AddThis code

Sunday, July 23, 2023

सोलापूर

सोलापूर छान शहर आहे. 5-10 मिनिटात एका ठिकाण हुन दुसरी कडे जाता येते. पुण्यात त्यालाच 10 मिनिटे ते 2 तास लागतात.
इथे धार्मिक स्थळे भरपूर आहेत. रिक्षा वाल्याला सांगताना बऱ्याचदा तश्याच खुना सांगाव्या लागतात. उदा एक मावशी राहते मल्लिकार्जुन मंदिराजवळ , एक मावस बहीण राहते रूपा भवानी मंदिर जवळ , पुरस्कार सोहळा जिथे होता तो निर्मलकुमार फडकुले हॉल होता सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ, उतरण्याची जिथे व्यवस्था होती ते डाक घर म्हणजे Guest House सात रस्त्यावर होते. जिथून सात रस्ते फुटतात.
इथे म्हणे 2 च ऋतू असतात उन्हाळा आणि कडक उन्हाळा..त्यामुळे सोलापूरकर पुण्याला घरी आले की त्यांच्या सवयीप्रमाणे 4-5 वर फॅन लावतात आणि आम्हाला थंडी वाजते...
इथे मिरवणुका पण खूप असतात म्हणजे वर्षातील 365 पैकी 282 दिवस कुठली ना कुठली जयंती वा पुण्यतिथी त्यामुळे त्याच्या भव्य मिरवणुकीमुळे काही रस्ते बंद असतात.
सोलापूर मध्ये लोक पटकन आक्रमक होतात आणि "काय बे, तुला ...." असे एक जण दुसऱ्याला म्हणत असल्याचा अनेक ठिकाणी अनुभव आला..
पूनम भोज येथे थाळी छान होती पण service च लवकर देत नव्हते. मी याबद्दल नरेश बदनोरे काकांना बोललो तर ते म्हणाले की इथे पुण्यासारखे नाही , "थांबता येत नाही का?" असे म्हणतील ते.
पार्क जवळ भेळ खाल्ली पण एवढी खास नाही वाटली.
इथली शेंगदाणा पोळी , खवा पोळी मला खूप आवडली. मी तर मावशीला तेच म्हटले की मला जेवण नको पण शेंगदाणा पोळी च गरम करून दे.
इकडे चांगली वैचारिक बैठक असलेले बुध्दी प्रामाण्यवादी असे विद्वान जैन धर्मीयही भेटले. पुण्यात असे वैचारिक बैठक पक्की असलेले कोणी दिसत नाही जैन धर्मियांत.
पुरस्कार सोहळ्यात आणि अन्य एका ठिकाणी माझा मोठा हार देऊन सत्कार झाला. मला कसे तरी वाटले की हा एवढा मोठा हार आणि एवढी फुले हे सगळे एका दिवसातच वाया जाणार. पण सोलापूर चे मासाजी ( मावशी चे मिस्टर) म्हटले की "मोठा हार देणे ही तुमच्या बद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे सोलापूरमध्ये , तुमचा मान असतो तो जेवढा मोठा हार तेवढा जास्त सन्मान". मग मी पुढे मिळणाऱ्या हारांचा हसत स्वीकार केला.
फोटो सिद्धेश्र्वर मंदिरातील...

Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment