AddThis code

Thursday, July 5, 2018

त्या जोरात येणाऱ्या लाटा

त्या जोरात येणाऱ्या लाटा
आणि अंगावर येणारा काटा
त्यातून होणारा फेस
आणि तिचे उडणारे सुंदर केस
अनुभवून तो मंद मंद वारा
अंगावर येतो शहारा
तिथे रचून शिंपल्यांची रास
जुळवूया राणी आपले श्वास
माझिया मनाला एवढीच आस
कधीच संपू नये हा आपला सहवास
तुझ्यासोबत जगलेला प्रत्येक श्वास
जणुं न संपणारा प्रेमाचा तास
©संकेत मुनोत
#Konkan
मालवण (कोकण) नक्की पहा
वॉटर गेम्स, रॉक गार्डन, जय गणेश मंदिर तारकल्ली बीच, गोपुरी चा अप्पासाहेब पटवर्धन(कोकण गांधी) यांचा आश्रम आणि तेथील कार्य आवर्जून पाहण्यासारखे असे आहे.

No comments:

Post a Comment