सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या योद्धा #लेशपाल याच्याशी आज भेट आणि गप्पा झाल्या. एका खऱ्या धैर्यशील योद्ध्या ला 'एक धैर्यशील योद्धा - गांधी' पुस्तक भेट दिल्याचे समाधान मिळाले.
सदाशिव पेठ मध्ये जेव्हा प्रेमात #नकार मिळालेला युवक कोयता घेऊन युवतीच्या मागे पळत होता तेव्हा ती जिवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत होती तेव्हा आसपास चे बहुतेक जण बघ्याची भूमिका घेत दुर्लक्ष करत होते तर काही जण तिने वाचण्यासाठी दुकानात घुसू नये म्हणून आपल्या दुकानाची शटर लावून घेत होते .पण लेशपाल आला आणि त्याने त्याच्या हातातून कोयता ओढून घेत तिचा जीव वाचवला. त्यात त्याच्या हाताला कोयता ही लागला पण त्याने निर्भयतेने हे काम केले. संवेदनशीलतेशिवाय हे शक्य नाही.
त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. "मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत, पण ती घटना घडली, तेव्हा रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला सत्काराला बोलावू नका", अशी प्रतिक्रिया लेशपाल याने काही दिवसांच्या पूर्वी न्यूज चॅनेल वर दिली होती.
महात्मा गांधी बद्दल प्रश्न विचारला असता त्यांचे विचार आणि जीवन प्रेरणादायी वाटत असल्याचे त्याने सांगितले. सध्या तू फक्त राज्याचाच नव्हे तर देशाचा हिरो बनला आहेस. पण सध्या देश वेगळ्याच संकटातून जात आहे. जात धर्म वर्ग लिंग यातील तेढ आणि त्यातून द्वेष, हिंसा आणि दंगली प्रचंड वाढल्या आहेत. Proud to be Hindu, proud to be jain, proud to be Muslim ,....etc म्हणत आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ म्हणणाऱ्या कट्टर लोकांची संख्या वाढत आहे proud to be human म्हणण्याची आज गरज आहे.
त्यामुळे द्वेष आणि हिंसा कमी करण्यासाठी गांधीविचार कसे महत्वाचे आहेत याबद्दलही तू मांडणी करावी अशी विनंती यानिमित्ताने मी त्याला केली अणि त्याने ती मान्यही केली.
महात्मा गांधींनी म्हटले आहे की "तुमच्या समोर कुठल्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर शांत बसू नका अहिंसेने प्रतिकार करा , अहिंसा झेपत नसेल तर हिंसेचा अवलंब करा पण भीतीने घरात बसू नका" हे पुस्तकातील वाक्य त्याला दाखवले.
Jaihind People's Movement - जयहिंद लोकचळवळ आणि knowing Gandhi चळवळीची ही यानिमित्ताने माहिती दिली .
महा अनिस तर्फे प्रेम आणि हिंसा या विषयावर चर्चासत्र ठेवले होते ज्यात विविध मान्यवरांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यात लेशपाल ने ही आपली मनोगत व्यक्त केले.
संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment