AddThis code

Sunday, July 8, 2018

तुझ्यासोबत जेवण

सहज सुचलेले

तुझ्यासोबत जेवण  |
जणू पृथ्वीवरच हेवन  || (Heaven- स्वर्ग)

जेव्हा तू असतेस आसपास |
मला वाटते एवढे खास ||
कि आपोआप जातात अजून 2 घास |||
तरीही का देतेस ग त्रास?😊 ||||

एवढीच विंनती कि कधीही करू नको माझ्यावर अविश्वास |
तुटून जाईल माझे हृदय आणि संपून जाईल श्वास ||
कारण तूच माझ हृदय आणि तूच माझा श्वास |||

चल मिळून घडवूया त्याग आणि प्रेमाचा असा इतिहास |
नवीन युगाला मिळेल प्रेरणा आणि समर्पणाची आस ||

तू माझं वर्तुळ आणि मी तुझा व्यास
सांगतो तुझ्या प्रेमाचा दास

©संकेत मुनोत

प्रेम , त्याग, समर्पण या अतिशय सुंदर गोष्टी आहेत समोरच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता मिळेल त्याच्यवर (किंवा तिच्यावर)त्या करायला हव्यात
त्यात रंगरूप , स्वभाव आदी पाहू नये आपण सुंदर असलो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सुंदरता दिसते किंवा आपल्या प्रेमामुळे ती गोष्ट आपोआप सुंदर व चांगली होऊ शकते, फक्त चिकाटी व सचोटी हवी.
संकेत

No comments:

Post a Comment