अरिहंत जागृती मंच च्या 2023 च्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे मुख्य वक्ते डॉ. Shripal Sabnis यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्षापासून सरांच्या बद्दल ऐकत होतो एकदा मेसेज वर भेटण्या संदर्भात बोलणे पण झाले होते पण प्रत्यक्ष भेट राहून गेली होती ती आज झाली आणि जेवतांना छान गप्पा पण झाल्या.
सामाजिक कार्यातून हळूहळू ब्रेक घेण्याबद्दल मागे लिहले होते पण मग नुसते बसून करणार काय आपली energy कुठे तरी utilize करायला हवी ना? सामजिक नाही तर धार्मिक कार्यात सहभाग घेतला. जैन धर्माचे भारतीय संस्कृतीत योगदान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती ज्यात मुख्य भाषण श्रीपाल सबनीस यांचे झाले जे अप्रतिम होते. कुठल्याही विषयावर सरांचा अभ्यास आणि मांडणी ऐकणे हा अप्रतिम अनुभव असतो. आत्तापर्यंत 391 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment