Author: Bhagat Singh
Title: Different views of new leaders (Naye netaon ke alag alag vicar)
First Published: in Kirti July 1928.
Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
शहाण्याने कोर्टाचीे पायरी चढू नये म्हणतात तसा मी कोर्ट, पोलीस आणि दवाखाना यांच्यापासून चार हात दूरच असतो.
नियमित व्यायाम केला तर दवाखान्याची गरज नाही, वाहतुकीचे नियम पाळले ट्रॅफिक पोलिसांशी संबंध येत नाही. पण कधी कधी काही प्रसंग टाळता येत नाहीत.
पुण्यात कुठल्या कार्यक्रमाला जायचे म्हटले तर बऱ्याचदा पार्किंग शोधायलाच 10-15 मिनिट जातात पण हे जर नाही केले तर नो पार्किंग मधून कधी गाडी उचलून नेतील याचा भरोसा नाही म्हणून तेवढी काळजी घ्यावीच लागते.
असाच काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर चौकातून संचेती हॉस्पिटल रस्त्याकडे जात होतो गाडी डावीकडे वळवली तेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी अडवले. मनात म्हटल कारण काय? डोक्यावर हेल्मेट होते, हेड लाईट, नंबर प्लेट सर्व तर बरोबर होते मग काय कारण असेल बरं? त्यांनी माझ्याकडून चालक परवाना (Driving Licence) घेतला आणि २०० रु ची पावती करायला सांगितले. म्हटल ‘काका चुकल काय पण माझ?’ तेव्हा कळले कि दुभाजकाच्या डाव्या बाजूने जाण्याऐवजी मी उजव्या बाजूने गाडी घेतली होती जेथून डावीकडे वळायला परवानगी नव्हती. त्यांना म्हटले "बोर्ड तरी लावायला हवा होता याबद्दल" , मग म्हटले "जाऊ द्या ना काका एवढ्या वेळेस" पण २०० रु ची पावती करा आणि मगच licence देतो अस त्यांनी बजावलेे. काय करणार?
खिशात हात घातला तर ६० रु निघाले. Debit Card होते पण नोटबंदीचा काळ होता. ६० रु दिले आणि म्हटले जाऊ द्या एवढेच आहेत पण तरीही त्यांनी licence काही दिले नाही. शेवटी sack मध्ये काही आहे का शोधू लागलो त्यात माझेच गांधीजीचे एक पुस्तक होते कुणाला तरी कुरिअर ने पाठवायचे होते ते दिले आणि पुस्तकाची माहिती दिली. त्यानंतर काय झाले काय माहित पण त्यांनी licence आणि ६० रु दोन्ही परत दिले. पुस्तक त्यांच्याकडेच ठेवले आणि जा म्हणाले. "पुस्तक कसे वाटले त्याचा अभिप्राय नक्की द्या असे 2-3दा त्यांना सांगून मी निघालो. "गांधी मजबुरी नाही मजबुती का नाम" याचा प्रत्यय आला.पण मन अस्वस्थ होते "का सोडले बरं?"
दुसर्या दिवशी पुन्हा माहिती घेऊ म्हणून तेथे गेलो तर ज्यांना पुस्तक दिले ते पोलीस तिथे नव्हते दुसरे होते त्यांच्याकडून दंड कसा असतो आणि इतर नियम काय असतात या गोष्टींबाबातीत माहिती घेऊ लागलो. "पोलीस काहीतरी कारण काढून पावती न करता पैसे उकळतात"असा एक समज अनेक लोकांमध्ये आहे याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले कि पोलीस कधीच पैसे मागत नाहीत प्रत्यक्ष्य डेमो तुम्हीच बघा त्यानंतर मात्र जे झाले ते आश्चर्यकारक होते
सिग्नल तोडणार्या दोघांची गाडी अडवली आणि मला जवळ बोलवून निरीक्षण करायला सांगितले. दोघांना २००-२०० रु ची पावती करायला सांगितले. क्रमाने ५० रु आणि नंतर १०० रु देण्याचा प्रयत्न त्यातील एकाने केला शेवटी पोलिसांनी शेवटपर्यंत नकार दिल्याने बर्याच वेळाने त्याने २०० रु ची पावती केली दुसर्याने तर शेवटपर्यंत दिलेच नाहीत.
ट्रॅफिक चे नियम व इतर अनेक बाबतीतील सत्य अधिक जाणून घेण्यासाठी मग पुणे शहराचे मुख्य पोलीस निरीक्षक शंकरराव डामसे यांची भेट घेतली.. त्यांना अनेक प्रश्न विचारले पोलिसांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सणवार आदीच्या सुट्टीबाबत विचारले असता ते म्हणाले कि "आम्हाला स्वतःला जरी सण साजरे करता येत नसले तरी लोक जे सण साजरे करतात त्यातच आमचा सन्मान आहे".हेल्मेट न घातल्यामुळे आज काल कुणाला पकडत नाही याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि पोलीसही शेवटी माणूसच आहे.समोरच्या ३० गाड्यांपैकी ३-४ जन च हेल्मेट घालत असतील तर पोलीस कुणा-कुणाला पकडणार ?
