खरच त्यांचेही असते का तुझ्यावर तेवढेच
प्रेम #
म्हटलं प्रेमात ठेवायची नसते अपेक्षा आणि कवितेला नको असते #दाद
शब्दाचे वेगळे अर्थ काढून उगाच कशाला #वाद
ज्याला लहानाचे मोठे केले आणि दिले हृदयाचे #भाग
अश्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारे ही असतातच ना काही #महाभाग
तरीही काय आई त्यांच्यावर प्रेम करणे #सोडून देते
एवढे होऊनही त्याच्याच चुका स्वतःवर #ओढून घेते
रात्र दिवस कष्ट करून ताठ मानेन जगत मोठं करणारे #आई_बाप
सुनेशी काही भांडण झालं तर लगेच झुकुन म्हणतात चूक असेल काही तर , कर आम्हाला #माफ
उगीच आमच्या दोघांमुळे कशाला तुमच्या संसाराला #ताप
तुम्ही फक्त आनंदी रहा , आम्ही होतो इथून #वाफ
पण कस करतात मुले एवढं मोठं #पाप
ज्याने लहानाचे मोठे केले त्यालाच करतात घरातून #साफ
सासू सासऱ्यांचे प्रत्येक गोष्टीत काढणारी #माप
त्यांच्या हृदयाच्या भागासोबत संसार करताना देते त्या हृदयालाच #काप
का विसरून जाते ती कि तीही होणारच कोणाची तरी #आई
इथे केलेले पाप इथेच फेडावे लागेल ना ग #बाई
मानून पहा त्यांनाही तुझे #आईबाप
सुखाने संसार कर मन ठेव #साफ
शब्दांचे कीस करुन काढू नको त्यांचे वेगळे #अर्थ
गैरसमज करून घेऊन नको करू जीवन #व्यर्थ
कशाला तू ठेवतेस सतत त्यांच्यावर #नेम
करून बघ कधी त्यांच्यावरही #प्रेम
आहे आता ते तुझेच ग घर
सगळ्या गोष्टी बाहेर सांगून छाटू नको त्याचे पर
अन्याय वा अत्याचार झाला तर बसू नको शांती
आवाज उचलून कर तू क्रांती
पण शक्यतो तुमच्या समस्या तुमच्यातच सोडव
एकमेकांवर विश्वास ठेवून प्रश्न उत्तरे सोडव
सासूला ही विंनंती कि समज तु तिला तुझी #लेक
नको मागू हुंडा, मन ठेव #नेक( नेक- चांगले)
दृष्ट सासू सारखी करू नको, तू तिचा #छळ
दे तू सुनेच्या ध्येयवादी पंखानाही आशेचे #बळ
उचलू नकोस तू तिच्यावर #हात
दे तिला तिच्या कामात #साथ
बापाला विनंती कि स्वतःची संपत्ती स्वतःजवळ राख
पोराबाळांच्या नावी करून नको करू त्याची राख
असेल सुपुत्र/पुत्री तर स्व कष्टाने कमवेल
असेल कुपुत्र/ पुत्री तर आळसाने गमवेल
कुटुंबप्रमुख म्हणून तुही लाव थोडा धाक
जेणेकरून व्यवस्थित चालेल संसाराचे चाक
मुलीच्या आई वडीलांनो नका घालू संसारात अति लक्ष
तुमच्या लुडबुडीमुळे होईल संसार त्यांचा भक्ष
दोघांनाही करू द्या थोडी सकारात्मक तडजोड
न बदलता आहे तसेच राहणार म्हटले तर होईल नातेसंबंधांची तोडफोड
कुटुंबातील व्यक्तींनो ,
त्याग आणि समर्पणासोबत एकमेकांना द्या एवढे प्रेम
प्रत्येक कुटुंबाला वाटेल व्हावे तुमच्यासारखे सेम
समजा बनला एक तलवार
तर बनू तुम्ही बनू नका तुम्ही ढाल वा तलवार
कारण दोन्हीतही होणार कश्यावर तरी वार
त्यापेक्षा बनून जा म्यान
समोरच्याला तुमच्यात सामावून घ्या छान
कधीही देऊ नका एकमेकांना त्रास
बना एकमेकांचं हृदय आणि एकमेकांचा श्वास
संकेत मुनोत
8087446346