AddThis code

Saturday, June 24, 2023

जोडीदार निवडी बद्दल च्या एका ग्रुप मध्ये झालेली चर्चा आणि त्यात मी मांडलेली मते

जोडीदार निवडी बद्दल च्या एका ग्रुप मध्ये झालेली चर्चा आणि त्यात मी मांडलेली मते कशी वाटतात पहा..
[10/05, 8:10 am] एक सदस्य:
जाती धर्मात लग्न व्हायला हवे कारण लग्नानंतर जी ritual practices असतात त्यामधे काही differences नको यायला. उदा. एखादे कार्य पार पडत असताना तिने/त्याने असे म्हटले की 'आमच्या कडे असं नसतं, तुमच्या कडे जरा वेगळंच आहे, त्यापेक्षा आमच्याकडे चांगल होत ई.' हे differences sort करण्यात वेळ जावू शकतो. म्हणून धर्मातील/समाजातीलच जोडीदार.
हे माझे वैयक्तिक मत आहे.
[10/05, 8:28 am] Sanket Munot : हो ती अडचण आहे . पण मला उलट वाटत की दुसऱ्या धर्मातील जोडीदार असला तर चांगले . एकमेकांच्या वेगळ्या पद्धती समजतात आणि त्या फॉलो करण्यात पण मजा असते.
माझे हिंदू मुस्लिम लग्न झालेले मित्र मैत्रीण ईद- दिवाळी दोन्ही सण छान साजरे करतात
[10/05, 8:52 am] Sanket Munot : शिवाय आपण आपल्याच जाती धर्मात शोधायला गेलो तर पर्याय कमी राहतात. उदाहरणार्थ मी ज्या जाती धर्मात जन्माला आलो त्यात बहुतेक लोक फक्त money minded आहेत. पैशानेच सगळ साध्य होऊ शकते असे त्यातील बहुतेकांना वाटते आणि तेवढेच जग असते. म्हणजे पैसा माझ्यासाठी पण गरजेचा आहे पण फक्त तो म्हणजे काही माझ्या आयुष्याचे ध्येय नाही.
नोकरी व्यवसाय यातून अर्थार्जन करावेच पण स्वतः ला अधिकाधिक उन्नत बनवणे, स्वपरिवर्तन सोबत हळूहळू समाज परिवर्तन पण घडवणे हे माझे ध्येय आहे. पण त्यांना त्याचे महत्व समजत नाही, आणि आपण त्यांना सांगावें तरी कसे?
डॉ अभय बंग यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की तुझं काम unsusual असे आहे तर तुषार गांधी सर बोलले की आम्ही जे काम 60 वर्षात नाही करू शकलो ते याने 7 वर्षात करून दाखवले. म्हणजे कौतुकाने हुरळून जायचे नाही पण माझ्या जाती धर्मातील लोक ज्या कुत्सित दृष्टीने बघतात आणि कमी लेखतात ना की असे शब्द आठवून स्वतः ला ऊर्जा द्यावी लागते. विशेष चिंता जी कोणी जोडीदार होईल तिची वाटते की निदान तिला तरी आपल्या कामाची थोडीशी जाण असावी.
तिने याला कमी लेखले तर मानसिक खच्चीकरणच होणार. कारण आमच्या धर्मातील बहुतेक लोकांची वैचारिक बैठकच नसते. Romantic गप्पा वगैरे मारूच पण कधी तरी मी कधीतरी वैचारिक गप्पा पण मारता याव्यात असे वाटते.
मला इतर जाती धर्मातील मुलींच्या बाबत तसे वाटत नाही कारण त्यांना वाढवताना फक्त पैसा-पैसा ही चाकोरी नसते. तर त्यामुळे जेव्हा आपण या जाती धर्माच्या चौकटी बाहेर जाऊन विचार करू तेव्हा आपल्याला पर्याय अधिक वाढतील आणि वैचारिक प्रगल्भता असणारा जोडीदार मिळणे सोप्पे जाईल.
आयुष्यात पैसा महत्वाचा असला तरी तोच सर्वकाही नसतो. आपण छोट्या-छोट्या गोष्टीतून ही आनंद घेऊ शकतो हे माझ्या जातीधर्मातील लोकांना समजावून सांगणे हे महा कठीण काम आहे.
