारे समजावून घ्यावयास हवे. थोडक्यात काय, तर त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र आपणासमोर यायला हवे.'
विवेकानंदाचे हे विचार आठवण्याचे कारण म्हणजे त्यांनी ज्या नव्या समाजाचे, नव्या धर्माचे, नव्या भारताचे स्वप्न पाहिले होते, ता आज पुर्णपणे धुळीस मिळवले जात आहे. त्यांचे विचार कृतीत आणुन तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहीजे. चला तर मग विवेकानंदाच्या स्वप्नातील भारत आपण साकार करुया.
#राष्ट्रीय_युवक_दिवस
#विवेकवादी_विज्ञानवादी_विवेकानंद
संकेत मुनोत
8668975178
