AddThis code

Sunday, July 23, 2023

महाराष्ट्र राज्य गांधी फोरम च्या वतीने पत्रमहर्षी स्व. रंगा अण्णा जोशी ( संचारकार) यांच्या स्मरणार्थ मला पुरस्कार

पुरस्काराबद्दल खूप खूप धन्यवाद
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे ,जेष्ठ नेते मा. उल्हासदादा पवार आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला..
खालील 4 मान्यवरांसोबत पुरस्कार स्वीकारायला मिळणे ही सुद्धा माझ्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट होती.
1.गेली अनेक दशके नर्मदा बचाओ, नयी तालीम चे कार्य करणारे डॉ. Sugan K Baranth
2.मा. प्रा. एम. एन. नवले (सोलापूर) - सिंहगड इन्स्टिट्यूट सारख्या मोठ्या संस्थेचे संस्थापक ७० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान बनले आहेत.
3.प्रा. डॉ. उमाकांत चनशेट्टी - भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. बोरामणी येथे म. गांधीजींच्या 'नई तालीम' संकल्पनेनुसार ग्लोबल व्हिलेज पब्लीक स्कूल व कॉलेजची स्थापना.
4.मा. सम्राट फडणीस- गेल्या ३ दशकापासून प्रसार माध्यमात असून सध्या ते सकाळ मिडीया ग्रुपमध्ये संपादक पदाची जबाबदारी पहात आहेत.
5. संकेत मुनोत - एक साधा मनुष्य
महाराष्ट्र राज्य गांधी फोरम च्या वतीने पत्रमहर्षी स्व. रंगा अण्णा जोशी ( संचारकार) यांच्या स्मरणार्थ देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे ,जेष्ठ नेते मा. उल्हासदादा पवार ,आमदार मा. प्रणितीताई शिंदे, माजी प्राचार्य, विचारवंत, माझे मार्गदर्शक मा. Naresh Badnore , महाराष्ट्र गांधी फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पुरुषोत्तम बलदावा, राज्य अध्यक्ष मा. उपेंद्र ठकार यांच्या प्रमुख उपस्थितीत 13 जुलै 2023 रोजी फडकुले सभागृह, सोलापूर येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते .
आपला आशीर्वाद आणि साथ अशीच नेहमी सोबत राहू द्यावी..😊
गांधी विचारांच्या द्वारे समाजात #प्रेम आणि बंधूभाव पसरवत राहूया...❤️❤️



































सोलापूर

सोलापूर छान शहर आहे. 5-10 मिनिटात एका ठिकाण हुन दुसरी कडे जाता येते. पुण्यात त्यालाच 10 मिनिटे ते 2 तास लागतात.
इथे धार्मिक स्थळे भरपूर आहेत. रिक्षा वाल्याला सांगताना बऱ्याचदा तश्याच खुना सांगाव्या लागतात. उदा एक मावशी राहते मल्लिकार्जुन मंदिराजवळ , एक मावस बहीण राहते रूपा भवानी मंदिर जवळ , पुरस्कार सोहळा जिथे होता तो निर्मलकुमार फडकुले हॉल होता सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ, उतरण्याची जिथे व्यवस्था होती ते डाक घर म्हणजे Guest House सात रस्त्यावर होते. जिथून सात रस्ते फुटतात.
इथे म्हणे 2 च ऋतू असतात उन्हाळा आणि कडक उन्हाळा..त्यामुळे सोलापूरकर पुण्याला घरी आले की त्यांच्या सवयीप्रमाणे 4-5 वर फॅन लावतात आणि आम्हाला थंडी वाजते...
इथे मिरवणुका पण खूप असतात म्हणजे वर्षातील 365 पैकी 282 दिवस कुठली ना कुठली जयंती वा पुण्यतिथी त्यामुळे त्याच्या भव्य मिरवणुकीमुळे काही रस्ते बंद असतात.
सोलापूर मध्ये लोक पटकन आक्रमक होतात आणि "काय बे, तुला ...." असे एक जण दुसऱ्याला म्हणत असल्याचा अनेक ठिकाणी अनुभव आला..
पूनम भोज येथे थाळी छान होती पण service च लवकर देत नव्हते. मी याबद्दल नरेश बदनोरे काकांना बोललो तर ते म्हणाले की इथे पुण्यासारखे नाही , "थांबता येत नाही का?" असे म्हणतील ते.
पार्क जवळ भेळ खाल्ली पण एवढी खास नाही वाटली.
इथली शेंगदाणा पोळी , खवा पोळी मला खूप आवडली. मी तर मावशीला तेच म्हटले की मला जेवण नको पण शेंगदाणा पोळी च गरम करून दे.
इकडे चांगली वैचारिक बैठक असलेले बुध्दी प्रामाण्यवादी असे विद्वान जैन धर्मीयही भेटले. पुण्यात असे वैचारिक बैठक पक्की असलेले कोणी दिसत नाही जैन धर्मियांत.
पुरस्कार सोहळ्यात आणि अन्य एका ठिकाणी माझा मोठा हार देऊन सत्कार झाला. मला कसे तरी वाटले की हा एवढा मोठा हार आणि एवढी फुले हे सगळे एका दिवसातच वाया जाणार. पण सोलापूर चे मासाजी ( मावशी चे मिस्टर) म्हटले की "मोठा हार देणे ही तुमच्या बद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे सोलापूरमध्ये , तुमचा मान असतो तो जेवढा मोठा हार तेवढा जास्त सन्मान". मग मी पुढे मिळणाऱ्या हारांचा हसत स्वीकार केला.
फोटो सिद्धेश्र्वर मंदिरातील...