डॉ अभय बंग- राणी बंग यांनी त्यांना परदेशात आणि इकडच्या शहरात मिळत असलेले लाखो रुपये महिन्याचे पॅकेज नाकारले आणि इकडे गावात जाऊन साधे जीवन स्वीकारले आणि एका ध्येयासाठी जीवन समर्पित केले त्यांच्या मुळे फक्त भारतातलाच नव्हे तर जगातला बालमृत्यू दर कमी झाला . कोट्यवधी रुपये दान करून पण ही गोष्ट कुणाला साध्य करता आली नसती ती त्यांनी गांधी विचार चळवळीच्या माध्यमातून साध्य केली. पण डॉ राणी बंग यांना आपला नवरा काय करतोय याची जाणीव होती आणि त्या संघर्षात त्या त्यांच्या सोबत उभ्या पण होत्या आणि पैसे कमी होते म्हणून काही त्यांचे प्रेम कमी झाले नाही. दोघेही नवनवीन गोष्टी शिकत राहिले आणि एकमेकाची वैचारिक, भावनिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढवत राहिले. हेच महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत त्यांनी जी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात काम केले त्यामुळे त्याकाळच्या सगळ्या ब्राम्हण मंडळींनी त्यांना तीव्र विरोध केला. एखादी ego वाली मूर्ख पत्नी असती तर जोतिबांना म्हणली असती की काय करायचे हे करून आपण भले आपले घर भले पण तसे झाले नाही. त्यांनी त्यांच्या कामाचे महत्व जाणले. त्या काळात स्त्रिया शिकत नसत पण ज्योतिबा म्हटले म्हणून त्या स्वतः तर शिकल्याच पण तेवढ्या पुरते मर्यादित न राहता त्यांनी संघर्ष करून इतरांना शिकवले. आज आपण मुलींसाठी शिक्षणाचा हक्क मिळालेला पाहतो त्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी जर घरात संघर्ष केला असता की मी अशिक्षित च राहणार आणि तुम्ही काय हे फालतू धंदे करताय तर जोतिबांना किती अवघड गेले असते. कदाचित त्या संघर्षातच त्यांचे जीवन गेले असते पण साथ मिळाल्यामुळे दोघेही घडले आणि आज त्यांना पाहून लाखो लोक घडले.
हेच महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी बद्दल पण वाटते. कस्तुरबा नी पूर्वी typical पत्नी प्रमाणे गांधीजींच्या बऱ्याच सुधारणावादी गोष्टींना विरोध केला पण नंतर त्या गोष्टी फक्त स्वीकारल्याच नाही तर भक्कम साथ गांधीजींना दिली. अजूनही जवळपास अशी बरीच उदाहरणे आहेत.
यांना जोडीदाराची साथ मिळाली म्हणून यांचे काम दुपटीने वाढले. त्यामुळे ती निवड काळजी पूर्वक करायला हवी असे वाटते. दोन चांगल्या व्यक्ती चांगले जोडीदार असतीलच असे नाही. मला तर असे वाटते की आधी चांगली मैत्री करावी मग गोष्टी जुळल्या तर हळूहळू प्रेमात पडतो आपण मग वाटल तर लग्ना साठी पुढे जावे नाहीतर दोघांनी चांगले मित्र राहून नवीन जोडराराचा शोध घ्यावा. यात थोडे तरी साम्य पहावे . जसे की एखादा गायक असेल तर त्याला पत्नी गायक नसली तरी निदान त्याचे गाणे ऐकणारी त्याला दाद देणारी रसिक तरी असावी. लेखक असेल तर जोडीदार लेखक नसला तरी किमान जोडीदाराचे लेख तरी आनंदाने वाचणारा, समजून घेणारा असावा. हेच इतर