या चर्चेतून हा निष्कर्ष निघाला कि पोलीस तर आपल्या संरक्षणासाठी त्यांचे सणवार, घर परिवार आदी सोडून रात्रंदिवस झटत असतात आपण त्याची जाण ठेवायला हवी.त्यांच्या असण्यामुळेच आपण वेळेवर सुरक्षितपणे आपल्या ठिकाणी जाऊ शकतो
, अपघात होत नाहीत बऱ्याच गोष्टी सुलभ होतात हे लक्षात घ्यायला हवे
याच बाबतचे काही अनुभव मला ही आले
वर्षभरापूर्वी अॉफिसमधुन घरी येत होतो.
पुणे मुंबई हायवेवर पिंपरी वरुन खडकीकडे जात असताना आमच्या कारच्या(company cab) थोडस पुढे भरदाव जाणारी एक बाईक स्लिप झाली बाईकवरील युवकाचे डोके दुभाजकाला जोरात धडकले ,बर्याच लांबपर्यंत तो गाडीसह फरपटत गेला आणि पडला. त्याच्या शेजारुन जाणार्या छोट्या टेंपोचालकाने प्रसंगवधान राखुन ईशारा करुन मागुन येणार्या गाड्यांना थांबवले 1-2 जणाांनी आपली गाडी थांबवुन त्या तरुणाला ऊचलुन बाजुला नेले त्याला किरकोळ मुका मार लागला होता हेल्मेटमुळे डोक्याला कुठलीही दुखापत झाली नव्हती हेल्मेट नसते तर काय झाले असते कुणास ठाऊक??
दोन वर्षांपूर्वी (नोव्हेंबर 2014)माझ्या Cousinचा(आत्येभाऊ)अपघात झाला होता तो पौडरोड सिग्नलवर थांबला होता आणि समोरुन येणार्या एका भरदाव कारने त्याला ऊडवले व कारचालक फरार झाली जवळ असणार्या काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले डोक्याला गंभीर जखम झाली होती 3दिवस तो ICU मध्ये होता आणि नंतर महिनाभर दवाखान्यातच.यात त्याची काहीही चुकी नव्हती तरीही त्याला हे सर्व सहन करावे लागले.यानंतर त्यानेही सांगितले कि हेल्मेट असते तर एवढी जखम झाली नसती.
असाच माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचाही शिक्रापुरजवळ अपघात झाला.शिक्रापुरहुन पुण्याकडे कारने येत असताना एक व्यक्ती अचानक गाडीसमोर आल्याने चालकाने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गाडी दुसरीकडे वळवली तेव्हा ती समोर थांबलेल्या कंटेनरला धडकली आणि थांबली तसे ते डायरेक्ट पुढे ढकलले गेले आणि त्यांच्या डोक्याला आणि हनुवटीला, जबड्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ड्राइवरने सीट बेल्ट लावल्यामुळे त्याला जास्त काही झाले नाही.
हेल्मेट किंवा सिट बेल्ट अतिशय महत्वाचे आहेत.वाहतुकीचे नियम आपल्याच चांगल्यासाठी आहेत ते पाळायलाच हवेत.
एका जवळच्या मित्राला मी हेल्मेटचे महत्व सांगत होतो तर त्याने प्रतिऊत्तरात "नशिबात व्हायचे असेल तर ते कधीही होईल तु हेल्मेट घातल काय किंवा नाही काय ?तरीही वाद प्रतिवाद करुन मी हेल्मेटचे महत्व त्याला पटवून दिलेच.
आपण एवढयाश्या मोबाईलला स्क्रीनगार्ड,कव्हर काय काय लावतो. एका निर्जिव स्क्रीनला एवढ जपतो तो खराब झाला तर दुसरा घेता येतो पण डोके ,आपले शरीर परत मिळेल का? विचार करावा
सर्व मित्रांना विनंती कि हेल्मेट आणि सीट बेल्ट अवश्य वापरावे. सोबतच गाडी चालवताना फोन वापरू नये.
तुम्हाला काही वाटत नसल तरी घरी तुमचे वाट पाहणारे असतात Cousin च्या अपघाताच्या वेळी हे मी स्वत: अनुभवल आहे तर मित्रानो शेवटी एवढेच सांगेन कि नियम पाळा सुरक्षित रहा. ज्या भ्रष्टाचाराच्या नावाने तुम्ही पोलीस किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने खडे फोडता त्या भ्रष्टचाराला मूळ कारण तुम्हीच आहात
So Be The Change you wish see in the World
जो बदल तुम्हाला देशात किंवा जगात घडवायचा आहे त्याची सुरुवात तर स्वतःपासूनच करावी लागेल ना
कोई भी देश परफेक्ट नही होता उसे परफेक्ट बनाना पडता है आणि त्याला तसं बनवण्यासाठी प्रयत्न करूया.
संकेत मुनोत
8087446346