Comment, Share ,Follow and Subscribe.

शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथे दि 14 जुलै २०२३ रोजी व्याख्यान

शिवाजी हायस्कूल, सोलापूर येथे दि 14 जुलै शुक्रवार रोजी दुपारी 1 ते 3 अनिस सोलापूर शहर शाखा आयोजित *महात्मा गांधी जागतिक प्रभाव: समज गैरसमज* या विषयावर मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत *डॉ सुगनचंद बरंठ* आणि पुणे येथील गांधीवादी विचारवंत *संकेत मुनोत* यांचे व्याख्यान झाले.
यात त्यांनी साध्या सोप्या भाषेत गांधी विचार सांगून मुलांना खादीचे महत्वही सांगितले. व्याख्यनानंतर संकेत मुनोत यांनी गांधींबद्दल काही प्रश्न विचारून उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना गांधींचे पुस्तक पारितोषिक म्हणून दिले. डॉ अस्मिता बालगावकर यांनी "आम्ही प्रकाशबीजे, रुजवित चाललो" या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मुलांना ओळख करून दिली. सोलापुरातील जेष्ठ गांधीवादी नरेश बद्नोरे सर हि सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
DrAsmita Balgaonkar







Comment, Share ,Follow and Subscribe.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या साप्ताहिक बैठकीत मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ सुगनचंद बरंठ व तरूण गांधीवादी विचारवंत संकेत मुनोत

एक धैर्यशील योद्धा: महात्मा गांधी*
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेची साप्ताहिक बैठक निर्मलकुमार फडकुले सभागृह प्रांगणात 13.7.23 रोजी संपन्न झाली. सदर बैठकीत मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ सुगनचंद बरंठ व तरूण गांधीवादी विचारवंत संकेत मुनोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
*डॉ सुगनचंद बरंठ* यांनी सद्य परिस्थितीत गांधीजीच्या विचारधनाची आवश्यकता, खादीचे सद्य स्थितीतही असणारे महत्त्व इ गोष्टींवर मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत कार्य करतानाचे अनेक अनुभवही सांगीतले.
*संकेत मुनोत* यांनी गांधींनी धर्म, राजकारण, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती, महिला हकक इ. अनेक आयामांवर मूलभूत चिंतन आणि कार्य कसे केले होते या बाबत सविस्तर माहिती दिली.
मान्यवरांचे स्वागत जेष्ठ साथी रवींद्र मोकाशी, डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, श्री व्ही डी गायकवाड यांनी पुष्प आणि अनिसचे पुस्तक देवून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अस्मिता बालगावकर यांनी केले. सदर बैठकीस ज्येष्ठ कार्यकर्त्या उषा शहा, मधुरा सलवारू, उषा धडके, संजीवनी देशपांडे, कुंडलिक मोरे, आर डी गायकवाड, डॉ निलेश गुरव, धनाजी राउत, विजय जाधव, मकरंद माने, गोरख गडसिंग, यशवंत फडतरे, नितीन जावळे, रजनीकांत इंगळे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष प्रा शंकर खलसोडे यांनीही मनोगतात गांधी विचारांचे महत्त्व सांगीतले. शेवटी सचिव ब्रम्हानंद धडके यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. अशा प्रकारे बैठक उत्तम प्रकारे पार पडली.
DrAsmita Balgaonkar







Comment, Share ,Follow and Subscribe.

चंद्रकांतजी लोढा भेट

2 वर्षापूर्वी मी आणि माझे मित्र यांनी एक मोहीम सुरू केली होती. की एक एक परिसर पकडायचा आणि त्या परिसरात चातुर्मास करणाऱ्या धर्मगुरूंचे दर्शन घ्यायचे. त्यांच्या कडून त्यांच्या बद्दल , धर्मा बद्दल जाणून घ्यायचे आणि सध्याची देशाची परिस्थिती, गांधी विचार ई. बद्दल ही चर्चा करत त्यांची मते जाणून घ्यायची. आपला गांधी विरोधक ते गांधी प्रेमी बद्दल चा प्रवास त्यांना सांगायचा. बहुतेक ठिकाणी खूप विष पसरलेले होते त्यामुळे संवादाची संधीही मिळाली. पण काही ठिकाणी अभ्यासू साधू साध्वी सुद्धा भेटले.
तर यात साधू साध्वी भेटले तसे श्रावक श्राविका पण भेटले त्यात येरवडा येथील जैन स्थानक जवळ चंद्रकांतजी लोढा यांची भेट झाली. आम्ही जवळपास च विश्रांतवाडी आणि अन्य परिसरातील धर्मगुरूंना भेटून आलो तोपर्यंत सूर्यास्त झाला आणि येरवडा येथील तेव्हा चातुर्मास करत असलेल्या साधुंना भेटता आले नाही. पण तेथील स्थानक चे अध्यक्ष चंद्रकांतजी लोढा यांची भेट झाली. ते उद्योजक असून त्यांचा चांगला व्यवसाय आहेच पण सोबत वैचारिक बैठक सुद्धा आहे हे पाहून आनंद वाटला. ही भेट 03 नोव्हेंबर 2021 मध्ये झाली पण त्यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये माझ्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्ती चे जे प्रकाशन आचार्य शिवमुनीजी महाराज साब यांच्या हस्ते झाले त्यातही ते उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर ही वेगवेगळ्या कार्यक्रमात गाठी भेटी होत राहिल्या. आज गुगल फोटोज् मध्ये हा फोटो सापडला म्हटल पोस्ट करू...


Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, June 24, 2023

जोडीदार निवडी बद्दल च्या एका ग्रुप मध्ये झालेली चर्चा आणि त्यात मी मांडलेली मते

जोडीदार निवडी बद्दल च्या एका ग्रुप मध्ये झालेली चर्चा आणि त्यात मी मांडलेली मते कशी वाटतात पहा..
[10/05, 8:10 am] एक सदस्य:
जाती धर्मात लग्न व्हायला हवे कारण लग्नानंतर जी ritual practices असतात त्यामधे काही differences नको यायला. उदा. एखादे कार्य पार पडत असताना तिने/त्याने असे म्हटले की 'आमच्या कडे असं नसतं, तुमच्या कडे जरा वेगळंच आहे, त्यापेक्षा आमच्याकडे चांगल होत ई.' हे differences sort करण्यात वेळ जावू शकतो. म्हणून धर्मातील/समाजातीलच जोडीदार.
हे माझे वैयक्तिक मत आहे.
[10/05, 8:28 am] Sanket Munot : हो ती अडचण आहे . पण मला उलट वाटत की दुसऱ्या धर्मातील जोडीदार असला तर चांगले . एकमेकांच्या वेगळ्या पद्धती समजतात आणि त्या फॉलो करण्यात पण मजा असते.
माझे हिंदू मुस्लिम लग्न झालेले मित्र मैत्रीण ईद- दिवाळी दोन्ही सण छान साजरे करतात
[10/05, 8:52 am] Sanket Munot : शिवाय आपण आपल्याच जाती धर्मात शोधायला गेलो तर पर्याय कमी राहतात. उदाहरणार्थ मी ज्या जाती धर्मात जन्माला आलो त्यात बहुतेक लोक फक्त money minded आहेत. पैशानेच सगळ साध्य होऊ शकते असे त्यातील बहुतेकांना वाटते आणि तेवढेच जग असते. म्हणजे पैसा माझ्यासाठी पण गरजेचा आहे पण फक्त तो म्हणजे काही माझ्या आयुष्याचे ध्येय नाही.
नोकरी व्यवसाय यातून अर्थार्जन करावेच पण स्वतः ला अधिकाधिक उन्नत बनवणे, स्वपरिवर्तन सोबत हळूहळू समाज परिवर्तन पण घडवणे हे माझे ध्येय आहे. पण त्यांना त्याचे महत्व समजत नाही, आणि आपण त्यांना सांगावें तरी कसे?
डॉ अभय बंग यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की तुझं काम unsusual असे आहे तर तुषार गांधी सर बोलले की आम्ही जे काम 60 वर्षात नाही करू शकलो ते याने 7 वर्षात करून दाखवले. म्हणजे कौतुकाने हुरळून जायचे नाही पण माझ्या जाती धर्मातील लोक ज्या कुत्सित दृष्टीने बघतात आणि कमी लेखतात ना की असे शब्द आठवून स्वतः ला ऊर्जा द्यावी लागते. विशेष चिंता जी कोणी जोडीदार होईल तिची वाटते की निदान तिला तरी आपल्या कामाची थोडीशी जाण असावी.
तिने याला कमी लेखले तर मानसिक खच्चीकरणच होणार. कारण आमच्या धर्मातील बहुतेक लोकांची वैचारिक बैठकच नसते. Romantic गप्पा वगैरे मारूच पण कधी तरी मी कधीतरी वैचारिक गप्पा पण मारता याव्यात असे वाटते.
मला इतर जाती धर्मातील मुलींच्या बाबत तसे वाटत नाही कारण त्यांना वाढवताना फक्त पैसा-पैसा ही चाकोरी नसते. तर त्यामुळे जेव्हा आपण या जाती धर्माच्या चौकटी बाहेर जाऊन विचार करू तेव्हा आपल्याला पर्याय अधिक वाढतील आणि वैचारिक प्रगल्भता असणारा जोडीदार मिळणे सोप्पे जाईल.
आयुष्यात पैसा महत्वाचा असला तरी तोच सर्वकाही नसतो. आपण छोट्या-छोट्या गोष्टीतून ही आनंद घेऊ शकतो हे माझ्या जातीधर्मातील लोकांना समजावून सांगणे हे महा कठीण काम आहे.
डॉ अभय बंग- राणी बंग यांनी त्यांना परदेशात आणि इकडच्या शहरात मिळत असलेले लाखो रुपये महिन्याचे पॅकेज नाकारले आणि इकडे गावात जाऊन साधे जीवन स्वीकारले आणि एका ध्येयासाठी जीवन समर्पित केले त्यांच्या मुळे फक्त भारतातलाच नव्हे तर जगातला बालमृत्यू दर कमी झाला . कोट्यवधी रुपये दान करून पण ही गोष्ट कुणाला साध्य करता आली नसती ती त्यांनी गांधी विचार चळवळीच्या माध्यमातून साध्य केली. पण डॉ राणी बंग यांना आपला नवरा काय करतोय याची जाणीव होती आणि त्या संघर्षात त्या त्यांच्या सोबत उभ्या पण होत्या आणि पैसे कमी होते म्हणून काही त्यांचे प्रेम कमी झाले नाही. दोघेही नवनवीन गोष्टी शिकत राहिले आणि एकमेकाची वैचारिक, भावनिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढवत राहिले. हेच महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत त्यांनी जी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात काम केले त्यामुळे त्याकाळच्या सगळ्या ब्राम्हण मंडळींनी त्यांना तीव्र विरोध केला. एखादी ego वाली मूर्ख पत्नी असती तर जोतिबांना म्हणली असती की काय करायचे हे करून आपण भले आपले घर भले पण तसे झाले नाही. त्यांनी त्यांच्या कामाचे महत्व जाणले. त्या काळात स्त्रिया शिकत नसत पण ज्योतिबा म्हटले म्हणून त्या स्वतः तर शिकल्याच पण तेवढ्या पुरते मर्यादित न राहता त्यांनी संघर्ष करून इतरांना शिकवले. आज आपण मुलींसाठी शिक्षणाचा हक्क मिळालेला पाहतो त्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी जर घरात संघर्ष केला असता की मी अशिक्षित च राहणार आणि तुम्ही काय हे फालतू धंदे करताय तर जोतिबांना किती अवघड गेले असते. कदाचित त्या संघर्षातच त्यांचे जीवन गेले असते पण साथ मिळाल्यामुळे दोघेही घडले आणि आज त्यांना पाहून लाखो लोक घडले.