क्षेत्रांच्या बाबतही. Make for Each other कोणी नसते पण थोडे mould for each other व्हायला. आपल्या जोडीदारासाठी स्वतः त नकारात्मक नव्हे तर सकारात्मक बदल करायला हवेत. माझे जीवनातीलच उदाहरण सांगतो मला पूर्वी प्राणी वगैरे आवडायचे पण मी कधी त्यांना हातात उचलून घेतले वगैरे प्रकार केले नाहीत पण माझ्या एक्स पत्नीला कुत्रा मांजर खूप आवडायचे तर तिच्यासोबत फिरायला गेल्यावर मी आपोआप कुठे मांजर किंवा लहान कुत्रा दिसला तर उचलून घेत असे तिला हातात देत असे, ती जे काही काम करे त्याबद्दल मला आदर होता पण तिला मात्र माझे काम , विचार समजत नव्हते मग गैरसमज वाढत गेले आणि नाते तुटले. मी समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही वाचवू शकलो ते नाते. आता तिला मनाजोगा जोडीदार मिळाला ती तिच्या जीवनात आनंदी आहे आणि मला ही कधी तरी जोडीदार मिळेलच. पण हे जर लग्नापूर्वी लक्षात आले असते , तेव्हा जास्त वेळ घेतला असता तर हे जुळणे, तुटणे वगैरे त्रास वाचला असता.
आजकाल आई वडिलांचा हस्तक्षेप पण खूप वाढला आहे लग्नात . एखादी चांगली सकारात्मक गोष्ट सांगितली जोडीदाराला तर त्याचे किंवा तिचे आई वडील त्याला किंवा तिला इंटरेस्ट नाही तर तो नाही करणार , तुम्ही तुमचे करा असे म्हणतात त्यातून जोडीदाराची प्रगती खुंटते. उदा - राजेश ला चालणे , व्यायाम करणे बिलकुल आवडत नसे तर त्याची योगा कोच असलेली पत्नी प्रिया त्याला आग्रह करत असे थोडे चाल, व्यायाम कर पण त्याला इंटरेस्ट नव्हता आणि तब्येत दिवसे दिवस अधिक जाड होत चालली होती पण त्याने ऐकले नाही, त्याच्या आई वडीलांनी प्रियालाच तंबी दिली की तुला करायचं तर तू कर योगा पण तो काही करणार नाही. सेम समीर आणि स्नेहा बद्दल . समीर एक अभ्यासू व्यक्ती होता समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल त्याची मते घेतली जात पण त्याची पत्नी स्नेहा याबाबत बिलकुल विरुद्ध होती तिला वाचनात बिलकुल रस नव्हता आणि आजूबाजूचे काहीही सामान्य ज्ञान नव्हते . समीर ने तिला जे आवडेल ते वाचण्याचा सल्ला दिला पण तिने नकार दिला शिवाय घरचे उलट म्हणाले की नाही वाचणार ती नसले सामान्य ज्ञान तर काय फरक पडतो. इथे खरतर राजेश च्या सी वडीलांनी प्रियाला आणि स्नेहा च्या आई वडीलांनी स्नेहाला याबद्दल आग्रह करायला हवा होता ते काही वाईट सांगत नव्हते. एक शरीर चांगले करण्यासाठी आवश्यक होते तर एक मेंदू अधिक चांगले करण्यासाठी आवश्यक होते पण दोन्ही कडे त्याचे महत्वच समजत नसल्यामुळे जोडीदाराची दमछाक झाली. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी तर कोणी स्वीकारेल पण उणीवा कमी करायला लावेल तो खरा जोडीदार...
लग्न मजबूरी म्हणून नव्हे तर मजबुती म्हणून करावे . त्यातून एकमेकांना भक्कम आधार मिळावा. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रगल्भता वाढावी असे मला वाटते..
संकेत मुनोत

No comments:

Post a Comment