हेच महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी बद्दल पण वाटते. कस्तुरबा नी पूर्वी typical पत्नी प्रमाणे गांधीजींच्या बऱ्याच सुधारणावादी गोष्टींना विरोध केला पण नंतर त्या गोष्टी फक्त स्वीकारल्याच नाही तर भक्कम साथ गांधीजींना दिली. अजूनही जवळपास अशी बरीच उदाहरणे आहेत.
यांना जोडीदाराची साथ मिळाली म्हणून यांचे काम दुपटीने वाढले. त्यामुळे ती निवड काळजी पूर्वक करायला हवी असे वाटते. दोन चांगल्या व्यक्ती चांगले जोडीदार असतीलच असे नाही. मला तर असे वाटते की आधी चांगली मैत्री करावी मग गोष्टी जुळल्या तर हळूहळू प्रेमात पडतो आपण मग वाटल तर लग्ना साठी पुढे जावे नाहीतर दोघांनी चांगले मित्र राहून नवीन जोडराराचा शोध घ्यावा. यात थोडे तरी साम्य पहावे . जसे की एखादा गायक असेल तर त्याला पत्नी गायक नसली तरी निदान त्याचे गाणे ऐकणारी त्याला दाद देणारी रसिक तरी असावी. लेखक असेल तर जोडीदार लेखक नसला तरी किमान जोडीदाराचे लेख तरी आनंदाने वाचणारा, समजून घेणारा असावा. हेच इतर क्षेत्रांच्या बाबतही. Make for Each other कोणी नसते पण थोडे mould for each other व्हायला. आपल्या जोडीदारासाठी स्वतः त नकारात्मक नव्हे तर सकारात्मक बदल करायला हवेत. माझे जीवनातीलच उदाहरण सांगतो मला पूर्वी प्राणी वगैरे आवडायचे पण मी कधी त्यांना हातात उचलून घेतले वगैरे प्रकार केले नाहीत पण माझ्या एक्स पत्नीला कुत्रा मांजर खूप आवडायचे तर तिच्यासोबत फिरायला गेल्यावर मी आपोआप कुठे मांजर किंवा लहान कुत्रा दिसला तर उचलून घेत असे तिला हातात देत असे, ती जे काही काम करे त्याबद्दल मला आदर होता पण तिला मात्र माझे काम , विचार समजत नव्हते मग गैरसमज वाढत गेले आणि नाते तुटले. मी समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही वाचवू शकलो ते नाते. आता तिला मनाजोगा जोडीदार मिळाला ती तिच्या जीवनात आनंदी आहे आणि मला ही कधी तरी जोडीदार मिळेलच. पण हे जर लग्नापूर्वी लक्षात आले असते , तेव्हा जास्त वेळ घेतला असता तर हे जुळणे, तुटणे वगैरे त्रास वाचला असता.
आजकाल आई वडिलांचा हस्तक्षेप पण खूप वाढला आहे लग्नात . एखादी चांगली सकारात्मक गोष्ट सांगितली जोडीदाराला तर त्याचे किंवा तिचे आई वडील त्याला किंवा तिला इंटरेस्ट नाही तर तो नाही करणार , तुम्ही तुमचे करा असे म्हणतात त्यातून जोडीदाराची प्रगती खुंटते. उदा - राजेश ला चालणे , व्यायाम करणे बिलकुल आवडत नसे तर त्याची योगा कोच असलेली पत्नी प्रिया त्याला आग्रह करत असे थोडे चाल, व्यायाम कर पण त्याला इंटरेस्ट नव्हता आणि तब्येत दिवसे दिवस अधिक जाड होत चालली होती पण त्याने ऐकले नाही, त्याच्या आई वडीलांनी प्रियालाच तंबी दिली की तुला करायचं तर तू कर योगा पण तो काही करणार नाही. सेम समीर आणि स्नेहा बद्दल . समीर एक अभ्यासू व्यक्ती होता समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल त्याची मते घेतली जात पण त्याची पत्नी स्नेहा याबाबत बिलकुल विरुद्ध होती तिला वाचनात बिलकुल रस नव्हता आणि आजूबाजूचे काहीही सामान्य ज्ञान नव्हते . समीर ने तिला जे आवडेल ते वाचण्याचा सल्ला दिला पण तिने नकार दिला शिवाय घरचे उलट म्हणाले की नाही वाचणार ती नसले सामान्य ज्ञान तर काय फरक पडतो. इथे खरतर राजेश च्या सी वडीलांनी प्रियाला आणि स्नेहा च्या आई वडीलांनी स्नेहाला याबद्दल आग्रह करायला हवा होता ते काही वाईट सांगत नव्हते. एक शरीर चांगले करण्यासाठी आवश्यक होते तर एक मेंदू अधिक चांगले करण्यासाठी आवश्यक होते पण दोन्ही कडे त्याचे महत्वच समजत नसल्यामुळे जोडीदाराची दमछाक झाली. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी तर कोणी स्वीकारेल पण उणीवा कमी करायला लावेल तो खरा जोडीदार...
लग्न मजबूरी म्हणून नव्हे तर मजबुती म्हणून करावे . त्यातून एकमेकांना भक्कम आधार मिळावा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढावी असे मला वाटते..
संकेत मुनोत

Great Bhet with Friend and Interior Designer Ganesh Chondhe


आज घरी आले होते. मनसोक्त गप्पा झाल्या
खूपच अभ्यासू , प्रामाणिक आणि दिलदार माणूस.लहानपणापासून संघर्षात जीवन गेले.शिक्षण करतांना कमवा आणि शिका या योजनेद्वारे स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.सुरवातीची अनेक वर्षे फेविकॉल आणि अनेक कंपन्यांमध्ये मार्केटिंग, सेल्स अश्या संघर्षाच्या नोकऱ्या करत अनेक रिजनल मॅनेजर पर्यत उत्कर्ष केला, त्यानंतर स्वतःतिल गुणांना वाव देत pesticide चा व्यवसाय सुरु केला हे करताना त्यांनी भारतातील अनेक ऐतिहासिक संग्रहालये आणि इमारतींना वाळवी आणि इतर समस्यांपासून संरक्षित केले, लग्न झाल्यावर पत्नीकडून स्वतःच्या सुप्त कलागुणांना वाव देत इंटिरियर डेकोरेशन शिकले सोबत एवढा पूर्वीचा मोठा अनुभव होताच आणि आज यातूनच एवढा मोठ्ठा टप्पा पार केला.जिथे भल्या भल्या लोकांचे डोक काम करणे थांबते तेथे यांचे सुरु होते.घराचे इंटिरियर करतांना अनेक आकर्षक कल्पना त्यांनी नव्याने आणल्या आहेत आणि तेवढयापुरतेच मर्यादित न राहता त्त्यांनी सामजिक चळवळीत ही मिळेल तसे योगदान दिले आहे knowing Gandhism समूहात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.पुण्यात ट्रॅफिक चे जे cctv कॅमेरे आहेत ते पोलीस कंट्रोल रूम मध्ये पाहण्यासाठी 16 संगणक ठेवणे गरजेचे होते पण कसे ठेवावे ते समजत नव्हते पण सरांनी आपल्या अवलिया बुद्धीने अशी काही रचना पुणे पोलिसांना करून दिली कि ते 16 संगणक तेथे ठेवून निरीक्षण करणे सोपे झाले.स्वतःला त्या क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता सरांनी क्रिकेट आज योगातही चांगले यश मिळवले आहे त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत
मला सर्वात जास्त आवडला तो त्त्यांचा #प्रामाणिकपणा
लिहायचा लवकर श्रीगणेशा करा गणेशजी वाट पाहतोय.
(ओळखीचा संदर्भ- चांगले विचार युवा व्याख्यानमालेत आले होते त्यांनतर समूहाच्या कृतिकार्यक्रमाच्या मिटींगला आले , मग वाई च्या स्नेहसंमेलनात अनेकांना बोलावण्यापासून ते तेथे स्वतःच्या गाडीत घेऊन जाण्यापर्यत अनेक जबाबदाऱ्या त्त्यांनी चोखपणे पार पाडल्या)
#फेसबुकवरीलमैत्री #अवलीयाव्यक्तिमत्व
Comment, Share ,Follow and Subscribe.